✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जुळले अजून आहे

ज — जयवी, Wed, 05/02/2012 - 11:44
सरले बरेच काही, उरले अजून आहे कोठेतरी जरासे, जुळले अजून आहे वणव्यात पोळलेल्या, राती कितीक सार्‍या वैशाखस्वप्न हिरवे, जपले अजून आहे संसार वाळवंटी, मनिषा जरी करपल्या स्वप्नात चिंब सारे, भिजले अजून आहे वैधव्य दु:ख गहिरे, लपवून काळजाशी सौभाग्य चिन्ह भाळी, जपले अजून आहे वाहून खूप गेले, पाणी पुलावरुनी सुखचित्र अंतरीचे, सजले अजून आहे आहेत भोग सारे, जे पूर्व संचिताचे ते भोगणे जरासे, उरले अजून आहे उन्मत्त वादळाने, ढळले किती मनोरे वाळूत बांधलेले, इमले अजून आहे अजुनी न जाग आली, मजला तशी पुरेशी दुलईत स्वप्न माझे, निजले अजून आहे जयश्री

प्रतिक्रिया द्या
2439 वाचन

💬 प्रतिसाद (17)

@वैधव्य दु:ख गहिरे, लपवून

अत्रुप्त आत्मा
Wed, 05/02/2012 - 13:02 नवीन
@वैधव्य दु:ख गहिरे, लपवून काळजाशी सौभाग्य चिन्ह भाळी, जपले अजून आहे >>> --^--^--^--
  • Log in or register to post comments

वा: !

परिकथेतील राजकुमार
Wed, 05/02/2012 - 14:06 नवीन
भारी लिहिले आहेस गं तै.
  • Log in or register to post comments

छान आहे कविता....

मुक्त विहारि
Wed, 05/02/2012 - 14:10 नवीन
छान आहे कविता....
  • Log in or register to post comments

वा... क्या बात है!

amit_m
Wed, 05/02/2012 - 14:14 नवीन
वणव्यात पोळलेल्या, राती कितीक सार्‍या वैशाखस्वप्न हिरवे, जपले अजून आहे आहेत भोग सारे, जे पूर्व संचिताचे ते भोगणे जरासे, उरले अजून आहे हे तर मस्तच....
  • Log in or register to post comments

मस्त ग तै. गझल खुप्पच आवडली

प्रीत-मोहर
Wed, 05/02/2012 - 14:17 नवीन
मस्त ग तै. गझल खुप्पच आवडली आहे.
  • Log in or register to post comments

आहेत भोग सारे, जे पूर्व

मनीषा
Wed, 05/02/2012 - 14:31 नवीन
आहेत भोग सारे, जे पूर्व संचिताचे ते भोगणे जरासे, उरले अजून आहे
हे खूप आवडलं सुरेख गझल ..!
  • Log in or register to post comments

वा! सुरेख कविता!! आवडली!!!

नरेंद्र गोळे
Wed, 05/02/2012 - 14:38 नवीन
वा! सुरेख कविता!! आवडली!!! रुजवून मराठी झाले, फुलवून मराठी झाले, संसार वाळवंटी, सजवून मराठमोळे | ढळू देत ते मनोरे, सरू देत भोग सारे, दुलईत स्वप्न निजले, ते होऊ देत ताजे ||
  • Log in or register to post comments

गोळेकाका......... अभिप्राय

जयवी
Wed, 05/02/2012 - 15:55 नवीन
गोळेकाका......... अभिप्राय खूपच आवडेश :) शुक्रिया सरजी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेंद्र गोळे

छान!

संजय क्षीरसागर
Wed, 05/02/2012 - 15:10 नवीन
लिहीत रहा! प्रत्येक दुसरी ओळ आणखी कल्पक करण्याचा प्रयत्न करा, ती रसिकाची अपेक्षापूर्ती करण्यापेक्षा त्याला नवा अनुभव किंवा जगण्याचा एक नवा अंदाज देणारी हवी.
  • Log in or register to post comments

संजय....... तुमचं म्हणणं

जयवी
Wed, 05/02/2012 - 15:53 नवीन
संजय....... तुमचं म्हणणं अगदी पटलं........ अपेक्षापूर्ती पेक्षा नवा अनुभव देता यायला हवा........ नक्की प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मनापासून आभार दोस्तांनो

जयवी
Wed, 05/02/2012 - 15:56 नवीन
मनापासून आभार दोस्तांनो :)
  • Log in or register to post comments

वैधव्य दु:ख गहिरे, लपवून

मदनबाण
Wed, 05/02/2012 - 18:38 नवीन
वैधव्य दु:ख गहिरे, लपवून काळजाशी सौभाग्य चिन्ह भाळी, जपले अजून आहे वा... आहेत भोग सारे, जे पूर्व संचिताचे ते भोगणे जरासे, उरले अजून आहे क्या बात है... उन्मत्त वादळाने, ढळले किती मनोरे वाळूत बांधलेले, इमले अजून आहे अप्रतिम... :)
  • Log in or register to post comments

शुक्रिया मदनबाणा

जयवी
गुरुवार, 05/03/2012 - 12:54 नवीन
शुक्रिया मदनबाणा :)
  • Log in or register to post comments

जयवी जी, अतिशय अप्रतिम कविता आहे.

निश
गुरुवार, 05/03/2012 - 18:13 नवीन
जयवी जी, अतिशय अप्रतिम कविता आहे.
  • Log in or register to post comments

"आहेत भोग सारे, जे पूर्व

शैलेन्द्र
गुरुवार, 05/03/2012 - 18:18 नवीन
"आहेत भोग सारे, जे पूर्व संचिताचे ते भोगणे जरासे, उरले अजून आहे उन्मत्त वादळाने, ढळले किती मनोरे वाळूत बांधलेले, इमले अजून आहे अजुनी न जाग आली, मजला तशी पुरेशी दुलईत स्वप्न माझे, निजले अजून आहे" कवितेत नित्य वाहणारा आशावाद फार आवडला.. छान कविता..
  • Log in or register to post comments

मनापासून आभार

जयवी
Fri, 05/04/2012 - 14:18 नवीन
मनापासून आभार :)
  • Log in or register to post comments

झकास ..मस्त...छान..

पक पक पक
Fri, 05/04/2012 - 19:26 नवीन
झकास ..मस्त...छान.. :) :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा