Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चिंतामणी on Wed, 11/21/2012 - 08:35
गुजराथ निवडणुका, महागाई, सत्ताधा-यांवर सतत होणारे अपहाराचे आरोप, देशांतर्गत वाढता विरोध, मा.बाळासाहेबांचे अंत्यविधीचे वेळी उसळलेला जनसागर इत्यादी गोष्टीपासुन लक्ष वळवण्यासाठी हुकुमाचा एक्का काढण्यात आलेला आहे. वरिल अनेक मुद्यांप्रमाणे अजून एक मुद्दा वारंवार उपस्थीत केला जातो. तो म्हणजे "अफजल गुरू" आणि "कसाब" यांची फाशी. अफजल गुरूची फाशी अजून होत नाही कारण सत्ताधारी आघाडितील घटकपक्षाचा असलेला विरोध. पण गुजराथ निवडणूक, मुंबईत उसळ्लेला जनसागर, मोदी करीश्मा या गोष्टींचा प्रभाव कमी करण्यासाठी हुकुमाचा एक्का वापरणार असे दिसत आहे. आत्ताच म.टा.च्या इआवृत्तीत एक महत्वाची बातमी वाचण्यात आली. कसाबला पुण्यात देणार फाशी? त्यात म्हणले आहे की पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद अजमल कसाब याचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला असून कसाबला पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात ( जेल ) हलवण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते . त्यामुळे कसाबच्या फाशीची अंमलबजावणी पुण्यामध्येच केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे . पुढे असे म्हणले आहे की राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सकाळी पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेत कसाबच्या संदर्भात काही महत्त्वाची माहिती दिली जाण्याची तसेच फाशीची वेळ अधिकृतरित्या जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. म.टा.ने चे.पु.वर हद्द केली आहे. तीथे म्हणले आहे "दहशतवादी कसाबला पुण्यात दिली फाशी - आर आर पाटील". आत्ताच इसकाळनेसुध्दा चे.पु.वर बातमी अपलोड केली आहे "अजमल कसाबला लटकविले फासावर" - सूत्र बाळासाहेबांचा करीश्मा आणि मोदींचा प्रभाव या दोन मुख्य गोष्टींना लक्ष करण्यासाठी हुकुमाचा एक्का वापरण्यात आलेला आहे.
  • Log in or register to post comments
  • 28640 views

प्रतिक्रिया

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Wed, 11/21/2012 - 08:56

Permalink

बाळासाहेबांचा करीश्मा आणि

बाळासाहेबांचा करीश्मा आणि मोदींचा प्रभाव या दोन मुख्य गोष्टींना लक्ष करण्यासाठी हुकुमाचा एक्का वापरण्यात आलेला आहे. मला नाही वाटत की काँग्रेस कसाब ला एका राज्याच्या निवडणुकीसाठी फाशी देइल्,कॉंग्रेस ला मुस्लिम मतांची काळजी असते नेहमी तसे नसते तर त्यांनी अफजल ला कधीचेच फासावर लटकविले असते,ते फक्त चर्चेचा झोत कसाब कडे वळवण्याचा प्रयत्न करताहेत.जेणेकरुन शिवसेनेबद्दल लोकांच्या मनामध्ये जी सहानभुती निर्माण होइल तीला अगोदरच पायबंद घालता येइल. राहीले बाळासाहेब, बाळासाहेबांच्या आणी मोदींच्या करीश्मा कसाकाय झाकोळला जाइल बरे,कसाब ला इतके दिवस बिर्याणी खाउ घातली आहे ते लोक सहजासहजी नाही विसरनार, अफजल गुरुचीही फाशी लटकलेली आहेच ना त्याचे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Wed, 11/21/2012 - 08:58

Permalink

नुकतीच मटाच्या इ-आवृत्तीत

नुकतीच मटाच्या इ-आवृत्तीत बातमी वाचण्यात आलीय. त्याला आज सकाळी ७.३० वा फासावर लटकवण्यात आले आहे. आज करोडो भारतीयांच्या मनाला खर्‍या अर्थाने शांती मिळेल.
  • Log in or register to post comments

Submitted by इनिगोय on Wed, 11/21/2012 - 08:58

Permalink

वा वा, यातही राजकारण शोधताय.

वा वा, यातही राजकारण शोधताय. असं एका रात्रीत ठरतं काय हे? तो मेला, याचा तुम्हाला आनंद नाही झाला काहो?
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Wed, 11/21/2012 - 09:15

In reply to वा वा, यातही राजकारण शोधताय. by इनिगोय

Permalink

कसाबला मारले याचा आनंद आहेच.

कसाबला मारले याचा आनंद आहेच. पण जनता काही लहान बाळे नाहीत की एखादे चॉकलेट दिले की मोठ्ठे खेळणे विसरतो. :) कसाबला फाशी द्यायचे टायमिंग म्हणजे बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराच्या वेळच्या जनसागरावरून लक्ष खेचण्यासाठीच केलेली खेळी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अन्तर्यामी on गुरुवार, 12/06/2012 - 15:22

In reply to कसाबला मारले याचा आनंद आहेच. by llपुण्याचे पेशवेll

Permalink

कसाब नक्की "मेला" कि पाकिस्तानात धाड्ला ???

कसाब नक्की "मेला" कि पाकिस्तानात धाड्ला ??? आनि आपण त्याला असा इतका गुप्ततेने का मारला? आप्ल्या देशात आप्ल्यला कस्ली भिती??? नाझीवाद असता तर अशी वेळच आली नसती.....
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Wed, 11/21/2012 - 09:38

In reply to वा वा, यातही राजकारण शोधताय. by इनिगोय

Permalink

आनंद??????? राजकारण???

अफजल गुरुबद्दल बोला. आणि कसाब डेंग्युने मेला की फाशी दिल्याने मेला कोणाला माहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on Wed, 11/21/2012 - 13:19

In reply to आनंद??????? राजकारण??? by चिंतामणी

Permalink

कॉलिंग थत्तेचाचा

अफजल गुरुबद्दल बोला.
याविषयी थत्तेचाचांचे मत ऐकायला आवडेल.बाकी मी त्यांच्या लिखाणाचा मोठ्ठा फॅन आहे पण त्यांच्या मिपावरील स्वाक्षरीत एक मजकूर वाचल्याचे आठवते---"अरे तुम्ही आज अफझल गुरूला फाशी द्या ही मागणी केली नाहीत का? मग तुम्हाला राष्ट्रवादी कसे म्हणवते" याच्याशी मात्र सहमत नाही. तेव्हा कसाबच्या मागोमाग अफझल गुरू असावा याविषयी त्यांचे मत वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Wed, 11/21/2012 - 14:59

In reply to कॉलिंग थत्तेचाचा by पुण्याचे वटवाघूळ

Permalink

फाशी

ती स्वाक्षरी एका दुसर्‍या सदस्याच्या स्वाक्षरीचे विडंबन होते. मला आता आठवत असेल तर राष्ट्रवादी असा शब्द नसून देशभक्त असा शब्द होता. कसाबला फाशी देण्याबाबत काही प्रश्नच नव्हता. खरे तर तो भारतीय नागरिक नसल्याने त्याच्यावर खटला वगैरे चालवण्याची गरज नाही असे माझे मत वेळोवेळी व्यक्त केले आहे. अफजल गुरू मात्र भारताचा नागरिक आहे. आणि त्याच्यावरील खटला योग्य पद्धतीने चालवला गेला नाही असे भाजपचे विद्यमान खासदार आणि कायदेतज्ञ राम जेठमलानी यांनी म्हटले आहे. तरीही न्यायव्यवस्थेने ठोठावलेली शिक्षा (योग्य पुराव्या आधारे ठोठावली असावी असे गृहीत धरून) सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मगच अंमलात आणायला हवी असे माझे मत आहे. परंतु कसाब आणि गुरू (अ‍ॅक्च्युअली) फासावर जाऊ नयेत असे इथल्या (त्यांना फाशी द्यायचा धोशा लावणार्‍या) काही लोकांना वाटत असावे असे म्हणण्यास या धाग्यावर येत असलेल्या प्रतिसादांवरून वाटते आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Wed, 11/21/2012 - 20:17

In reply to फाशी by नितिन थत्ते

Permalink

>>

>> परंतु कसाब आणि गुरू (अ‍ॅक्च्युअली) फासावर जाऊ नयेत असे इथल्या (त्यांना फाशी द्यायचा धोशा लावणार्‍या) काही लोकांना वाटत असावे असे म्हणण्यास या धाग्यावर येत असलेल्या प्रतिसादांवरून वाटते आहे. << हे म्हणजे अगदी खास. नेमके मार्मिक आणि मोजके
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 11/22/2012 - 01:21

In reply to फाशी by नितिन थत्ते

Permalink

जेठमलानी

जेठमलानींनी इंदीरा गांधी आणि राजीव गांधींच्या मारेकर्‍यांची देखील म्हणूनच वकीली केली होती. त्यतील म्हणणे देखील आपल्याला मान्यच असेल अशी आशा करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on गुरुवार, 11/22/2012 - 07:26

In reply to जेठमलानी by विकास

Permalink

छे

त्यांचे म्हणणे मान्य आहे असे कुठे म्हटले आहे? न्यायालयाने अफजल गुरूला दिलेली शिक्षा (योग्य प्रक्रिया पूर्ण करून) अंमलात आणलीच पाहिजे असे मी म्हटले आहे. मी फक्त भाजपच्या खासदाराचे काय म्हणणे आहे ते सांगितले.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 11/22/2012 - 19:07

In reply to छे by नितिन थत्ते

Permalink

याचा अर्थ

मी फक्त भाजपच्या खासदाराचे काय म्हणणे आहे ते सांगितले. म्हणजे भाजपाच्या खासदाराने म्हणले तर ते बरोबर असणार असे आपल्याला म्हणायचे आहे का? ;) अजून एक अर्थ असा देखील आहे: केवळ आपल्या पक्षाचा खासदार म्हणून त्याच्या प्रत्येक गोष्टीत भाजपा पक्षश्रेष्ठी लक्ष घालत नसावेत.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Fri, 11/23/2012 - 10:36

In reply to याचा अर्थ by विकास

Permalink

भाजपा पक्षश्रेष्टी कोण म्हणे?

भाजपा पक्षश्रेष्टी कोण म्हणे? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sat, 11/24/2012 - 11:21

In reply to भाजपा पक्षश्रेष्टी कोण म्हणे? by ऋषिकेश

Permalink

काय माहीत!

काय माहीत! :-) पण त्यावरून चेपूवर पाहीलेला ही व्हिडीओ अ‍ॅड आठवली. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Wed, 11/21/2012 - 09:04

Permalink

सहमत . बाकी कसाब लटकला हे

सहमत . बाकी कसाब लटकला हे उत्तमच अमोल केळकर मला इथे भेटा
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिका on Wed, 11/21/2012 - 12:51

In reply to सहमत . बाकी कसाब लटकला हे by अमोल केळकर

Permalink

एक सुधारणा "डेंग्युने

एक सुधारणा "डेंग्युने अर्धमेल्या कसाबला फासावर लटकवला" हे जात्स समर्पक वाटते नाही का? बाकी काँग्रेसने एक लक्षात ठेवावे "जो बुंद से गई वो हौद से नही आती"
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Wed, 11/21/2012 - 09:05

Permalink

झक्कास. बाळासाहेबांची इच्छा

झक्कास. बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झाली म्हणायची.
  • Log in or register to post comments

Submitted by मी_आहे_ना on Wed, 11/21/2012 - 09:11

Permalink

मस्त बातमी

२०१२ सालातली सर्वांत चांगली बातमी. बाळासाहेब असतानाच हे घडले असते तर अजून छान वाटले असते. असो... प्रणवदांना बाळासाहेबांनी केलेल्या विनंतीला मान दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानराम on Wed, 11/21/2012 - 09:14

Permalink

बाळासाहेबांचा करीश्मा आणि

बाळासाहेबांचा करीश्मा आणि मोदींचा प्रभाव या दोन मुख्य गोष्टींना लक्ष करण्यासाठी हुकुमाचा एक्का वापरण्यात आलेला आहे.">>>>>>> चिंतामणी यांच्याशी सहमत.. Image removed. कसाबला फाशी द्यायची असती तर केव्हाच देता आली असती पण योग्य वेळ साधून हे केलेले आहे... वा वा, यातही राजकारण शोधताय. असं एका रात्रीत ठरतं काय >>>> मग काय इतके दिवस त्याला ठेऊन लोणचे घालायचा विचार करत होतं का सरकार..!!!!!! मेला याच आनंद झाला पण इतक्या उशीरा का??? हा च प्रश्न पडतोय..
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on Wed, 11/21/2012 - 09:16

Permalink

झकास !

वास्तविक कोणाच्या मरणांवर आनंद व्यक्त करावा अशी आपली संस्कृती नाही.. अश्या हरामखोराला वास्तविक जाहीर फाशी द्यायला हवी होती. सी. एस . टी . वर नागडा करून उल्टा टांगून पब्लिक कडून त्याला मारवण्याची माझी इच्छा मात्र अपुरी राहीली....थान्कु प्रणव दा !
  • Log in or register to post comments

Submitted by अमृत on Wed, 11/21/2012 - 09:26

Permalink

मुंबई हल्ल्यात मरण पावलेल्या

मुंबई हल्ल्यात मरण पावलेल्या निष्पाप नागरीकांना आज खर्‍या अर्थाने शांती मिळेल.. भारतीय न्याय संस्थेचा अभिमान व कौतुक वाटावे तेवढे कमीच.. प्रणवजींनी शब्द पाळला...
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Wed, 11/21/2012 - 09:26

Permalink

मला वाटते

मला वाटते अशा खेळ्यानी आपले मत बदलावे इतकी भारतीय जनता खुळी नाही. ह्या फाशीला जनतेच्या मते उशीरच झालेला आहे. सबब कॉग्रेसला याचा भावनिक लाभ मिळेल व त्याचे रुपांतर मतात होईल असे वाटत नाही. बाकी मी तुम्हाला राष्ट्रपति निवडणुकीत पाठबळ देतो तुम्ही माझी ही कसाबला फाशीची विनंति मान्य करा अशी जर अट बाळासाहेबानी टाकली असेल तर त्यांच्या राजकारणाला व देशभक्तीला सलामच केला पाहिजे !
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 11/21/2012 - 09:27

Permalink

जर हे खरे असेल तर ..

हे वृत्त अधिकृत नाही तेव्हा त्यावर प्रतिक्रीया देणे किंचित घाईचे ठरावे .. मात्र जर हे खरे असेल तर या प्रकरणात सद्य कायद्यानुसार - भारतीय घटनेनुसार- सदर आरोपी दोषी ठरण्यासाठी भरपूर कष्ट उपसून साक्षी-पुरावे गोळा करून भक्कम केस उभी करणार्‍या पोलिस पथकाचे, निर्भिड साक्षी देणार्‍या नागरीकांचे, जबाबदार वृत्तांकन करणार्‍या पत्रकारांचे, समर्थपणे केस उभी करणार्‍या वकील मंडळींचे, अतिशय वेगाने व खास लक्ष देऊन पाठपुरावा करणार्‍या न्याययंत्रणेचे, संयमी प्रतिक्रीया देणार्‍या राजकीय पक्षांचे/नेत्यांचे आणि कसाबलाही आपले म्हणणे मांडायची संधी मिळण्यासाठी त्याची वकीली करणार्‍या वकिलांचेही आभार आणि अभिनंदन करणे अधिक अगत्याचे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 11/21/2012 - 09:50

In reply to जर हे खरे असेल तर .. by ऋषिकेश

Permalink

दहशतवादी कसाबला

दहशतवादी कसाबला सकाळी साडेसातला फाशी दिली ही अधिकृत बातमी आहे. विविध वाहिन्यांवर सुशीलकुमार शिंदे यांनी माहिती दिली. मटाची बातमी सतत घुसखोरी करुन भारतीय नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला तर त्याची शिक्षा मृत्युच असेल असा एक संदेश जावा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 11/21/2012 - 09:52

In reply to दहशतवादी कसाबला by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

अफजल गुरु नै हो कसाब तुम्ही

अफजल गुरु नै हो कसाब :) तुम्ही अजून आशा वाढवली बघा!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 11/21/2012 - 09:54

In reply to अफजल गुरु नै हो कसाब तुम्ही by बॅटमॅन

Permalink

चुभु

कसाब असे दुरुस्त करत होतो तर प्रतिसाद टाकलाच का ! विशेषाधिकारात दुरुस्ती केली आहे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Wed, 11/21/2012 - 10:00

In reply to चुभु by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

माझाही प्रतीसाद उडवा की ,मला

माझाही प्रतीसाद उडवा की ,मला वाटले नव्हते की,ते असे करतील.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 11/21/2012 - 10:05

In reply to चुभु by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

काय करू, जरा अचपळ मन साले,

काय करू, जरा अचपळ मन साले, नावरे आवरीता :)
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Wed, 11/21/2012 - 11:40

In reply to चुभु by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

प्रा.डॉ.

थोडेसे अवांतर- हा अधीकार सगळ्यांना होता. तो "विषेषाधिकार" का झाला? मिपामध्येसुध्दा घटनेचे ३०७वे कलम आहे वाटते. :P
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 11/21/2012 - 12:05

In reply to प्रा.डॉ. by चिंतामणी

Permalink

अवांतर

>>> हा अधीकार सगळ्यांना होता. अंहं. लेखन संपादनाचा अधिकार सर्वांना होता. पुढे तो अधिकार काढुन टाकण्यात आला. प्रतिसादाला उपप्रतिसादाचा बूच मारल्यावर मूळ प्रतिसाद सदस्यांना संपादित करताच येत नाही. विशेषाधिकार यासाठी वापरावा लागला की बातमीचा दुवा आणि मसुदा कसाबचा आणि प्रतिसादाचे शीर्षक अफजल गुरुचे झाले होते. :) गोंधळ नको म्हणुन प्रतिसाद संपादित केला. अन्य कोणी सदस्यांनी अशी विनंती केली असती तर असा बदल केलाच असता. घटनेत ३०७ वे कलम काय आहे बॉ ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Wed, 11/21/2012 - 23:27

In reply to अवांतर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

३०७ ही टायपो मिश्टेक आहे. मला ३७० म्हणायचे होते.

जम्मु आणि काश्मीर राज्याला विषेशाधीकार देणारे घटनेतील कलम. या बद्दल अजून माहिती हवी असल्यास येथे टिचकी मारा.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on गुरुवार, 11/22/2012 - 07:28

In reply to अवांतर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

बिनाबूच

>>प्रतिसादाला उपप्रतिसादाचा बूच मारल्यावर मूळ प्रतिसाद सदस्यांना संपादित करताच येत नाही. सध्या असे बूच मारले नसतानाही प्रतिसाद संपादन करता येत नाही. :(
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Fri, 11/23/2012 - 01:15

In reply to अवांतर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट

सदस्य म्हणून वावरत असताना संपादक म्हणून मिळालेल्या विशेषाधिकारांचा वापर करणे बरे नव्हे. म्हणजे सरकारी नोकरीत सरकारी कामासाठी मिळालेल्या वाहनाचा वापर वैयक्तिक कामासाठी करणे. ;-) बघा पटते का?
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 11/21/2012 - 09:57

In reply to दहशतवादी कसाबला by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

बातमी बद्दल आभार.. सकाळी

बातमी बद्दल आभार.. सकाळी घरातून निघताना सगळीकडे 'सुत्राकडून' इतकेच सांगितले जात होते म्हणून तसे लिहिले होते. आता तसे असल्याने मी वर उल्लेख केलेल्या सगळ्या संबंधितांचे आभार आणि अभिनंदन!
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल खरे on Wed, 11/21/2012 - 09:34

Permalink

आजचा दिवस तमाम भारतीयांसाठी

आजचा दिवस तमाम भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. प्रणवदांचे, सुशीलकुमार शिंदे व आर आर पाटील ह्या सर्वांचे मनापासुन अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on Wed, 11/21/2012 - 12:19

In reply to आजचा दिवस तमाम भारतीयांसाठी by अमोल खरे

Permalink

अभिनन्दन!!.. कसाब'ला फाशी

अभिनन्दन!!.. कसाब'ला फाशी दिली गेली.... :) :) :) ____________________________________ बाळासाहेबांनी "वरती" देखील आपली हुकुमत चालवायला सुरुवात केलेली दिसतेय... ;) . 'यमदूत' तरी काय करणार.. शेवटी "बाळासाहेबां"चाच्च शब्द अन्तिम असतो...!! इथेही.. आणि तिथेही... किंवा कुठेही!!!..... अभिनन्दन पुन्हा एकदा !!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by यन्ग्या डाकु on Wed, 11/21/2012 - 09:35

Permalink

चिंतामणी यांच्याशी सहमत..

सरकारने वेळेतच हुकुमाचा एक्का टाकला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 11/21/2012 - 09:41

Permalink

मेला एकदाचा!!!!!!!

मेला एकदाचा!!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Wed, 11/21/2012 - 09:51

Permalink

हुकुमाचा एक्का?

२६/११/२००८ च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यामधील एक अतिरेकी अजमल कसाब याला मे २०१० मध्ये सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. त्यावर त्याचे अपील उच्च (फेब्रू २०११) व सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळले. परकीय नागरिकाला भारतीय न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावण्याचे हे उदाहरण कदाचित पहिलेच असावे. ऑगस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अपील फेटाळल्यावर कसाबने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. नियमाप्रमाणे राष्ट्रपतींनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून यावर मत (अहवालाच्या रूपाने) मागवले व केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्र सरकारचे मत मागवले. दोन्हीकडून दयेचा अर्ज फेटाळण्याची विनंती राष्ट्रपतींना करण्यात आली. ५ नोव्हेंबरला राष्ट्रपतींनी या अर्जावर नकारात्मक निर्णय घेतल्यावर २ दिवसांत कसाबला फाशी देण्याच्या प्रक्रियेवर निर्णय घेण्यात आला. २१ नोव्हेंबर हि तारीख ठरवण्यात आली. या हल्ल्यांतील मृतांना व शहिदांना यामुळे थोड्या प्रमाणात का होईना न्याय मिळाला. या हल्यांचे खरे सूत्रधार अजूनही सीमेपलीकडे मोकळे असल्याने पूर्ण न्याय झाला असे म्हणता येणार नाही. एवढा क्लिष्ट व मोठ्या आकारमानाचा खटला विशेष सत्र न्यायालयाने केवळ १ वर्षांत संपवला हि नक्कीच कौतुकाची गोष्ट आहे. गुन्ह्याच्या तीव्रतेमुळे दया दाखवली जाण्याची कुठलीही शक्यता नव्हती. कसाब भारताच्या शत्रुराष्ट्राचा नागरिक असल्याने त्याच्याबद्दल निर्णय घेण्यात कुठल्याही पातळीवर वेळखाऊपणा दाखवला गेला नाही. तरीही कुठल्याही नियमांचे उल्लंघन केले गेले नाही हे पण महत्त्वाचे. याबद्दल राज्य व केंद्र सरकारचे व शिक्षेची प्रक्रीया पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन. हल्ल्यांना ४ वर्षे पूर्ण होण्याअगोदर हि शिक्षा देण्यात आली हे बरेच झाले. कारण जखमांवरच्या खपल्या पुन्हा एकदा निघाल्या असत्या. आता या सर्व घडामोडींमागे (निवडणुकांचे अथवा मतांचे) राजकारण असल्याचे म्हणणे पूर्णपणे असंयुक्तिक आहे. कारण वेळेत कारवाई नाही केली तरी लोक आक्षेप घेतात अन केली तर त्यामागे राजकारण शोधतात, हे एका प्रगल्भ समाजाचे घटक म्हणून शोभनीय नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मी_आहे_ना on Wed, 11/21/2012 - 10:18

In reply to हुकुमाचा एक्का? by श्रीरंग_जोशी

Permalink

५ नोव्हें

५ नोव्हें.ला राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला म्हणजे मला आपली एक वेडी आशा, "बाळासाहेबांना ते जाण्यापूर्वी हे माहित असेल की दया अर्ज फेटाळलाय आणि लवकरच फाशी होणार. प्रणवदांनी शब्द पाळला."
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Wed, 11/21/2012 - 10:31

In reply to ५ नोव्हें by मी_आहे_ना

Permalink

शक्यता वाटत नाही.

दोन्ही सरकारमधील निवडक व्यक्तीनांच व अधिकाऱ्यांनाच या गोष्टीची माहिती असणार... कमालीची गुप्तता पाळली गेली जे अपेक्षितच होते. २००४ मध्ये कोलकाता येथे या अगोदरची फाशीची शिक्षा अमलात आणली होती तेव्हा मानवाधिकारवाल्यांनी मोर्चे वगैरे काढले होते. या बाबतीत तसे नसते घडले तरी अतिरेक्यांनी अपहरण, घातपात असे काही घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती...
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Wed, 11/21/2012 - 10:25

In reply to हुकुमाचा एक्का? by श्रीरंग_जोशी

Permalink

+१

असेच म्हणतो. कसाबला फाशी दिली नाहि तर ते मुस्लीमांचे लांगुलचालन (शब्द बरोबर आहे का हो?), दिली तर गुजरात निवडणुका वगैरे... (मुस्लीम लांगुलचालन होत नाहि असं नाहि...पण कसाबला फाशी दिल्यास भरतीय मुस्लीम समाजास दु:ख वगैरे अजीबात होणार नाहि हे नक्की... तेंव्हा या प्रकरणात व्होटबँकचं लॉजीक बसत नाहि) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Wed, 11/21/2012 - 22:32

In reply to +१ by अर्धवटराव

Permalink

अर्धवटराव

तुम्ही विषय निट वाचला नसावा असे वाटते. धाग्यात कुठेही मुस्लीम अनुनयाविषयी (तुमच्या भाषेत "लांगुलचालन") म्हणलेले नाही. महत्वाचा मुद्दा जी वेळ साधली याबद्दल आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on गुरुवार, 11/22/2012 - 00:42

In reply to अर्धवटराव by चिंतामणी

Permalink

मित्रा...

मी कुठे म्हटलय कि धाग्यात मुस्लीम अनुयय आला आहे म्हणुन?? मी केवळ नाण्याच्या दोन बाजु दाखवल्या. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on गुरुवार, 11/22/2012 - 00:55

In reply to मित्रा... by अर्धवटराव

Permalink

अर्धवटराव +१

अर्धवटराव +१
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Wed, 11/21/2012 - 11:52

In reply to हुकुमाचा एक्का? by श्रीरंग_जोशी

Permalink

तार्किकदृष्टया गफलत वाटते

वेळेत कारवाई नाही केली तरी लोक आक्षेप घेतात अन केली तर त्यामागे राजकारण शोधतात,
मला वाटते असे हवे होते. वेळेत कारवाई नाही केली तरी लोक आक्षेप घेतात अन उशीरा का होइना, पण केली तर त्यामागे राजकारण शोधतात
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Wed, 11/21/2012 - 12:35

In reply to तार्किकदृष्टया गफलत वाटते by आनन्दा

Permalink

असहमत

कसाबला लौकरात लौकर फाशी दिले जावे हि लक्षावधी किंवा कोट्यावधी लोकांची भावना असू शकते. पण इतक्या मोठ्या आकारमानाचा व क्लिष्ट स्वरूपाचा खटला कुठलीही कायदेशीर तडजोड न करता या वेळेत त्याच्या शेवटापर्यंत नेणे हे कौतुक करण्यासारखेच आहे. जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या मारेकऱ्यांनाही यापेक्षा अधिक उशीराने फाशी दिली गेली होती. त्या खटल्याचे आकारमान निश्चितच यापेक्षा लहान होते. अशा प्रकारचे खटले जर घिसाडघाईने खटले चालवून मृत्युदंडाची शिक्षा दिल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाच्या विश्वासहर्तेला धक्का पोचू शकतो. अनेक देश गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणात भारताला सहकार्य करतात त्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on गुरुवार, 11/22/2012 - 13:37

In reply to असहमत by श्रीरंग_जोशी

Permalink

पटत नाही

१६८ जणांच्या मृत्यूला कारणीभूत झालेल्या आणि ज्याची प्रत्येक हालचाल कॅमेर्‍यात बंदिस्त झाली आहे अश्या माणसाला खरे तर विशेष न्यायालय स्थापन करून जलदगती न्याय मिळवून द्यायला होता.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Wed, 11/21/2012 - 10:22

Permalink

हा हुकुमाचा एक्का असेल तर

हा हुकुमाचा एक्का असेल तर हुकुमाचे राजे,राणीं, गुलाम ते दुर्री कोण अशा विचारात पडलोय. असो, मारलं ते बरंच झालं. आनंद आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Wed, 11/21/2012 - 11:43

In reply to हा हुकुमाचा एक्का असेल तर by ५० फक्त

Permalink

५०राव

सगळ्या कैदेतील अतीरेक्यांची लिस्ट नाही माझ्याकडे. नाहीतर राणी, गोटु, दश्शी, नश्शी........................... सगळे सांगीतले असते. पण हुकुमाचा राजा माहीत आहे ना. "अफजल गुरू". जो सध्या फारुक अब्दुल्लांनी धरून ठेवला आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com