✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बार्बारोसा आणि मोसाद च्या लेखकांना विनंती

अ
अत्रन्गि पाउस यांनी
Mon, 03/14/2016 - 13:42  ·  लेख
लेख
जकु आणि बोकोबा, तुमच्या अतिशय उच्च प्रतीच्या लिखाणाची मजा आम्ही सगळे घेत आहोत आणि त्या बद्दल तुम्हा दोघांचे मन:पूर्वक आभार .... काही विनंती वजा सूचना ज्या अमलात आणल्यास किंवा त्यावर स्वतंत्र लेखमाला लिहिल्यास दुधात साखर पडेल ...... १. सम्बन्धित लोकांचे उल्लेख करतांना त्यांचे फोटोवरील डकवले तर ? २. नकाशे टाकून त्यात कोण कुठून कसे गेले हे दाखवले तर ? ३. हे सगळे लोक जेव्हा मूळ कामगिरी करत असतात त्यावेळी त्यांना सपोर्ट करणारी जी यंत्रणा असते ती कशी काम करते ह्यावर एक प्रकाश टाकला तर ..उदा?
  • रसद (इंधन, अन्न, कपडे, संदेश इत्यादी )कोण कशी कुठून पुरवते ?
  • रसदिचे व्यवस्थापन कोण करते ते लोक कधी प्रकाशात आले का ?
  • मोसाद (किंवा कुणीही) चे लोक त्याकाळात इतक्या अगडबंब माहितीचे पृथ:करण कसे करत
  • ह्याने अमुक पासपोर्ट तमुक देशात बनवला किंवा तो इथून तिथे अमुक नावाने गेला हे वाचायला जितके सोपे तितकेच ते करायला कठीण; ह्याचे काही प्रशिक्षण वगैरे दिले जाते का
  • एखादी माहिती उपलब्ध झाल्यावर त्याची खातरजमा करून सत्यासत्यता कशी पडताळून पहात ? त्याचा वापर कसे करत असत ?
  • दुसऱ्या महायुद्धात विशेषत: जर्मनीत इतके जनरल्स होते त्यांचे आपापसात कसे जमायचे ? त्यंच्यात समन्वय कोण साधायचे ?
ह्या लेखमाला किंवा ऐतिहासिक दस्तावेजाचे संकलन हे एक महत्वचे जागतिक पातळीचे मराठीत केले लेखन आहे त्यामुळे वरील बाबी त्याचे मोल अजून वाध्वतील असे वाटते पुनश्च धन्यवाद !!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2822 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

फोटोबद्दल सहमत..

मोदक
Mon, 03/14/2016 - 16:32 नवीन
फोटोबद्दल सहमत..
  • Log in or register to post comments

जाली पासपोर्टची अन

अभ्या..
Mon, 03/14/2016 - 17:30 नवीन
जाली पासपोर्टची अन डोक्युमेंटची टेक्निक थोडीफार मला माहीते. (मी करत नाही) आधी बरेचसे शॉर्ट कट आणि कॉमन तरीके वापरले जात. आता टेक्निकली सुपर काम होते. इथे सांगण्यासारखे मार्ग नाहीत ते. याचेही प्रशिक्षण असणार शुअर. पण हे कलाकारीचे काम आहे.
  • Log in or register to post comments

अभ्या

मी-सौरभ
Mon, 03/14/2016 - 19:50 नवीन
रॉ ला तुझ्या सारख्या कलाकारांची गरज असेल्च भावा. नोकरी साठी अर्ज करुन टाक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

+1

जव्हेरगंज
Mon, 03/14/2016 - 19:16 नवीन
+1 मलाही हेच प्रश्न पडले आहेत!
  • Log in or register to post comments

जी थोडीफार माहिती आहे

बोका-ए-आझम
Mon, 03/14/2016 - 21:09 नवीन
त्यानुसार - कुठल्याही गुप्तचर संघटनेत चार प्रमुख विभाग असतात - Operations, Intelligence, Training आणि Counterintelligence. माहितीचं विश्लेषण करणं हे Intelligence department चं काम आहे. मोसादचं प्रशिक्षण केंद्र किंवा Midrasha चा कोर्स हा जगातल्या सर्वात कठीण courses पैकी एक समजला जातो. त्या हेराला कुठे पाठवलं जाणार आहे यावरून त्याचं advanced प्रशिक्षण ठरतं. मायर अमितने तो संचालक असताना त्याने हा कोर्स चालू केला. तो अजूनही शिकवला जातो. त्याबद्दल मी लिहिणार आहे.
  • Log in or register to post comments

लवकरात लवकर लिहा.

राजू
Mon, 03/28/2016 - 14:38 नवीन
मायर अमितने तो संचालक असताना त्याने हा कोर्स चालू केला. तो अजूनही शिकवला जातो. त्याबद्दल मी लिहिणार आहे.
वाट पाहत आहे.लवकरात लवकर लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

आजुन एक सुचना

प्रणवजोशी
Tue, 03/15/2016 - 06:52 नवीन
लेख जरा शक्य झाल तर लवकर टाका ना.
  • Log in or register to post comments

बोका ए आझम साहेब,

नाना स्कॉच
Tue, 03/15/2016 - 08:47 नवीन
बोका ए आझम साहेब, जमल्यास जितके मोठे भाग लिहिता आहात त्याच्या अर्ध्या अर्ध्या आकाराचे करुन 2 दिवसांच्या गॅप न प्रकाशित करा! तुमचे भाग खुप लांब होतात अन आमच्यासारख्या स्लो लोकांना एकच मैराथन भागातल्या सगळ्या व्यक्ति जागा वगैरे लक्षात घेऊन समजून घ्यायला खुप सायास पडतात, दोन भागात असल्यास सहज पचेल अन रुचेल लेखन , विनंती आहे ही ___/\___ बाकी ते फोटो चे घ्या ज़रा मनावर!
  • Log in or register to post comments

-१

जव्हेरगंज
Tue, 03/15/2016 - 11:19 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

का हो जव्हेरगंज दादा? काय

नाना स्कॉच
Tue, 03/15/2016 - 11:48 नवीन
का हो जव्हेरगंज दादा? काय चुकले आमचे?? (तुमच्या ग्रामीण कथा लै दिवस आल्याल्या नाहीत लिवा की एखादी फर्मास कथा) :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा