एक होते झुरळ

खालीमुंडी पाताळधुंडी's picture
खालीमुंडी पाताळधुंडी in जे न देखे रवी...
24 Feb 2016 - 10:05 pm

एक होते झुरळ,चालत नव्हते सरळ
चालता चालता पडले,गाडीत जाऊन बसले
तिकिट नाही काढले,कंडक्टरने विचारले
तू बाळ कोणाचा,मी बाळ आईचा
आई कुठं गेली कामाला,भूक लागली पोटाला

बालगीत

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

24 Feb 2016 - 10:12 pm | कविता१९७८

बालगीतावर बालगीत वाचायला मिळतायत ,

लकडी की काठी
काठी पे घोडा
घोडे के दुम पे
जो मारा हथोडा
दौडा दौडा दौडा घोडा
दुम उठाके दौडा

टवाळ कार्टा's picture

24 Feb 2016 - 10:49 pm | टवाळ कार्टा

अरे वा

विवेक ठाकूर's picture

25 Feb 2016 - 12:04 am | विवेक ठाकूर

नांव उद्या सांगतो,
शहर परवा सांगतो
आवडी निवडी लपवतो,
खाली मुंडी |

चटकाव मटकाव करतो,
बॉलवाडीत जातो,
दू दू करतो,
पाताळ धुंडी |

विकास's picture

25 Feb 2016 - 12:10 am | विकास

पाडगावकरांच्या विडंबन कवितेतील मुळ ओळी अशा काहीशा आहेतः

एक होते झुरळ, ते चालत नसे सरळ
बसमधे चढले (अजून समथिंग समथिंग)
तिकीट न काढताच, त्याने गाठले परळ
असे होते झुरळ, जे चालत नसे सरळ :)

काळा पहाड's picture

25 Feb 2016 - 6:32 pm | काळा पहाड

एक होतं झुरळ
चालत नव्हतं सरळ..!
तिकडून आली बस...
बसमध्ये बसलं,
तिकीट नाही काढलं....
तिकीटचेकरने पाहीलं,
चिमटीत धरून फ़ेकलं.....!!!

रातराणी's picture

25 Feb 2016 - 12:11 am | रातराणी

बदका बदका नाच रे
तुझी पिल्ले सात रे
एक पिल्लू हरवलं
पोलिसाला सापडलं
पोलिसाने विचारलं
बाळ तू कुणाचा?
मी माझ्या आईचा!

सायकलस्वार's picture

25 Feb 2016 - 12:50 am | सायकलस्वार

एक होते झुरळ,चालत नव्हते सरळ
चालता चालता पडले
,गाडीत जाऊन बसले
तिकिट नाही काढले,कंडक्टरने विचारले
' भXX, झेपत नाही तर एवढी झोकतो कशाला?'

होबासराव's picture

25 Feb 2016 - 6:19 pm | होबासराव

;)

सस्नेह's picture

25 Feb 2016 - 10:08 pm | सस्नेह

एवढा मोठ्ठा भोपळा
आकाराने वाटोळा
त्यात बसली म्हातारी
म्हातारी गेली लेकीकडे
लेकीने केले लाडू
लाडू झाले घट्ट
म्हातारी झाली लठ्ठ्

सुबोध खरे's picture

25 Feb 2016 - 11:35 pm | सुबोध खरे

भंपक