टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
अमेरीकेतला आमचा गणपती (मोदकांसहित)
प्रेषक बबलु ( मंगळ, 09/16/2008 - 07:20) .
काही फोटू अमेरीकेतल्या घरातले....

मोदक पण जबरी झाले होते. ताव मारला.



»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

वा..गणपती
वा..गणपती कस्ला मस्त आहे!! कान अगदी सुपासारखे म्हण्तात तसे आहेत.. मूर्ती खूपच आवडली!! कुठून घेतलीत?
मोदकही एकदम मस्त दिसत आहेत..
बरोबर वेगळी मुर्ती
काही म्हणा, एकंदर गणपतीउत्सव लहानपणापासुन आपल्या मनात प्रचंड घर करुन आहे की काय कल्पना नाही पण ती गणपतीची मुर्ती बघताना काही शब्दातीत आनंद मिळतो नाही?
अगदी!! मला
अगदी!! मला गणपतीची मूर्ती एरवीच पाहताना मस्त वाटतं.. गणेशोत्सवात तर अगदी झळाळी आल्यासारखी मस्त दिसते गणपतीची मूर्ती!
आत्ताच अलिकडे मला एका मैत्रिणीच्या घरी जावं लागलं.. तिच्या भल्यामोठ्या घराची थीम होती गणपती!! तिच्या घरात तब्बल २००+ गणपतीच्या मूर्ती आहेत!! असं काहीतरी करेन मी ही माझ्या घरात..
गणपतीबाप्
गणपतीबाप्पा एकदम सात्विक आणि सुंदर आहेत. प्रसन्न वाटलं बघून.
मोदक तर मस्तच दिसताहेत!
बाप्पा..
मूर्ति फार सुरेख,सजावटही छान,प्रसन्न वाटले पाहून.. आणि मोदक तर .. पटकन एक उचलावासा वाटतो आहे..
स्वाती
अगदी अस्सेच म्हणतो
आणि मोदक तर .. पटकन एक उचलावासा वाटतो आहे..
ही पहा -




अगदी हेच म्हणतो!
(मोरयाभक्त)बेसनलाडू
आमच्या गणपतीचीही अगदी अशीच (किंबहुना हीच!) मूर्ती होती असे वाटते. भारत बाजार मधून घेतली काय बबलूशेठ?
आणि हे आमचे मोदक -
बाप्पांची आनखी एक प्रसन्न मुद्रा -
दिव्यांचे ताट -
बबलू आणि
बबलू आणि बेसनलाडू,
सर्वच फोटू सुरेख....!
लालबागच्या राजाचा विजय असो....
तात्या.
बेसनलाडूजी....
मस्त वाटलं पाहून...
जास्वंदाचं फूल सहीच. आम्हाला काही मिळालं नाही.
भारत बाजार मधून घेतली काय बबलूशेठ?
होय होय (लॉरेन्स-रीड वरचं भारत बाजार, सन्निवेल). तीच मूर्ती आहे
बाकी तुमचेही मोदक झकास.
दिव्यांचं ताट तर जबरीच.
....बबलु-अमेरिकन
बरोब्बर
जास्वंदाचं फूल सहीच. आम्हाला काही मिळालं नाही.
साउथ मेन स्ट्रीटवरील जैन मंदिराच्या समोर जी छोटी दुकाने,कॉम्प्लेक्सेस आहेत त्यांच्या आवारात फुटपाथलगत तीन-चार जास्वंदाची झाडे आहेत. त्यांच्यातल्या एकावरून ७-८ काढून आणली
होय होय (लॉरेन्स-रीड वरचं भारत बाजार, सन्निवेल). तीच मूर्ती आहे
असो.
बरोबर. आम्हीही तेथूनच घेतली. आतापर्यंत ज्या ज्या भारतीय वाणसामानाच्या दुकानात गेलो, त्यांत हे माझे सगळ्यात आवडते दुकान. मुख्य म्हणजे इतरांच्या तुलनेत जास्त स्वच्छ आहे
(माहीतगार)बेसनलाडू
क्या बात है..
बबलू/बेसनलाडू,
सहीच आहे.
- नाटक्या...
ता.क.: कट्ट्यावर येताना मोदक जरुर आणा
सहीच!!
मुर्ती एकदम सुरेख!!! जास्वंदाचे फूल आम्हाला पण नाही मिळाले जपानमध्ये