(सख्या रे, घामट मी तरुणी!)

जगदीश खेबुडकरांचं, दीदींच्या आवाजातलं 'सख्या रे घायाळ मी हरणी' हे सुंदर गीत ऐकलं. प्रियकराला भेटायला निघालेल्या पण उन्हाळ्यानं आणि प्रदूषणानं हैराण झालेल्या तरुणीची कैफियत आमच्या नजरेसमोर आली!
(श्रेय - मूळ गाणे गुणगुणत असतानाच सौ. चतुरंग यांना काही ओळी स्फुरल्या आणि तो धागा पकडून लगोलग आम्ही विणकाम करायला घेतले! Wink )

हा लोट कसला, धूर असे हो दाट
अंधार दिवसा, कुठं दिसंना वाटं
कुण्या द्वाडानं हाणता गाडी
केली मनधरणी
सख्या रे, घामट मी तरुणी

धूळमाखला जर्द कोट अन्‌ घाम घाम अंगात
ओघळणार्‍या थेंबांनांही कुबटवास दे साथ
कुठं पुसू मी, कशी पुसू मी, गेले भांबावुनी

थेंब उमलले चेहर्‍यावरती, प्राण दाटले डोळ्यात
केस गुंतले असती माझे, डबडबल्या त्या भेटीत
कुठं लपू मी, कशी लपू मी, गेले मी हरवुनी

चतुरंग

छान

चा॑गले विड॑बन आहे.

स्वप्निल मन

पहिला श्वास घेतला तेव्हाच मृत्युला आम॑त्रण दिल॑स, जीवनाची हीच ग॑मत आहे. आपण प्रतिक्षणी मरतो आणि म्हणतो जगतोय.

ग्रेट!

ग्रेट! अशाही अवस्थेत गाणे सुचते म्हणजे ..... घाम करी काम!

मस्त

विडंबन , आवडले

सुंदर

१ नंबर विडंबन...

शेखर

:)

अरे रंगा,

एका चांगल्या गाण्याची अशी वाट का लावली आहेस रे? Smile

छान..

आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आवडली

मस्तच!!!

मस्त..

भारी आहे! Smile

--
गिरिजा..

लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------

सर्व प्रकट आणि अप्रकट आस्वादकांचे,

आणि टीकाकारांचे आभार! Smile

चतुरंग

चुकून

सर्व प्रकट आणि अप्रकट आस्वादकांचे,

वरील वाक्य वाचताना मी चुकून "सर्व घामट आणि बिनघामट आस्वादकांचे,"

असे वाचले Wink

चालायचंच!

घाम डोळ्यांवर आला की होतं असं कधीकधी!! Wink

चतुरंग

आस्वादक?

>>>घाम डोळ्यांवर आला की होतं असं कधीकधी!!
घाम डोळ्यांवर आला की तोंडातही जातो वाटत? यक्क!

आवडलं!

घाम गाळून लिहिलेलं Wink हे काव्य आवडलं!
वा! चतुरंगराव! मस्त केलंय विडंबन!
श्रेय - मूळ गाणे गुणगुणत असतानाच सौ. चतुरंग यांना काही ओळी स्फुरल्या आणि तो धागा पकडून लगोलग आम्ही विणकाम करायला घेतले!
अच्छा! म्हणजे ह्यांची 'कविता,स्फुर्तिदेवता,प्रतिभा' वगैरे वगैरे कोण ते आज कळले. Smile

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

मस्त झालंय...

अहाहा, काल घरात हे गाणं आळवून आळवून म्हणालो... लै शिव्या पडल्या.... Smile)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/