दर 18 वर्षांनी येणारे विवाहित स्त्रियांचे कोकीळा व्रत
सध्या महिलावर्गाची कोकीळा व्रत करण्याची गडबड चालू आहे. हे व्रत आषाढ शु 15 ते श्रावण शु 15 असे महिनाभर चालते. अधिक आषाढ महिना संपून निज आषाढातील पोर्णिमा येईल तेव्हा सुरू करून श्रावण पौर्णिमे पर्यंत करावे लागते. हे व्रत 18 वर्षानी एकदा येते. ज्या वर्षी अधिक आषाढ मास असतो तेव्हाच करायचे असल्यामुळे आयुष्यात जास्तीत जास्त 3 वेळा करण्याची सॆधी मिळते. यावेळेला हे व्रत 29 जूलै ते 29 आॅगस्ट या महिन्यात आहेे.
हे व्रत विवाहित स्त्रिया करू शकतात. हे व्रत केल्याने स्त्रियांनां दीर्घकाळ सौभाग्य, घनवृद्धि, व सॆतंतीसौख्य व इतर प्रपंचातील सुखे प्राप्त होते. व्रत महिनाभराच्या पुण्यकाळात कुणी महिनाभर, कुणी 3 दिवस, कुणी 1 दिवस करतात. हे व्रत ब्रह्मर्षी वसिष्ठ मुनींनी शत्रुघ्नाची पत्नी कीर्तिमाला हिला सांगितले.
कोकीळा व्रताची कहाणी: ब्रह्मदेवाला दहा पुत्र त्यातील दक्षप्रजापती,, त्याला 101 कन्या होत्या. जेष्ठ कन्या दाक्षायणीचा शंकराशी, 27 कन्या चंद्राला व इतर कन्यांचे विवाह इतर देवांशी करून दिले. दक्षाला पुत्र नव्हता म्हणून कपीलमुनीनूी त्यास पुत्रकामेष्टि यज्ञ करण्यास सुचविले. दक्षाने मग एका विशाल मैदानात यज्ञाची सिद्धता केली. दक्षाने सर्व देवांना, ऋषिनां आमंत्रणे पाठविली, पण शंकराला मात्र वगळले कारण दक्षाला शंकराचे वेदबाह्य वर्तन, स्मशानात राहणे, भुतांचा सहवास, नागांची भुषणे व अघोरी वागणे आवडत नसे.
यज्ञाच्या वेळी सर्व देवांनी दक्षाला शंकराच्या अनुपस्थितीविषयी विचारले तेव्हा त्याने शंकराला बोलावण्यास स्पष्ट नकार दिला. मग यज्ञाला आरंभ झाला, पण नारदमुनी (कळलावे) तिथून थेट कैलासावर आले व दक्षाच्या यज्ञाचे रसभरीत वर्णन सांगितले. ते ऐकून शंकर शांत बसले पण दाक्षायणीला मात्र आपल्या वडिलांनी सर्वांना बोलावले पण शंकराला बोलावले नाही याचा राग आला. (बायकांना आपल्या नवर्याला माहेरी बाेलावले नाही तर फार राग येतो.)
शंकराने गणपती, शिवगणांचे सैन्य, वाहन नंदी यांना दाक्षायणी सोबत माहेरी पाठवले. तेथे यज्ञ धुमधडाक्यात चालला होता, तेथे वडिल व आईने तिच्याकडे दुर्लक्ष केले, हे दाक्षायणिला जिव्हारी लागले. तिने रागाने कुणाला काही कळण्याआधी यज्ञकुंडात उडी घेतली. अग्नीने काही क्षणातच तिची आहुती घेतली. सर्वजण स्तंभीत झाले. काही वेळाने सर्व भानावर आले. सर्वत्र हाहा:कार माजला. नारद गुपचूप निघून कैलासावर गेले व त्यानी शंकराला सर्व सांगितले.
हे ऐकूण शंकर ताडकन उठले व रागारागाने आपल्या जटा एका शिळेवर आपटल्या. त्या क्षणी तिथे एक विराट पुरूष (वीरभद्र) प्रगटला. शंकराने त्याला आज्ञा केली सर्व सैन्यानिशी तेथे जाऊन यज्ञाचा विध्वंस करा तसेच सर्व निमंत्रितांचा संहार करून दक्षाला मृत्युदंड द्या
वीरभद्र त्वरेने मोठ्या सेनेसह यज्ञस्थळी पोहचला. त्याने हल्ला सुरू केला, सर्व देवांनी व ऋषि-मुनींनी वेदमंत्रांनी दर्भ शक्तीयुक्त करून प्रतिकार केला. वीरभद्राने व त्याच्या सैन्याने भयानक संहार केला, वीरभद्राने तलवारीने दक्षाचे मुडंके छाटून यज्ञात फेकले.
बह्मा, विष्णू व नारदाने वीरभद्राने केलेला संहार सांगून वीरभद्राला शांत करण्यास सांगितले. तेव्हा शंकर उठले व यज्ञभूमीवर आले व सर्वांना जिवंत केले. बह्माने आपला पुत्र दक्षाला जिवंत करण्याची पार्थना केली. शंकराने त्याचे मुंडके आणण्यास सांगितले पण ते यज्ञात जळून खाक झाले होते. मग कोणतेही शिर आणा असे शंकर म्हणाले. तेव्हा जवळ पडलेले बोकडाचे मुंडके दक्षाच्या मानेवर ठेवले व त्याला जिवंत केले.
नारदाने दाक्षायणिला (शंकराची पत्नी) जिवंत करण्याची विनंती केली. तेव्हा शंकराने सांगितले की तिचे दर्शन तुम्हाला घडवितो परंतु तिचे शरीर नसल्यामुळे ती पुर्नजीवित होणार नाही. असे म्हणून यज्ञकुंडातील राख हवेत फेकली तेव्हा दाक्षायणी प्रगटली. तिने हात जोडून शंकराची क्षमा मागितली. परंतु शंकर म्हणाले, प्रिये रागाच्या भरात तुझ्याकडून आत्महत्या व यज्ञाचा अपमान हे दोन अपराध घडले. त्याचे फळ अटळ असल्यामुळे पुढील दहा हजार वर्ष तुला काळ्या रंगाची व कुरूप पक्षिणी व्हावे लागेल.
दाक्षायणिने उ:शाप मागितला तेव्हा शंकर म्हणाले तुला पश्चाताप झाला आहे म्हणून तू पक्षिणी जरी झालीस तरी गोड आवाजाची कोकीळा होऊन सदैव नंदवनात विहार करतील. शंकर पुढे म्हणाले दहा हजार वर्ष झाल्यावर तुला हिमालयाची पत्नी मेनका हिच्या पोटी जन्म मिळेल आणि हरितालिका व्रताच्या प्रभावाने पुन्हा आपला विवाह होईल.
वर्गीकरण
In reply to धन्यवाद डाॅक्टर साहेब. तुम्ही by मांत्रिक
मांत्रिक साहेब
In reply to मांत्रिक साहेब by सुबोध खरे
आपले कर्मकांड दुसर्यावर लादणे
In reply to आपले कर्मकांड दुसर्यावर लादणे by मांत्रिक
यात घोळ कुठे होत आहे?
In reply to कर्मकांड -- एक वेगळा विचार by सुबोध खरे
डाॅक्टर छान सांगितले.
In reply to कर्मकांड -- एक वेगळा विचार by सुबोध खरे
डॉक्टरसाहेब, आपला विचार पटला.
In reply to डॉक्टरसाहेब, आपला विचार पटला. by समीरसूर
समीर सूर साहेब
In reply to कर्मकांड -- एक वेगळा विचार by सुबोध खरे
विचार आवडला
>>>>>हे व्रत आषाढ शु 15 ते
असली बिनडोक व्रतवैकल्ये करून
In reply to असली बिनडोक व्रतवैकल्ये करून by तुडतुडी
समुद्रमन्थानाचा अर्थ
समुद्रमन्थानाचा अर्थ कुंडलिनीचा मूलाधार चक्रापासूनचा सहस्त्रारा पर्यंतचा प्रवास आहे.नाय हो, आमचा अभ्यास वेगळा दावा करतो... (ह घ्या. पण दावा पडताळून पाहण्यासारखा आहे खरा !)In reply to समुद्रमन्थानाचा अर्थ by डॉ सुहास म्हात्रे
डाॅ. लेख अतिशय उत्तम आहे. पण
In reply to असली बिनडोक व्रतवैकल्ये करून by तुडतुडी
तुडतुडी अक्का, या प्रतिसादा
In reply to असली बिनडोक व्रतवैकल्ये करून by तुडतुडी
धन्यवाद, काही माहिती अतिशय
In reply to असली बिनडोक व्रतवैकल्ये करून by तुडतुडी
..........
In reply to .......... by अत्रुप्त आत्मा
त्यात काय विनोद झाला कळलं
In reply to त्यात काय विनोद झाला कळलं by मांत्रिक
खरच णविण दिसता मि पावर! ;-)
In reply to असली बिनडोक व्रतवैकल्ये करून by तुडतुडी
तुम्ही वसकन अंगावर येणार नसाल
In reply to असली बिनडोक व्रतवैकल्ये करून by तुडतुडी
समाजाला चुकीच्या दिशेने
In reply to असली बिनडोक व्रतवैकल्ये करून by तुडतुडी
प्लीज प्लीज अंगावर येऊ नका
In reply to प्लीज प्लीज अंगावर येऊ नका by पैसा
ज्या काळात स्त्रीला चप्पल
In reply to ज्या काळात स्त्रीला चप्पल by अजया
खरंय
In reply to खरंय by पैसा
असली व्रते वगैरे श्रद्धा नाही
In reply to असली व्रते वगैरे श्रद्धा नाही by यशोधरा
+११११
In reply to खरंय by पैसा
हे केनीकुर्डू काय प्रकार आहे?
In reply to हे केनीकुर्डू काय प्रकार आहे? by बॅटमॅन
पावसाळी भाजी
In reply to पावसाळी भाजी by पैसा
धन्यवाद!
असे थिल्लर उत्सव करून आपण
ऊर्ध्वरेता वगैरे वाचून एका
समीरसूर सर +++++ ११११
पैसा भाऊ , यशोधरा ताई
In reply to पैसा भाऊ , यशोधरा ताई by तुडतुडी
तसं तर मग पुरुषांबाबतही
समाजाने त्यांचं त्यांचं -
In reply to समाजाने त्यांचं त्यांचं - by तुडतुडी
लैईच भारी!
In reply to समाजाने त्यांचं त्यांचं - by तुडतुडी
आपण त्यांचं घर उन्हात बांधू