✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बोल एनिथिंग बट अ नो बॉल ...

च
चौकटराजा यांनी
Sun, 04/14/2013 - 09:51  ·  लेख
लेख
कालच दि. १३ एप्रिल २०१३ रोजी आय पी एल मधे बंगलोर व चेन्नई संघात टी २० चा सामना झाला. The game is not finished unless the last ball is bowled.या क्रिकेट मधील कुठेही लिखित न झालेल्या नियमाचा प्रत्यय आला. शेवटच्या चेडूवर २ धावा जिकण्यासाठी चेन्नईला हव्या होत्या.आर पी सिंग ने रवींद्र जडेजाला चेडू टाकला .त्याने तो थर्ड मॅनच्या दिशेने उंचावून मारला. थर्ड मॅनला असलेल्याने तो झेलला. झाले. बंगलोरच्या खेळाडूनी हवेत उंच उड्या मारून सेलेबब्रेशन करायला सुरूवात देखील केली. छोट्या पडद्यावर नवेच द्ष्य दिसू लागले. इकडे पिवळा ड्रेस वाले चेनाईकर ही आनंदाने मैदानाकडे अर्थात विजयी मुदद्रेने धाव घेउ लागले. शेवटच्या चेडूवर झेल ऊडविल्यानंतर काय झाले? क्षेत्ररक्षण करणार्‍यांचे सारे लक्ष उडलेल्या झेलाकडे पर्यायाने बिजयोन्मादाकडे लागले. पण जडेजाने नो बॉलचा कॉल ऐकला होता. त्याने त्यातही एक धाव पूर्ण केली. त्यात नो बॉलची एक धाव मिळून चेनई चा विजय साकार झाला. यावरून एक आठवण झाली. १९६० मधे बिस्वेन येथे ऑस्ट्रेलिया व विंडीज मधे सामना झाला . आठ चेंडूंचे अष्टक टाकण्यासाठी कप्तान फ्रॅन्क वॉरेलने आपला हुक्मी एक्का वेस हॉल याला पाचारण केले. शेवटच्या दोन चेडूत जिंकण्यासाठी ऑसीसना एक धावेची गरज होती. सातव्या चेंडूला लिडसे क्लाईन हा फलंदाज खेळणार होता. यावेळी वेस हॉल वॉरेलकडे आला व त्याने विचारले" फ्रॅन्क, मी कोणत्या प्रकारचा चेंडू आता या क्लाईनला टाकावा ?" त्यावेळी त्याच्या जवळ जाउन हळूच आवाजात वॉरेल म्हणाला" वेस, त्याना सहजी जिंकून दद्यायचे नाही मला. बोल एनिथिंग इन द वल्ड बट अ नो बॉल! " अशी सूचना बेंगलोरच्या कप्तानाने आर पी सिंगला दिली असती तर काही वेगळे झाले असते का? क्रिकेट ईज अ फनी गेम ओफ चान्सेस ! ता क. वरील ब्रिस्वेन सामन्याची आठवण सांगताना गारफील्ड सोबर्स यानी एक गम्मतीदार गोष्ट सांगितली . तो सामना विंडीजने जिंकला असा समज सर्व विंडीज खेळाडूंचा होऊन रात्री सेलेब्रेशन ही झाले. दुसर्‍या दिवशी म्हणे पेपरात याना कळले की सामना बरोबरीत सुटला.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
2569 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

भारत - श्रीलंका. वन डे मॅच.

मोदक
Sun, 04/14/2013 - 10:01 नवीन
भारत - श्रीलंका. वन डे मॅच. भारताला जिंकण्यासाठी १ धाव हवी असताना (व सेहवाग ९९ वर खेळत असताना) लंकेच्या एका बोलरने सेहवागला ९९ वर नाबाद ठेवण्यासाठी व भारताला जिंकून देण्यासाठी (हो! कारण ती ४२ वी वगैरे ओव्हर होती आणि भारत कोणत्याही दृष्टीने मॅच हरवण्याच्या स्थितीमध्ये नव्हता!!) मुद्दाम नो बॉल टाकला होता - हा प्रकार आठवला. तो सामना विंडीजने जिंकला असा समज सर्व विंडीज खेळाडूंचा होऊन रात्री सेलेब्रेशन ही झाले. दुसर्‍या दिवशी म्हणे पेपरात याना कळले की सामना बरोबरीत सुटला. हे थोडे अतीरंजीत वाटते आहे.
  • Log in or register to post comments

मी पाहिलेली मुलाखत..

