मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सिंटॅक्स- मिपावरील शब्द

राजेंद्र मेहेंदळे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मिपावर प्रतिसाद देताना ठराविक शब्द वापरले जातात आणि ते पुन्हा पुन्हा वाचायला मिळतात.त्यांचा संदर्भ माहीत नसल्याने नवखा माणुस ते वाचुन प्रथम गोंधळतो,मग हळुहळु चाचपडत का होईना त्याला थोडेथोडे शब्द कळु लागतात.आणि मग तोही या दंग्यात सामील होउन जातो. मला सापडलेले काही शब्द असे चोप्य पस्ते (कॉपी पेस्ट) चानचान (छानछान) जौदे बै (जाउ दे बाई) चेपु,तुनळी (फेसबुक,युट्युब) जिलब्या (लेख) पिंक (प्रतिक्रिया) हहपुवा (हसुन हसुन पुरेवाट) ह्घ्या (हलके घ्या) या शिवाय काही महान लोकांच्या स्मरणार्थ चेसुगु,जीवनभौ वगैरे तर समस्त मिपाकरांना आवाहन कि नवख्या मिपाकरांच्या सोयीसाठी असे अजुन शब्द सांगावे.

वाचने 68857 वाचनखूण प्रतिक्रिया 118

In reply to by बॅटमॅन

पैसा गुरुवार, 12/05/2013 - 17:00
पाटीवरती काढीन चित्रे पाहुनी रेघा भितात पितरे भूगोलातील ओहोटी भरती लिहिता पोरे हसून मरती पाटीपेणसल द्या मज आणुनी

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

आदूबाळ Fri, 12/06/2013 - 02:19
आपुल्या सहीत हायपरलिंका , दुसर्‍यांच्या प्रोत्साहनार्थ टाकु पिंका मराठी बांधवांच्या कौतुका , केलेचि पाहीजे !!!
क्या बात है! गिल्टी अ‍ॅज चार्जड!

In reply to by शैलेन्द्र

प्यारे१ Wed, 12/04/2013 - 16:56
तेचं काय्ये ना! प्रतिसाद काढला म्हणून डोक्यातनं जातो असं नस्तं. नि नाही काढला म्हणून डोक्यात ठेवला असं पण नस्तं. काय बोम्बा मारायच्या? सगळे शाणे असतात. :)

उपास Fri, 12/06/2013 - 02:39
एकंदर काय, शब्द् सोयीस्कर असतिल तर प्रचलित होतात.. यातले कित्येक शब्द आता माझ्या रोजच्या वापरात यायला लागलेत... कंपू म्हणोत किंवा काही, पण ही सामायिक शब्दसंपत्तीच माणसामाणसांना जोडते.. एक संग्रह बनवून आला तर टाकतो.. हाकानाका!

उपास Fri, 12/06/2013 - 02:54
तर या भाषाविकासाला हातभार लागावा म्हणून हे डॉक्युमेंट शेअर करतोय गुगल डॉक लिंक सध्या सगळ्यांना ओपन एडिट ठेवलय त्यामुळे तुम्हाला वेळ होत जाईल तस तसे शब्द टाकत चला.. बँट्या त्या बायकांची नावं सुद्धा टाकता आली तर बरंच! रच्याकने, अशा प्रकारच्या बर्याच गोष्टी गुगल डॉक्स किंवा तत्सम टूल (ड्रॉपबॉक्स) वापरुन पब्लिग्कली/ ग्रुप्मध्ये शेअर करुन ठेवता येतिल (उत्तम लेखांच्या लिंका विषयवार../ युट्युबच्या लिंका) ज्या निवांतपणे बसून वाचता येतिल. मी स्वतः अशी एक उत्तम लिस्ट मेंटेन करतोय, जी पर्सनल आहे आणि फावल्या वेळात (एअरपोर्टवर वगैरे) काय आणि कुठे वाचू/ पाहू असा प्रश्न येत नाही!