मराठीतील लेखांचा प्रसार
सर्व मिपा करांना नमस्कार,
मला मराठी भाषेतील उत्कृष्ट लेख, मग ते सर्वच विषयांवरील असले तरी वाचायला खूप आवडतात. मिपा वर देखील जसा वेळ मिळेल तसा मी येतच असतो. माझ्यामते मिपा मराठी भाषा संवर्धनात मौलिक काम करत आहे.
मी अधिकाधिक लोकांपर्यंत हा खजिना घेऊन जायचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी whatsapp वर लहान लहान संदेशांमार्फत ही सर्व माहिती पोहोचवली जाते.
अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे, संगणक जोडणी वरील अनिरुद्ध दातार यांचा लेख त्यांच्या परवानगीने मी आणि माझा whatsapp समूह (मराठीचे शिलेदार)जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. आमचे एकूण ८ समूह आहेत. आम्ही एकूण १००० पेक्षा जास्त लोकांपर्यंत हा खजिना दररोज पोहोचवत आहोत. उद्देश एकच आहे, मराठी भाषेबाबत च न्यूनगंड कमी करणे, मराठीतही भरपूर ज्ञानवर्धक लेख लिहिले जातात त्यांचा प्रसार करणे, आणि अधिकाधिक लोकांना नवनवीन मराठी लेखनासाठी प्रवृत्त करणे.
तुमची मदत - तंत्र जगत मध्ये जर अधिकाधिक तंत्र ज्ञानावर लिखाण झाले तर त्याचा मराठीसाठी खूप फायदा होईल.
याच शिवाय, मला तुम्ही सर्वांनी जर एकत्रित पणे तुमचे लेख whatsapp वर प्रसारित करण्याची परवानगी दिलीत तर माझे काम अजून सोपे होईल.
मला खालील विषयावर अजून कुठे कुठे मराठी लेख मिळू शकतील यावर देखील मार्गदर्शन करा :
संगणक
सामान्य ज्ञान
भाषा
गणित
विज्ञान
इतिहास
Gadgets
कला
संस्कृती
आभार,
सुचिकांत
९०५२३४४४७६
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मराठीतील लेखांचा प्रसार
माझ्या माहीतीतला
आपण एखाद्या पुस्तकातील मजकूर
होय आहेत. प्रताधिकाराचा
कॉपीराइट विषयी...
तुम्ही लिहिता, बनवता, निर्माण
अच्छा....
माहिती लोकांपर्यंत घेऊन
पण जर वाचकांकडे व्हॉट्सअॅप
उपक्रम स्तुत्य पण
प्रश्न हा आहे कि, एक माणूस
नेमके काय म्ह्णायचे आहे ते कळले नाही
माझ्या हा संकेत स्थळाचा
तर त्यावर कोणी आक्षेप घेऊ शकते का?
आभारी आहे