चौकटराजा
Sun, 04/14/2013 - 12:09 नवीन
@ मोदक ,ही मुलाखत मी पाहिलेली होती. कोणत्यातरी कॅरिबियन सीनच्या बॅकग्राउंडवर सर सोबर्स यांची दीर्घ मुलाखत घेण्यात आली होती. त्यात असे काहीसे ते म्हटल्याचे मला नक्की आठवतेय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

>>> भारताला जिंकण्यासाठी १

श्रीगुरुजी
Mon, 04/15/2013 - 20:38 नवीन
>>> भारताला जिंकण्यासाठी १ धाव हवी असताना (व सेहवाग ९९ वर खेळत असताना) लंकेच्या एका बोलरने सेहवागला ९९ वर नाबाद ठेवण्यासाठी व भारताला जिंकून देण्यासाठी (हो! कारण ती ४२ वी वगैरे ओव्हर होती आणि भारत कोणत्याही दृष्टीने मॅच हरवण्याच्या स्थितीमध्ये नव्हता!!) मुद्दाम नो बॉल टाकला होता - हा प्रकार आठवला. हा सामना २०१० मध्ये श्रीलंकेत खेळला गेला. तो गोलंदाज सूरज रणदिव होता. त्याला नोबॉल टाकायचा सल्ला कर्णधार कुमार संगकारा व दिलशानने दिला होता. त्याने ठरवून नोबॉल टाकल्याने हा चेंडू टाकताना त्याचा पाय क्रीझच्या तब्बल १ फुटाहून अधिक पुढे होता. या चेंडूवर सेहवागने षटकार मारला. पण नियमानुसार ज्याक्षणी नोबॉल दिला गेला त्याच क्षणी संघाला १ धाव मिळाल्यामुळे भारताने सेहवागने चेंडू मारायच्या आधीच सामना जिंकला व त्यामुळे सेहवागचा षटकार नोंदला न जाता तो ९९ वर नाबाद राहिला. या अखिलाडू घटनेवर बरीच टीका झाल्यामुळे श्रीलंकेने दिलशान व रणदीववर १ सामन्याची बंदी घातली, पण संगकारावर काहीच कारवाई झाली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

:)

पैसा
Sun, 04/14/2013 - 10:49 नवीन
मस्त किस्सा. ऐकलेला आहे. अशीच चॅपेल बंधूंच्या अंडर आर्म बॉलची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

अशीच चॅपेल बंधूंच्या अंडर

निनाद मुक्काम …
Sun, 04/14/2013 - 12:10 नवीन
अशीच चॅपेल बंधूंच्या अंडर आर्म बॉलची आठवण झाली. आठवण झालीच आहे तर प्रत्यक्ष पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सर रवींद्र जडेजा. या

आदूबाळ
Sun, 04/14/2013 - 12:02 नवीन
सर रवींद्र जडेजा. या महापुरूषाचा योग्य नावानेच उल्लेख झाला पाहिजे!
  • Log in or register to post comments

पण पंच जर खमका असेल तर असे ही

निनाद मुक्काम …
Sun, 04/14/2013 - 12:13 नवीन
पण पंच जर खमका असेल तर असे ही होते.
  • Log in or register to post comments

वेस हाॅल आणि नो बाॅल

शेखर काळे
Mon, 04/15/2013 - 11:42 नवीन
माझ्या माहितीनुसार वाॅरेलने हाॅलला सांगितले की तू जर नो बाॅल टाकलास तर तू बारबेडाॅसला परत जाऊ शकणार नाहीस.
  • Log in or register to post comments

मला तरी तो स्पॉट फिक्सिंग चा

गुलाम
Mon, 04/15/2013 - 21:01 नवीन
मला तरी तो स्पॉट फिक्सिंग चा प्रकार वाटला. १ चेंडू, २ धावा असे समीकरण असताना कोणताही गोलंदाज वैध चेंडू टाकायचा प्रयत्न करणार नाही का? शिवाय, त्याचा पाय क्रीजच्या बराच पुढे होता. एवढी मोठी चूक एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोलंदाजाकडून होणे पटत नाही.
  • Log in or register to post comments

मला तर,

मुक्त विहारि
Mon, 04/15/2013 - 23:07 नवीन
आज काल हे सगळे सामनेच संशयास्पद वाटत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुलाम

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा