दोस्ता...
(प्रेरणा: आदूबाळ यांची समर ऑफ ६९ ची अनुवादित रचना पाहिली, आणि मीही एका इंग्रजी मालिकेच्या
प्रारंभगीताचा मराठीत केलेला हा प्रयत्न .... )
जरी न दिली तुज कोणी कल्पना याची,...
आंधळी खडतर वाट मित्रा, ही जीवनाची...
पोटासाठी पाळावी लागे, लाचारी टुकार नोकरीची...
फाटक्या खिशाल्या लाजेखातरही, न साथ कोण्या दमडीची...
पेरणीविना करपून गेली, कोवळी प्रेमशिवारं तुज्या मनीची...
आठदिन माहवर्षे उलटली कैक, कोरड्या रहाटगाडग्याची..
परी तुझ्यासवे तिथे असेन मी, हे जाणून घे तू ...
संकटांच्या वर्षावात जरी पोळलास तू,
तरी तुझ्यासवे तिथे असेन मी, हे उमजून घे तू ...
याजन्मीचा सहोदरच जणु माझा तू ...
तुझ्यासवे तिथे असेन मी,
कारण माझ्यासाठीही असशीलचना दोस्ता तिथे तू ....
कोणती शिरेल? मूळ गाणंपण द्या
फ्रेंड्स
THE REMBRANDTS LYRICS
या गाण्याचे गुगल ने असे भाषांतर केले..
फ्रेण्द्सचे त टायटल साँग का?
टका
*बरोबर
छानच जमलंय. आवडलं.
थॅंक्स
जम्या साहेब... आवडेश हो आवडेश
थॅंक्स