मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक
(ऑफबिट गाड्यांच्या धाग्यावर झालेल्या गाड्यांच्या वेगाबद्दलच्या चर्चेवर आधारित....)
स्कॉर्पीयोसारखी गाडी ताशी २० च्या वेगाने शहरातल्या गल्लीतून जातांना कुणाला धडकल्यास मृत्यू होऊ शकतो. तर सायकल ४० च्या वेगाने आदळली तरी कुणाला सहसा मरण येणार नाही.
अपघात हे अतिवेगामुळे होतात असा प्रचंड मोठा गैरसमज भारतात आहे. वेग नाही तर नियंत्रणाच्या अभावाने अपघात होतात. वेगाने गाडी हाकण्याला 'पैशाची मस्ती', 'बेफिकिरी' हे बिरुद चिकटवल्याने चुकतं. मग कुठलाही अपघात हा बेदरकार चालवण्याने होतो असे समजले जाते. अगदी २० च्या गतीने शहरातून जाणार्या महाकाय ट्रकच्या मागच्या चाकात कुणी मूर्ख स्वतःच्या चुकीने सापडला तरी "ट्रक भरधाव"च असतो. ज्याचे वाहन मोठे तो गुनहेगार.
कुठल्याही कारणाने "चालक पुरेसा अलर्ट नसणे" हेच अपघाताचे मुख्य कारण आहे. एकदा वेग ६० च्या पलिकडे गेला की चालकाचा अवेलेबल रिस्पॉन्स टाइम वेगाच्या व्यस्त प्रमाणात कमी होत जातो. उपलब्ध वेळेत योग्य ते निर्णय पटापट घेण्याची मेंदुची क्षमता किती आहे यावर बरेच अवलंबून असते. त्यात दारू, तीव्र भावना इत्यादींच्या अंमलाखाली असेल तर परिस्थिती अधिक धोकादायक असतेच. आपण इथे १३० च्या स्पीड्चा विचार करतोय पण लँड स्पीड रेकॉर्ड १३०० किमी प्रतितास आहे. म्हणजे योग्य प्रशिक्षणाने मानवी मेंदु तितका वेग यशस्वीपणे हाताळू शकते. इथे कुणीही बेदरकारपणे गाडी हाकण्याला प्रोत्साहन देत नाही तर उपलब्ध मानवी मेंदूच्या क्षमतेनुसार आधुनिक मशिनद्वारे वाहनाचा वेग नियंत्रित करून गाडी चालवण्याला समर्थन देत आहे. अनेक लोक वेगाला घाबरतात तर कैक त्या घाबरण्याच्या स्टेजला ओलांडायला, आपण शूर आहोत हे सिद्ध करायला वेग वाढवतात. दोन्ही टोकं भयानक आहेत. दोन्ही अवस्थेत चालक पुर्ण अलर्ट नाही. ड्रायविंगच्या मूळ संकल्पनेपेक्षा वेगळीच भावना त्याच्या मनावर कब्जा धरून बसलेली असते. तीच अपघाताचे कारण असते. कारण मेंदू, भावनेच्या आहारी जाऊन, योग्य निर्णय घ्यायची क्षमता गमावून बसतो.
१२० च्या वेगाने वळणे घेणे हे धोकादायक आहे असे म्हटले गेले आहे. सरसकट ते चूक की बरोबर असं नाही म्हणता येणार. परिस्थितीवर अवलंबून आहे. ९०-१२० अंशावर ४० च्या स्पीडने १५ डीग्री स्लोप/इन्क्लाइन टर्न मारणे छोट्या गाडीसाठी सोपे असू शकते. इथे काठिण्यपातळी वाढत गेली तर...? म्हणजे ओवरटेकींगसाठी मोठे ट्रेलर, छोट्या छोट्या वळवळणार्या बाइक्स, सूर्य किंवा हेडलाइट्स थेट अचानक डोळ्यावर येणे, अचानक समोरून वाहन येणे. अगणित शक्यतांचा विचार करता अशा वळणांवर ३० ची वेग मर्यादा व ओवरटेकींगला मनाई असते. 'ती पाळली नाही तर अपघात होणारच' असे नाही पण शक्यता कमी होऊ शकतात. पण जिथे असले अडथळे नसतील तर गाडी व चालक एकमेकांच्या साथीने १२०ने टर्न मारू शकतात. पण अशा परिस्थितीचा उपयोग कुणी मर्दुमकी दाखवण्यास करत असेल तर मी त्याला खरा नामर्द म्हणेल, जो बाह्य दिखाव्याने आपली मानसिक कमतरता झाकण्याचा प्रयत्न करतो.
गाडीत बसल्यावर गाडीमय, रस्तामय, निसर्गमय, भवतालमय व्हावं लागतं. इथे खरं ध्यान-मेडीटेशन लागतं, इथे 'स्व' विसरावा लागतो. मग स्पीडोमीटर असू दे ८० वा १८० वर... मन कसलाही रीपल्शन दाखवत नाही, त्याचं अस्तित्वच नसतं, आपलं अस्तित्व नसतं, स्टेअरिंगच्या दांड्यातून उतरून आपण सस्पेन्शनवर तोललेल्या चाकांमधे घुसलेलो असतो. टायरच्या एका एका ट्रेडशी रस्त्याच्या एका एका दगड-खड्याच्या होणार्या मिलनाचा-संघर्षाचा स्तब्ध साक्षिदार असतो. फेन्डर्सवर आदळणार्या वार्याशी हस्तांदोलन करत असतो, इंजीनाच्या तालासोबत चाललेल्या अॅक्सिलेटर तारेच्या जुगलबंदीचे पहिल्या रांगेतले प्रेक्षक असतो. क्षणा-क्षणाला शेकडो फूटांचा रस्ता मागे सोडत जातो तरी तिथल्या प्रत्येक कणाकणाचा हिशोब मनात तयार होत असतो, पुढचे, मागच्या, आजू बाजूच्या वाहनांशी अनामिक बंधनानी जोडले गेलो असतो. पुढ्यातल्या जोरात पळणार्या हरिणीच्या प्रत्येक लटक्या-झटक्याला न्याहाळत असतो, त्यावरून पुढचा खड्डा, गतिरोधक, चौक, वळण याचा अंदाज बांधत असतो. त्याच बरोबर सतत घोंगावणार्या मृत्यूच्या भयाला मार्गदर्शक मित्र म्हणून डाव्याबाजूला बसवून घेतलेलं असतं. सदैव जागृत, चतुर राहून मिनिटामिनिटाला हजारो जीबींच्या प्रमाणात होणारी मेंदूतली संगिणिकिय उलाढाल शांतपणे समजून घेत असतो. जेव्हा मन शांत, जागृत असतं तेव्हा अवलेबल रीस्पॉन्स टाइम वेगाच्या व्यस्त प्रमाणाकडून सम प्रमाणाकडे येत जातो. एक वेळ अशी असते की वेगापेक्षा कैक पटीने हा रेस्पॉन्स टाइम वाढलेला असतो. १००-१५०-२०० ची स्पीडही २०-३० एवढी क्षुद्र वाटू लागते. मग जाणवायला लागतं... कितीही वेगाने धावलो तरी मन संतुष्ट होणार नाही. मन तर त्यापेक्षा वेगाने धावतंय. मग वेगाच्या मागे का जा? मनाच्या मागे जा. मन शांत करा. वेगाची नशा उतरून जाते. काहींना हे जाणवत नाही. ते अजून अजून वेग वाढवतात. नियंत्रण सुटतं, मनावरचं, गाडीवरचं, रस्त्यावरचं.... बातमी येते 'भरधाव गाडीचा अपघात'. अपघात तर आधीच झालेला असतो, भरधाव मनाचा. तेवढा सांभाळला तरी ९० टक्के अपघात होणार नाहीत.
There are only two kinds of driving in the world: Safe Driving and Rash Driving. There is nothing such as Fast Driving. let Einstein alone explain it.
तुम्हाला काय वाटतं मंडळी?वर्गीकरण
प्रतिक्रिया
लेखाचा विषय छान आहे, लिखाणही
ते सग्ळे ब्रोब्र आहे...पण आधी
लेख ड्रायविंगबद्दल आहे,
खिक्क
काडीसारमूलक चूर्ण
रग्बी!
शेवटचा पॅरा फारच सुंदर जमलेला
+१ अगदी सुंदर !!
गाडीत बसल्यावर गाडीमय,
गाडीत बसल्यावर गाडीमय,
कार *
असा सगळा प्रकार झाला तर
हॅ हॅ
आदि जोशी बाईकला हात लौ देत
छान लेख.
काही बाबतीत सहमत , काही
अद् भूत लिहीलत, या पॅरॅग्राफच्या प्रेमात पडलोय.....
सर्व वाचक आणि
छान लेख. फार आवडला.