✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अलखपैंजणी परखडमोती

श — शरदिनी, Tue, 03/27/2012 - 01:52
सुशिरनभाले चरित्रक्रांता लखलख दर्जा झुरतो दर्द शिरशिरी बाधा व्याकूळ साहित्याला लुचतो नवगेयाच्या शिंकाळ्यावर तीर्थ दुपारी झडतो झळझळ जिव्हा हरित भुसनळे सम्यकधावन करतो सुकल्या ओष्ठी निबंधतस्कर मारे वारे स्त्रवतो रुधिर धाबळी साजणलपलप आस्वादातून डुबतो विझल्या पणतीवरी धुराच्या नक्षीलाही गिळतो त्या वातीवर त्या गंधावर शतखंडाने जळतो चिवित्रसंध्या गरळगोजिरे मलम विषारी खलतो अलखपैंजणी परखडमोती निरोप दुर्लभ सलतो शरदिनी.... पुणे २६ मार्च २०१२

प्रतिक्रिया द्या
15658 वाचन

💬 प्रतिसाद (53)

दर्द शिरशिरी बाधा व्याकूळ

नंदन
Tue, 03/27/2012 - 01:55 नवीन
छान गं. मस्त गं कसं जमतं गं डोळे पाणावले गं (खवतून साभार :))
  • Log in or register to post comments

खिखिखि

पैसा
Tue, 03/27/2012 - 08:11 नवीन
काल शरदिनीतैंना ऑनलाईन पाहिल्याबरोबर त्यांच्या खवमधलं कॉपी करून ठेवलं होतं, पण कविता व्हायला उशीर झाल्यामुळे नंदोबांनी माझ्या आधी नंबर लावला. आता फक्त +१. छान गं. मस्त गं कसं जमतं गं डोळे पाणावले गं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

+१

पिवळा डांबिस
Wed, 03/28/2012 - 00:38 नवीन
नंदनशी सहमत. साहित्यिक रूट-कॅनालच हे!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

रूट-कॅनाल

नंदन
Wed, 03/28/2012 - 01:13 नवीन
>>> साहित्यिक रूट-कॅनालच हे!!! अंत'र्मुख' करणारी 'दर्दी' प्रतिक्रिया ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

अगदी, अगदी

श्रावण मोडक
Wed, 03/28/2012 - 10:17 नवीन
खतरनाक रूट कॅनल आहे हे... प्रतिक्रिया अगदी दर्दी आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

छ्या! दर्जा गंडला

यकु
Tue, 03/27/2012 - 02:03 नवीन
छ्या! दर्जा गंडला शरूतै. तुम्हाला कधीपासून कथाकारी स्टान्स घावा लागतोय? तुम्ही तर नुसते वाट्टेल तसे शब्द मांडत सुटायचे आणि त्यातून अर्थ, प्रतिमा, गेयता, कथा बाहेर पडायची असे पूर्वी होत होते ब्वॉ.
  • Log in or register to post comments

आपल्या शब्द - संचयाची समृध्दी पाहून दिपलो.

तर्री
Tue, 03/27/2012 - 02:29 नवीन
चिवित्रसंध्या गरळगोजिरे मलम विषारी खलतो अलखपैंजणी परखडमोती निरोप दुर्लभ सलतो. कविता पूर्ण समजली नाही , पण ह्या दोन ओळी मनात रुतल्या गेलेल्या आहेत.
  • Log in or register to post comments

"कविता पूर्ण समजली नाही

शैलेन्द्र
Tue, 03/27/2012 - 07:59 नवीन
"कविता पूर्ण समजली नाही " म्हणजे थोडी समजली का? मग आंम्हालाही सांगुन टाका. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

हा हा हा

मुक्तसुनीत
Tue, 03/27/2012 - 04:35 नवीन
शिसानविवि शरूमौशी ;-)
  • Log in or register to post comments

आई आई ग! ह्या अजुन इथे

स्पंदना
Tue, 03/27/2012 - 04:49 नवीन
आई आई ग! ह्या अजुन इथे आहेत? अपर्णा बघ . सुरु कर तु पण चार शब्द खरडायला....
  • Log in or register to post comments

किंचीत शंका

सहज
Tue, 03/27/2012 - 06:24 नवीन
"पुरुषांची" खरच गरज आहे का? हा धागा अथवा कवी ग्रेस यांचे निधन किंवा या दोन्हीही या कवितेच्या प्रेरणा आहेत का? :-)
  • Log in or register to post comments

नाही समजले

सांजसंध्या
Tue, 03/27/2012 - 07:50 नवीन
नाही समजले
  • Log in or register to post comments

म्हणजेच कविता चांगली उतरलीय..

शैलेन्द्र
Tue, 03/27/2012 - 07:57 नवीन
म्हणजेच कविता चांगली उतरलीय.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या

मास्तर, झक्कास हो.

प्रचेतस
Tue, 03/27/2012 - 08:22 नवीन
मास्तर, झक्कास हो.
  • Log in or register to post comments

छे छे छे.. स्पॉइल स्पोर्ट...

शैलेन्द्र
Tue, 03/27/2012 - 08:24 नवीन
छे छे छे.. स्पॉइल स्पोर्ट... कोड्याचे उत्तर माहीत असेल त्याने सांगायचे नसते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

इथे बहुतेकांना माहीत आहेच हो.

प्रचेतस
Tue, 03/27/2012 - 08:37 नवीन
इथे बहुतेकांना माहीत आहेच हो. तरी आता तुम्ही बूच मारलतच.:P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

काळ सोकावतो शरदिनीतै.... काय

प्यारे१
Tue, 03/27/2012 - 09:13 नवीन
काळ सोकावतो शरदिनीतै.... काय करायचं???
  • Log in or register to post comments

क्या बात है..

गवि
Tue, 03/27/2012 - 10:10 नवीन
शृंगाराचे सूचक वर्णन आवडले.. त्यातल्या काही ओळींना विशेष खोली आणि अन्य ओळींना लखलखती धार आहे..
  • Log in or register to post comments

@ गवि

मी-सौरभ
Tue, 03/27/2012 - 11:04 नवीन
खरचं कळलं का आपल्या टंचनिकेची कृपा आहे ही?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

..

गवि
Tue, 03/27/2012 - 15:10 नवीन
तू गप रे.. तुला रे मेल्या कशाला नसत्या चवकशा.. वशाड मेलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

आमचे भाषा अज्ञान म्हणा पण

अमृत
Tue, 03/27/2012 - 10:14 नवीन
काहिही कळलं नाही :-( अमृत
  • Log in or register to post comments

काही समजल नाही

जाई.
Tue, 03/27/2012 - 10:59 नवीन
काही समजल नाही
  • Log in or register to post comments

वा:

परिकथेतील राजकुमार
Tue, 03/27/2012 - 11:21 नवीन
सुकल्या ओष्ठी निबंधतस्कर मारे वारे स्त्रवतो रुधिर धाबळी साजणलपलप आस्वादातून डुबतो
मंडई झाली पार डोक्याची ! लै भारी. कशी आहेस गं ? आजकाल दिसत नाहीस जास्ती ऑनलाईन ?
  • Log in or register to post comments

आई गं....!! अलखपैंजणी हा शब्द

जयवी
Tue, 03/27/2012 - 11:26 नवीन
आई गं....!! अलखपैंजणी हा शब्द खूपच आवडेश :)
  • Log in or register to post comments

गल्ली चुकली आहे

विसुनाना
Tue, 03/27/2012 - 11:31 नवीन
विझल्या पणतीवरी धुराच्या नक्षीलाही गिळतो त्या वातीवर त्या गंधावर शतखंडाने जळतो
-या ओळी स्पष्टपणे कळण्यासारख्या आहेत. गल्ली चुकलं काय व्हो ते, पीएल्ल? ;) बाकी ग्रेसफुल कविता, बर्का! शरदिनीबाई.
  • Log in or register to post comments

या कवितेतील शब्दांचे,

शैलेन्द्र
Tue, 03/27/2012 - 11:49 नवीन
या कवितेतील शब्दांचे, अर्थांचे.. आणी इतरही कसले कसले समीक्षण करण्यासाठी चौकट राजा यांना सादर आमंत्रीत केले जात आहे.. कॉलींग चौरा काका कॉलींग कॉलींग..
  • Log in or register to post comments

_______/\_______ !!! हम्म..

यकु
Tue, 03/27/2012 - 11:57 नवीन
_______/\_______ !!! हम्म.. म्हणजे ब्बास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

अ आ नी वल्लीला विडंबनाचं पण

प्यारे१
Tue, 03/27/2012 - 13:06 नवीन
अ आ नी वल्लीला विडंबनाचं पण बघायला सांगा जरा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

(No subject)

गणपा
Tue, 03/27/2012 - 13:22 नवीन
:) (शरदिनीतैंचा फॅन) गणा
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर कविता . खुप

गणेशा
Tue, 03/27/2012 - 13:29 नवीन
अतिशय सुंदर कविता . खुप आवडली. दरवेळेस पेक्षा कमी क्लिष्टता आली आहे मात्र शब्दात. लिहित रहा... वाचत आहे...
  • Log in or register to post comments

जय जालिंदर....

मन१
Tue, 03/27/2012 - 13:37 नवीन
जय जालिंदर बाबा की...
  • Log in or register to post comments

छान लिहीलयंस गं !! काहीही

सूड
Tue, 03/27/2012 - 14:30 नवीन
छान लिहीलयंस गं !! काहीही कळलं नाही. भडक मकर हा उलटसुलटशा ओळी भलत्या खरडवतो. ;)
  • Log in or register to post comments

वा वा वा ग्रेस यांच्या नंतर

विजुभाऊ
Tue, 03/27/2012 - 14:58 नवीन
वा वा वा ग्रेस यांच्या नंतर कोण हा प्रश्न आता नक्की सुटला.
  • Log in or register to post comments

:)

हारुन शेख
Wed, 03/28/2012 - 20:50 नवीन
खपलो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

वा वा एकदम जबर्दस्त कविता

वेताळ
Tue, 03/27/2012 - 18:39 नवीन
छान आवडली..कविता
  • Log in or register to post comments

कसं जमतं गं

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 03/27/2012 - 19:11 नवीन
शरदिनी, डोळे पाणावले गं :) आपल्या रचना विशेषतः कवितेत येणार्‍या शब्दांची जी योजना असते ती पाहता अनेकदा दुर्बोध वाटावी अशी वाटत असली तरी आपल्या कवितेतून येणार्‍या शब्दाची जी सहजता आहे ती दोन बोटातून निसटणार्‍या रांगोळीसारखी आहे. आपल्या कवितेतील कोणत्याही ओळींचा कोणत्याही ओळीशी परस्पर संबंध नाही असे वाटते परंतु ती आस्वादकाची मर्यादा आहे, हे स्पष्ट जाणवते ते नम्रपणे नमूद करतो. उदाहरण म्हणून आपल्या वरील कवितेतील 'सुकल्या ओष्टी' 'डुबणे' 'विझलेल्या पणत्या' 'जळत्या वाती' अशा शब्दातून जी दु:खाची भावना व्यक्त होते त्याला मराठी साहित्यविश्वात तोड नाही. आपली कविता वाचल्यानंतर कप्पाळाला हात मारुन घेतल्यानंतर जे हलकेच 'हसू फूलतं' अशी निर्मिती काही मोजक्याच साहित्यरत्नांना जमली आहे. अशी जाणीव व्यक्त करण्याची आपली जी अद्भूत शक्ती ती मराठी काव्यपरंपरेत कुठेही दिसत नाही. आपल्या कवितेची निर्मितीप्रक्रिया आणि आपल्या काव्यप्रकृतीवर वेग-वेगळ्या अंगाने संशोधन होणे गरजेचे आहे, यात काही वाद नाही. ;) -दिलीप बिरुटे (शरदिनीच्या कवितेचा समीक्षक)
  • Log in or register to post comments

भडभडून आले आहे... कित्येक

प्राजु
Tue, 03/27/2012 - 23:40 नवीन
भडभडून आले आहे... कित्येक महिन्यांनी शरदिनी ताईंच्या नविन काव्याचा लाभ घेता आला..! लिहित जा शरदिनी बै!.. बरं असतं अधून मधून कर्रकट्ट.. कर्रकट्ट!!
  • Log in or register to post comments

अग्ग्गागा !! छान गं. मस्त

सुहास..
Wed, 03/28/2012 - 00:59 नवीन
अग्ग्गागा !! छान गं. मस्त गं कसं जमतं गं डोळे पाणावले गं (प्र.क्र.१ मधुन साभार :) ) # भयानक # कृष्णमुर्ती # बिभत्स हे लय आवडले ;)
  • Log in or register to post comments

पुन्हा पुन्हा वाचली पुन्हा

सांजसंध्या
Wed, 03/28/2012 - 13:13 नवीन
पुन्हा पुन्हा वाचली पुन्हा पुन्हा नाही समजली
  • Log in or register to post comments

खूपच शब्दबंबाळ कविता.

हारुन शेख
Wed, 03/28/2012 - 20:59 नवीन
खूपच शब्दबंबाळ कविता. वाचून भोवंड आली. तुम्ही मोरोपंतांच्या फ्यान आहात का? असल्यास 'निरोष्ठ रामायणाप्रमाणे' 'निरोष्ठ कामसुत्रही' लिहिता येऊ शकेल अशी आशा वाटायला लागलीय. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments

काय बुवा लोकांना प्रतिभेची

शैलेन्द्र
Wed, 03/28/2012 - 23:09 नवीन
काय बुवा लोकांना प्रतिभेची कदरच नाही.. बघा आता हे कडव, किती गहीरा अर्थ दडलाय त्यात.. "चिवित्रसंध्या गरळगोजिरे मलम विषारी खलतो अलखपैंजणी परखडमोती निरोप दुर्लभ सलतो" इथे संध्या म्हणजे संध्याकाळची वेळ नाही तर "संध्या" हा दैनीक परिपाठ अपेक्षीत आहे.. हा विचित्र परिपाठ आहे, गोजीरेसे विष खलण्याचा.. म्हणजे विषारी आठवणी ज्या मलमासारख्या लावल्या की अनुनुभुत सुख देतात त्या आठवण्याचा दैनीक परिपाठ..पण हे उद्योग का करायचे? त्याच उत्तर दुसर्‍या चरणात.. अलख पैंजनी म्हणजे न बोलावता येणार्‍या याचकाचा नाद, हा याचक एक परखडसा निरोप घेवुन येतो .. आणी तो निरोप जी जखम करुन जातो त्यावर लावण्यासाठी हा आठवणींचा विखारी मलम.. ही दुखा:ची जात तर बघा.. विषाने विषाचा उतारा.. चला बर आता सगळ्यांनी एक एक कडव सोडवायला घ्या..
  • Log in or register to post comments

शरदिनी,

अजया
Wed, 11/12/2014 - 09:14 नवीन
शरदिनी, छान गं. मस्त गं कसं जमतं गं डोळे पाणावले गं (प्र १ व सा) परत ये गं तुझी झनन झांजरी शब्दकळा घेऊन, रुटकॅनाल काय आम्ही पण करतो!!
  • Log in or register to post comments

:) :) :)

भडकमकर मास्तर
Fri, 07/03/2015 - 13:32 नवीन
:) :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

अरेच्चा!

सुनील
Wed, 11/12/2014 - 09:29 नवीन
मला वाटलं नवी काही आलय काय? नाही. जुन्या मडक्यात जुनेच दगड! ;)
  • Log in or register to post comments

असू द्या!

अजया
Wed, 11/12/2014 - 10:53 नवीन
असू द्या! कोणासाठी जुनं ते सोनं! कोणासाठी दगड! पसंद अपनी अपनी खयाल अपना अपना!!
  • Log in or register to post comments

मिस्सींग हां ..शरदीनी ..

पहाटवारा
Fri, 11/14/2014 - 06:50 नवीन
हि आर्त हाक ..तुझ्याच्साठी . मंत्रनिळाई सत्रपकाठा, खंडरात्रीला झरून ये | झडझड्कारी किनारपंखी, वानलवारा तरून ये || चिंबमिठाई गोड्मस्करे,लाळरकंदी स्मरून ये | मीनलपंखी स्वत्वमिनारे, माईनमूळी लवून ये || -पहाटवारा
  • Log in or register to post comments

हे राम!

स्वामी संकेतानंद
Fri, 11/14/2014 - 09:13 नवीन
इ का होला? *DASH*
  • Log in or register to post comments

भ न्ना ट

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 11/14/2014 - 18:57 नवीन
निव्वळ भ न्ना ट!! __/\__!! नव्या मिपाकरांना (माझ्यासारख्या) आता हे नविन काम लागलं. शरदिनी ताईंच्या जुन्या कविता हुडकून काढायचे.
  • Log in or register to post comments

"डुडूळगावचा गोलंदाज" नक्की

आदूबाळ
Fri, 11/14/2014 - 19:04 नवीन
"डुडूळगावचा गोलंदाज" नक्की वाचा. माष्टरपीस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

अगदी अगदी.

बॅटमॅन
Fri, 11/14/2014 - 19:06 नवीन
अगदी अगदी. आजवर कविता केल्या, विडंबनेही केली, पण शरदिनीस्टाईल काही लिहू शकलो नाही. ते या जगतीचे नोहेंच मुळी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा