✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

लंबर स्पॉन्डेलिसिस / सायटिका इत्यादी आणि त्यावरील उपचार.

क
कलंत्री यांनी
Mon, 02/15/2016 - 16:55  ·  लेख
लेख
जवळ जवळ १ १/२ महिन्यापूर्वी बराच प्रवास झाला, दगदग झाली, प्रवासात थोडे सामान उचलण्यात आले त्याच बरोबर कंबरेवर ताण पडेल असे वाकुनही काम करावे लागले. याचा परिणाम किंवा कारण असावे, पण पायाला चालताना / उभे राहताना पोटरीमध्ये रग लागु लागली. चालणेही अशक्य आहे असे वाटु लागले. सुरवातीला घरगुती उपचार केले, गरम पाण्याने अथवा बर्फाने शेकणे, मालिश इत्यादे उपचार १० / १२ दिवस केले पण काहीही फायदा झाला नाही. दरम्यान फॅमिली डोक्टर ( आयुर्वेदिक) याची ट्रिटमेंट घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु केले. त्यांनी सांगितले की लंबर स्पाँडेलिसिस / सायटिका असे दुखणे आहे. ओषधाने २ महिन्यात बरे होईल. अनेक हितचिंतकानी बरेच सल्ले दिले की हाडाच्या डॉक्टरांना दाखवावे, एम आर आय करावा इत्यादी इत्यादी. हा आजार कधीही बरा होत नाही फक्त व्यायामाने नियंत्रणात राहतो. कोणताही आजार हा व्यायाम आणि ओषधांनी बरा होतो आणि त्यास काहीतरी काळावधी लागतो हे मान्य करुनही जेंव्हा जेंव्हा पायात वेच्दना येतात तेंव्हा काय करावे हेच समजणे असक्य होत जाते. सध्या योगासाने, तरणतलावत पाण्यात चालणे असे व्यायाम आणि आयुर्वेदिक ओषधे चालु आहेत. मिपाच्या वाचकांना याबद्दल काही माहिती, अनुभव आहे का? कृपया कळवावे हि विनंती.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9355 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

तज्ञांच्या प्रतिसादाच्या

एस
Tue, 02/16/2016 - 10:29 नवीन
तज्ञांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

इथे तुम्हाला नक्की योग्य उपाय मिळेल

सामान्य वाचक
Tue, 02/16/2016 - 11:15 नवीन
आपल्या इथे एक लाख दुखोंकी एक दवा वाले काका पण आहेत
  • Log in or register to post comments

गुण चांगला आला आहे म्हणे

मन१
Tue, 02/16/2016 - 11:47 नवीन
गुण चांगला आला आहे म्हणे . . http://www.misalpav.com/node/18693 . . http://www.misalpav.com/node/18533
  • Log in or register to post comments

Koch's spine/ Pott's disease म्हणजेच spine TB

पर्ण
Tue, 02/16/2016 - 12:38 नवीन
माझ्याही एका २९ वर्षीय नातेवाईकाला असाच त्रास होत होता... जवळ जवळ ४-५ महिने ती औषधे घेत होती मग अचानक एक दिवस तिला बसताच येईना म्हणून हॉस्पिटल मध्ये admit केले गेले... Tractions/ वजने लावण्यात आली नंतर थोडा बरे वाटू लागले आणि मग तिला discharge देण्यात आला... पण लंबर पेन तसाच होता... मग डॉक्टरनी सांगितले कि MRI करावा लागेल तसा MRI केला असता तिला Koch's spine/ Pott's disease म्हणजेच spine TB आहे असे कळले... त्यानंतर 1st लाइन treatment चालू झाली नंतर पण Biopsy करण्यात आली त्यामुळे ती बेड ridden झाली... त्यानंतर पुढील ४-५ महिने ती तशीच होती मग डॉक्टर ने antibiotics चालू केली आणि मग ती हळू हळू उठून बसू लागली चालू लागली आता पण चालते पण अजून posture ठीक नाही आहे डॉक्टर म्हणतात कि इन्फेक्शन कमी होणार तसा फरक पडेल... दुसरा उपाय सर्जरी सांगितलेला पण औषधांनी फरक पडू लागला म्हणून सर्जरी नक्को म्हणाले डॉक्टर.... मी म्हणेन तुम्ही एकदा कलंत्री तुम्ही एकदा MRI करून घ्यावा म्हणजे निदान लागेल आणि योग्य औषधोपचार चालू होतील आणि तुम्ही लौकर बरे व्हाल...
  • Log in or register to post comments

पायाला चालताना / उभे राहताना पोटरीमध्ये रग लागु लागली !

