संसारी माणसाची पाककृती: संडे स्टार्टर्स

निखिल देशपांडे's picture
निखिल देशपांडे in पाककृती
20 Nov 2011 - 11:41 pm

अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर,
आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर!!

यापुर्वी आम्ही बॅचलर पाककृती लिहिली होती. या पाककृतीच्या नावात बॅचलर लिहिता येणार नाही अशी तंबी आम्हाला स्वयंपाक घरात जायच्या आधीच मिळाली. तसेही आम्हाला आज नव्याने कळलेला नियम म्हणजे " नीट आवरलेले स्वयंपाकघर ही नवर्‍याने स्वयपांक केल्याची खूण आहे"! तुम्हाला काय वाटले?? नवर्‍याने स्वयंपाक घर आवरले? अहो त्याने स्वयंपाक केल्यावर पुर्ण स्वयंपाकघरच ओट्यावर असते तर मग आपोआप आवरल्या जाणार नाही का??? ;) ;)

तर आमच्या अशाच क्लृप्त्यांमुळे आम्ही आमच्या साठी स्वयंपाक घरात नो एंट्रीचा बोर्ड लाऊन घेतला आहे. आहोत ना आम्ही हुशार? तसे आम्ही एक नंबरचे आळशी आहोत त्यामुळे आम्हाला अशा कल्पना सुचतातच. आमच्या बॅचलर काळात आमच्या रुमवर रविवारच्या सकाळी (गेले ते दिवस....) आमच्या साठी खास चहा आणि वडापावची होम डिलीव्हरी पार्सल यायचे. पण आता रविवार सकाळी ७.३० पासुनच कचरावाला, कामवाली बाई, पेपरवाला सगळे दार बडवतात. तर मंडळी रविवारी अशा पहाटे पहाटे उठल्या नंतर वेळ कसा घालवायचा हा प्रश्न आम्हाला पडला होता आणि आमच्या समोर टिव्ही वर अवतीर्ण झाले फूड्फूड (ज्याला आम्ही करतो हुडहुड) नावाचे चॅनल. याआधी बायकोला हजारोवेळा टोमणे मारुन झाले असल्यामुळे आणि आज नको तितका उत्साह ओसांडुन वाहात असल्यामुळे आम्ही आज स्वयंपाक घरावर चाल करुन जायचे ठरवले.

असो नमनाला घडाभर तेल ओतून झालेले आहेच. या डिश ला काय म्हणायचे ते म्हणा बुवा आम्हाला तर याचे नाव माहित नाही. वेगवेगळ्या हॉटिलात आम्ही हे वेगवेगळ्या नावाखाली स्टार्टर म्हणून खाल्लेले आहे. तर आता आपण या नापाककृती साठी लागणार्‍या घटकांकडे एक दृष्टीक्षेप टाकूयात.

१. मायक्रोव्हेव विथ ग्रील अ‍ॅण्ड बार्बेक्यु स्टीक्स (आमच्या कडे आहे ;) जाहीरातच समजावी.)

२. एक बायको/ गर्लफ्रेंड ( भाज्या चिरायला. आधी मारे ऐटीत (आयटीत नव्हे) चल आज मी तुला खाऊ घालतो असे म्हणालो तरीही हिच्या मदती शिवाय तुमची पाकृ पुर्ण होणार नाहीच. (बायकोला यासाठी कसे पटवायचे याच्या टिप्स उत्सुकांना व्यनी द्वारे दिल्या जातील.) सर्व काम बायकोनं केल्यावर आपण फक्त क्रेडिट घ्यायला मोकळे ;) )

आता प्रत्यक्ष स्वयंपाकघरात असणारे साहित्यः ( सगळे घरात सापडेलच, जरा शोधा म्हणजे सापडेल. नसल्यास बायकोला बाजारात पिटाळा.)
मुख्य साहित्यः कोणत्याही रंगीबेरंगी भाज्या.
उदा. १. दोन मध्यम आकाराचे टोमॅटो (आकार मध्यम की कसा आहे, हे बायकोवर सोडावे कारण शेवटी भाज्या तिलाच चिरायच्या असतात)
२. दोन मध्यम आकाराचे बटाटे.
३. दोन सिमला मिरच्या
४. एक कांदा
५. दोन चमचे घट्ट दही(मॅरिनेट करण्यासाठी. म्हणजे काय म्हणून विचारले तर बायकोने गणपाला विचार असं सांगितलंय. त्यामुळे इच्छुकांनी थेट तिकडेच संपर्क साधावा)
६. स्वयंपाकघरात मिळतील ते मसाले: पिझ्झ्यासोबत आलेले ओरॅगिनो-चिली फ्लेक्स, धने-जिरे पूड, सासरवाडीहून आलेले मसाल्याचे तिखट, इ.
७. चवीपुरते मीठ(असे लिहायचे असते नाहीतर इथे पाकृ प्रकाशित होत नाही म्हणे.) आणि हो, जSSराशी साखर. बस्स.

कृती: दह्यात सगळे मसाले-मीठ-साखर घालून नीट मिक्स करा. त्यात चिरलेल्या भाज्यांच्या फोडी घालून सर्व फोडींना मसाला लागेल असे ढवळा. हे मिश्रण असेच वीसेक मिनिटे राहू द्या.

Marinated Vegeteables

नंतर या फोडी बार्बेक्यू स्टिक्सना लावा. या स्टिक्सची टोके जाम टोकदार असतात तेव्हा जपून. किंवा हलकंसं टोचवून घेऊन तिथं आलेलं रक्त बायकोला दाखवा. पुढचं काम ती करते.)

On sticks

त्यानंतर आपापल्या अनुभवाप्रमाणे आणि आवडीप्रमाणे ग्रिल्+मायक्रोवेव्ह किंवा नुसते ग्रिल करा. आम्ही पाच मिनिटे ग्रिल्+मायक्रोवेव्ह आणि नंतरची पाच मिनिटे फक्त ग्रिल केले.( हे काम मात्र मी एकट्याने केले हो!)
तर हे सगळे मायक्रोव्हेव मधे टाकल्यानंतर... बायकोला चल मी आता थोडी रेस्ट घेतो तो पर्यंत तु हे आवरुन घे असे म्हणावे आणि स्वत: सोफ्यावर तंगड्या पसरुन टिव्ही चा आस्वाद घ्यावा. मायक्रोव्हेव ने आवाज केलेला एकुन स्वयंपाक घरात यावे आणि बायकोला अजुन तुझे आवरुन झाले नाही का असे विचारुन घ्यावे. बायकोचा पारा एवढ्यावर चढला असेलच. वर आणखी आज मी अशी अशी पाकृ केली असे चार पाच मित्रांच्या बायकांना फोन करुन सांगावे.

तर अशा प्रकारे आमची रविवारची सकाळ सार्थकी लागली.

प्रतिक्रिया

पैसा's picture

20 Nov 2011 - 11:57 pm | पैसा

दिसतंय पण खाणेबल. फक्त नंतर स्वयंपाकघराचा अवतार कसा होता हे मकीला विचारायचं आहे. माझा नवरा काहीही बनवतो, तेव्हा त्याला घरात असतील नसतील ती सगळी भांडी पूर्वतयारीला लगतात.

निवेदिता-ताई's picture

21 Nov 2011 - 12:13 pm | निवेदिता-ताई

आमच्याकडेही असेच सेम टू सेम............;)

स्मिता.'s picture

21 Nov 2011 - 12:03 am | स्मिता.

समस्त नवरा जातीची गाडी स्टार्टर्सच्या (आणि ते केल्याचा बायकोला पश्चाताप आणण्याच्या) पुढे का जात नाही? अर्थात त्याला गणपासारखे अपवाद असतात म्हणा ;)
संडे स्टार्टर्स छान तर दिसतायेत पण ते मायक्रोव्हेव मध्ये वापरता येणारे बार्बेक्यु स्टीक्स कुठे मिळतील तेही सांगा.

निखिल देशपांडे's picture

21 Nov 2011 - 12:14 am | निखिल देशपांडे

मायक्रोव्हेव मध्ये वापरता येणारे बार्बेक्यु स्टीक्स कुठे मिळतील तेही सांगा.

फुक्ट मिळाले आहेत..
तसे आमच्या घरा जवळच्या अमेरिकन स्टोर मधे मिळते असे माझ्या बायकोच्या मैत्रीणिच्या नवर्‍याचे मत आहे.
तुमच्या कडे पण मिळेल

स्मिता.'s picture

21 Nov 2011 - 2:25 pm | स्मिता.

म्हणजे आता पॅरिसमध्ये अमेरिकन स्टोर शोधणे आले ;)

संपले का तुमच्या नवलाईचे नऊ दिवस. ;)
या या या आपलं स्वागत आहे या दालनात. अशीच अधनं मधनं भेट देत जा. (म्हणजे आता द्यावीच लागणार त्याला पर्याय नाही. लग्नाआधी झाईरात करत सुटला व्हतास नव्हं. बाण आधीच सुटला होता.)

बाकी मकी बरी आहेना?
नाही तुझ्या हातच पहिल्यांदाच खाल्लं असेल म्हणुन म्हटलं तब्येतीची चौकशी करावी. ;)

चलाऽऽऽ....
अजून एक मिपाकर नीट सौंसाराला लागले.
पाकृ रंगीबेरंगी दिसतिये पण चव कशी होती?
तोंडीलावणे काय घ्यायचे? की हेच तोंडीलावणे आहे?
आम्ही सासरी पाठवलेल्या मुलीला अश्याप्रकारे सुखात पाहून डोळ्याला आणि नाकाला कागदी रुमाल लावला.:)

कुंदन's picture

21 Nov 2011 - 12:22 am | कुंदन

तोंडीलावणे म्हणुन चिल्ड बियर चालावी बहुतेक.

मध्यंतरी दुबईहून पाककृत्या टाकून तुम्ही देशपांडेकाकांना भूल पाड्लीत ना भाऊजी!;)
आता सगळे पुरूष स्वयंपाकाला लागणार की पुन्हा एका पुरुषमुक्तीच्या लेखाची तरतूद झाली.

चित्रा's picture

21 Nov 2011 - 12:39 am | चित्रा

रेवती हे खातखात शांतपणे सोफ्यात बसून चिल्ड बिअर पिते आहे, असे दृष्य डोळ्यासमोर आले. हसून हसून पुरेवाट झाली.

बाकी निदे हेही मार्गाला लागलेले बघून आनंद झाला.

तुमच्या ग्रिल्ड भाज्यांबरोबर केळफुलाचे लहान घट्ट वडेपण करून ग्रिल केल्यास छान लागतील असे वाटते.

दृष्य डोळ्यासमोर आले. हसून हसून पुरेवाट झाली
धन्यवाद! आपला प्रतिसाद हेच दाखवतो की मी जे कधी करू शकणार नाही ते डोळ्यासमोर आले आणि विसंगती लक्षात आल्याने आपणास हसू आले.;) याची तुलना नऊवारी साडीतील ललना बर्गर खाते आहे या चित्राशी (हे नाव नव्हे) केल्या गेली आहे.
वरील पाककृतीचे श्रेय मकलाही द्यायला हवे.
आम्ही तिला स्त्रीमुक्तीचे बरेच सल्ले दिले होते त्याप्रमाणे तिने आपले काम चोख बजावले.;)

चित्रा's picture

21 Nov 2011 - 12:47 am | चित्रा

मला वाटते तुम्ही अपेयपान करीत नाही, करता का? :) शिवाय शांत सोफ्यावर बसून पिते आहे हेही तुमच्या व्यक्तिमत्वाशी विसंगत आहे ना.

रेवती's picture

21 Nov 2011 - 12:54 am | रेवती

हॅ हॅ हॅ
मी दूध पिते असं म्हटल्यावर मंडळी हसतात मला.
आजकाल तेच अपेयपान समजले जाते.

चित्रा's picture

21 Nov 2011 - 1:11 am | चित्रा

मी दिवसातून दोनदा तरी अपेयपान करते ;) हाहाहा.

स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद!
आता आपण अधुनिक म्हणून मिरवायला मोकळे!;)

एका गरीब बिचाऱ्या पुरषाच्या धाग्याचा या दोन पाशवी शक्तिंनी खफ केलाय?
आता कुठे गेले ते पुरुष्मुक्ती वाले? ;)

चित्रा's picture

21 Nov 2011 - 5:43 am | चित्रा

ते बहुदा इथे अजून एका गरीब बिचार्‍या पुरुषावर रांधा-वाढायची वेळ आलेली पाहून अजूनच खंतावले असतील.

कुंदन's picture

21 Nov 2011 - 11:03 am | कुंदन

कृपया धाग्याचा ख फ करु नका.
कृपया अनिवासींनी धागा हायजॅक करु नये.

पुरुष मुक्ती वाले, शन्वारी शन्वारवाड्यासमोर निदर्शनं करत होते.

आत्मशून्य's picture

21 Nov 2011 - 12:27 am | आत्मशून्य

.

सानिकास्वप्निल's picture

21 Nov 2011 - 7:37 am | सानिकास्वप्निल

:)

परिकथेतील राजकुमार's picture

21 Nov 2011 - 11:10 am | परिकथेतील राजकुमार

नीट आवरलेले स्वयंपाकघर ही नवर्‍याने स्वयपांक केल्याची खूण आहे

तरी आम्ही सांगत होतो, "निख्या अजून विचार कर .. विचार कर...."

सिंगल मिंगल
परा

धमाल मुलगा's picture

21 Nov 2011 - 11:14 am | धमाल मुलगा

वेलकम टू क्लब! ;)

अवांतरः च्यायला, ही पाककृती म्हणजे शबरीमध्ये झालेल्या उशीराचं पापक्षालन तर नव्हे ना?....असा हलकट प्रश्न नको नको म्हणलं तरी तरळलाच. ;)

मस्त कलंदर's picture

21 Nov 2011 - 11:43 am | मस्त कलंदर

@ स्मिता, गणपा :
पाकृ फोटोत जितकी छान दिसतेय, त्याहून खायला जास्त चटपटीत झाली होती. नवर्‍याची प्रगती स्टार्टर्सच्याही पुढे आहे. त्याच्या हातची पावभाजी आणि मिसळपाव खाऊनही मी अजून ठणठणीत आहे. आम्हाला मायक्रोवेव्हसोबत इडली कुकर, बार्बेक्यू स्टँड आणि ग्रिलचे दोन स्टँड्स मिळाले आहेत. त्यांवर हळूहळू वेळ मिळेल तसे प्रयोग चालू आहेत.

@रेवती: यासोबत तोंडीलावणे म्हणून खरंतर पुदीना-कोथिंबीर-मिरचीची सँडविचला लावण्याच्या चटणीसदृश्य काहीही छान लागेल. पण आम्ही हे करताकरताच इतकी भूक लागली की नुसते खाऊन टाकले. (त्यांना आधीच लावलेल्या मसाल्यांमुळे ते तसेही छान लागले)

@चित्रा: मीही अगदी हेच इमॅजिन केले होते. :-)

@परा: असो!!! हे ही दिवस जातील.

@धम्या: नवर्‍याने अशी पापक्षालनं करायची ठरवली तर घरी मला स्वयंपाकघरात जायचीही गरज पडणार नाही. समजलें काँय?

परिकथेतील राजकुमार's picture

21 Nov 2011 - 12:39 pm | परिकथेतील राजकुमार

@परा: असो!!! हे ही दिवस जातील.

मके, शपथ मी इतका फिस्सकन हसलो हे वाचून ;)

कुंदन's picture

21 Nov 2011 - 1:10 pm | कुंदन

मग परा कसली पा कृ टाकेल ? थालिपिठ , मेतकुट्-भात , पोव्हे टाकुन केलेली मिसळ. ;-)

स्मिता.'s picture

21 Nov 2011 - 2:19 pm | स्मिता.

जिथे तिथं जावून फक्त नेमके वरचे शब्द वाचून फिस्सकन हसणं शोभत नाही हों!

परिकथेतील राजकुमार's picture

21 Nov 2011 - 2:53 pm | परिकथेतील राजकुमार

जिथे तिथं जावून फक्त नेमके वरचे शब्द वाचून फिस्सकन हसणं शोभत नाही हों!


आता लोकं नको तिकडे त्याचा गैरवापर करतात त्याला आम्ही तरी काय करणार ? ;)

खी खी खी
स्मिता, टोला बरोबर बसला.

(संसारी म्हणुन )पाकृ ठीक-ठाक च !!

(हलकट ) अवांतर : तरी म्हटलं, घर, संसार, अभ्यास ई.ई. असताना " चित्रपट-परीक्षणे " लिहीण्याकरिता वेळ कसा मिळतो ब्वा ;)

इंटरनेटस्नेही's picture

21 Nov 2011 - 12:05 pm | इंटरनेटस्नेही

उत्तम! पाकृ आवडली!

छोटा डॉन's picture

21 Nov 2011 - 1:53 pm | छोटा डॉन

छान ...
निख्या संसाराला लागल्याचे पाहुन धन्य धन्य वाटले. 'माणुस संसारात रोज एक नवी गोष्ट शिकतो' असे आमचे मित्र अ‍ॅडीजोशी (अनुभवाने) सांगतात, त्याचा प्रत्यय आलाच.

- छोटा डॉन

वा वा वा डॉनकाकांची प्रगल्भ की काय म्हणतात ती हीच प्रतिक्रीया अपेक्षीत होतीच

विशाखा राऊत's picture

21 Nov 2011 - 7:15 pm | विशाखा राऊत

प्रगती आहे :)

जाई.'s picture

21 Nov 2011 - 8:12 pm | जाई.

मस्त

तेव्हाच संशय बळावला होता की बल्लव बनण्याची तयारी सुरु असावी म्हणून. आता तर ह्या धाग्याने खात्रीच पटली की! ;)
जियो! क्लबात स्वागत आहे रे! :)

-रंगा

अवांतर - "हॉटेलची बिले कमीकमी होत जाणे ही नवरा बल्लव बनत असल्याची खूण आहे!"

गणपा's picture

21 Nov 2011 - 8:40 pm | गणपा

मनीच्या बाता : रंगाशेटच आवांतर स्वानुभवातुन आलं असेल का रे गण्या? :p

डीश तर छान दिसतेय.....रविवारी बघतो करून.....

शंका-- इथे सगळे एकमेकांना ओळखता काय्,,,,,एकेरी नावाने हाका मार्ताय्....म्हणुन विचारल.....Joint Family.....joint account .....तसा join blog