गाभा:
आनंदी समाधानी जीवन जगण्यासाठी....
पाच रूमचा वेल फर्निशर्ड फ्लॅट, महागडी कार, 40 इंची एलईडी टिव्ही, एेसी, मुलांना इंटरनॅशनल शाळेत अॅडमिशन.
हे सगळे साध्य करण्यासाठी 8 ते 8 नौकरी. बायकोची नौकरी. एकत्र कुटुंब नसल्यामुळे मुलांना पाळणाघरात पाठविणे. सुट्टीच्या दिवशी बाहेर जायची इच्छा नसणे. त्यामुळे नवरा बायकोत चिडचिड. मुलांना मागितले ते मिळाल्यामुळे नाही ऐकायची सवय नसणे. काॅलेजात गेले की मुलांना आय फोन, स्कुटी किंवा बाईक. वयाच्या चाळीशीला हार्ट, बीपी, मधुमेह हे आजार होणे. मग त्यावर डाॅक्टरी इलाज.
प्रकाश आमटे व मदांकिनी आमटे हे डाॅक्टर दाम्पत्य हिमलकसा सारख्या जंगल भागात काही सुविधा नसतांना किती आनंदी जीवन जगतात. नाही तर आपण व आपली मुले सर्व सोयी सुविधा असूनही करमत नाही, बोअर होते म्हणून किरकिर करतो.
प्रतिक्रिया
29 Dec 2015 - 7:16 pm | विश्वव्यापी
ह्या सर्व गोष्टींची खरच गरज नाही.
पण म्हंटात ना स्वता: मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही.
त्या साठीच कदाचित ही सर्व खटपट असावी.
वर नमुद केलेल्या सर्व गोष्टींत सुख व समाधान असेलच हे बहुतेकांना वाटते. ते खरोखरच त्यात नाही हे कुणी सांगितले तर ते पटणार नाही. म्हणून स्वानुभूति साठी ही सर्वांची खटपट असावी.
29 Dec 2015 - 7:28 pm | सुबोध खरे
हे एक सार्वत्रीकरण आहे कि माणसाकडे सुख सोयी असतील तर तो समाधानी नाही.
खेड्यातील लोक जास्त आनंदात आहेत किंवा चाळी तच माणसामाणसात ओलावा असतो. हि जुना काळ चांगला होता सारखी म्हणण्याची एक पद्धत आहे. असे मुळीच नसते.
गावात सर्व लोक समाधानी आहेत असे मुळीच नाही. किंवा सुखवस्तू लोकांना असे चाळीशीला हार्ट, बीपी, मधुमेह सगळे आजार असतात हेही असत्य आहे. गावातील लोकांना तितकेच किंवा जास्त आजार असतात ( कुपोषण,पांडुरोग, तंबाखू जन्य आजार भयावह प्रमाणात आहेत).
प्रकाश आमटे आणी कुटुंबीय हे "अपवाद"च आहेत.
डॉ. अभय बंग यांचे माझा साक्षात्कारी हृदय विकार हे पुस्तक जरूर वाचा.
माझ्या आसपासचे आणी माझे बरेचसे मित्र नक्कीच सुखी समाधानी आहेत. त्यांची मुले सुद्धा व्यवस्थित मार्गाला लागलेली आहेत. शेवटी आई वडिलांचे संस्कार महत्त्वाचे असतात मग ते खेड्यात असोत कि शहरात.
मी स्वतः लष्करात राहून तंबूत किंवा समुद्रात किंवा अंदमान सारखी सुदूर असलेल्या ठिकाणी राहून आलेलो आहे. तेथील कष्ट हे कष्टच असतात. त्याचे उदात्तीकरण करून काही होत नाही. त्या कहाण्या "मिसळपाव" वर वाचायला छान असतात
मुंबईत मिळणाऱ्या सुविधा कुठेही मिळत नाहीत हि मला आलेली अनुभूती आहे. आणी मनाची शांती तुम्ही काय आणी कुठे करता त्यावर अवलंबून असते.
मनाची खोटी समजूत करणे सोडून द्या.
29 Dec 2015 - 7:39 pm | उगा काहितरीच
खरं आहे ! आपल्याकडे गरीबीचे, खेड्याचे विनाकारण उदात्तीकरण केले जाते. याचा अर्थ असा नव्हे की शहरात वा श्रीमंतीतच सुख आहे. सुख ही संकल्पना व्यक्तीपरत्वे, स्थानपरत्वे , कालपरत्वे बदलू शकते . आपल्याकडे लोकांना वाईट सवय आहे , एखाद्याने गाडी घेतली की लगेच 'टेबलाखालून घ्यायला सुरूवात केली वाटते ! ' अशा चर्चा सुरू होतात . विशेषतः मध्यमवर्गीय समाजामध्ये आणी निमशहरी भागात. माझ्या मते भौतिक सुखाला वाईट म्हणन्याच्या उदात्तिकरणाचा हा परिणाम असेल ! असो. तुर्तास इतकेच.
30 Dec 2015 - 12:56 am | डॉ सुहास म्हात्रे
असं कसं, असं कसं. गरीबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडवापेक्षा जास्त गोड असते, त्याचं काय मग ?! ;) =))
30 Dec 2015 - 9:59 am | हेमंत लाटकर
मला गरीबी, गरीबीतच राहावे याचे समर्थन करायचे नाही. जास्तीचा हव्यास गरज आहे का. शेजार्याकडे कार, इंम्पोर्टेड सोफा, एसी, मोठा एलईडी टिव्ही, किचन ट्राॅली आहे मग माझ्याकडे पाहिजे. इंजिनिअर झाले की 50-60 ह. पगार असला की 1 लाख पगाराची पाहिजे, मग परदेशात जास्त पगाराची नौकरी. ही मनोवृत्ती चुकीची आहे.
30 Dec 2015 - 10:13 am | प्रसाद भागवत
अगदी माझ्या मनातले लिहिलेत डॉ... १००% सहमत.
29 Dec 2015 - 8:24 pm | हेमंत लाटकर
मला येथे शहरातील लोक किंवा खेड्यातील लोक सुखी, गरीबीचे, खेड्याचे उदात्तिकरण करायचे नाही. काही जण वरील सर्व गोष्टीसाठी खुप आटापिटा करतात व यातच सुख मानतात. टुमदार घर, घरात आवश्यक साधने, एखादी बाईक. चार रूमचा फ्लॅट घरात आवश्यक गोष्टी असल्या तरी माणूस समाधानी राहू शकतो.
29 Dec 2015 - 8:48 pm | सुबोध खरे
मग डॉ. प्रकाश आमटे यांचे उदाहरण का देताय?
प्रकाश आमटे व मदांकिनी आमटे हे डाॅक्टर दाम्पत्य हिमलकसा सारख्या जंगल भागात काही सुविधा नसतांना किती आनंदी जीवन जगतात. नाही तर आपण व आपली मुले सर्व सोयी सुविधा असूनही करमत नाही, बोअर होते म्हणून किरकिर करतो.
संपत्ती मिळवणे हा काही गुन्हा नाही.
एखादा कलाकार त्याच्या कलेसाठी बारा तास मेहनत करत असेल तर त्यात तो आटापिटा/ मरमर करतो आहे असेच का म्हणायचे. त्याला जर सृजनाचा आनंद मिळत असेल तर काय वाईट आहे आणि त्यातून त्याला चार पैसे मिळत असतील तर सोन्याहून पिवळे.
रच्याकने-- मी कलाकार नाही किंवा १२ तास कामहि करत नाही. आणि माझ्या दवाखान्याला मी मोटार सायकलनेच जातो.
29 Dec 2015 - 11:47 pm | अभ्या..
.
नाही हो. एवढे झाले की मग बाजीरावने ड्यान्सच कसा केला, प्र्यांकाने साडी अशीच कशी नेसली अशी किरकीर चालू होते.
चालायचेच. समाधान कशात मानावे हे कुठे कळलेय अजून? ;)
30 Dec 2015 - 10:12 am | हेमंत लाटकर
अभ्या प्रत्येक धाग्यावर खोचक, टवाळ, संदर्भहीन प्रतिसाद देण्यापेक्षा पटेल असा प्रतिसाद टंकावा.
अंवातर: प्रियांका दुसर्या पिक्चर मध्ये अशी नाचली असती तर चालले असते. पण काशीबाईच्या रोलसाठी असे नाचणे चुकीचे आहे.
30 Dec 2015 - 11:19 am | अभ्या..
सॉरी हेलाकाका. तुम्ही दिलेला सल्ला अगदी रास्त आहे. ह्यापुढे मी अगदी सरळ, प्रेमळ अन संदर्भाने परिपूर्ण अशेच प्रतिसाद टंकेन.
जाता जाता तुम्हाला पण एक सल्ला: (आता मी एकले किनै तुमचे, मग तुम्ही पण ऐकायचे माझे)
खरोखर अभ्यास करुन, नेहमीच्या चाकोरीबाहेर, जातीच्या परिघाबाहेर येऊन तुम्ही कधी काही केलय/लिहिलय का?
तुमच्या वयाचा मान राखतोय. तसे नसेल तर फुकाचे सल्ले देणे बंद करा.
30 Dec 2015 - 12:13 pm | अद्द्या
कैच्याकाय अपेक्षा बा तुझी पण
30 Dec 2015 - 3:08 pm | होबासराव
हेलाकाका :)
31 Dec 2015 - 10:03 am | नाखु
काय हे(१) लाकाका
काय हेलाका(२) का?
का(३) यहे लाकाका
काय हेला काका(४)
===============
शब्द तळटीपा..
१:कसली ही अत्मवंचना
२:काथ्याकूट फसलेला
३.नक्की उद्देश काय?
४.बाजीरांवावर चांगला धागा काढणार्यांकडून जरा अपेक्षा वाढल्या तेच तुम्ही मनोभंग केलात
30 Dec 2015 - 8:37 am | भंकस बाबा
मी स्वतः बारा वर्षापुर्वी शेतीच्या ध्यासाने शहरातील नोकरी सोडून गावात नोकरी पकडली होती. शेतीकामाशी निगडित असलेली ही नोकरी जवळजवळ २४ तास चालायची. कारण शेतीशी निगडित कामे घड्याळ पाहून होत नाही. तीन वर्षे काम केल्यानंतर आम्ही बैक टू पैवेलियन!
त्या वेळी अनिल अवचटाचे 'कार्यरत' हे पुस्तक व् त्यातील 'अरुण देशपांडे' हे व्यक्तिमत्व फारच प्रभाव टाकून गेले होते. वाचायला फार सोपे पण कृतिला फारच अवघड!
31 Dec 2015 - 10:19 am | प्रकाश घाटपांडे
बर झाल लवकर लक्षात आले. नाहीतर मारुतीच्या बेंबीत बोट गार लागत राहिल असत.
29 Dec 2015 - 9:49 pm | हेमंत लाटकर
म्हणजे छोटेसे घर/फ्लॅट, साधे फर्निचर, एखादा 21" टिव्ही, बजाज बाईक इ. गोष्टी.
29 Dec 2015 - 10:02 pm | मोगा
हट्टीकट्टी दरिद्री अन लुळीपांगळी श्रीमंती .... या दरिद्री म्हणीने हिंदुस्तानचा घात केला आहे.
तुमच्या घरा गाडीत सुख नसेल तर ते मला देउन तुम्ही एव्हरेस्टकडे जावे.
30 Dec 2015 - 1:07 am | बोका-ए-आझम
आपल्या सगळ्या कहाण्या पण अशाच - आटपाट नगरात एक गरीब ब्राम्हण राहात होता. रच्याकने एव्हरेस्टकडे जायला पण खर्च करावा लागतो. आजकाल हिमालयात जाणं अजिबात स्वस्त नाहीये.
30 Dec 2015 - 1:47 am | होबासराव
तुम्हि सगळे दान करुन मक्केला जाणार होता !! काय झाले त्याचे? का परत धर्म बदलला?
चिन्धिचोराचा फॅन
होबासराव
30 Dec 2015 - 9:49 am | मोगा
मक्केला जाताना सर्व दान देउन जात नाहीत.
ती पद्धत तुमची ! पुर्वी काशीला jaataanà घरावर तुळशीपत्र ठेवुन जायचे.
30 Dec 2015 - 6:15 pm | सुबोध खरे
मक्केला जाताना सर्व आप्तेष्टांना भेटून गळा मिठी मारून जायची पद्धत आहे कारण तेथून परत येऊ याची कोणतीही खात्री नसे( आजही नाही, चेंगरा चेंगरीत किती गचकतात दर वर्षी याचा हिशेब नाही).
बाकी सर्व दान देण्याचे तर आपणच म्हणाला होतात.आता तोंड का फिरवताय?
30 Dec 2015 - 8:54 pm | आनंदी गोपाळ
अहो, मांढरदेवीलाही शेकड्यांनी मरतात. जिथेजिथे देवाच्या नावावर विनाकारण गर्दी करतात तिथे लोक मरतातच. काशीयात्रेचंही तेच आहे.
इतकंच नाही खरे साहेब, घरून गाडीला किक/चावी मारून दुकानाकडे जायला निघताना परत येणारच याची तुमची/माझी ग्यारंटी असते का?
बाकी "सर्व" दान देण्याचं त्यांनी "सर्वा"वर बळीराजास्टाईल तुळशीपत्र वगैरे ठेवून, झारीतल्या शुक्राचार्याचा डोळा फोडून, पाणी सोडून वगैरे वचन दिलेलं होतं का? :>
31 Dec 2015 - 9:46 am | सुबोध खरे
जिथेजिथे देवाच्या नावावर .... गर्दी करतात तिथे लोक मरतातच. हे मात्र खरं. कारण असो व नसो
पण आम्ही हिमालयात जातो असा म्हटलंच नव्हतं. ते मोगासाहेब म्हणाले मक्केला जातो म्हणून ते सुद्धा सर्व संग परित्याग करून पुण्य कमवायला.
मग आम्ही म्हणालो जर दानच करायचं असेल तर आम्हाला करा.
आमच्या इतक्या वर्षाच्या शोधानंतर आम्हाला एकच व्यक्ती दानास सर्वथैव सत्पात्र आढळली ती म्हणजे आम्ही स्वतः.
30 Dec 2015 - 8:55 pm | मोगा
मी सर्व दान देऊन मक्केला जाणार असे बोललो / लिहिलो नव्हते... त्याची लिंक द्या असे तुम्हाला सांगितले की तुम्हीच शेपुट घालता.
मक्केच्या चेंगराचेम्गरीची चिंता करु नये... करोडोत भरपाई मिळते , गुगलवर शोधुन पहावे. तुम्हीच हिमालयात वगैरे जाणार असाल तर काळजी घ्यावी.
31 Dec 2015 - 3:44 pm | प्रदीप
'करोडोत भरपाई मिळते' -- पण जन्नतमधे त्या पैशाचा काय उपयोग?
31 Dec 2015 - 3:57 pm | नाव आडनाव
जन्नत मधे गरज नाही (जर जन्नत मधे गेले तर),
आणि जहन्नुम मधे ऊपयोग नाही :)
9 Jan 2016 - 1:52 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
जन्नतेत भात्तर वर्जिना मिळतात म्हणे.
9 Jan 2016 - 3:43 pm | अर्धवटराव
इती अॅक्मेल ;)
9 Jan 2016 - 6:09 pm | सुबोध खरे
"वर्जीना" फक्त जिहाद मध्ये मेल्यावर मिळतात.
असं कुणाच्या पायाखाली चेंगरून मेल्यास फक्त थडगं मिळतं.
29 Dec 2015 - 11:07 pm | शार्दुल_हातोळकर
खुप जास्त नसल्या तरी थोड्याफार सोयीसुविधा घरात असणे आवश्यकच आहे.....
मात्र.... काम/नोकरी आणि कौटुंबिक जीवन यामध्ये समन्वय साधने अतिशय गरजेचे आहे!!
29 Dec 2015 - 11:08 pm | हेमन्त वाघे
I would rather cry in a BMW than smile on a bicycle
29 Dec 2015 - 11:37 pm | पिंगू
"थोडा है थोडे की जरुरत है" या उक्तीला अंत नाही, हेच खरे..
30 Dec 2015 - 1:27 am | पद्मावति
पैशाने सगळंच विकत घेता येतं असे नाही पण बरंच काही विकत घेण्याचा चॉइस मात्र मिळतो.
30 Dec 2015 - 1:44 am | नंदन
धाग्याचे शीर्षक आणि त्याचे प्रयोजन यांच्यातले अद्वैतात्मक अभिन्नत्व अंमळ हळवे करून गेले.
इथे एका शब्दावर 'मात्रा' लागू पडत नाही म्हणावं तरी पंचाईत, लागू पडते म्हणावं तरी!
30 Dec 2015 - 10:03 am | यशोधरा
इथे एका शब्दावर 'मात्रा' लागू पडत नाही म्हणावं तरी पंचाईत, लागू पडते म्हणावं तरी! >> =))
9 Jan 2016 - 12:30 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मेल्या, तुझ्यामुळे वाक्य नीट वाचावं लागलं. मग सगळा धागाच काकदृष्टीने वाचला.
19 Jan 2016 - 12:59 pm | मेघना भुस्कुटे
बघ की. जरा कुठे निवांतपणे वरवर नजर फिरवायची सोय नाही. पण मी नाही हो सगळा धागाबिगा परत वाचला. प्रतिसादापुरतं ठीकाय.
30 Dec 2015 - 1:56 am | रेवती
मुलांना मागितले ते मिळाल्यामुळे नाही ऐकायची सवय नसणे.
यासाठी घर मोठे आहे की झोपडी आहे याचा संबंध नाही.
31 Dec 2015 - 3:20 pm | सस्नेह
माझा मुलगा नववीत असताना त्याला पाच हजाराची सायकल घेण्यासाठी मी सहा महिने विचार करत होते, आणि एका खोलीत राहणाऱ्या माझ्या कामावलीने आपल्या चौथीतल्या मुलाला कालच चार हजाराची सायकल झटक्यात खरेदी करून दिली.
30 Dec 2015 - 2:07 am | राघवेंद्र
गरज ही शोधाची जननी आहॆ. जर गरजा कमी ठेवल्या तर शोध कमी लागतील, शोध कमी त्यामुळे काम कमी, त्यामुळे रोजगार कमी, त्यामुळे बाजारातील पैसा कमी, त्यामुळे समाधानी लोक कमी.
त्यामुळे गरजा जास्त ठेवल्यास, जास्तीत जास्त समाजातील लोक समाधानी राहतील.
30 Dec 2015 - 8:10 am | हेमंत लाटकर
काही जण घरासाठी पाॅश पाॅश म्हणून इतका खर्च करतात की बघून वाटते खरेच इतकी गरज आहे का? बैठकीत इम्पोर्टेड सोफा, मोठ्या स्क्रिनचा टिव्ही, प्रत्येक रूम मध्ये एसी, स्वयंपाक घरात किचन ट्राॅली, फुड प्रोसेसर, मायक्रोआेव्हन, अजून बरेच काही.....
30 Dec 2015 - 8:10 am | हेमंत लाटकर
काही जण घरासाठी पाॅश पाॅश म्हणून इतका खर्च करतात की बघून वाटते खरेच इतकी गरज आहे का? बैठकीत इम्पोर्टेड सोफा, मोठ्या स्क्रिनचा टिव्ही, प्रत्येक रूम मध्ये एसी, स्वयंपाक घरात किचन ट्राॅली, फुड प्रोसेसर, मायक्रोआेव्हन, अजून बरेच काही.....
30 Dec 2015 - 9:33 am | संदीप डांगे
Jordan Belfort: Let me tell you something. There's no nobility in poverty. I've been a poor man, and I've been a rich man. And I choose rich every fucking time.
लहानपणी मी चपलेशिवायही कित्येक दिवस राहिलोय, उपासही घडलेत, साधी सायकलही धड मिळाली नाही. पण स्वतःचं पहिलं वाहन विकत घेतलं ते ड्रीम कार तीही लग्जरी. त्यानंतर श्रीमंतीतला अर्थ कळला... 'फोलपणा' नाही. लग्जरी ही एक गरज आहे, हवा-पाणी-भाकरीसारखी. जे तिच्याकडे शो-बाजी, उधळपट्टी म्हणून बघतात त्यांना ती कधीच कळणार नाही.
लॅपटॉप हे बोजड पीसींच्या काळात लग्जरी वाटायची," कसलं भारी वाटतं यार दिसायला, एकदम हाय-फाय..." असे काहीसे वाटायचे. जेव्हा लॅपटॉप घेतला आणि कामं सुरु झाली तेव्हा ती लग्जरी नव्हती, गरज होती हे कळले. एकेकाळी ते बोजड पीसीही लग्जरी वाटायचे. तेच मोबाईल इत्यादींबद्दल. तस्मात् पाच रुमचा फ्लॅट घेतल्याखेरीज 'स्व' गवसत नाही. स्व गवसला की ती 'शोबाजी की गरज' याचा उलगडा होतो. तोपर्यंत धावणे हा पर्याय उत्तमच आहे. 'कुठे ना कुठे पोचणे' ही खरी गरज आहे.
बाकी राहता आलं तर रस्त्यावरही राहता येतं आणि म्हटलं तर राजमहालही तोकडा पडतो, त्यामुळे कशाची 'खरीच गरज' आहे काय हा प्रश्न अप्रस्तुत आहे.
(ज्यांना आयुष्यात स्वतः हे सगळे मिळवता आले नाही, व इतरांशी तुलना झाल्याने न्यूनगंड आलाय त्यांना मानसिक समाधानासाठी लेखातले विचार पटू शकतात. *हे लेखकासाठी नाही*)
30 Dec 2015 - 5:08 pm | सोत्रि
जियो मेरे लाल!
_/!\_ _/!\_ _/!\_
संपूर्ण प्रतिसादाशी शत प्रतिशत सहमत.
- (स्व गवसण्यासाठी धावणारा) सोकाजी
31 Dec 2015 - 2:49 pm | रुस्तम
__/\__
30 Dec 2015 - 9:53 am | जेपी
मागे एका धाग्यावर डॉ.सुबोध खरे यांचा एक क्वोट वाचला तो मला भलताच आवडला होता.
"A rich is not the person who earns more, or spends more. But rich is the person who does not need anything anymore."बस्स याच्या पलीकडे कशाला विचार करा.
30 Dec 2015 - 11:15 am | सुबोध खरे
जेपी साहेब
RICH IS NOT A PERSON WHO EARNS MORE OR SPENDS MORE
RICH IS A PERSON WHO NEEDS NO MORE
मी असे म्हटले आहे याचे एक कारण असे आहे. आपल्याकडे चैनीची वस्तू गरजेची केंव्हा होते? जेंव्हा तुमचा शेजारी घेतो तेंव्हा.
जेंव्हा माझ्या गरजेच्या सर्व वस्तू मिळून माझ्या कडे चार पैसे उरले तर मला "अजून आणि अधिक" हवे हि हाव नसली पाहिजे.
दुर्दैवाने अनेक लोकांना गरज केंव्हा संपली आणी चैन कुठे सुरु झाली हेच कळत नाही.म्हणून ते मृगजळाच्या मागे धावत राहतात.
हेवा आणि मत्सर यातील फरक काय ?
हेवा करण्यात कोणताही नकारात्मक भाव नसून जर अमुक तम्मुक माणूस करू शकत असेल तर मला का करता येऊ नये म्हणून माणूस काही भरीव कार्य करण्यास उद्युक्त होतो
मत्सर म्हणजे काय? -- एक तर मी वर चढू शकत नसेन तर त्याला खाली खेचा. किंवा इतकी मरमर करून कसेही करून त्याचे नाक खाली करण्यासाठी मी त्याच्या वर जाण्याचा प्रयत्न करणे.यात भाव मुळातच नकारात्मक आहे. हा नकारात्मक भाव तुम्हाला असमाधानी करू शकतो.
उदा. मी (रामदास साहेबांसारखा किंवा इतर सिद्धहस्त लेखकांसारखा) लेखक नसलो तरी शब्द् बंबाळ लेखन करून मोठे मोठे प्रतिसाद देउन स्वतःला लेखक सिद्ध करण्याचा आटापिटा करणे आणि अशा लेखकांच्या लेखांवर कारण पिंका टाकणे हे आपल्याला मिसळपाव वर दिसून येणारे मत्सराचे उदाहरण.
5 Jan 2016 - 3:38 am | अर्धवटराव
हेवा वाटणं स्वच्छपणे दाद दिल्यासारखं कबुल करता येतं, मिरवता येतं. ज्याचा हेवा वाटतो त्याला ते कॉम्प्लीमेण्टसारखं वाटतं. त्याउलट मत्सराचं.
30 Dec 2015 - 10:11 am | प्रसाद१९७१
हेला काका - चला आधी स्वतापासुन सुरुवात करा. फ्लॅट, गाडी वगैरे विकुन विदर्भात शेती आणि छोटे घर विकत घ्या.
30 Dec 2015 - 10:28 am | सर्वसाक्षी
आपल्या सुखाची याख्या आपण करावी. त्याच सरसकटीकरण होउ शकत नाही.
कुणाला तुम्ही म्हणत असलेला हव्यास म्हणजे महत्वाकांक्षा, प्रगती वाटत असेल तर कमी साधनात राहणे हे कर्तव्यशून्यतेचे वाटेल - ही 'ठेवीले अनंते' भावना वाटेल.
'जीवनशैली आणि व्याधी' अशा आशयाच्या एका कार्यक्रमात एका डॉक्टरने सांगितले होते प्रगतीची आस, स्पर्धा, उत्कर्षचे ध्येय, सतत जिंकण्याचा ध्यास यामुळे अनेक रोग जडु शकतात. ऐकायला हे बरे वाटते पण प्रत्यक्षात असं न वागणारे कर्मचारी कोणत्याही आस्थापनेला परवड्त नाहीत.
30 Dec 2015 - 10:35 am | प्रसाद१९७१
ह्याला कुठलाही विदा नाहीये.
हेला काकांसारखे हट्टीकट्टी गरीबी आणि रोगट श्रीमंती असले विचार असलेले खूप लोक भारतात आहेत आणि ते डॉक्टर पण त्यातलेच असतील. गम्मत म्हणजे असले विचार असले तरी त्यांची कृती मात्र ह्या विचारांच्या अगदी विरुद्ध असते.
30 Dec 2015 - 10:42 am | अद्द्या
"हट्टीकट्टी गरीबी आणि रोगट श्रीमंती"
या सारखे फालतू विचार ठेऊन मागच्या २ पिढ्या शक्य असून सुद्धा काहीच न कमावता बसल्या .
आणि नंतर माझ्या आधीच्या पिढीला गेली ३०-४० वर्षे जो त्रास सहन करावा लागतोय तो बघतोय .
यापेक्षा जमेल तेवढे पैसे कमावणे कधीही प्रिफर करेन . .
बाकी . असेल विचार मांडायला आधी करोडपती व्हावं लागतं हे हि खरं .
(आमटे इत्यादी मंडळी अति दुर्मिळ अपवाद आहेत )
30 Dec 2015 - 11:07 am | संदीप डांगे
आधी करोडपती व्हावं लागतं हे हि खरं>>> +१००००
5 Jan 2016 - 3:40 am | अर्धवटराव
त्यांनी त्यांची श्रीमंती कमवायला अपार कष्ट उपसलेत, ध्यास घेतला. त्यांची श्रीमंतीची व्याख्या इतरांपेक्षा वेगळी होती हे मात्र खरं.
30 Dec 2015 - 11:04 am | सुबोध खरे
लाटकर साहेब
आपले उदाहरण मुदलातच गंडलेले आहे.
मुंबईत माझा ५६० चौ फुटाचा एक बेड रूम चा (तीनच खोल्यांचा) फ़्लैटच एक कोटी रुपयांचा आहे.
या रकमेच्या दोन महिन्यांच्या व्याजातच ( दीड लाखात) आपण म्हणता त्या सर्व "बैठकीत इम्पोर्टेड सोफा, मोठ्या स्क्रिनचा टिव्ही, प्रत्येक रूम मध्ये एसी, स्वयंपाक घरात किचन ट्राॅली, फुड प्रोसेसर, मायक्रोआेव्हन" वस्तू येतात.
मग या गोष्टीवर आपण म्हणता तसा "इतका खर्च" कसे म्हणता येईल.आपल्या वरील प्रतिसादाप्रमाणे "चार रूमचा फ्लॅट घरात आवश्यक गोष्टी असल्या तरी माणूस समाधानी राहू शकतो." यातील चौथी रूम विकत घ्यायला ( माझ्या तीन रुमच्या घरा ऐवजी) मला २५ लाख रुपये अतिरिक्त खर्च येईल त्यापेक्षा त्या रकमेच्या व्याजात मी घरातील सुखसोयीच्या वस्तू घेऊ शकतो.
म्हणून मुंबईतील माणूस मोठे घर घेण्यापेक्षा आपण म्हणता तशा चैनीच्या वस्तू घेताना दिसतो. विश्वास बसत नसेल तर गिरगाव येथे चाळीच्या दोन्ही खोल्यांना लावलेली वातानुकूलन यंत्रे पाहून घ्या.
30 Dec 2015 - 11:17 am | सतिश गावडे
त्यांचा वन बी एचके का उल्लेख तुलनात्मक असावा. तीन खोल्यांच्या घरातही मानूस सुखाने राहू शकतो तर चार किंवा पाच खोल्यांच्या घराचा हव्यास कशाला अशा अर्थी असावे ते.
30 Dec 2015 - 3:47 pm | मृत्युन्जय
सुखाने तर माणूस दोन खोल्यांच्या घरातही राहु शकतो, एका खोलीतही राहु शकतो. मला वाटते "गरज" शब्दाची व्याख्या प्रत्येक माणसाप्रमाणे बदलत असते आणि प्रत्येकाने स्वतःच्या उत्पन्नानुसार त्याचा विचार करावा
30 Dec 2015 - 11:09 am | विवेक ठाकूर
परिस्थिती कायम परिवर्तनीय आहे.
तस्मात, मनःस्थिती प्रसन्न ठेवा, मग कशानं काही फरक पडत नाही.
30 Dec 2015 - 11:19 am | संदीप डांगे
शब्दांच्या निवडीबद्दल तुमच्याकडून चूक व्हावी...?
सुविधा-साधनांतून मिळते ते 'सुख', पजेशन-मालकीहक्कातून येते ते 'सुख'. दुसर्यावर अवलंबून असतं ते 'सुख'. सुख हे परिस्थितीवर अवलंबून असतं.
तुम्ही सुख हा शब्द आनंद ह्या अर्थी वापरला आहे. 'आनंद' मनःस्थितीवर अवलंबून असतो.
30 Dec 2015 - 2:44 pm | विवेक ठाकूर
सुख आणि आनंद हे समानार्थी शब्द आहेत आणि लेखातल्या मुद्याबद्दल मला जे म्हणायचंय ते एकदम सोपं आहे.
दुसर्या बाजूनं पाहा, दु:खाचं कारण वस्तूचा आभाव किंवा परिस्थिती आहे असं वरकरणी वाटत असलं तरी खरं कारण `स्वतःचा स्वतःशी होणारा वियोग' (गेटींग डिसकनेक्टेड विथ सेल्फ) आहे.
जर तुम्ही कायम स्वतःशी कनेक्टेड असाल तर मनःस्थिती प्रसन्न राहाते आणि परिस्थितीचा तुमच्यावर कोणताही परिणाम होत नाही.
30 Dec 2015 - 3:07 pm | स्पा
क्या बात
30 Dec 2015 - 3:08 pm | स्पा
थोडे अजून उलगडून सांगा ना सर
30 Dec 2015 - 3:22 pm | विवेक ठाकूर
प्रतिसाद दिला आहे.
30 Dec 2015 - 3:31 pm | स्पा
लिंक उघडत नाहीये
30 Dec 2015 - 3:39 pm | विवेक ठाकूर
क्लिक केलं की प्रतिसाद दिसतोय.
19 Jan 2016 - 2:21 pm | पैसा
समानार्थी नाहीत. आनंद आतून येतो, तर सुख कोणत्यातरी बाह्य गोष्टीसोबत येतं. म्हणूनच "तुम्ही सुखं विकत घेऊ शकता पण आनंद नाही" असं म्हटलं जातं. सुख आणि दु:ख हे दुसर्या कोणत्यातरी गोष्टीचे, वस्तूचे, व्यक्तीचे बोट धरून येतात मात्र आनंदात रहाणे हा प्रत्येकाचा चॉईस असतो.
19 Jan 2016 - 2:25 pm | होबासराव
छान प्रतिसाद
नेमका असाच फरक किंमत आणि मुल्य ह्या मधे आहे...
एव्हढे बोलुन मि माझे २ शब्द संपवितो ;)
30 Dec 2015 - 11:27 am | सुबोध खरे
ठाकूर साहेब
खरी समाजसेवा हि मुळात रक्तात असावी लागते. उगाच डॉ. प्रकाश आमटे करतात म्हणून मी सर्वसंग परित्याग करून समाजसेवा करण्यास गेलो तर मला ते झेपणार नाही. आणी मी कितीही उदात्त विचार ठेवले तरी आतून मनस्थिती प्रसन्न राहणार नाही.
डॉ. प्रकाश आमटे यांच्या विचाराची बैठक फार उच्च पातळीवर आहे.त्यांची जागा दीपस्तंभासारखी आहे. त्यांच्या प्रकाशात वाट काढणारी जहाजे आहोत आम्ही. मला ती विचारसरणी झेपणार नाही.
वीरेंदर सेहवाग पहिल्या बॉलवर षटकार मारतो म्हणून मी मारायला गेलो तर मागून स्टम्पिंग होऊन बाद होण्यात काय हशील आहे? आम्ही दहावे अकरावे फलंदाज म्हणून वीस धावा दहा षटकात काढल्या तर संघाला तेवढीच मदत इतका साधा विचार आहे. तेंव्हा मला "सोसंल" तेवढीच "सोशल" सर्व्हिस मी करतो. त्यांनी हजारो आदिवासींचे कल्याण केले. मी माझ्या कुटुंबाबद्दलची कर्तव्ये पार पडून सुखासमाधानाने जगून दोनच माणसांचे थोडे फार कल्याण करू शकलो तरी मी समाधानी राहू शकेन अशी माझी विचारसरणी आहे.
30 Dec 2015 - 11:48 am | देशपांडे विनायक
आता तुम्हाला भेटल च पाहिजे
30 Dec 2015 - 3:04 pm | विवेक ठाकूर
प्रश्न : `मी कितीही उदात्त विचार ठेवले तरी आतून मनस्थिती प्रसन्न राहणार नाही.' असा नाही.
तो कायम स्वतःशी संलग्न असण्याचा आहे. कारण मुळात तुम्हीच आनंद आहात.
तस्मात, सुख किंवा आनंद बाहेरून येतं असं सकृद्दर्शनी जरी भासलं तरी ते तुम्ही स्वतःशी कनेक्ट झाल्यामुळे आलेलं असतं.
उदाहरणार्थ, एव्हरेस्ट सर करून जर हिलरी कायमचा आनंदी झाला असता तर बहुतेक सगळे एवरेस्ट चढायच्याच मागे लागले असते. एवरेस्ट सर केल्यावर तो सुखी होतो कारण काही क्षण का होईना त्याच्या सगळ्या इच्छा संपल्यासारख्या वाटतात आणि त्या शांत मनःस्थितीत तो स्वतःशी कनेक्ट होतो.
अर्थात, ही कनेक्टीविटी न कळल्यानं, एवरेस्टवरून खाली उतरल्यावर नव्या व्यावधानानं तो पुन्हा दु:खी होऊ शकतो कारण एवरेस्टवर किती वेळ थांबणार ?
तस्मात, सुख वस्तूत नाही, तुम्ही सुख आहात. मग काम काहीही करा कारण कामाला अर्थ तुमच्यामुळे प्राप्त होतो. एकदा तुम्ही स्वतःपासून विलग झाला नाही की परिस्थिती तुम्हाला दु:खी करू शकत नाही.
30 Dec 2015 - 5:13 pm | सोत्रि
गुरूदेव!
_/\_
- (संक्षीना मिस करणारा) सोकाजी
30 Dec 2015 - 5:18 pm | स्पा
चायला एकदम नवी थिअरी
पोइंत हय
30 Dec 2015 - 5:49 pm | विवेक ठाकूर
इथे बहुतेकांचा वस्तुसुखावर किंवा कार्यमौलिकतेवर भर आहे पण वस्तु किंवा कार्य हे व्यक्तीनिरपेक्ष आहेत. फ्लॅट सुखी करत नाही, तुम्ही सुखी होता. कार्य दु:ख देत नाही, त्याचा दुस्वास करुन आपण दु:खी होतो.
त्यामुळे वस्तुप्राप्ती किंवा कार्यबदल व्यक्तीला सुखी अथवा आनंदी करु शकत नाही, कारण पुन्हा नवी वस्तुकांक्षा किंवा कार्याकांक्षा दु:ख निर्माण करु शकते.
त्यामुळे जो आनंदी होतो त्याच्याशी (म्हणजे स्वतःशी) अनुसंधान असण्यात आनंद आहे. मग वस्तू असो की नसो आणि कार्य कोणतेही असो, त्यानं काही फरक पडत नाही.
30 Dec 2015 - 5:59 pm | स्पा
सर, --/\--
30 Dec 2015 - 6:17 pm | सुबोध खरे
आम्ही "शरद तळवलकर" सारखे आहोत. कान्हा मात्र नसलेली सरळ माणसं.
आमची पट्टी काळी दोन
पांढरी पाच आम्हाला झेपत नाही.
तेंव्हा पास
30 Dec 2015 - 6:20 pm | सुबोध खरे
बायकोने कांद्याची भजी किंवा भाजणीचे थालीपीठ केले कि तो दिवस
किंवा सणावाराला छान साडी बिडी नेसून चार दागिने घालून सुहास्य मुद्रेने स्वागत केले तरी आमचे चार दिवस समाधानात आणि आनंदात जातात. एवढे उच्च विचार झेपत नाहीत.
30 Dec 2015 - 6:38 pm | मोदक
एवढे उच्च विचार झेपत नाहीततुम्ही CA चा अभ्यास का सुरू करत नाही?
30 Dec 2015 - 7:18 pm | सुबोध खरे
अहो काही झेपत नाही म्हणून जीवशास्त्र घेऊन घोकंपट्टी करून डॉक्टर झालो. आता तुम्ही ते अकौंटस वगैरे सांगता कसं झेपणार.
30 Dec 2015 - 6:39 pm | विवेक ठाकूर
आपणच आनंद आहोत हा फंडा आहे. त्यामुळे जी गोष्ट आपल्याला स्वतःपासून दूर नेते ती दु:ख देते. आनंदाला प्रमाण नाही कारण तो सदैव एकसारखा आहे. तस्मात, मोठी गाडी म्हणजे मोठा आनंद असं नाही किंवा लहान फ्लॅट म्हणजे दु:ख असंही नाही. हे एकदा लक्षात आलं की आपण स्वतःपासून दुरावत नाही. आणि अशी एकदा स्वतःशी कनेक्टेड असण्यातली खुमारी कळली की मग मन कायम प्रसन्न राहातं.
30 Dec 2015 - 9:12 pm | सोत्रि
दंडवत स्विकारा!
_/\_
- (कनेक्टेड) सोकाजी
30 Dec 2015 - 9:22 pm | स्पा
कडक
31 Dec 2015 - 10:26 am | म्हसोबा
कधी कधी एखाद्या टुकार गोष्टीतून काही अनमोल हाती लागतं ते असं.
हेमंत लाटकरांचा हा धागा एकदम टुकार आणि भंगार आहे. अगदी "रिकामा सलुनवाला, पोचला दिल्लीला" पठडीतला.
मात्र त्या निमित्ताने विवेक सरांचे या धाग्यावरील प्रतिसाद ही विचारी मनासाठी अक्शरशः मेजवानी आहे. त्यांच्या विचारांची सघनता, खोली लाजवाब. अध्यात्मविषयक साहित्यात उल्लेख होणारे आत्मज्ञान नेमके काय असू शकेल याचा अंदाज सरांच्या प्रतिसादातून येतोय. विचारांची ईतकी सुस्पष्टता आत्मप्रचितीशिवाय शक्य नाही.
आज खुप दिवसांनी मिपावर लॉगिन केले त्याचे चिज झाले. असेच लिहित रहा विवेक सर.
31 Dec 2015 - 3:09 pm | हेमंत लाटकर
काही वेळा भंगारातून सोने मिळू शकते. पण ते कळण्यासाठी ज्ञानदेवांचा रेडा असून चालत नाही तर स्वतः मध्ये तशी विचार क्षमता असावी लागते.
महाराज लोक सतसंगामध्ये बर्याच गोष्टी सांगतात पण ते स्वत:च ढोंगी असतात. उदा. आसाराम बापू अनिरूद्ध बापू.
31 Dec 2015 - 8:11 pm | म्हसोबा
ज्ञानदेवांच्या रेडयाने पैठणच्या ब्रम्हसभेत वेद म्हटले हो. तुम्हाला साधूवाण्याची कथा तरी सांगता येते का?
31 Dec 2015 - 8:42 pm | हेमंत लाटकर
ही एक कवीकल्पना आहे. ज्ञानेश्वर हे प्रगाढ पंडीत होते यात वाद नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहली. म्हणून रेडा पंडीत असू शकत नाही.
1 Jan 2016 - 8:59 am | विवेक ठाकूर
धाग्याविषयी त्यांची कमेंट खटकणारी आहे तरी त्यावर मी दिलेले प्रतिसाद अनुभवातून आलेले आहेत. मुळात आनंद काय आहे याविषयी उहापोह आहे, आणि धाग्यातल्या नेमक्या प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न केला आहे, कदाचित तुम्हाला उपयोगी होऊ शकतील.
6 Jan 2016 - 1:23 pm | होबासराव
हेलाकाकांचे कोकिळ्व्रतात स्पेशलायझेशन आहे हो.
30 Dec 2015 - 11:19 am | स्पा
आस्तिक नास्तिक शांत झाले आता गरीब -श्रीमंत =))
असेही निरीक्षण आहे कि आस्तिक हे गरीब किंवा मध्यमवर्गीय असतात आणि श्रीमंत नास्तिक
30 Dec 2015 - 11:30 am | सुबोध खरे
स्पा
एकदम चूक .
शिर्डी, सिद्धिविनायक, लालबागचा राजा या देवस्थानांना मिळणाऱ्या देणग्या पाहिल्यास तर तुझे डोळे पांढरेच काय सप्तरंगी होतील. या देणग्या देणारे काय गरीब किंवा मध्यम वर्गीय असतात? मध्यमवर्गीय म्हणजे देवळात गेल्यावर खिशात सुटे पैसे मिळाले नाही म्हणून दहा रुपयाची नोट टाकावी लागली म्हणून अर्धा तास हळहळणारा माणूस.
30 Dec 2015 - 11:27 am | हेमंत लाटकर
मला गरीबीत खितपतच पडावे, स्वतःची प्रगती करूच नये, पैसा जमवूच नये असे म्हणायचे नाहीच. माझ्याकडेही चार रूमचा फ्लॅट, बाईक, काॅम्युटर, स्मार्टफोन (₹ 5000), साधा सोफा, crt tv अश्या गोष्टी आहेत. आता यापेक्षा जास्तीची काय गरज आहे यात व्यवस्थित चालते.
काही जण याबाबतीत फारच हव्यास (महत्वाकांक्षा) करतात. मारूती कार असली तरी सेदान कारसाठी आटापिटा करतात (बर्याच जणाकडील कार सोम-शनि धुळ खात पडलेल्या असतात, ट्रॅफिकचा प्राॅब्लेम, नौकरीमुळे वेळ नसणे).
बिल गेटस् दाम्पत्य स्वत: जवळील सर्व संपत्ती दान करणार आहेत. मग आपण, जास्तीचा हव्यास, दोन पिढ्याची संपत्ती जमविण्याची काय गरज आहे. मुलांमध्ये धमक असली तर ते स्वत: आपली प्रगती करतील.
30 Dec 2015 - 11:32 am | संदीप डांगे
आता तुम्ही चर्चेचा सांधा बदलत आहात. ;-)
30 Dec 2015 - 11:57 am | हेमंत लाटकर
मी सांधा बदलला नाही. आमटे दाम्पत्याचे उदा. समाधानी जीवन जगणे कसे असते हे सांगण्यासाठी दिले.
30 Dec 2015 - 12:24 pm | प्रसाद१९७१
आमटे दांपत्यानी अनेक वेळेला जाहीर रित्या सांगितले आहे की
आम्ही जे करतो ते करतो कारण आम्हाला तसे करायला आवडते. आम्हाला कोणताही मोठेपणा देऊ नका.
तसेच प्रत्येकाला जे आवडेत ते त्यानी करावे आणि समाधानी रहावे. कोणाला १० रुम चा बंगला आवडत असेल तर त्याची तुलना आमटे दांपत्याशी करायची काही गरज नाही.
लोकांनी संपत्ती निर्माण करण्याचे कमी केले तर गरजवंत भुके मरतील. कोणी तरी ३ खोल्यातुन ५ खोल्यात गेले तर अनेक गवंडी, सुतार वगैरेंची २-३ महीन्याची सोय होते.
30 Dec 2015 - 12:18 pm | अद्द्या
हो पण त्या आधी त्यांनी कित्येक वर्षे मेहनत करून एवढी संपत्ती कमावून आपण आणि आपल्या घरच्यांना जगातल्या सर्व सुख सुविधा मिळवून दिल्या .
आणि त्यांची मुले आता स्वतः कमवू शकतात असं समजल्या वर त्यांनी हे पूल उचललंय .
30 Dec 2015 - 12:28 pm | प्रसाद१९७१
भारतातल्या ९५% लोकांच्या साठी ४ रूम चा फ्लॅट आणी बाईक ही मोठीच चैन आहे. आणि हेला काका, ती चैन तुम्ही करता आहात. तुम्हाला सेदान कार घेणार्यांवर बोट दाखवायचा काहीही अधिकार नाही.
माझा पूर्वीचा जॉब च लोकां नी कार विकत घेण्यावर अवलंबुन होता. लोकांनी मारुती वरुन सेदान कडे वाट केली नसती तर मला बेरोजगार व्हावे लागले असते.
30 Dec 2015 - 11:29 am | स्पा
हा सुबोध सरांचा आवडता विषय आहे असेही नमूद करू इच्छितो ;)
30 Dec 2015 - 12:25 pm | मोदक
वरील लेखामध्ये तुम्हीच मांडलेले विचार तुम्ही स्वतः अंमलात आणले आहेत का? असल्यास "कसे अंमलात आणले" ते वाचायला आवडेल.
..आणि तुमच्या फ्लॅट, टीव्ही, कार वगैरे गरजा पूर्ण झाल्यानंतर वरील विचार मनात आले असतील तर तसेही सांगा..! :)
30 Dec 2015 - 12:36 pm | मयुरMK
जो तो आपाअपल्या परीने सुख शोधत असतो.
शेवटी अरुन-फिरून माझे मन एकाच विचारावर येते. ''आपले सौख्य आपल्या विचारावर अवलंबून आसते
30 Dec 2015 - 1:04 pm | हेमंत लाटकर
माझे म्हणने फक्त मध्यमवर्गीय लोकांसाठी आहे. मी पुणे मुंबईला राहत नाही त्यामुळे चार रूमचा फ्लॅट म्हणजे 1 कोटीचा नाही.
30 Dec 2015 - 3:08 pm | आदूबाळ
बरं... काय ठरलं मग? सेदान घेऊ की नको?
30 Dec 2015 - 3:10 pm | अभ्या..
सेदान.......सूटे गिराण.
31 Dec 2015 - 10:11 am | नाखु
पण वापरू नका
हट्टाने सगळीकडे चालत जा आणि सगळीकडे त्याची (मिपावर जास्तच) जाहीरात करा......की मी सेदान असूनही अजूनही चालतच जातो म्हणून...
दोन ठळक फायदे:तुम्हाला भारतातल्या गाडी नसलेल्या गरीबांबद्दल कळवळा आहे,पेट्रोल दरवाढीच्या काळजीतून मुक्ती.
इअतर फायद्यांसाठी बॅट्न मोदक आणि अभ्याकडे देत आहे.
वाचनमात्र नाखु
30 Dec 2015 - 3:39 pm | जिन्क्स
कोल्ह्याला द्राक्ष आंबट .... दुसरं काही नाही
30 Dec 2015 - 4:27 pm | प्रसाद१९७१
अगदी अगदी. मला हेच लिहायचे होते. पण हेलाकाका मनाला लाऊन घेतील म्हणुन लिहीले नाही.
30 Dec 2015 - 4:09 pm | उगा काहितरीच
"शक्ती का पासमे होना जरूरी है । सवाल शक्तीके इस्तेमाल का है। " हा डायलॉग आठवला . कुणी जर प्रचंड पैसे कमाई करून दान केले व निष्कांचन अवस्था चांगली आहे असे म्हणत असेल तर तो मे बी बरोबर असेल. (त्याच्या दृष्टीने!) पण ज्याला लहानपणापासूनच दोन वेळेसचे अन्नच व्यवस्थित मिळू शकत नाही अशा व्यक्तीने जर गरीबीतच सुख आहे असं म्हटलं तर काय फायदा ? त्याला श्रीमंतीत काय सुख आहे ते काय माहीत ! (याला काही सन्माननीय अपवाद असू शकतात)
30 Dec 2015 - 4:54 pm | अजया
डाॅ खरेंचे प्रतिसाद आवडले.
समाधान व्यक्तीसापेक्ष गोष्ट आहे.त्याला कोणा एकाचे निकष लावून कसे चालेल.त्यापेक्षा कुटुंबाचा किंवा त्या व्यक्तीचा हॅपिनेस इंडेक्स महत्त्वाचा नाही का?
30 Dec 2015 - 5:12 pm | आदूबाळ
अहो अजयाताई, जर ती व्यक्तीच मुळात हॅपीनेस असेल तर हॅपीनेसचा हॅपीनेस इंडेक्स कसा काढता येईल?
30 Dec 2015 - 5:32 pm | अजया
हेला काका काढून देतील हो.
30 Dec 2015 - 5:15 pm | ऋषिकेश
याची गरज आहे का? याची माझ्यापरीने उत्तरे:
पाच रूमचा वेल फर्निशर्ड फ्लॅट - घरात किती मंडळी आहेत त्यावर हे आवश्यक आहे का सांगता यावे
महागडी कार - ऑफिस किती लांब आहे, पर्यटनाची किती आवड आहे त्यावर याचे उत्तर देता यावे
40 इंची एलईडी टिव्ही - चित्रपट पाइत्याडीदीच्ग इत्यादी किती आवडते त्यावर सांगता यावे
एेसी - हे एसी आहे असे समजतो. घर कोणत्या प्रदेशात आहे त्यावर सांगता यावे
मुलांना इंटरनॅशनल शाळेत अॅडमिशन - मुलांनी काय व्हावेआअहे त्यावरून सांगता यावे
हे सगळे साध्य करण्यासाठी 8 ते 8 नौकरी - करा सगळे साध्य करायचे तर याची खरच गरज आहे
बायकोची नौकरी - काहीही साध्य करायचे नसले तरीही स्त्रियांना स्वतंत्र मिळकत असावी असे माझे मत आहे.
एकत्र कुटुंब नसल्यामुळे मुलांना पाळणाघरात पाठविणे. - मुपाळणागह्रातघरात पाठवणे उपयुक्त आहे. माझे एकत्र कुटुंब असूनही मुले पाळणाघरात जातात.वृद्ध आई-वडिलांना त्यामुळे दुपारची झोप मिळते व त्यांचेही आरोग्य चांगले रहाते.
सुट्टीच्या दिवशी बाहेर जायची इच्छा नसणे - हे फिरायची आवड आहे की नाही त्यावरून सांगता यावे.
त्यामुळे नवरा बायकोत चिडचिड.- याची गरज वाटत नाही पण कोणत्याही दोन व्यक्तीत थोड्या कुरबुरी होणारच
मुलांना मागितले ते मिळाल्यामुळे नाही ऐकायची सवय नसणे.- याची गरज वाटत नाही.
काॅलेजात गेले की मुलांना आय फोन, स्कुटी किंवा बाईक. कॉलेज घरापासून किती लांब आहे त्यावर सांगता यावे
वयाच्या चाळीशीला हार्ट, बीपी, मधुमेह हे आजार होणे - याची गरज वाटत नाही
मग त्यावर डाॅक्टरी इलाज. - आजार झाल्यास याची मात्र नितांत गरज आहे
आशा आहे उत्तरे पटतील
30 Dec 2015 - 5:23 pm | आदिजोशी
गरज आणि चैन ह्यात सीमारेषा कशी आखावी आणि कुणी ओळखावी? माझ्यासाठी जी चैन आहे त्याकडे अंबानी ढुंकूनही पाहत नसेल. तसेच, माझ्याकडे जे आहे त्याचा अजून कुणाला हेवा वाटत असेलही.
कुणाला सर्व त्यागण्यात सूख, तर कुणाला सगळं भोगण्यात सूख. ज्याचं त्याने ठरवावं आणि मजा करावी.
30 Dec 2015 - 5:53 pm | पिलीयन रायडर
प्रत्येक माणसावर अवलंबुन आहे.. असं सगळ्यांसाठी एकच उत्तर असलेलं नवनीत गाईड थोडीच असतं..
एक मित्र आहे.. शिकलाय आणि कमावतोय न्युयॉर्कमध्ये.. बदाबदा कमावतोय.. साऊथचा आहे.. तिकडेच मोठ्या शहरात स्वतःचा "मॉल" आहे.. सिंगापुर का असंच कुठेतरी घर आहे. पुण्यातही घर घेतोय.. इतकं कमावतोय.. रिलेशनशिप्मध्ये मार खालेल्ला आहे. पण जस्ट तीसचा आकडा गाठलाय.. लग्न होऊन लागेल मार्गी.. अजुन वय गेलेलं नाही..
तर मला वाटायचं इतकं सगळं आहे.. हा माणुस किती सुखी असेल?!!
कळालं की त्याची महात्वाकांक्षा ही न्युयॉर्कमध्ये "हेलिकॉप्टर" बाळगण्याची आहे. त्याच्यामते अजुन तर खुप काही करणं बाकी आहे..
आपण असंही म्हणु शकतो की काय हा हव्यास.. आहे त्यात सुखी रहावं.. पण मग असं केलं तर ह्या मोठमोठ्या कंपन्या.. उद्योगधंदे कुठुन उभे राहिले असते.. ही खुप काही मिळवण्याची काहींची आस त्यांच्याच नाही तर इतरांच्याही आयुष्यात फार घडामोडी घडवत असते. ती आवश्यक आहेच की..
आनंद मानणं एक गोष्ट झाली.. आहे त्यात समाधान मानुन स्वस्थ बसणं दुसरी.. सतत काही तरी मिळवत जाणारे आनंदी नसतातच असं काही नाही..
30 Dec 2015 - 8:17 pm | शब्दबम्बाळ
मला वाटत समाधानी राहण्यासाठी एक "ध्येय" सगळ्यात महत्वाचे असते.
मग ते एक TV घेण्याच असो वा एखादे पेटंट फ़ाइल करण्याचे असो. ध्येय माणसाला आळशी होऊ देत नाही आणि कामात गुंतवून ठेऊन निराशही होऊ देत नाही.
पण गम्मत म्हणजे सतत नव-नवी ध्येय येत रहाणे देखील महत्वाचे आहे. नाहीतर जे मिळवायचे होते ते मिळवल्यानंतर आता आयुष्यात काय करायचे हि भली मोठी पोकळी निर्माण होऊ शकते.
त्यामुळे Megamind हा सिनेमा मला फार आवडतो. हिरोला मारल्यानंतर खलनायक कसा आळशी आणि सैरभैर होतो हे त्यात गमतीशीर रित्या दाखवलं आहे.
पण शेवटी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच! म्हणून समाधानाची व्याख्या ज्याने त्याने स्वतःच ठरवावी. सगळ्यांसाठी समान व्याख्या असू शकेल असे मला तर वाटत नाही.
30 Dec 2015 - 8:21 pm | मुक्त विहारि
धाग्याने निराशा केली नाही...
30 Dec 2015 - 9:07 pm | नितिन नितिन
दुविदा मनस्तिथि उत्तर नहि
30 Dec 2015 - 10:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुख हवे ते मिळण्यात नाही, तर मिळालेले हवेहेवेसे वाटण्यात आहे.
हे बरोबर आहेच, पण अजून एक सत्य आहे...
"जर मिळालेल्या गोष्टींत सर्व माणसांना सुख मिळाले असते तर, आजपर्यंत मानवी जीवन जेवढे विकसित झाले आहे, त्याच्या निम्मेही झाले असते की नाही यात संशय आहे."
30 Dec 2015 - 10:25 pm | वीणा३
सगळ्याच प्रकारचे लोकं या जगात लागतात. पै पै साठवून कोणीतरी बचत करणारे लागतात तसंच रिस्क घेऊन कर्ज काढून बिसनेस करणारे पण लागतात.
जर सगळेच आहे त्यातंच समाधानी असते तर अजूनही आपण पायी फिरत असतो, जात्यावर दळत असतो (किंवा रोज शिकार करून अन्न मिळवत असतो ).
कोणाला पोळी भाजी खाऊन समाधान मिळेल कोणाला पुरणपोळी कोणाला चिकन बिर्याणी. कोणाच समाधान आनंद बरोबर किंवा चूक हे मी कोण ठरवणार.
मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे असं मला वाटणं महत्वाचा. मग ती झोपडी असो ५ बेडरूम चा flat असो अथवा अजून काही.
31 Dec 2015 - 10:27 am | प्रकाश घाटपांडे
जगी सर्वसुखी असा कोण आहे?
विचारी मना तुच शोधोनी पाहे
गरीब बी नाय आन श्रीमंत बी नाय!
सुखी वा दु:खी या जीवनात असलेल्या अवस्था आहेत. जन्मापासून मृत्यूपर्यंत कायम सुखी वा दु:खी कोणी नसते.
31 Dec 2015 - 10:43 am | हेमंत लाटकर
काही चांगले, खोचक, बोचक, सतसंगी प्रतिसाद आवडले. डाॅ. खरेचे प्रतिसाद परखड असले तरी मनाला लागणारे नसतात. डाॅ. आडनावा प्रमाणे खरे बोलणारे, लष्करी नौकरीत काॅपरेटिव्ह व पाॅप्युलर असावेत असे वाटते.
हा धागा टाकण्यामागे गरीब सुखी व श्रीमंत दुखी:, गरीबीतच राहावे, प्रगती करूच नये, आहे त्या परिस्थितीत राहावे हा उद्देश नसून जास्तीच्या हव्यासापायी मनुष्य आनंदी व समाधानी जीवन जगणेच विसरून जाईल. प्रत्येक गोष्टीत इतरांशी तुलना करून इतराकडे असलेले आपल्याकडे असावे याचा आटापिटा करेल. हा धागा मध्यमवर्गीय नौकरदारांना उद्देशून आहे. उद्योजक लोकांकडे सर्व काही असले तरी ते साधे राहतात (नारायण मुर्ती)
आमटे दाम्पत्यांचे उदा. देण्यामागे आपण त्यांच्या सारखे करावे असा नाही तर आनंदी व समाधानी राहण्यासाठी जास्तीचा हव्यास करण्याची गरज नाही हे सांगणे आहे.
31 Dec 2015 - 10:59 am | सोत्रि
जितका धागा पोकळ होता त्याच्या दुप्पट हा प्रतिसाद पोकळ आहे.
स्व्गतः सोक्य, ठाकूरांचे प्रतिसाद वाचले नसल्याचाच परिणाम असावा का हा वरचा प्रतिसाद
- (५ रूमच्या घरात राहून, SUV चालवूनही सुखी व समाधानी असलेला) सोकाजी
31 Dec 2015 - 11:11 am | नाव आडनाव
त्यांनी शतक झाल्यानंतर बॅट उंचवून दाखवली आहे :)
31 Dec 2015 - 12:10 pm | स्पा
=))
31 Dec 2015 - 12:03 pm | जेपी
लाटकर काकांच्या धाग्याचे शंभर झाले,
इसी खुशी के मोके पर बॅटमॅन आणी टवाळ कार्टा यांच्यावरील प्रतिबंध काढण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
31 Dec 2015 - 12:07 pm | नाव आडनाव
दोन्ही आयडींसाठी समर्थन / अनुमोदन देण्यात येत आहे.
31 Dec 2015 - 12:34 pm | नाखु
माझा हात वर केला आहे...
बाकडा विद्यार्थी
मिपा विद्यामंदीर
31 Dec 2015 - 12:47 pm | आदूबाळ
मीही झारा वर करून पाठिंबा देतो.
- बाहेरचा वडापाववाला
1 Jan 2016 - 5:30 pm | पॉइंट ब्लँक
आयला हे कधि झालं. एवढे भारी दोन आयडी बॅन. ऐकावे ते नवलच.
31 Dec 2015 - 12:09 pm | जिन्क्स
बॅटमॅन ह्यांच्या वर प्रतिबंध का घालण्यात आले?
31 Dec 2015 - 12:16 pm | कपिलमुनी
ह.घ्या.
7 Jan 2016 - 3:29 pm | हाडक्या
एक चित्र हजार शब्दांच्या तोडीचं की काय म्हणतात ते.. ;)
पण कै का असेना.. बॅटमॅन नि टका परत आलाच पायजे. (नैतर आमी सामुहिक जालीय उपोषण करु आता.!!)
31 Dec 2015 - 12:20 pm | अजया
=))
2 Jan 2016 - 9:26 am | सिरुसेरि
"तुझे आहे तुजपाशी" या नाटकात काकाजींनी असेच सांगितले आहे . आमटे परिवार , गांधीजी , विवेकानंद , सावरकर हि सारी लोकोत्तर , महान माणसे आहेत . सर्वसामान्य माणसांनी सोसत नसेल तर उगाचच त्यांचे अनुकरण करु नये . नाहितर मग , न झेपणारया पट्टीत गायला गेले तर जसे गाणे बेसुरे होते , तसेच जीवनही अर्थहिन होउन जाते . हि महान माणसे म्हणजे जणू सागरातील दिपस्तंभ आहेत . सर्वसामान्य मनुष्यरुपी जहाजांनी त्यांच्याकडुन प्रकाश घेउन जीवनरुपी सागरात मार्गक्रमण करावे , परंतु स्वता: क्षमता नसताना दिपस्तंभ बनण्याचा अट्टाहास बाळगू नये. अन्यथा हे मार्गक्रमण दिशाहिन होऊन जाते .
2 Jan 2016 - 10:27 am | सुबोध खरे
मी वर लिहिले आहे ते तुझे आहे तुजपाशी मधीलच वाक्य आहे (मला अतिशय पटलेले)
3 Jan 2016 - 4:56 pm | मोगा
न पेलवणार्या गोळ्या घेऊ नयेत. असे काहीतरी ते वाक्य आहे. तुज आहे तुजपाशी.
7 Jan 2016 - 12:29 pm | मानस्
व्वा, क्या बात है...अतिशय समर्पक प्रतिसाद.
2 Jan 2016 - 11:08 am | सिरुसेरि
+१ . अगदी बरोबर खरे सर . तुमच्या प्रतिक्रिया वाचूनच मला "तुझे आहे तुजपाशी"ची आणी काकाजीं ची आठवण झाली .
4 Jan 2016 - 4:56 pm | नया है वह
पुप्रप्र.
4 Jan 2016 - 7:20 pm | हेमंत लाटकर
लेखाचा उद्देशच कुणाला कळला नाही. सर्वांनी प्रकाश आमटेंचेे अनुकरण करावे किंवा गरीबच राहावे असे माझे म्हणने नव्हते तर अति हव्यासामुळे माणूस आनंदी व समाधानी जीवन जगणे विसरून जाईल हे सुचवायचे होते.
5 Jan 2016 - 7:22 am | मोगा
आमटे , अवचट , सिंधुताई यांच्या समाजकार्यातही अनेकांच्या लाखो रु दानाचा समावेश आहे.
9 Jan 2016 - 11:28 am | सुबोध खरे
त्यांनी पहिल्याने स्वकष्टाने समाजकार्य उभे केले आणी मग लोकांनी त्यांना मदत दिली.
पहिल्या दिवसापासून जनतेचा पैसा वापरायला ते राजकारणी नव्हेत. एवढे तरी लक्षात घ्या.
जिथे तिथे पिंक टाकणे सोडा
8 Jan 2016 - 10:09 pm | नितिन थत्ते
Money is not everything.
But make sure you have loads of it before saying this.
असं वॉरन बफेने म्हटल्याचं ऐकलं आहे.
10 Jan 2016 - 11:34 am | नमकिन
बहुधा मानव जन्मात मनात जेव्हा वरील ही भावना जोपासली जाईल तेव्हा क्षणिक आनंद, भौतिक सुख व निरंतर समाधान यांचा फरक अनुभवतील, तोवर आहेच उर फुटेस्तोवर धावणे.
14 Jan 2016 - 5:57 pm | अभिजीत अवलिया
चैन वगैरे गोष्टी व्यक्तीसापेक्ष आहेत. एखाद्या फुटपाथ वर राहणार्या माणसाला झोपडीत राहणारा माणूस चैन करत आहे असे वाटू शकते, झोपडीत राहणार्या माणसाच्या दृष्टीने चाळीत राहणारा, चाळीत राहणार्याच्या दृष्टीने flat मध्ये राहणारा, तर flat वाल्याना बंगल्यामध्ये राहणारा माणूस चैन करत आहे असे वाटू शकते. प्रत्येक माणसाने आपले जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करावे असे मला वाटते. फक्त त्यासाठी लागणारा पैसा प्रामाणिकपणे कमवावा. चोऱ्या माऱ्या करून, भ्रष्टाचार करून न्हवे. प्रामाणिकपणे पैसा कमवून प्रत्येकाने antilia सारखे घर बांधले तरी चालेल.
14 Jan 2016 - 6:03 pm | होबासराव
=))
19 Jan 2016 - 1:15 pm | पैसा
धागा आणि प्रतिक्रिया वाचून दमले. वेळ कमी असल्याने मिपावर येणे ही आज चैन आहे. खरे तर ती जीवनावश्यक गरज म्हटली पाहिजे.
19 Jan 2016 - 2:00 pm | सामान्य वाचक
अतिशय फालतू विषयावरचा तेवढाच फालतू लेख आणि पब्लिक चढ ओढीने उत्तरे देत आहे
झुंजी लावून श्री श्री रा रा रा लाटकर काकासो ( बघा , नीट पूर्ण नाव लिहिले आहे लेखकाच्या विनन्तिनुसार)
चला सगळे, आता कुठे तरी दुसर्या धाग्य वर जाऊ
वि सु : हि प्रतिक्रिया सर्व लिखाणा साठी blanket प्रतिक्रिया आहे
(कुणाच्या लिखाण ला? असे कोण म्हणते आहे?)