"मी न मोजलेले आनंदी क्षण"
मी न मोजलेले कितीतरी आनंदी क्षण
कितीतरी आले. साले मोजायचेच कशाला?
ते त्यावेळी तर उपभोगायचे असतात.
रामदासांच्या आणि सर्वसाक्षांच्या बरोबर,
पारशी बेकरीत खाल्लेल्या गार्लिक ब्रेडची चव विसरीनही कदाचित, पण....
त्यांच्या बरोबरची मैफिल विसरणे कसे शक्य आहे?
त्याच्याच जराशा अलिकडे-पलिकडे,
राणीच्या बागेतले ते नुलकरांच्या बरोबर वृक्षांची ओळख विसरीनही कदाचित, पण....
त्या कट्ट्याच्या निमित्ताने झालेली विमेंची ओळख आणि विमें बरोबर झालेली सात जन्माची दोस्ती कशी विसरेन.
असेच कधीतरी वल्लींच्या बरोबर, लेणी बघण्याचा, की लेण्यांच्या संगतीत रमलेल्या वल्लींना, बघण्याचा बेत ठरतो.
कुणी तरी लगेच धागा काढतो. घारापुरी किंवा असेच कुठलेतरी स्थळ ठरते.
वल्ली आणि वल्लींचे शिष्यगण जमायला जास्त वेळ पण लागत नाही.
बरेच सुंदर क्षण आपोआपच पोतडीत जमा होतात.
कोण कुठला गारूडी (जॅक डॅनियल) आणि पनीरवाले बाबा (दीपक कुवैत) येतात.
परत एकदा मदनबाण अत्तरांच्या कुप्या घेवून येतो.
त्या अत्तरांचा वास विसरीनही कदाचित....पण.....
तलावपाळीच्या साक्षीने झालेला तो कट्टा विसरणे कसे शक्य आहे?
असे बरेच क्षण आयुष्यात आले आणि ते क्षण सतत लक्षांतही राहिले.
आयूष्य हे असेच असते.
उत्तम मित्रांच्या साथीने घालवलेले क्षण आठवत, दिवस सार्थकी लावायचा...की....
उगाच, दू:खाचे उमाळे सोडत, एकलकोंडेपणे, आपलेच आयुष्य काळवंडून घ्यायचे
आयुष्य !
ही तर एकोप्याने राहण्यातली मज्जा आहे...
तो उपभोगायला खरेच वेळ कमी पडतो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मजा आहे, तुम्हाला मित्र तरी
ओ दादा,
+ १
आयला...तुम्ही पण कवीतेच्या
कसली कविता अन कसले काय?
चला करु की :)
काढा धागा....
खिक्क...मी इतक्या लवकर फ्री
व्वा!!!!! व्वा!!!!! मस्त......
पनीरबाबाला ठिकाण सांगितले तर
छान लिहिलंय.
मिपामुळेच केवळ हे शक्य होतं.
वरील सर्वांशी सहमत
माझे ही आनंदाचेच क्षण
श्री. अरूण देशपांडे....
आम्ही ही त्यांच्या विचारावर
अरूण देशपांडे ह्यांच्या स्नेह्यांचा मोबाईल नंबर....
व्यनि केला
बस करो मुवि
बाकी हा लेख निरवानिरवीचा का वाटतोय मला?
वाह...
अरे! सगळेजण भावुक वगैरे झाले
छान लिहिलंय.
कचकून दवणीय
सात जन्माची दोस्ती वेग्रे.........
दवणीय नाही