जे.के.रोलींग यांचे हार्वर्ड विद्यापिठातील अभिभाषण

लिखाळ's picture
लिखाळ in जनातलं, मनातलं
13 Aug 2008 - 8:02 pm

नमस्कार !
अपयशाचे आनुषंगिक फायदे आणि कल्पनाशक्ती
http://www.saptahiksakal.com/sapsakal/sapsakal/rightframe.html
साप्ताहिक सकाळ मध्ये अनुवादित स्वरुपात आलेले, 'हॅरी पॉटर' या पुस्तकमालिकेच्या लेखिका जे. के. रोलिंग यांनी जगद्विख्यात हार्वर्ड विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात नुकतेच म्हणजे ५ जूनला केलेले, अभिभाषण माझ्या आजच वाचनात आले.
ते भाषण अतिशय आशयपूर्ण आणि सुंदर आहे. मला ते परत परत वाचावे असे वाटले. आपण सर्वांनी ते वाचावे आणि आनंद घ्यावा.
त्याबद्दल आपली प्रतिक्रियासुद्धा वाचायला आवडेल.
--लिखाळ.

वावरसमाजजीवनमानविचारप्रतिक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

14 Aug 2008 - 2:13 am | लिखाळ

वर दिलेला दुवा साप्ताहिक सकाळचे मुख्य पान उघडतो आहे. लेखाचा दुवा तयार होत नाहिये. कृपया मुख्य पानावर डावीकडे प्रेरणा या सदरामध्ये पहावे. लेख तेथेच आहे.
कळावे.
--लिखाळ.

मेघना भुस्कुटे's picture

14 Aug 2008 - 6:45 am | मेघना भुस्कुटे

वेगळे आहे भाषण. पण भाषांतर काहीसे कृत्रिम वाटते.

दिगम्भा's picture

14 Aug 2008 - 12:14 pm | दिगम्भा

लिखाळराव

हे भाषण अत्यंत आवडले, सर्व जवळच्या मित्रांना आवर्जून पाठवण्याजोगे आहे.

नजरेला आणून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.
आपल्या पारखी नजरेचे कौतुक करावे तितके थोडे आहे.

- दिगम्भा

लिखाळ's picture

14 Aug 2008 - 3:32 pm | लिखाळ

आपल्या पारखी नजरेचे कौतुक करावे तितके थोडे आहे.
आभारी आहे दिगम्भा :)
--लिखाळ.

स्वाती दिनेश's picture

14 Aug 2008 - 1:05 pm | स्वाती दिनेश

भाषण आवडलेच,मेघना म्हणते तसे भाषांतर थोडे कृत्रिम वाटते आहे.
स्वाती

II राजे II's picture

14 Aug 2008 - 1:12 pm | II राजे II (not verified)

वाचले !
आवडले !

पण कृत्रिम वाटत नाही... ती भाषातराची चुक आहे असे मला तरी वाटते !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

सहज's picture

14 Aug 2008 - 3:15 pm | सहज

चांगल्या दुव्या करता लिखाळ यांना धन्यवाद.

लिखाळ's picture

14 Aug 2008 - 3:31 pm | लिखाळ

प्रतिसाद दिल्याबद्दल आणि स्वारस्याबद्दल आपणा सर्वांअचे आभार.
हेच भाषण यु-ट्युब वर पहायला मिळेल.
http://video.google.de/videoplay?docid=-7042428362278438455&ei=cgGkSPbiB...

व्यक्तिशः मला अनुवाद आवडला. तो कृत्रीम अजिबातच वाटला नाही.
यु-ट्युब वर ऐकतानासुद्धा जाणवते की साप्ताहिक सकाळ मध्ये केलेला अनुवाद चांगलाच आहे.

आपलाच,
--लिखाळ.

अभिज्ञ's picture

14 Aug 2008 - 3:44 pm | अभिज्ञ

फारच छान भाषण .
लिखाळ, एका उत्तम दुव्याबद्दल धन्यवाद.
भाषण मलातरी अजिबात कृत्रिम भासले नाहि.
भाषणाच्या भाषांतरापेक्षा त्यातील "आशय" महत्वाचा वाटतो.

अभिज्ञ.

कलंत्री's picture

14 Aug 2008 - 5:51 pm | कलंत्री

अपयश, अपयशातुन आलेले नैराश्य, उपजत असलेली उदासिनता, यशाचा अपुर्ण प्रयत्न इत्यादी गोष्टी जगण्यातच मजा आहे.

यातील काही व्याख्या / वाक्ये आवडली. काहीवेळेस यशातून आंतरिक सुरक्षा प्राप्त होते तर कधी अपयशातून अशी शक्ती आपल्या अंतरंगात किती आहे याचा प्रत्यय येतोच येतो.

सकाळचे अश्या विलक्षण लेखाबद्दल अभिनंदन करावयालाच हवे.

अपयश आपल्या स्वताकडे बघण्याची स्वतंत्र अशी दृष्टी देतो हेही खरे आहे.

आगे बढो.

विकास's picture

14 Aug 2008 - 6:47 pm | विकास

लिखाळांना या दुव्या संदर्भात धन्यवाद!

असेच अजून एक आवडलेले भाषण आहे ते ऍपल कॉम्प्यूटर्सच्या (आणि अर्थातच आयपॉड/आय फोनच्या, पिक्सार ऍनिमेशन स्टूडीयोच्या ) स्टीव्ह जॉब्ज चे. प्रेरणा देणारे हे मूळ भाषण आहे.

२००५ सालचे हे भाषण आहे पण तेंव्हा वाचले आणि कायमचे लक्षात राहीले. सुदैवाने दुवा मिळाला म्हणून देत आहे. वाचले नसल्यास अवश्य वाचा!

मुख्य गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की त्याने स्वतः कधीच कुठली पदवी मिळवली नव्हती....

(सुरवातीचे वाक्य: I am honored to be with you today at your commencement from one of the finest universities in the world. I never graduated from college. Truth be told, this is the closest I've ever gotten to a college graduation.)

लिखाळ's picture

15 Aug 2008 - 2:57 pm | लिखाळ

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.

विकास,
आपण दिलेल्या दुव्यातील भाषण पाहिले. फार छान आहे. धन्यवाद.
--(भुकेला आणि खुळा) लिखाळ.

दीपक साळुंके's picture

6 Aug 2009 - 2:52 pm | दीपक साळुंके

साप्ताहिक सकाळच्या संकेतस्थळावर हा लेख शोधत होतो, मिळाला नाही. मागील अंक पाहण्याची सुविधा काही तांत्रिक अडचणीमुळे बंद आहे असे दिसते. त्यावेळी कुणी हा लेख सेव करुन ठेवला होता का ? किंवा आणखी कुठे हा लेख उपलब्ध आहे का ?