वृद्ध आईसाठी ठाण्यात देखभालीसाठी माहिती हवी आहे
नमस्कार,
मी मि. पा. वर नवीन आहे. मला माझ्या एका वयक्तिक समस्येवर आपणां सर्वांकडून मदत / माहिती हवी आहे.
मी गेली काही वर्षे अमेरिकेत स्थायिक असून, माझी आई ठाण्याला मोठ्या बहिणीकडे राहते. आईचे वय ७८ वर्षे तर बहिण ५४ वर्षे. आत्तापर्यंत आईची सर्व काळजी, बहिणीने घेतली - आजारपण, रुग्णालयात भरती, वगैरे सर्व काही.
सध्या, आई जवळपास अंथरुणावर आहे. गुढघे झिजल्यामुळे, पाऊल नीट पडत नाही व बरेच वर्ष औषधांवर असल्यामुळे, पोटाचा त्रास, बेचैनी असते.
डॉक्टर knee replacement करायला सांगत आहेत, पण या वयात इतर तब्बेत बघता झेपेल की नाही हि शंकाच आहे. वयोमानामुळे, कधीकधी कोणासमोर काय बोलेल तेही सांगता येत नाही, त्यामुळे घरच्या-घरी दुसऱ्या कोणाकडून (नर्स, आया, इत्यादी) शुश्रुषा करवून घेणे कठीणच आहे.
बहिणीला ही काही तब्येतीच्या तक्रारी आहेत, त्यामुळे तीलाही आईची सेवा पूर्णपणे झेपत नाही वा कोणतेही बाहेरचे काम करता येत नाही. पण सर्व जबाबदारी बहिणीवरच आहे.
पूर्वी जेव्हा तब्येत बरी होती तेव्हा आई २-३ वेळा माझ्याकडे काही महिने राहून गेली, पण आता तब्येतीमुळे तेही शक्य वाटत नाही. नोकरी व प्रापंचिक जबाबदार्यांमुळे मला भारतात कायमचे किंवा दीर्घ मुदतीसाठी येणे शक्य नाही.
आम्ही एखादी अशी एक संस्था शोधत आहे, जिथे आईची आपलेपणाने पूर्ण देखभाल केली जाईल, राहण्या खाण्याची सोय आणि २४ तास डॉक्टर उपलब्ध असतील.
ठाणे शहर किंवा जवळपास अशी काही सोय तुम्हाला कोणाला माहितीत असलयास, कृपया मला सांगाल का?
आभारी आहे.
- मधु
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आईची सेवा
वृद्धाश्रम पाहिजे का?
There are palliative care
http://mayacare.com/
मनराव, चांगली माहिती!
व्य नि पाठवला आहे
पुणे येथे अथश्री
मधू_टी, तुमचं काम झालं आहे की नाही माहिती नाही
धन्यवाद
कळव्यात पारसिकनगर ला अशा
पुणे इथील माहिती पाहिजे