✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

परीकथा - भाग दहा - फेसबूक स्टेटस २.३ - २.४ वर्षे

त
तुमचा अभिषेक यांनी
Wed, 08/03/2016 - 02:07  ·  लेख
लेख
१ जुलै २०१६ मल्हारी आमचे आधीपासूनच फेव्हरेट गाणे. परवा त्याला जरा तडका दिला. मी परीच्या मम्मीचा एक येल्लो कलर कुर्ता घातला आणि त्या गेटअप मध्ये परीसोबत नाचू लागलो. परीच्या मम्मीच्या शिव्या खाऊनही फार धमाल आली. परीलाही नक्कीच आली असणार. कारण काल पुन्हा ती मम्मीचा एक दुसरा कुर्ता घेऊन माझ्याकडे आली.. आणि म्हणाली, "हे घाल तू.. मल्हारी नाचूया" .. मग काय, धिस टाईम विथ ब्ल्यू कुर्ता.. सोबत परी गळ्याभोवती मम्माची ओढणी लपेटून.. आणि पुन्हा एकदा मल्हारी.. बजने दे धडक धडक.. ढोल ताशे धडक धडक :) .. बाकी या अवतारात एखादा सेल्फी काढून फेसबूकवर अपलोड करायचा मोह झालेला.. पण आवरला.. नाहीतर मम्माने त्याच कुर्त्यात गुंडाळून बदड बदड बदडले असते ;) . . ८ जुलै २०१६ लाईफ खूप सिंपल असते आपण उगाच कॉम्प्लीकेटेड करून ठेवतो. त्या दिवशी परीने माझ्या बॅगमधून कॅलक्युलेटर बाहेर काढला. त्याचे स्लाईडींग कवर कसे काढायचे हे तिला थोडावेळ समजले नाही. तसे तिने तो खाली जमिनीवर आपटला... आदळत दोन तुकडे होत कवर वेगळे झाले. काल पुन्हा तिच्या हाती माझा कॅलक्युलेटर लागला. ए हे कसे उघडायचे असा भोळाभाबडा प्रश्न स्वतालाच विचारत, मी काही हस्तक्षेप करायच्या आधीच, ए हे असे उघडायचे म्हणत, तिने तो पुन्हा जमिनीवर आदळला. आणि पुन्हा त्याचे दोन तुकडे होत कवर वेगळे झाले :) खरंच, लाईफ खूप सिंपल असते आपण उगाच कॉम्प्लीकेटेड करून ठेवतो.. . . ९ जुलै २०१६ एक लांबलचक रस्ता असतो.. रस्त्यावर चिटपाखरूही नसते.. डावीकडून हिरो धावत येतो.. उजवीकडून हिरोईन धावत येते.. स्लो मोशनमध्ये.. मध्ये कुठेतरी ते भेटतात.. एकमेकांना मिठी मारतात.. आणि हिरोईनला हिरो उचलून घेतो.. फुल्ल फिल्मी.. सेवंटीपासून नाईंटीपर्यंत बॉलीवूडच्या कित्येक चित्रपटांत पाहिलेले हे द्रुश्य.. काल खरोखर अनुभवले.. पण यावेळचे कलाकार होते.., तीन आठवड्यानंतर भेटणारे आजोबा, आणि त्यांची नात :) . . १३ जुलै २०१६ first Autograph :-) auto 1 स्वताच्या नावापासून लिहायला सुरुवात.. हि चार अक्षरेच तुर्तास.. पण आता पुढचे नाव माझे ;) ते एकदा जमले की पोरीने बापाचे नाव काढले म्हणायला मोकळा :) . . १६ जुलै २०१६ नावांचाही अर्थ असतो.. नावांवरूनही वर्तमान आणि भविष्य ओळखता येते.. काल परीने आपले नाव लिहिताना सहजच अक्षरे उलट सुलट लिहिली.. आणि मला तिच्या नावाचा आणखी एक अर्थ समजला.. R I P A . . Rest in peace .... Abhishek ! :) . . १७ जुलै २०१६ यावेळचा आमचा पावसाळा फुल्ल पैसा वसूल आहे. रोजचाच पाऊस आहे आणि रोजचेच भिजणे आहे. तरीही आमचे मन भरत नाहीये. घरात असलो की खिडकीत बसायचे असते, तर बाहेर पडल्यास कंपाऊंडमध्ये साचलेल्या पाण्यात उड्या मारूनच पुढे जायचे असते. त्यातही जर साचलेल्या पाण्याची पातळी जरा जास्त असेल तर तिला कंपाऊंडबाहेर काढणे एक दिव्य असते. आजही रविवारचे आम्ही तिला सागरविहारला फिरायला घेऊन गेलो होतो. मस्तीची सुरुवातच पडून झाली. थोडे लागलेही. जरा रडली आणि शांत झाली. पण शांत झाली ते शांतच राहिली. एखाद्या फोटोसाठी तरी हस म्हटले, तर त्यालाही तयार नव्हती. तसे मग आता काय ही ईथे काय मजा करत नाही म्हणत तिला शेजारच्या गार्डनमध्ये नेऊ लागलो. ईतक्यातच अचानक पावसाची जोरदार सर आली. पटापट लोकांच्या छत्र्या उघडल्या गेल्या. पण खाडीकिनारच्या सुसाट वार्‍याने त्या कुचकामी ठरू लागताच लोकांनी शेडकडे धाव घेतली. मात्र त्याच वेळी एवढा वेळ शांत असलेल्या या पोरीच्या अचानक अंगात संचारले. पावसाचा पहिला थेंब अंगावर पडताच, झटका आल्यासारखे "पाऊस, पाऊस" ओरडत, चेकाळल्यासारखे त्या मोकळ्या जागेत धावू लागली. मी तिच्या मागे मागे पळत तिच्या डोक्यावर छत्री धरायचा केविलवाणा प्रयत्न करत होतो, पण ती मात्र मला झिडकारून "पप्पा नो, छत्री नको" बोलत पुढे पुढे पळत होती. एकीकडे तिने मजा करावी असेही वाटत होते, पण तब्येतीकडे पाहता फारसे भिजू नये याचीही काळजी घ्यायची होती. सरतेशेवटी तिला सर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन छत्री तिच्या मम्मीच्या हातात देत तिचे मुटकुळे करत उचलले आणि तिथून बाहेर काढले. पण जेवढा वेळ तिथे होती आमच्यासह आजूबाजूच्या सर्व प्रेक्षकांचे मनोरंजन केले :) पावसाची एखादी छानशी सर यावी आणि जावी, पण तेवढ्याश्या वेळात तिने आपल्याला छानसे भिजवून टाकावे. अगदी तसेच हा छोटासा दंगाही आम्हाला विकेंड रिफ्रेशमेंट देऊन गेला :) . . १८ जुलै २०१६ एकदा आपले नाव लिहायला जमू लागताच, आता कुठेपण केव्हापण ... हळूहळू आईबापाच्या एकेक प्रॉपर्टीवर स्वत:चे नाव लिहायला सुरुवात झाली आहे :) auto 2 . . २४ जुलै २०१६ स्टोरी टेलिंग - जंगल, डॉगी आणि पाऊस! एक मोठे जंगल होते. जंगल मध्ये एक डॉगी होता. जंगलमध्ये एक खारूताई होती. खारूताईने डॉगीला खाऊन टाकले. मग जोरात पाऊस आला. स्क्विरल भिजून गेली. कॅटी सुद्धा भिजून गेली. डॉगी भिजला नाssय.. (कदाचित खारूताईच्या पोटात असल्याने भिजला नसावा) मग डॉगीने ब्रश केला आणि तो 'सो' गेला.. मम्मी : सो गेला? म्हणजे? सो गया का? परी : होss.. झोपिंग :P आणि आता हा शब्द कुठून आला या विचाराने आम्ही हैराण :) काही का असेना, स्टोर्या बनवणे आमच्या रक्तातच आहे .. . . २७ जुलै २०१६ फादर फिंगर, फादर फिंगर, व्हेअर आर यू.. हिअर आय एम, हिअर आय एम.. हाऊ डू यू डू.. असे काहीसे ईंग्लिशमध्ये एक बालगीत आहे. ज्यात फादर फिंगरच्या नावाखाली 'अंगठा' दाखवला जातो. पुढे त्यात मॉम्मी फिंगर, ब्रदर फिंगर, सिस्टर फिंगर वगैरे हाताच्या एकेका बोटांवर येतात. हल्ली हे गाणे आमचे फार फेव्हरेट झालेय. त्यात आज्जी, भाऊ, माऊ अश्या स्वताच्या वेरीएशन सुद्धा आम्ही आणतो. तर ते एक झाले. पण काल काय झाले, माझ्या बाजूला खेळत असताना अचानक ती पडली. नेमके माझे लक्ष नव्हते. पडल्याचा जोरात आवाज आला नाही, म्हणजे कुठे आपटली नसावी, एवढेच काय ते समाधान. पण हात पोटाखाली अवघडलेल्या आणि मुरगळलेल्या स्थितीत होता. आणि तिथेच काहीतरी दुखावल्याने ती रडत होती. पण मला काही सांगायला तयार नव्हती. म्हणून उचलून आत तिच्या मम्मीकडे नेले. मम्मीने थोपटून शांत केले आणि विचारले, "काय झाले परी?".. तसे तिच्यासमोर अंगठा नाचवत हुंदके देत म्हणाली, माझ्या 'फादरला' लागले .. :P आईं ग्ग, हसून हसून एक कळ खरंच फादरच्या छातीतून गेली :) .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
बालकथा

प्रतिक्रिया द्या
4268 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

मस्त!

बहुगुणी
Wed, 08/03/2016 - 02:18 नवीन
हेही आवडलं, अडीच वर्षांची चिमणी लिहायला लागली? चांगला कंट्रोल आहे बोटांवर!
  • Log in or register to post comments

हो, वयाच्या मानाने कंट्रोल

तुमचा अभिषेक
Wed, 08/03/2016 - 02:26 नवीन
हो, वयाच्या मानाने कंट्रोल आहे बरा.. गिरवायची आवडही आहे.. पुढची प्रगती पुढेच समजेल.. पण ज्याच्या प्रत्येक पेपरावर अक्षर सुधारावे असा शेरा असायचा, ज्याची चित्रकलेची वही बाईंनी भिरकावून दिलेली, जो आजही शाळाकॉलेजमधील मित्रांमध्ये दिव्य अक्षरासाठी ओळखला जातो, त्या बापासाठी पोरगी एवढ्या लहान वयात त्यापेक्षा चांगले (वाचनेबल) अक्षर काढू लागलीय हेच कौतुकाचे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

बापसे बेटी सवाई!

बहुगुणी
Wed, 08/03/2016 - 02:33 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक

अप्रतिम ! मी फॅन आहे तुमच्या

वेल्लाभट
Wed, 08/03/2016 - 07:39 नवीन
अप्रतिम ! मी फॅन आहे तुमच्या या मालिकेचा
  • Log in or register to post comments

+११११११११

टवाळ कार्टा
Wed, 08/03/2016 - 07:50 नवीन
+११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

+११११११११११११

जगप्रवासी
गुरुवार, 08/04/2016 - 15:26 नवीन
+११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

:)

अजया
Wed, 08/03/2016 - 08:39 नवीन
:)
  • Log in or register to post comments

मस्त रे अभ्या. These are

सनईचौघडा
Wed, 08/03/2016 - 08:53 नवीन
मस्त रे अभ्या. These are the golden days for you. एन्जॉय.
  • Log in or register to post comments

मस्त...

ब़जरबट्टू
Wed, 08/03/2016 - 09:47 नवीन
आवडले..
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलंस रे, अतिशय छान

५० फक्त
Wed, 08/03/2016 - 11:24 नवीन
मस्त लिहिलंस रे, अतिशय छान वाटतंय.
  • Log in or register to post comments

अप्रतिम...! मी तर तुमच्या

प्रफ
Wed, 08/03/2016 - 15:31 नवीन
अप्रतिम...! मी तर तुमच्या परीचाच फॅन आहे. :)
  • Log in or register to post comments

वयाच्या मानाने अक्षर छान आहे

किसन शिंदे
Wed, 08/03/2016 - 15:36 नवीन
वयाच्या मानाने अक्षर छान आहे परीचं.
  • Log in or register to post comments

धन्यवाद :)

तुमचा अभिषेक
Wed, 08/03/2016 - 19:19 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

किती गोड ! आता परीचा फोटो पण

शि बि आय
गुरुवार, 08/04/2016 - 15:07 नवीन
किती गोड ! आता परीचा फोटो पण डकवा लवकर...
  • Log in or register to post comments

धन्यवाद :)

तुमचा अभिषेक
गुरुवार, 08/04/2016 - 21:56 नवीन
धन्यवाद :) पण त्यासाठी देवाने आपल्याला फेसबूक दिले आहे ना :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शि बि आय

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा