✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

“रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा...!

ग — गंगाधर मुटे, गुरुवार, 10/22/2015 - 14:37

“रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा...!


शेतमालाचे भाव वाढले की
आपला जळफळाट होतो...कारण
आपल्या मनात दडी मारून
बसला आहे एक रावण

आपल्या मनातल्या रावणाला
सीता पळवून न्यायची असते
भूमीतून निपजलेल्या वस्तूंची
किंमत मोजायचीच नसते

आमची मानसिकता रावणीच
संधी मिळताच जागी होणारी
पोशिंद्याला सदैव अशोकवनात
बंदिस्त ठेवू पाहणारी

कधी मरेल हा रावण
तुमच्या आमच्या मनातला?
आणि कधी होईल मुक्त
बळीराजा रानातला?

रावणी मनोवृत्तीचे दहन व्हावे
अशी बाळगू ‘अभय’ इच्छा
नंतरच देऊ एकमेकांना
“रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा...!

                        - गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रतिक्रिया द्या
3095 वाचन

💬 प्रतिसाद (10)

ह्याला काय अर्थ आहे! ?? उगाच

नाना स्कॉच
Fri, 10/23/2015 - 07:44 नवीन
ह्याला काय अर्थ आहे! ?? उगाच काहीही, तुम्ही जो लोकांचाजळफळाट म्हणता आहात तो "जीव जळणे" प्रकार असतो हो साहेब!
  • Log in or register to post comments

तुमच्या मनातला नॉन शेतकरी

बिन्नी
Fri, 10/23/2015 - 08:11 नवीन
तुमच्या मनातला नॉन शेतकरी लोकांबद्दलचा रावण दिसतोय ! त्याला जाळा आधी ! नाहीतर पाखंडी लेबल लागायचं !
  • Log in or register to post comments

शेतकरी अनुदाने घेतो..कर्जमाफि

अविनाशकुलकर्णी
Fri, 10/23/2015 - 09:37 नवीन
शेतकरी अनुदाने घेतो..कर्जमाफि घेतो...लुकसान भरपाई मिळते...कोटी रु किमतिच्या जमीनी असेट असते त्याच्या नावावर....मरतो शेत मजुर..त्याला कुणी वाली नसतो........
  • Log in or register to post comments

शेतात सापडलेली सीता आणि शेतात

अनुप ढेरे
Fri, 10/23/2015 - 10:02 नवीन
शेतात सापडलेली सीता आणि शेतात उगवलेली पिकं यांची तुलना आवडली. कविता छानच आहे.
  • Log in or register to post comments

शमी वरुन् शस्त्रे काढण्यासाठी हार्दीक शुभेच्छा.....

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 10/23/2015 - 13:01 नवीन
शेतमालाचे भाव पडले की यांचा जळफळाट होतो...कारण यांच्या मनात दडी मारून बसला आहे एक दुर्योधन यांच्या मनातल्या दुर्योधनाला ग्राहकाचे वस्त्रहरण करायचे असते भूमीतून निपजलेल्या वस्तूंची किंमत करुन यांना स्वतःची तुंबडी भरुन घ्यायची असते त्यांची मानसिकता दुर्योधनाचीच संधी मिळताच डाळींचे भाव वाढवणारी दुधाचे भाव पडताच ते रस्त्यावर ओतुन देणारी रक्त पिपासू गोचिडी सारखी आत्महत्यांचे ही राजकारण करणारी फुकटची अनुदाने कर्जमाफी घेत, झुंड करुन सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारी कधी मरेल हा दुर्योधन या स्वार्थांध लोकांच्या मनातला? आणि कधी मोकळा श्वास घेइल ग्राहकराजा या देशातला? दुर्योधनी वृत्तीचा खातमा व्हावा अशी पैजारबुवाची इच्छा आहे त्यासाठी, शेवटचा उपाय म्हणून्, शमीवरची शस्त्रे काढायला लागली तरी हरकत नाहीये पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

हल्ली दुर्योधनाला चतुर व्यापारी असे म्हणतात

मोगा
Sat, 10/24/2015 - 08:25 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

मोगा

इरसाल
Sat, 10/24/2015 - 16:23 नवीन
मोगा म्हणजे मोदींची गाय .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा

सर्वच जब्बर्दस्त !

निनाव
Fri, 10/23/2015 - 14:52 नवीन
मुळ काव्य आणिक पैजार बुआ ह्यन्चे प्रतिसाद .. सुन्दर. मुद्दा नाजुक आहेच. महागाइ आत्म हत्या , मध्यम वर्गियान्चि गळचेपि.
  • Log in or register to post comments

मुटे कविता मनाला पटली. रावणा

विवेकपटाईत
Sat, 10/24/2015 - 10:18 नवीन
मुटे कविता मनाला पटली. रावणा नंतर श्रीरामाने हि सीता आपल्या अधीन ठेवली. शेवटी जनतेनेच श्रीरामाला त्याची जाणीव करून दिली. सीता जमिनीत गुप्त झाली. शेतकरी, रानावनात राहणारे लोक सुखी झाले. तिथे शेतकरी सुखी तिथेच 'रामराज्य'.
  • Log in or register to post comments

ठरवून टाकली मोक्यावर जिल्बि

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/24/2015 - 11:31 नवीन
ठरवून टाकली मोक्यावर जिल्बि मोकळा केला भस्सकन कोठा गाई पळाल्या राना वनात ओरडू लागला मोकळा गोठा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा