माहिती / मदत हवी आहे - विश्लेषण
२०१५ नंतर मिपावर माहिती / मदत हवी आहे या विषयावर बरेच धागे आले. गेल्या वर्षभरात (मार्च २०१५ ते फेब्रुवारी २०१६) मिपावर असे किती धागे आले याचा सहजच शोध घेतला. त्याआधीचे धागे विचारात घेतले नाही. त्यातली काही निरीक्षणे खाली देत आहे.
• या कालावधीत एकूण ४४ माहिती / मदत हवी आहे साठी धागे आले. मार्च २०१५ ते डिसेंबर २०१५ - ३७ आणि जानेवारी २०१६ ते फेब्रुवारी २०१६ – ७
• २० पेक्षा जास्त प्रतिसाद असलेले १४ धागे होते. १०-२० प्रतिसाद असलेले १४ धागे होते. १६ धाग्यांवर १० पेक्षा कमी प्रतिसाद आले.
• १० मिपाकरांचा 'माहिती / मदत हवी आहे' हा एकमेव धागा होता.
• १० मिपाकरांचे ५ पेक्षा कमी धागे आले होते. बाकीच्या मिपाकरांचे ५ पेक्षा जास्त धागे आले होते.
• सहलीची माहिती हवी आहे यावर १५ धागे होते. वैद्यकिय मदत यावर ६ धागे होते.
• २५ धागे दोन चार ओळीत आटोपले होते. १९ धाग्यांवर सविस्तर माहिती दिली होती.
आधी असे धागे वाचल्यावर मला नवल वाटायचे, पण आता त्यांची किव येते. जर एखाद्याला काही प्रश्न पडला तर पहिले घरातले सदस्य (आई-बाबा, भाऊ-बहिण, नवरा-बायको) नंतर जवळचे / लांबचे नातेवाईक, शेजारीपाजारी, शाळेतले / कॉलेजमधले मित्र-मैत्रिणी, नंतर ऑफिस / बस / ट्रेनमधले मित्र-मैत्रिणी, नंतर कायअप्पा / चेपूवरचे मित्र-मैत्रिणी या सगळयांकडून माहिती मिळवता येते. आंजावर गूगल / बिंग वापरून शोध घेतल्यावर बरीच माहिती मिळते.
तरीही, ज्यांना कधी प्रत्यक्षात बघितले सुध्दा नाही अश्या तिऱ्हाइकांकडून माहिती घेण्यात काय अर्थ आहे? म्हणजे एकतर तो माणूस एकलकोंडा किंवा माणूसघाणा आहे किंवा त्याला आपल्या जवळच्या लोकांवर अजिबात विश्वास नाही आहे. अश्या धाग्यांवर आत्तापर्यंत तुम्ही त्यापध्दल काय माहिती मिळवली आणि तुम्हाला नक्की काय अपेक्षित आहे हे सविस्तर लिहिले तर प्रतिसाद देणे सोपे जाते.
मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती विचारण्यासाठी सदाहरित धागा असताना आणि सदस्यांसाठी खरडफळयाची सोय असताना ५ -१० प्रतिसादांसाठी प्रत्येक वेळी नविन धागा काढण्याचा अट्टाहास का? 'मदत / माहिती हवी आहे' साठी मिपावर नविन विभाग काढुन दिल्यास किमान त्याचे सगळे धागे एकत्रित वाचता / बघता येतील.
मिपावर आलेल्या मदत / माहिती हवी आहे धाग्यांकडे पाहिल्यावर लवकरच 'प्रेशर कुकर, मिक्सर, वॉशिंग मशिन घ्यायचे आहे - मदत हवी आहे' असे धागे आले तर नवल वाटणार नाही. मिपाची अवस्था बस किंवा रेल्वे स्थानकातल्या चौकशी खिडकी सारखी झाली आहे. कोणीही उठतो आणि 'मदत / माहिती हवी आहे' चा धागा काढतो. हेच का ते दर्जेदार साहित्य देणारे आपले मिपा?
टीप - कोणत्याही सदस्याला / वाचकाला दुखवायचा माझा हेतू नाही. नव-मिपाकरापासुन ते मिपावर जेष्ठ असलेल्या सदस्यांचे धागे असल्याने मी संपुर्ण यादी इथे देत बसलो नाही. मला वाटले ते लिहुन मी मोकळा झालो. आक्षेपार्ह वाटल्यास ठराविक मजकूर अथवा संपूर्ण धागा संपादक मंडळाने अप्रकाशित करावा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हेच का ते दर्जेदार साहित्य
आशयाशी सहमत
भिकार राजकारणी वांझोट्या
+१
आणि
निव्वळ टंकन श्रमात माहितीचा उत्साहाने भरलेला
नुसती उत्साहाने दिलेली माहिती नाही
ज्यांना कधी प्रत्यक्षात बघितले सुध्दा नाही अश्या तिऱ्हाइकांकडून
भातेंनी थोडे इनो घ्यावे
भातेंशी सहमत.
मला वाटलं की कसलं विश्लेषण
मलापण..:) म्हणून उघडत नव्हतो
माझी एक छोटीशी सुचना आहे
मिपावर आलेल्या मदत / माहिती
मुद्दे पटतात पण
हो. तुमचं बरोबर आहे.
-1
बोका
शीर्षक वाचून लेखकाला कसलंतरी
ताजिकिस्तानमध्ये बाळंतशेपा
अवांतर- मी ताजिकिस्तानमध्ये
या
'ताजिकिस्तानमध्ये बाळंतशेपा
अरे वा वा.. माझा एक मुद्दा
सदाहरित धाग्याचा प्रयोग व
निसटत्या बाजू
निसटत्या बाजू २
निसटत्या बाजू ३ - धागा लेखातील व्यक्तिलक्ष्य तर्कदोष
नमस्कार,
अवांतर : ताजिकिस्तानमध्ये बाळंतशेपा
बाळंतशोपा म्हणजे शेपूच्या
गोव्या च्या पर्यतानासंबधी
सदाहरित धाग्यात असे प्रश्न
सात्विक संताप आवडला.
कबुल आहे पण,
एरवी वाचनमात्र आयडींनी जरूर
सहमत आहे.
मदत करताना पण ओळख हवीच का ?
विश्लेषणाचा धागा आणि आलेख
हम्म