✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मारुती अल्टो -Petrol Verson

न
नितिनभालेराव यांनी
गुरुवार, 11/10/2011 - 16:04  ·  लेख
लेख
नमस्कार, माझ्याकडे मारुती अल्टो -Petrol Verson आहे. मला ती Gas वर convert करायची आहे. CNG आणी LPG पैकी कुठला पर्याय चालेल. दोहो पैकी फायदेशीर आणी सुरक्षीत कुठला ? माहिती पाहिजे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4718 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

रिक्षा घ्या

daredevils99
गुरुवार, 11/10/2011 - 16:12 नवीन
गाडी विका आणि CNG वर चालणारी रिक्षा घ्या.
  • Log in or register to post comments

अहो इतरत्र झालेल्या

धन्या
गुरुवार, 11/10/2011 - 16:18 नवीन
अहो इतरत्र झालेल्या भांडणांचा राग असा मिपावर येऊन काढायचा नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: daredevils99

CNG वर चालणारी रिक्षा

कुंदन
गुरुवार, 11/10/2011 - 16:36 नवीन
>>CNG वर चालणारी रिक्षा घ्या +१ संध्याकाळी ४-५ IT कंपनी वाली भाडी मिळाली तर घरखर्च पण निघुन जात जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: daredevils99

पेट्रोल पेक्षा चांगले दुसरे काहीच नाही.

चेतन सुभाष गुगळे
गुरुवार, 11/10/2011 - 16:13 नवीन
तुम्ही कुठे वावरता? म्हणजे तिथे सीएनजी ची पुरेशी उपलब्धता आहे का? असल्यास सीएनजी उत्तम. सुरक्षित आणि फायदेशीर देखील. नसल्यास एलपीजी ठीक. यापैकी कुठलाही बदल वाहनात केल्यास तो अधिकृत विक्रेत्याकडूनच करून घ्या आणि तशी नोंद वाहन नोंदणी प्रमाण पत्र तसेच विमा कागदपत्रांवर न विसरता करून घ्या. अर्थात तुमचा वापर वार्षिक १०,००० किमी हून कमी असेल तर पेट्रोल वर राहू द्या तेच अतिउत्तम. माझा अनुभव तरी असा आहे की वाहन पेट्रोल वर उत्तम सेवा देते. त्याला तोड नाही. फारच गरज असेल तितकेच आणि तेव्हाच वापरावे. वार्षिक सात हजार किमी इतका माझा वापर आहे.
  • Log in or register to post comments

तिथे सीएनजी ची पुरेशी उपलब्धता आहे का

नितिनभालेराव
गुरुवार, 11/10/2011 - 16:21 नवीन
मी पुण्यात रहातो. मला गाडी घेउन १ वर्ष झाले आहे. वापर वार्षिक १०,००० किमी झाला आहे. सीएनजी ची पुरेशी उपलब्धता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

-सीएनजी संच बसवल्यावर आधीचा

गवि
गुरुवार, 11/10/2011 - 17:17 नवीन
-सीएनजी संच बसवल्यावर आधीचा इन्शुरन्स व्हॉईड होतो आणि वाढीव प्रीमियम असलेला इन्शुरन्स प्रीमियम लागू होतो हे लक्षात घ्यावे. -नॉन ब्रँडेड /सबस्टँडर्ड पण स्वस्त अशी अनेक किट्स बाजारात मिळतात पण ती अत्यंत धोकादायक ठरु शकतात. -किट बसवल्यावर डिकीतली स्पेस नष्ट होते. (त्यातल्यात्यात कमी जागा खाणारी काही किट्स आहेत.. चवकशी करावी) - पिकअप अत्यंत जाणवण्याइतपत कमी होतो. -सीएनजी आणि एलपीजी दोन्ही पेट्रोलपेक्षा स्वस्त असले तरी लिटरमागे पेट्रोलला मिळालेले मायलेज किलोमागे सीएनजीला मिळणार्‍या मायलेजपेक्षा थोडेसे जास्त असते. त्यामुळे अगदी इंधनखर्च अगदी निम्म्यावर येईल असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. सर्व फॅक्टर्स धरुन खर्चात तीसेक टक्केच बचत होते..आणि सेफ्टीशी बरेच कॉम्प्रोमाईज.. -एकदा सीएनजीवर चालवायला लागलेल्या गाडीच्या इंजिनाला हळूहळू अधिकचे करोजन होते असे ऐकले आहे पण पुरावा किंवा विदा नाही. -एकदा सीएनजीवर चालवायला लागलेल्या गाडीच्या इंजिनचा पेट्रोलवरचा परफॉर्मन्सही सीएनजी किट बसवल्यावर कायमचा खराब होतो असं वापरणार्‍यांकडून कळतं...
  • Log in or register to post comments

सहमत, पिकअप बेक्कार कमी होतो.

सोत्रि
गुरुवार, 11/10/2011 - 19:27 नवीन
सहमत, पिकअप बेक्कार कमी होतो. माझ्या मते १०,००० किमी पेक्षा जास्त रनिंग असेल तर जमत असल्यास पेट्रोल गाडी विकून डिजेल गाडी घ्यावी. बिना पिकअपची गाडी चालवण्यापेक्षा ते बरं! - (फुल पिकअप आवडणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हे घ्या ...

कपिलमुनी
गुरुवार, 11/10/2011 - 18:26 नवीन
http://www.team-bhp.com/forum/modifying-car/22225-article-cng-vs-lpg-comparision.html http://www.team-bhp.com/forum/modifications-accessories/88692-my-experiments-lpg-cng.html http://www.team-bhp.com/forum/modifications-accessories/4177-cng-vs-lpg.html http://www.team-bhp.com/forum/modifications-accessories/101797-advice-cng-conversion-7.html http://www.team-bhp.com/forum/technical-stuff/26643-open-loop-closed-loop-cng-lpg.html lpg सध्या ४५ रु आहे ..आणि मायलेज पेट्रोल पेक्शा कमी देते .. उदा : अल्टो :मायलेज पेट्रोल १८ किमि असेल तर lpg ला १५ देइल.. cng सध्या ३७ रु आहे ..आणि मायलेज पेट्रोल पेक्शा जास्त देते.. उदा : अल्टो :मायलेज पेट्रोल १८ किमि असेल तर lpg ला २२देइल.. म्हणजे प्रति किमि पेट्रोल खर्च ४.२० रु किमि .. प्रति किमि lpg खर्च ३ रु किमि .. प्रति किमि cng खर्च १.७५ रु किमि .. पण इंशुरन्स चा खर्च वारवाढतो १२००-१५०० रु ने वाढतो * ( या बद्दल चौकशी करा "हव तर अजुन एक धागा काढा ;) ") cng कीट मधे कही प्रकार आहेत .. त्या मधे sequential चांगले असते पण त्याची किंमत ५८,००० -६०,००० असते दुसरे Injection किट ३०,००० पर्यन्त मिळते ..पण त्याचे टायंमिंग सेट करावे लागते .. आणि ते ट्युन कारावे लागते ( वर्षातुन एकदा) आणि Closed Loop system बसवुन घ्या ..तीची अनुभव चांगले अहेत.. आता तुम्ही गोल भोकात चौकोनी खुंटी बसवता आहात तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येतील त्याबद्दल गुगल करा ..टंकायचा कंटाळा आला
  • Log in or register to post comments

घरातल्या यल.पी.जी ग्यास च्या

अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 11/10/2011 - 18:45 नवीन
घरातल्या यल.पी.जी ग्यास च्या टाकिवर पण गाडी चालते..किट पण स्वस्त होति/आहे.. पण आता सरकार त्याला मान्यता देत नाहि.. त्या मुळे शक्यतो ति बसवु नका.... पण यल.पी.जी किट बसवणार असाल तर एक पंप विकत मिळतो त्याने घरातल्या टाकितला ग्यास गाडीच्या टाकित भरता येतो...तो पण एक पर्याय आहे.
  • Log in or register to post comments

हे बेकायदेशीर मार्ग आहेत

कपिलमुनी
गुरुवार, 11/10/2011 - 19:15 नवीन
तुम्हांस खात्रीशीर माअहित नसेल तर इतराना सुचवु नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

+१

सोत्रि
गुरुवार, 11/10/2011 - 19:33 नवीन
- (खात्रीशीर माहिती नसलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

:)

कपिलमुनी
गुरुवार, 11/10/2011 - 19:45 नवीन
अहो सोकाजीराव, त्यांनी सुचवलेला उपाय खुप धोकादायक होता .. अशा यंत्रामधुन गॅस लीक होण्याची शक्यता असते .. बाकी पिक अप च्या बाबतीत एकमत .. पेट्रोल कार पिक-अप आणि स्मूथपणा आणि कमी मेंटेंनन्स यावर भाव खाते ( आय १० प्रेमी आयटी हमाल )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

+१

छोटा डॉन
गुरुवार, 11/10/2011 - 19:52 नवीन
हेच म्हणतो. >>पण यल.पी.जी किट बसवणार असाल तर एक पंप विकत मिळतो त्याने घरातल्या टाकितला ग्यास गाडीच्या टाकित भरता येतो...तो पण एक पर्याय आहे. खरं आहे, पण हे धोकादायक आहे. शिवाय हे आहे असे दिसल्यास पोलीस छानपैकी बिनभाड्याच्या खोलीत राहण्याची सोय करतात, तिकडे अस्सल कोल्हापुरीपद्धतीचे जेवण वगैरेही देतात, बघा आता. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

शिवाय हे आहे असे दिसल्यास

गणपा
गुरुवार, 11/10/2011 - 20:14 नवीन
शिवाय हे आहे असे दिसल्यास पोलीस छानपैकी बिनभाड्याच्या खोलीत राहण्याची सोय करतात, तिकडे अस्सल कोल्हापुरीपद्धतीचे जेवण वगैरेही देतात, बघा आता.
वरील विधानावरुन, डॉण्राव याबाबतीत खात्रीशीर माहिती बाळगुन आहेत असा निष्कर्ष काढतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

खी खी खी

सोत्रि
गुरुवार, 11/10/2011 - 20:33 नवीन
आज डॉन्रावांचे काही खरे नाही असे दिसते. डॉन्राव, आजच्या दैनंदिन भविष्यात 'मित्रांकडून कमी जास्त ऐकावे लागेल' असे काही होते का ? - (दैनंदिन भविष्यानुसार दिवसाची कामे ठरवणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

Petrol Verson नाहि हो Version

शाहिर
गुरुवार, 11/10/2011 - 19:53 नवीन
एकोळी धागा ..त्यात सुद्धा व्याकरणाच्या चुका
  • Log in or register to post comments

मिपा हे गुगलला पर्याय ? असा

मराठी_माणूस
गुरुवार, 11/10/2011 - 20:49 नवीन
मिपा हे गुगलला पर्याय ? असा एक धागा काढावा काय ?
  • Log in or register to post comments

'माझ्याकडे मारुती अल्टो

५० फक्त
गुरुवार, 11/10/2011 - 21:51 नवीन
'माझ्याकडे मारुती अल्टो -Petrol Verson आहे. - आजतागायत डिझेल अल्टो ऐकलेले नाही. मला ती Gas वर convert करायची आहे. - पेट्रोल महाग झाले म्हणुन,अजिबात करु नका. वर्षाला धा हजार म्हंजे पेट्रोलच बेस्ट. CNG आणी LPG पैकी कुठला पर्याय चालेल. - गाडी नवीन असेल १००० सिसि अल्टो तर कशाला पिकपची काशी करताय. दोहो पैकी फायदेशीर आणी सुरक्षीत कुठला ? - दोन्हीही नाही, हे खरंच फायदेशीर आणि सुरक्षित असतं तर मारुतीनंच असं व्हर्जन बाज्रारात आणलं असतं, वॅगर आर का घेत नाही पेट्रोल + एल्पिजी.
  • Log in or register to post comments

व्यागनार ग्यासवरची हे एक

विजुभाऊ
Fri, 11/11/2011 - 15:21 नवीन
व्यागनार ग्यासवरची हे एक भंगार काँबिनेशन आहे. गाडीत जागा नाही आणि पिकप बोंबललेला असतो. तसेच करायचे असेल तर नॅनो डिझेल किंवा नॅनो एल पी जी हा सर्वोत्तम पर्याय आहे
  • Log in or register to post comments

१. एलपीजी धोकादायक कारण

नितिन थत्ते
Fri, 11/11/2011 - 16:39 नवीन
१. एलपीजी धोकादायक कारण एलपीजी लीक झाल्यास हवेपेक्षा जड असल्याने तेथेच राहतो. सीएनजी हलका असतो त्यामुळे साठून रहात नाही. (घरगुती गॅस वाहनात वापरणे हे बेकायदेशीर आहे त्याचे "फायदे" डॉन्रावांनी सांगितलेच आहेत). ऑटो एलपीजीची आउटलेट फार कमी असतात. २. देशभक्तांसाठी- सीएनजी देशातच उपलब्ध आहे. एलपीजी आयात करावा लागतो किंवा आयात केलेल्या क्रूडमधून बनवला जातो. ३. सीएनजीची टाकी बसवली की मागची जागा भरून जाते. मग सामानासाठी टपावर कॅरिअर बसवावी लागते. कॅरिअर असलेल्या गाड्यांवर पोलीसांचे विशेष लक्ष राहते. ;) कारण ती गाडी भाड्यावर लावली आहे असा संशय त्यांना असतो. ४. पेट्रोलची गाडी चालवण्याचे सुख इतर कशात नाही. रनिंग फार नसेल तर पेट्रोलचीच ठेवणे उत्तम. खर्चच कमी करायचा असेल तर ऑफीसमधल्या इतरांशी शेअर करायचे बघा (कार पूलिंग).
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा