✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(सुटलेल्या पोटाची कहाणी)

य — यकु, Wed, 01/18/2012 - 15:28
प्रेरणा: दमलेल्या बाबाची कहाणी घामेजून ताणलेला एक पट्टा कुणी काचलेला लालेलाल वळ उठे झणी रोजचेच झाले आता नवे काही नाही इन कशी करु आता मला सांगा कुणी झोपेतच हात जातो ढेरी वरी जरी निजेतच स्वप्नी भासे स्लीम झाली ढेरी सांगायचे आहे काही माझ्‍या मनातले मला सुटलेल्या पोटाची ही कहाणी तुला ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना.... दाटदाट नगरात गर्दी होई सारी घामाघूम राजा नाही तरी एसीचा हा वारा रोज सकाळीच राजा निघताना बोले जिम मारायचे काल रा‍हूनिया गेले जमलेच नाही जरी चालायाला कधी आज परि चालतच मी येणारच घरी स्वप्नातल्या मांड्‍यांवरी मारु ताव थोडा ढेरी कमी झाली स्वप्नी पाही वेडा येता घरी दोन पेग मारु आज थोडे दोनच पेग त्यामुळे फार काही न घडे सुटलेल्या पोटाची ही कहाणी तुला ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना.... ऑफिसात उशीरा मी राही सदा बसून थंडावले जाल सारे लोक गेले उठून तास-तास गेला कसा प्रतिसादी निघून एक-एक भिडू गेला हळूच निघून अशा वेळी कसे सांगू काय-काय वाटे ढेरीपाशी हात जाई वेड्‍यापरी धावावेच वाटे वाटे मज सदासाठी रहावे उपाशी उगाचच पळावे नि खावी फळे खाशी उतरत उतरत उतरेल काही बघताना भान मला उरणार नाही हसूनिया दोस्तलोग मारतील ढुशा बसूनच स‍ेलिब्रेट करु आता उठ लेका नशा नको नको म्हणताना मारु दोन-दोन पेग क्षणोक्षणी ढेरी वाढे मज येई राग सांगायचे आहे काही माझ्‍या मनातले मला सुटलेल्या पोटाची ही कहाणी तुला ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना.... पीतापीता केव्हा तरी येईल जांभई जाऊ घरी हळूहळू जरी पाय धरवणार नाही झोपू मग दिवसभर तंगडे पसरुनी असे पूर्वीपेक्षा वाढे ढेरी असे उगा वाटे ढेरीच ती सांगताहे ऐक बाळा उगा तुझीच रे सदा आता मी तुज कधी सोडणार नाही सांगायचे आहे काही माझ्‍या मनातले मला सुटलेल्या पोटाची ही कहाणी तुला ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....

प्रतिक्रिया द्या
9133 वाचन

💬 प्रतिसाद (40)

आयला! इथे तर प्रतिसाद

गणपा
Wed, 01/18/2012 - 15:32 नवीन
आयला! इथे तर प्रतिसाद द्यायचीच गोची! ;)
  • Log in or register to post comments

+१ असेच म्हणतो

सागर
गुरुवार, 01/19/2012 - 11:51 नवीन
आयला! इथे तर प्रतिसाद द्यायचीच गोची! गणपा मित्रा, माझी पण तीच गोची झालीय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

च्यायला

श्रावण मोडक
Wed, 01/18/2012 - 17:53 नवीन
परिक्रमेचा लाभ काय रे हा? अर्ध्यामुर्ध्या परिक्रमेचा? भारीच! बादवे, आता 'हळव्या' प्रतिसादांची प्रतीक्षा करतोय. ;)
  • Log in or register to post comments

मोडक,अहो काही लोकांना तर लाभ

यकु
गुरुवार, 01/19/2012 - 00:08 नवीन
मोडक, अहो काही लोकांना तर लाभ कमावण्यासाठी अर्धीमुर्धीही नर्मदा परिक्रमा करावी लागत नाही. ;-) आलं लक्षात की उकल करुन सांगू? ;-) हळवे प्रतिसाद बरेच आलेत. पाहून घेतले ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

यकुशेठ,

प्रास
Wed, 01/18/2012 - 15:54 नवीन
धन्य आहात.... __/\__
  • Log in or register to post comments

_/\_

जाई.
Wed, 01/18/2012 - 16:04 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

भारीच!!

Maharani
Wed, 01/18/2012 - 16:10 नवीन
भारीच!!
  • Log in or register to post comments

विडंबन आवडले.. मला आली

गणेशा
Wed, 01/18/2012 - 16:18 नवीन
विडंबन आवडले.. मजा आली वाचताना बाकी बोळ्क्या मधे लुक - लुकलेला ह्या गद्य ओली राहिल्या की वो .. देतो.
बोळ्क्या मधे लुक - लुकलेला तुझा पहीला दात आणि पहिल्यांदाच घेतलास जेंव्हा मऊ भात आई म्हणण्या आधी सुद्धा म्हणली होतीस बाबा रांगत रांगत घेतलास जेंव्हा घराचा ताबा लूटू लूटू उभ रहात टाकलस पाऊल पहिल दूर च् पाहत राहिलो फक्त जवळच पाहायच राहून गेल,
कमरेवरच ओघळलेला तुझा पहिला घाट, आणि पहिल्यांदाच घेतले जेंव्हा तुला प्रेमाणे आत ओह म्हणण्या आधीही म्हणालो होतो बास, हळु हळु घेतलास जेंव्हा सर्वांगाचा घास लुटु लुटु हालत हालत टाकलीस पहिली उडी.. लांबचे जावुद्या जवळच ही उडी मारणे जमलेच नाहि ला लाला ला !
  • Log in or register to post comments

यक्कूशेठ जियो... बेक्कार हसू

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/18/2012 - 16:42 नवीन
यक्कूशेठ जियो... बेक्कार हसू येत होतं वाचताना...काही ओळींपुढे तर ---^--- @निजेतच स्वप्नी भासे स्लीम झाली ढेरी Image removed. @येता घरी दोन पेग मारु आज थोडे दोनच पेग त्यामुळे फार काही न घडे Image removed. @हसूनिया दोस्तलोग मारतील ढुशा बसूनच स‍ेलिब्रेट करु आता उठ लेका नशा Image removed.
  • Log in or register to post comments

बेश्ट!

मेघवेडा
Wed, 01/18/2012 - 17:01 नवीन
एकदम झ्याक जम्या हय!
  • Log in or register to post comments

मस्त

नि३सोलपुरकर
Wed, 01/18/2012 - 17:19 नवीन
यशवंत राव्,भट्टी मस्त जमलीय.. खूप हसू येत होतं वाचताना ..... @ गणेशा ...अ‍ॅडीशन पण छान जमलीय.
  • Log in or register to post comments

मस्तच.

michmadhura
Wed, 01/18/2012 - 17:31 नवीन
छान आहे, मजा आली वाचताना. :-)
  • Log in or register to post comments

__/\__

मूकवाचक
Wed, 01/18/2012 - 17:35 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

_/\_ _/\_ _/\_

सुहास झेले
Wed, 01/18/2012 - 17:49 नवीन
जबरा !!
  • Log in or register to post comments

दमलेल्या बाबाची कहाणी ऐकतांना

उदय के'सागर
Wed, 01/18/2012 - 18:15 नवीन
दमलेल्या बाबाची कहाणी ऐकतांना जेवढा 'सेन्टी' झालो नव्हतो तेवढा हि कविता वाचुन 'सेन्टी' झालो :( असो, पोट सुटलेल्याचे दु:ख कोणाला तरी समजले .. धन्स यकुजी!!! ;)
  • Log in or register to post comments

मस्त!!

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 01/18/2012 - 19:27 नवीन
आपण महान आहात. __/\__
  • Log in or register to post comments

परिक्रमा पूर्ण केली असती तर

रेवती
Wed, 01/18/2012 - 21:01 नवीन
परिक्रमा पूर्ण केली असती तर असे लिहायची वेळ आली नसती.
  • Log in or register to post comments

हा हा!! एकदम फक्कड. गणेशाची

स्वानन्द
Wed, 01/18/2012 - 21:03 नवीन
हा हा!! एकदम फक्कड. :D गणेशाची अ‍ॅडीशन सुद्धा सही सही जमलीय!
  • Log in or register to post comments

यक्कुशेट, आमच्या वरुन

५० फक्त
Wed, 01/18/2012 - 21:33 नवीन
यक्कुशेट, आमच्या वरुन लिहिलेल्या कवितेला सलाम, आपल्याकडं ती दगडं उभी करायची पद्धत असती ना तर हीच कविता लिहायला सांगितलं असतं मी..
  • Log in or register to post comments

एकदम झक्कास.. --टुकुल

टुकुल
Wed, 01/18/2012 - 21:39 नवीन
एकदम झक्कास.. --टुकुल
  • Log in or register to post comments

वा वा आमच्या पेटंट विषयावर आलेले विडंबन बघून छान वाटले!

चतुरंग
Wed, 01/18/2012 - 22:10 नवीन
आमचे हे एक जुने विडंबन आठवून दिल्याबद्दल आभारी आहोत! ;) -रंगा
  • Log in or register to post comments

परिक्रमेला जाच तू!

पैसा
Wed, 01/18/2012 - 23:06 नवीन
६ महिने डाळ बट्ट्या खाऊन आणि रोज चालून सडसडीत होऊन येशील!
  • Log in or register to post comments

मीटर चुकलंय, असे कुणी म्हणाले

कवितानागेश
गुरुवार, 01/19/2012 - 00:08 नवीन
मीटर चुकलंय, असे कुणी म्हणाले कसे नाही अजून? ;)
  • Log in or register to post comments

जमलयं मस्त..

मराठमोळा
गुरुवार, 01/19/2012 - 04:35 नवीन
काय बोलावे यावर.. ही सुटलेल्या पोटाची कहाणी नव्हे तर 'कहानी घर घर की' आहे. ;)
  • Log in or register to post comments

खी खी खी !

प्यारे१
गुरुवार, 01/19/2012 - 10:16 नवीन
खी खी खी !
  • Log in or register to post comments

मस्त जमलय

पियुशा
गुरुवार, 01/19/2012 - 11:11 नवीन
मस्त जमलय :)
  • Log in or register to post comments

वा वा यशवंता... क्या बात है..

गवि
गुरुवार, 01/19/2012 - 11:40 नवीन
वा वा यशवंता... क्या बात है.. पण बेल्टमधून बाहेर ओघळलेल्या पोटाप्रमाणे अनेक ओळीत शब्द मूळ गाण्याचा मीटर फोडून फोफावलेत की.. ;) कपड्यांचे कपाट उपसताना करुण सत्यपरिस्थितीतून मलाही "पुरानी जीन्स, और गिटार"च्या धर्तीवर "जुनी जीन्स , पण पोट फार.. **च्या वरती चढेनाच यार.." असं गाणं सुचलं होतं. पण ते अपुरं राहिलं.. तुझी कविता वाचून समाधान पावलो.
  • Log in or register to post comments

ते खरंय पोएटिक फ्रिडम कायसं

यकु
गुरुवार, 01/19/2012 - 11:47 नवीन
ते खरंय पोएटिक फ्रिडम कायसं असतं तसं विडंबिक फ्रिडम घेतलंय ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

एक नंबर हो !

कपिलमुनी
गुरुवार, 01/19/2012 - 12:52 नवीन
नाद खुळा .... जिकलास !!!
  • Log in or register to post comments

छान जमलेय .......

इरसाल
गुरुवार, 01/19/2012 - 16:59 नवीन
हातोहात प्रत्येकाने आपला टायर कोणता तेही जाहीर करावे.................
  • Log in or register to post comments

आमचा मिशेलिन.

गवि
गुरुवार, 01/19/2012 - 17:15 नवीन
आमचा मिशेलिन. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

विडंबनाचा विषय चांगला आहे

आदिजोशी
गुरुवार, 01/19/2012 - 17:12 नवीन
पण विडंबन मिटर मधे नसल्याने वाचायला अजिबात मजा आली नाही. मूळ चालीत, मूळ गेयतेसकट विडंबन म्हणता आलं नाही तर ते वाचायला मजा येत नाही.
  • Log in or register to post comments

+1

यकु
गुरुवार, 01/19/2012 - 17:41 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

आवडलं, सुदैवाने माझं पोट

सूड
गुरुवार, 01/19/2012 - 20:00 नवीन
आवडलं, सुदैवाने माझं पोट आटोक्यात आलं म्हणावं तर उगा झैरात केल्यासारखं वाटायचं म्हणून गप्प बसायचं ठरवलं आहे.
  • Log in or register to post comments

माहितेय बे तू जिमला जातोस

प्रचेतस
गुरुवार, 01/19/2012 - 20:04 नवीन
माहितेय बे तू जिमला जातोस ते. बाकी ते ट्रेडमिलचं काय झालं तो किस्सा जरा सांग की. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

बाकी ते ट्रेडमिलचं काय झालं

यकु
गुरुवार, 01/19/2012 - 20:07 नवीन
बाकी ते ट्रेडमिलचं काय झालं तो किस्सा जरा सांग की. Wink
खाली झालंय तसं काही झालं होतं का ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ते आता सूडच सांगेल ब्वा.

प्रचेतस
गुरुवार, 01/19/2012 - 20:15 नवीन
ते आता सूडच सांगेल ब्वा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

सर्व काही खाऊन सुध्दा.. माझं

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 01/19/2012 - 20:53 नवीन
सर्व काही खाऊन सुध्दा.. माझं ताटं कसं भरलेले.. पाहील तर..मी तुझंच ताट माझ्या समोर धरलेलं.. - द्याद्या ढेकर..
  • Log in or register to post comments

मस्तच....

वपाडाव
गुरुवार, 01/19/2012 - 21:23 नवीन
अन यकु त्ये मीटर बीतर ग्येलं चुलीत.... आपाण आपली व्यथा सांगुन व्हा मोकळे.... -(समदु:खी) वपाडाव
  • Log in or register to post comments

झकास!

नंदन
Fri, 01/20/2012 - 04:38 नवीन
लै भारी
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा