लोकायतचे सहर्ष स्वागत...!

विसोबा खेचर's picture
Login or registerto access quick links.

राम राम मंडळी,

कालच पार पडलेल्या भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहुरावर लोकायत डॉट कॉम हे मायमराठीतील एक नवे संकेतस्थळ स्थापन झाले आहे. मिसळपावचेच तांत्रिक सल्लागार श्री नीलकांत यांनी हे संकेतस्थळ सुरू केले आहे. मी वैयक्तिकरित्या, तसेच समस्त मिसळपाव परिवारातर्फे नीलकांतचे व लोकायत डॉट कॉमचे सहर्ष स्वागत करतो. हे संकेतस्थळ संगणक, संगणकीय तंत्र, तसेच आंतरजाल इत्यादी विषयांवरील तांत्रिक माहितीच्या देवघेवीकरता स्थापन झालेले व त्याला वाहिलेले संकेतस्थळ आहे. हे संकेतस्थळ संगणक-तंत्र या विषयावरील मराठीतील अग्रगण्य संकेतस्थळ ठरो अशी शुभकामना मी व्यक्त करतो आणि लोकायतला सुयश चिंतितो...

आपला,
(शुभेच्छुक) तात्या.

लोकायत डॉट कॉम या संकेतस्थळाचे निवेदन येथे देत आहे -

- निवेदन -

नमस्कार,

आज आपल्याला या निवेदनाद्वारे मराठीतील एका नव्या संकेतस्थळाबद्दल माहिती देतांना आनंद होत आहे. १५ ऑगस्ट २००८ ह्या भारताच्या ६१ व्या स्वातंत्रदिनापासून मराठीत लोकायत डॉट कॉम ( http://www.lokayat.com/ ) नावाचे एक नवे संकेतस्थळ सुरू झाले आहे.

लोकायत.कॉम, ओळख :

या संकेतस्थळाचा मुख्य हेतू इंटरनेटवर संगणकावर मराठीच्या वापरास चालना देणे हा आहे. येथे साध्या सोप्या मराठीतून संगणक व इंटरनेटच्या वापराबद्दल मार्गदर्शक लेख, नवनवीन तंत्रांची मराठीतून ओळख तसेच आपल्या संगणक व इंटरनेटबद्दलच्या अडचणींबद्दल तज्ज्ञांना प्रश्न विचारण्याच्या सोई उपलब्ध आहेत/ उपलब्ध करुन् देण्याचा मानस आहे.

मराठीचा वापर इंटरनेटवर वाढावा यासाठी अनेक लोक काम करीत आहेत. त्यांच्या कार्याबद्दल माहिती, त्यांचे प्रकल्प आदींबाबत सविस्तर वृतांत येथे देण्यात येतील. तसेच मराठी फ्रीलांसर्सची सूची येथे उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. या संकेतस्थळावर अत्यंत सोप्या पध्दतीने मराठी लिहीता येते. त्यासाठी वेगळं मराठी टायपींग शिकण्याची गरज नाही. त्यामुळे दहा मिनीटातच आपण या मराठी संकेतस्थळावर सहज होतो आणि लिहू लागतो.

येथे या आणि सदस्य व्हा. एक साधा अर्ज भरून सदस्य होता येते. वाचण्या करिता सदस्य होणे गरजेचे नाही मात्र लेख लिहीण्यासाठी तसेच प्रश्न विचारण्यासाठी मात्र सदस्य होणे गरजेचे आहे.

आपण सुद्धा या प्रकल्पात सामील व्हा. सदस्य व्हा. आपल्या आवडीच्या तंत्रज्ञानासंबधी लेख लिहा. प्रश्न विचारा, इतरांच्या शंकांना उत्तरे द्या.

आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत..!

धन्यवाद.

लोकांकडून-लोकांसाठी...लोकायत!

अवांतर: हा नीलकांत आहे का? Smile -- तात्या.

अभिनंदन

नीलकांत यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा

नाना चेंगट
(ठरावाच्या बाजुने मतदान करणारा प्रथम मतदार)

--
प्रत्येक हिंदूद्वेष्टा हा विचारवंत नसतो पण प्रत्येक विचारवंत हा हिंदूद्वेष्टा असतो..

शुभेच्छा!

लोकायत ह्या तांत्रिक माहितीची देवाणघेवाण करणारे संस्थळ सुरु केल्याबद्दल नीलकांतचे अभिनंदन अन् लोकायतच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

- टिंग्या

अवांतर - वरील चित्रातील व्यक्ती नीलकांती वाटतेय Wink

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

शुभेच्छा!

लोकायतकरिता नीलकांत यांना शुभेच्छा!

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

असेच म्हणतो

लोकायतकरिता नीलकांत यांना अनेक शुभेच्छा!

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तकवेडे आहात ? मग जरुर भेट द्या पुस्तकविश्व डॉट कॉमला Smile

हेच म्हणतो

लोकायत आणि विश्वकर्मा नीलकांत ह्यांचे मनापासुन अभिनंदन, आणि लोकायतच्या पुढील वाटचालीकरता हार्दिक शुभेच्छा !!!

हेच म्हणतो +१

लोकायत च्या पुर्ण टिमचे हार्दिक अभिनंदन.आम्ही ऑलरेडी लोकायत मेंबर Smile

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

हेच म्हणतो

- सर्किट

अभिनंदन..

मी घेतले आहे सदस्यत्व..
लोकायत कडून उत्तमोत्तम कार्याची अपेक्षा आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

हार्दिक अभिनंदन...

नीलकांत,
ह्या नवीन संकेतस्थळाबद्दल तुमचे मनापासुन अभिनंदन व शुभेच्छा.

मराठी आंतरजालसागरात मिसळपाव व लोकायत सारखी संकेतस्थळे निश्चितच दिपस्तंभाचे कार्य करतील
ह्यात काहि शंका नाहि.

पुन्हा एकदा अभिनंदन.

अभिज्ञ.

अभिनंदन

अभिज्ञच्या प्रतिसादाशी सहमत.

नोंदणीही कालच केली. Smile

ई मेल आय डी चा स्वीकार होत नाही...

लोकायत वर नोंदणी करतांना माझ्या (मनोगतावरच्याच) ई मेल आय डी चा स्वीकार होत नाही, .....@जीमेल.कॉम किंवा ...@जिमेल.कॉम या दोन्ही प्रकारे टंकित करूनही ई मेल आय डी चुकीचा असल्याचा संदेश येतो आहे. काय करावे?

ई-मेल

तुमचा विरोपाचा (ईमेल) पत्ता व हवे असलेले सदस्यनाम नीलकांत यांना कींवा मला व्यनीने पाठवू शकता.
आपल्याकरिता सदस्यखाते तयार करुन त्याचा परवलीचा शब्द(पासवर्ड) विरोपाद्वारे पाठवला जाईल. त्यानंतर तुमच्या सदस्यखात्यामधे जाऊन तुम्ही तुमचा परवलीचा शब्द बदलू शकता.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

आपलाही मोठेपणाच..

एका नवीन संकेतस्थळाची माहिती आपण आपल्या संकेतस्थळावरून देता यात आपलाही मोठेपणाच दिसतो.

लोकायत तसेच मिपा वर्धिष्णू होवोत ही शुभेच्छा!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अभिनंदन व शुभेच्छा !

या स्तुत्य उपक्रमा बद्दल नीलकांत यांचे अभिनंदन व संस्थळासाठी हार्दीक शुभेच्छा!

ही माहिती दिल्याबद्दल तात्याबा माहाराजांचे जाहिर आभार!

हार्दिक अभिनंदन.

मी घेतले आहे सदस्यत्व..

अवांतर: हा नीलकांत आहे का?

हा खरा कौलाचा प्रश्न आहे.

सखाराम गटणे

----
नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.

नीलकांत...

अभिनंदन आणि शुभेच्छा...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

असेच म्हणते!

- मेघना भुस्कुटे

- मेघना भुस्कुटे

लोकायत ला अनेक शुभेच्छा !

लोकायतच्या स्थापनेसाठी नीलकांताचे अभिनंदन.
Smile

झालो

मी पन झालोय मेंबर

अभिनंदन.

लोकायत वर नक्की भेटू.

माझ्याकडू

माझ्याकडूनही अभिनंदन आणि शुभेच्छा Smile

अभिन॑दन

अभिन॑दन नीलका॑त! वाटचालीसाठी शुभेच्छा!

मराठी पाऊल पडते पूढे....

http://mr.upakram.org/node/1390#comment-22487

लोकायत बद्दल माहिती उपक्रमावर नोंदवली होती. त्यात आणखी एका संकेतस्थळाचा शोध लागला. सचिन आणि नीलकांत सारखे मुले आपल्याकडे असतील तर असे म्हणावेच लागेल की, मराठी पाऊल पडते पूढे....

अभिन॑दन

अभिन॑दन नीलका॑त! वाटचालीसाठी शुभेच्छा!
मी या संकेत स्थळाचा सदस्य झालो आहे..

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

मदनबाण.....
कॄष्यति आकर्षयति इति कॄष्ण:

अभिनंदन आणि शुभेच्छा

नीलकांतचे (आणि इतर संबधित मंडळींचे) अभिनंदन आणि शुभेच्छा!

अनेकोत्तम शुभेच्छा!

वा! मराठी जालविश्व चहुअंगांनी बहरत चाललं आहे.

नव्या युगात नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून जी भाषा/संस्कृती घेते तीच टिकते. मराठी भाषा ललित अंगाने, माहितीपर लेखांनी जालविश्वात पुढे नेण्याचे काम मनोगत,मिसळपाव, उपक्रम वगैरे करतच आहेत. सध्याची मराठी संस्थळे ही लेखनाच्या दर्जाने उत्कृष्ट असली तरी तांत्रिकदृष्ट्या विकास होण्यास भरपूर वाव आहे. त्यासाठी एखादा नीलकांत, एखादा ओंकार झटतोही आहे. परंतु काळाच्या वेगात पावले टाकायची असल्यास जितक्या जणांचा सहभाग तितकी प्रगती अधिक! आता लोकायत स्थापनेनंतर अश्या तांत्रिक बाबींबरही मनसोक्त चर्चा होईल आणि नवनव्या अंगाने तंत्र बहरेल अशी आशा करतो. लोकायत सार्‍या मराठी जालविश्वाचे तांत्रिक विदागार बनो आणि त्यातून तयार होणार्‍या तंत्राचा वापर करून संपूर्ण मराठी जालविश्व उत्तरोतार प्रगती करो हीच सदिच्छा!

लोकायतला माझ्या अनेकोत्तम शुभेच्छा!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

ऋषिकेश
------------------
तुम्ही शब्दांचा प्रतिकार अपशब्दांनी करत नाही? छ्या! स्वाभिमानी कसे म्हणवते तुम्हाला?

शुभेच्छा!

हार्दिक शुभेच्छा -
(लोकायतवरील सदस्य क्रमांक २६) धनंजय

अभिनंदन आणि शुभेच्छा !!!

नीलकांता,
अभिनंदन !

आणि उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा !!!

--
काय? आज तुम्ही आय टी वाल्यांना शिव्या घातल्या नाहित? अनिवासिंच्या नावाने खडे फोडले नाहित? ...अरेरे! स्वतःला पुरोगामी कसे म्हणवते तुम्हाला?

धन्यवाद...

आपल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. या प्रकल्पात सुध्दा तुम्हा सर्वांचा सहभाग अपेक्षीत आहे.

नीलकांत.

शुभेच्छा

अभिनंदन नीलकांत!

लोकायतच्या वाटचालीस शुभेच्छा!

(खुद के साथ बातां : रंग्या, उत्साहाच्या भरात एकदम सदस्यत्व घेऊन ठेऊ नकोस. तिथे काही बरे करु शकणार असलास तरच नीट विचार करुन सदस्य हो! :? :W )

चतुरंग

६१ व्या स्वातंत्रदिनापासून ???

लोकायतचे अभिनंदन व सहर्ष स्वागत.

तात्या, हा ६१ वा स्वातंत्र्यदिन की ६२ वा?

आणि हो, आम्ही एक-दीड वर्षांनी पुन्हा मराठी आंतरजाळावर आलो बरं का? आणि ते ही थेट आपल्या मिसळपावावर!

आपला,
(स्वतंत्र) भास्कर
आम्ही येथे वसतो.

अभिनन्दन आणि शुभेच्छा!

'लोकायत'चे मनापासून अभिनन्दन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा! मराठी भाषेत संगणक, संगणकीय तंत्र आणि आंतरजाल ह्या विषयी माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी 'लोकायत' करित असलेल्या प्रयत्नाना सलाम!

तसेच, लोकायतची माहिती इथे दिल्यबद्दल मि.पा. चेहि आभार.

असेच म्हणतो

लोकायतकरिता नीलकांत यांना अनेक शुभेच्छा!

अभिनंदन..

नीलकांत,
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!
स्वाती

अभिनंदन..

लोकायतकरिता नीलकांत यांना अनेक शुभेच्छा!

बोका

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः
सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चिद दुखभाग भवेत्.
May all be happy. May all enjoy health and freedom from disease.
May all have prosperity and good luck. May none suffer or fall

अभिनंदन

लोकायत संकेतस्थळाच्या रचनेबद्दल नीलकांत आणि सहकार्‍यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा !!
--लिखाळ.

-- लिखाळ.
तेच ते तेच ते !

© 2011 Misalpav.com, All rights reserved. Disclaimer | Privacy policy
Scroll to Top