विवेक ठाकूर
Tue, 02/16/2016 - 13:30 नवीन
उपचार म्हणून पाण्यात चालण्याचा फार सायास होतो. त्यापेक्षा, जशी जमतील तशी ही दोन आसनं : Image removed. Image removed. आणि क्षीरबलादी या आयुर्वेदिक तेलानं हिप्स टू हिल्स असा मसाज करा, एक महिन्यात ठीक व्हाल.
  • Log in or register to post comments

पायाला चालताना / उभे राहताना

सुबोध खरे
Tue, 02/16/2016 - 20:36 नवीन
पायाला चालताना / उभे राहताना पोटरीमध्ये रग लागु लागली ! म्हणून आपण वरील दोन आसने सुचवता आहात याला काही शास्त्राधार आहे कि हे आपल्या वाचन मनन चिंतन यातून निघालेला आविष्कार आहे? आणि या आसनामुळे काय होऊ शकते याची आपल्याला कल्पना आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

मलाही काही वर्षापूर्वी असा त्रास झाला होता

विवेक ठाकूर
Tue, 02/16/2016 - 23:15 नवीन
या आसनांमुळे हिप्स टू हिल्स असे सगळे मसल्स स्ट्रेच होऊन तिथले रक्ताभिसरण सुधारले आणि मसल टोन उत्तम झाला . पाहिल्या आसनामुळे स्पाईन फ्लेक्सिबिलीटी वाढली . ऑईल मसाजचाही उपयोग झाला. आता मी हवी ती आसनं करू शकतो आणि रोज दीड ते दोन तास टेबल टेनीस खेळू शकतो . तीन चार किलोमिटर चालणं म्हणजे काही विशेष वाटत नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अर्थात , हा एरिया तुमचा आहे

विवेक ठाकूर
Tue, 02/16/2016 - 23:29 नवीन
मी फक्त माझा अनुभव शेअर केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

ठाकूर साहेब

सुबोध खरे
Wed, 02/17/2016 - 10:37 नवीन
ठाकूर साहेब आपण आपला वैयक्तिक अनुभव येथे मांडलात इथपर्यंत ठीक आहे. आपण सुचवलेल्या आसनानी एखाद्या माणसाची अपूर्ण असलेली स्लिप डिस्क पूर्ण बाहेर पडून माणसाला कमरेखाली लकवा मारू शकतो हे आपल्याला ठाऊक आहे का? किंवा ज्याची डिस्क अजुन मणक्याच्या आत आहे ती बाहेर पडून त्याची पाठदुखी असह्य होऊ शकते असा विचार आपण केलेलाच नाही. तेंव्हा एखाद्या रुग्णाला असा सल्ला देण्यापूर्वी आपणच नव्हे तर इतर सर्व जणांनी जागरूक असणे अतिशय आवश्यक आहे. रच्याकने-- न्हाव्याने केस कापल्यानंतर मन मोडताना मज्जारज्जूला कायमची इजा होऊन. मानेखाली पूर्ण लुळा( दोनही हात आणि पाय) पडलेला माणूस मी पहिला आहे तेंव्हा पासून मी न्हाव्याला मानेला झटका देण्यास बंदी केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

तेच सांगतोय

मन१
Wed, 02/17/2016 - 11:06 नवीन
तेच सांगतोय . एरव्हीही काही बाबींत जिथे तज्ञाशी प्रत्यक्ष भेट आवश्यक आहे; त्या बाबींबद्दल मिपावरनं फक्त संपर्क पत्ते मिळवावेत; प्रत्यक्ष भेट / अपॉइण्टमेण्ट घ्यावी ह्या मताचा मी आहे. फक्त वैद्यकीय बाबी नव्हेत तर अगदि फायनान्शिअल प्लानिंगसुद्धा त्यात आले. कारण आंतरजालावर, ओपन फोरमवर सारेच तपशील आपण उघड करु शकत नाही; मग सल्ला देनारा जेन्युइन असला तरी त्याला इन्पुट्स अर्धवट्च मिलालेले असल्याने सल्ला अचूक असण्याची शक्यता कमी होते. सल्ला देनारा तज्ञ नसला तर प्रश्नच मिटला. पत्ते म्हणजे त्यात सगळेच आले ; अगदि आयुर्वेदिकवाले असोत; नैतर मॉडर्न मेदिसिन किम्वा योगासनवाले. प्रत्यक्ष भेटणेच चांगले आपापल्या स्प्सेसिफिक केससाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

लौकर बरे व्हा

पैसा
Tue, 02/16/2016 - 15:53 नवीन
एका डॉक्टरचे निदान समाधानकारक वाटले नाही तर दुसर्‍याचे मत घ्या. मात्र उपचार चालू ठेवा. लौकर बरे व्हा.
  • Log in or register to post comments

माझे ही दोन शब्द ....

नितीन पाठक
Tue, 02/16/2016 - 15:57 नवीन
नमस्कार , डिसेंबर २०१५ साली मला ही हा त्रास झाला होता. नेहमी प्रमाणे मी आपल्या "मिपा" वर हया आजारावर सल्ला / उपाय मागितला होता. भरपूर चांगले सल्ले मिळाले. त्याप्रमाणे उपाय सुध्दा केले. फायदा झाला. आजारपण दूर झाले. परंतु औगस्ट २०१५ मध्ये घरीच व्यायाम करत असतांना अचानक मणक्याची डिस्क सरकल्याचे जाणवले.(कारण स्टेप चुकली). अगदी ब्रम्हांड आठवले. डोळ्यात पाणीच आले. संपूर्ण शरीर थरथर कापत होते. उभे सुध्दा राहू शकत नव्ह्तो. बोलता येत नव्हते. कसातरी १० मिनीटांनी बोलू शकलो. तसाच झोपलो (कसातरी). आमच्या हाडांच्या डॉक्टरांना दाखवले. पुन्हा एमाआरआय काढला. त्यामध्ये L4-L5 मधील डिस्क सरकून थोडी बाहेर आलेली आहे असे दिसले. मग काय सक्तीची विश्रांती, १५ दिवस झोपून. प्रचंड त्रास झाला. एका अंगावरून दुस-या अंगावर होतांना प्रचंड दुखायचे. रडायचो मी. उजव्या पायात प्रचंड मुंग्या यायच्या. चालता येत नव्हते. दररोज Traction, IFT चालूच होते. फरक काही पडला नाही. असेच १५-२० दिवस निघून गेले. मग नेहमीच्या डॉक्टरकडे न जाता Neurosurgeon कडे गेलो. त्यांनी तपासून मणक्यामध्ये इंजेक्शन घ्यायला सांगितले. हॉस्पिटलमध्ये जाउन खास डॉक्टरांकडून मी माझ्या L4-L5 मणक्यामध्ये इंजेक्शन घेतले. इंजेक्शन घ्यायच्या आधी तेवढी जागा बधीर केली होती. डॉक्टरांनी इंजेक्शन दिले. प्रचंड वेदना झाल्या. परंतु इंजेक्शन दिल्यानंतर लगेच माझे दुखणे एक्दम थांबले. मी चालतच बाहेर आलो. काही दिवस गेले. पुन्हा हाच त्रास सुरू झाला. हळूहळू त्रास होत होता. औषधे चालू केली. फारसा फरक पडला नाही. पुन्हा डॉक्टरांकडे गेलो त्यांनी सांगितले की आता ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. सेकंड ओपिनीयन घेतले त्यांनी तेच सांगितले. शेवटी माझी मोठी बहीण जी पुण्याला रहाते तिने मला खास गाडी करून पुण्याला नेले आणि त्यांच्या ओळखीच्या डॉ. जोग, पौड रोड येथे नेले. डॉ. जोग (वय साधारण ६५-७० वर्षे) यांनी माझी आधीच्या ट्रीटमेंट म्हणजे MRI, IFT ची काहीही न पाह्ता, चौकशी न करता स्वत: तपासले आणि सांगितले की, फार काळजी करू नका. अजून पायात जोर आहे. पाय काही वाया गेला नाही. मी सांगतो ते व्यायाम सकाळ - संध्याकाळ करा. त्यांनी फक्त एका आठवड्याची औषधे दिली आणि पुन्हा १५ दिवसांनी बोलावले. मी घरी आलो. डॉक्टरांनी सांगितलेले व्यायाम केले. थोडा फरक पडला. पुन्हा गेलो. त्यांनी तोच व्यायाम दररोज करावयास सांगितला. साधारण एक - दीड महिना फार काही फरक पडला नाही. व्यायाम नियमित चालू होता. गेल्या महिन्यात मला अचानक पणे बरे वाटायला लागले. पाय दुखणे कमी झाले. सरळ चालता येउ लागले. त्रास कमी झाला. १ फेब्रुवारी मी दररोज सकाळी फिरावयास जायला सुरूवात केली आहे. निष्कर्षः ऑपरेशन शक्यतो टाळावे. व्यायाम नियमीत करावा. सेकंड ओपिनीयन घ्यावे. (प्रतिसाद घाईत लिहीला आहे. चूकभूल द्यावी-घ्यावी)
  • Log in or register to post comments

निष्कर्षः ऑपरेशन शक्यतो

खेडूत
Wed, 02/17/2016 - 10:03 नवीन
निष्कर्षः ऑपरेशन शक्यतो टाळावे. व्यायाम नियमीत करावा. सेकंड ओपिनीयन घ्यावे.
हे येक लंबर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितीन पाठक

हे येक लंबर... लिटरली..!!

गवि
गुरुवार, 02/18/2016 - 16:58 नवीन
हे येक लंबर...
लिटरली..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

फेब्रुवारी २०१५ च्या लेखाची लिंक

नितीन पाठक
Tue, 02/16/2016 - 15:59 नवीन
सोबत मी मिपा वर मागितलेल्या सल्ल्याची (लेखाची) लिंक ................. http://www.misalpav.com/node/30291 धन्यवाद. नितीन पाठक
  • Log in or register to post comments

कबीर बाग बद्दल ऐकले आहे .कोणाला आहे का अनुभव ह्या बद्दल

nandan
Wed, 02/17/2016 - 09:56 नवीन
  • Log in or register to post comments

http://www.kabirbaug.com/

nandan
Wed, 02/17/2016 - 10:16 नवीन
http://www.kabirbaug.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nandan

वडिलांना सायटिका चा त्रास आहे

मम्बाजी सर्वज्ञ
गुरुवार, 02/18/2016 - 16:27 नवीन
वडिलांना सायटिका चा त्रास आहे. त्यांच्याबरोबर कबीर बागेत गेलो होतो काही वेळा. माझे असे मत आहे कि ते फक्त सल्ला देतात. सगळ्या गोष्टी नीट मोनीटर होत असाव्यात असे वाटत नाही. लोकांना वेग वेगळे अनुभव आले आहेत त्यामुळे मी स्वतः कन्फ्युजड आहे. आता वर सांगितल्या प्रमाणे डाक्तर जोग ना संपर्क साधून बघतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nandan

कळकळीचा सल्ला

मन१
Wed, 02/17/2016 - 10:12 नवीन
कळकळीचा सल्ला . वरती चिंटुच्या धाग्याची जी लिंक दिली आहे ना, त्यातले डॉ चिपळूणकर अत्यंत चांगले आहेत. त्यांनीही बोर्डावरच लिहिले आहे की ऑपरेशनचा विचार करण्यापूर्वी एकदा तरी व्हिजिट करा इथे म्हणून. तुमच्या दुखापतीस नेमके असे एखाद दोन सोपे व्यायाम ते सांगतात. ( एकच एक व्यायाम, पद्धत , आसन सर्वांना लागू पडेलच असं नाही. मणक्याच्या वरच्या बाजूकडील भाग दुखावला असेल तर एक आसन/व्यायाम, मधला असेल तर वेगळा, खालचा भाग असेल तर अजून थोडं वेगळं असं काही असणं शक्य आहे. ) थोडक्यात काय, तर एखाद्या तज्ञाकडून तपासून घ्या. मिपा वगैरेवरुन फक्त तज्ञांचे नाव, पत्ते मिळवावेत. प्रत्यक्ष तपासणीत काय ते टह्रवावे. बाकी जालिय सल्ले बहुतांश वेळा बाजूला सारावेत. उदा :- " अमुक अमुक तेल चमचाभर खाउन बघ. गुडघेदुखी कमी होइल " वगैरे स्टाइल किंवा, " उन्हात रोज एक तास ह्या हिशेबाने एक महिना उभा रहा. दुकह्णं कमी होइल " वगैरे. . . डायग्नोसिस / निदान्म जालावर, फोनवर नेमकं शक्य नाही. तेही नॉन-तज्ञ लोकांकडून नकोच. सल्ल्यामागील सद्भावना सम्जू शकतो; पण ते उपचार टाळा . प्लीझ. कळवळीने सांगतो आहे.
  • Log in or register to post comments

हा तो डॉक्टर

मन१
Wed, 02/17/2016 - 10:15 नवीन
https://in.linkedin.com/in/shridhar-chiplunkar-60984414 . . आणि तुम्हाला हा डॉक्टर पटत नसेल , तर दुसर्‍याकडे जा. पण तपासणी करुन काय ते करा. आणि शक्य तितक्या लवकर तपासून घेत चला. ह्या धाग्यावर आसनांची चित्रं वगैरे दिसलीच नाहित असं समजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

खा प्या बरे व्हा

नितीनचंद्र
गुरुवार, 02/18/2016 - 16:42 नवीन
आपण आपल्या डॉक्टर्स ना भेटाल आणि औषधे घ्याल सोबत काही अनुभवाने काही निसर्गाच्या जवळ जायला सुचवतो. व्हिटामिन ई च्या कमतरतेने छोटीशी कंबरदुखी लंबर स्पॉन्डेलिसीस मध्ये परिवर्तीत होतो. व्हिटामीन ई हे स्नायुच्या कार्यक्षमतेशी संबधीत आहे. जर कंबरेचे स्नायु काम करेनासे झाले की मणक्यातील गॅप वाढते किंवा कमी होते. यावर बदाम खाणे किंवा कोरफड ज्युस ( खाण्याचा ) सोबत आवळा ज्युस घेतल्याने व्हिटामीन ई ची कमतरता त्वरीत दुर होतो. बसण्याच्या सवयी सुधारणे. भुजंगासन/ हलासन यासारखी सोपी आसने केल्याने या स्नायुंची रोज कसरत होऊन टोन सुधारतो. अनुभव कळवा.
  • Log in or register to post comments

तुम्ही वर्णन करताय तस्साच

गवि
गुरुवार, 02/18/2016 - 16:55 नवीन
तुम्ही वर्णन करताय तस्साच त्रास एका ट्रिपनंतर सुरु झाला. पोटरीबाबत तुम्ही म्हणताय तेच पण पोटरीसह मांडीचा मागचा भाग वगैरे पूर्ण पायच अफेक्ट झाला होता. कोणत्याही प्रकारे उभं राहून किंवा बसून पायाची रग आणि एकूण त्रास कमी होत नसे. मग एमाराय वगैरे सर्व करणं भाग पडलं. त्याच्या रिपोर्टमधे आणि एकूण त्या डिस्क सरकण्याविषयी जे काही डॉक्टरांनी सांगितलं त्यावरुन आता सर्जरीशिवाय पर्याय नाही असंच दिसलं. पण समहाउ दोनेक महिन्यांत अक्षरशः आपोआप वेदना पूर्ण थांबली आणि आता अनेक वर्षं थांबलेलीच आहे. काळाखेरीज कोणतंही औषध किंवा उपाय केलेला नाही. काय प्रकार आहे कोण जाणे.
  • Log in or register to post comments

आपले आरोग्य आपल्या हातात

नितीनचंद्र
गुरुवार, 02/18/2016 - 17:40 नवीन
गाला पब्लीशर्स चे वरील पुस्तकात सायटीका हे प्रकरण आणि त्यावरचे घरी करता येण्याचे उपाय पहा. आश्चर्य्कारक परीणाम मी स्वतः अनुभवले आहेत. पण वय चाळिस नंतर व्यायम - योगासने आणि मायक्रो डाएट यासारखे काहीच प्रभावी नाही.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

कलंत्री
Fri, 02/19/2016 - 17:49 नवीन
आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. खरड आणि व्यनि ने अथवा मुख्य पानावर सल्ला, सुचना आणि अनुभव मिळाला. जोपर्यंत शरीर स्वस्थ असते तेंव्हा त्याची किंमत समजत नाही. अश्या दुखण्याने माणसाचा आत्मविष्वासच हादरतो. विस्तृत प्रतिसाद फुरसतीने लिहिणच. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा