खरडवही व खरडफळ्यावरील मजकूर
उगाच कुणाला चिडवण्यासाठी म्हणून धागे काढायचे टाळा.दुसरा प्रश्न असा की काही धागेदेखील मित्रामित्रांच्यात एकमेकांची चेष्टा करण्यासाठी काढले जातात. मी अदितीच्या अमेरिकाप्रवासाबद्दल लिहिलेला होता, छोटा डॉन यांना रजनीकांत कल्पणारा लिहिला होता. तसंच अदितीनेही माझी आणि प्रियालीची गुरू कल्पून चेष्टा करणारा धागा परवाच लिहिला. अशी मित्रांमित्रांतली गंमत करू नये का? पुन्हा दुसऱ्यांना चिडवणारा, त्रास देणारा धागा आणि मित्रांची गंमत करणारा धागा यात फरक कसा करायचा? तसा फरक होत नसेल तर सगळ्याच गमती थांबवायच्या का?
In reply to धन्यवाद by राजेश घासकडवी
. मित्रामित्रांच्यात अनेक वेळा अशी भाषा गंमत म्हणून वापरली जाते. त्यात मानहानीचा बिलकुल हेतू नसतो. अनेक माननीय सदस्यांच्या खरडवह्या अशा भाषेने भरलेल्या सापडतील. त्या सर्व स्वच्छ करणार का?मला वाटते मित्रामित्रांतील भाषा आणि त्रयस्थाबद्दल लिहिलेला मानहानीकारक अश्लील आणि खालच्या पातळीवरील संवाद यांत फरक आहे. याला अटकाव घातला हे योग्य झाले. कोणी कितीही कंठशोष केला तरी खरडवह्या या जाहीर असतात. त्यात लिहिलेल्या गोष्टी प्रकाशित (पब्लिश्ड) असतात आणि त्याविरुद्ध तक्रार नोंदवता येते. मिसळपावावर खरडवहीची धोरणे अधिक स्पष्टपणे जाहीर करावीत. तूर्तास जी वर सूचना दिली आहे त्याबद्द्ल धन्यवाद. येथे हे ही नमूद करावेसे वाटते की मागे अशाप्रकारे एका बाईला सौम्य शिवी दिल्याबद्दल एका सदस्यांचे खाते गोठवण्यात आले होते. इथे अश्लाघ्य प्रकार घडल्यावरही संबंधितांवर कार्यवाही झालेली नाही.
In reply to मला वाटते by प्रियाली
मागे अशाप्रकारे एका बाईला सौम्य शिवी दिल्याबद्दल एका सदस्यांचे खाते गोठवण्यात आले होते. इथे अश्लाघ्य प्रकार घडल्यावरही संबंधितांवर कार्यवाही झालेली नाही.आणखी दोन प्रकार सांगते. १. याच स्त्री आयडीच्या शयनगृहाचा उल्लेख जाहीर धाग्यावर केल्यानंतर एका संपादकांचा राजीनामा आला होता. २. दुसर्या स्त्री आयडीला काहीबाही व्यनी केले म्हणून एका सदस्याचा आयडी नामशेष झाला. यापुढे मला प्रश्न असा आहे की एक पुरूष आयडी आणि दोन स्त्री आयडींबद्दल एका स्त्री आयडीने बीभत्स खरड लिहीली त्याबद्दल काही कारवाई होणार का? नसेल तर स्त्रियांनी काहीही केले तर खपून जाते अशी मिपाची प्रतिमा व्हावी का? का पुरूषांविरोधात काहीही लिहीले तर खपून जाते? सदर बीभत्स खरड लिहीणार्या स्त्री आयडीच्या मित्रांनीही या बीभत्सपणाला खरडवह्यांतून साथ दिलेली आहे तर या सर्व लोकांवर कारवाई होणार काय? का चार लोकांनी मिळून काही केलं तर खपून जातं? असले बीभत्स लेखन करणार्या लोकांना काही ताकीद मिळाल्याचे मला समजलेले नाही. शिवाय त्यांच्यापैकी काही लोकांची इथेही अरेरावी दिसून येत आहे. तेव्हा अनिर्बंध लिखाण करणार्या लोकांनी खोड्या काढलेल्या चालतात पण स्वतःवर निर्बंध घालून लिहीणार्यांनी स्वतःवर झालेली टीका सतत ऐकूनच घ्यावी असा मिपाचा नवा नियम आहे का?
In reply to धन्यवाद by राजेश घासकडवी
In reply to परवाचा संदर्भ आला म्हणुन !! by सुहास..
पुन्हा तसे दिसल्यास भाषा मानहानीपुर्ण आढळली तर मी जबाबदार नाही.घोषणेत जे म्हटलंय त्याच्या सरळसरळ विरोधी कृती करण्याची ही धमकी समजावी का?
In reply to धन्यवाद by राजेश घासकडवी
मला म्हणायचं आहे की दुसऱ्याची मानहानी करणारी गलिच्छ भाषा आणि मित्रांमित्रात गमतीने वापरलेली भाषा यात फरक कसा करणार?माझ्या मते हा प्रश्न फक्त काही थोड्या करड्या क्षेत्रासाठीच उद्भवू शकेल. बहुतेक परिस्थितीत ओळखता येते. संदिग्धता वाटल्यास संबंधितांना विचारता येईल. अधिकृत विचारणेचे उत्तरही अधिकृत मानता येईल. मित्रामित्रांपैकी एका-एकीनेही वाक्यांस आक्षेप घेतला तर तो संवाद आक्षेपार्हच ठरतो. - - - माझ्याबाबत घडलेला एक अनुभव सांगतो - मित्रामित्रांतच पण लोकांना ऐकू येईल अशा ठिकाणचा संवाद आहे. एकदा एका भाजीपाल्याच्या दुकानात मी मित्रामित्रांत बिगर-इंग्रजी भाषेत गप्पा मारत होतो. (मी राहातो त्या गावात बहुतेक इंग्रजी बोलून व्यवहार होतो.) वेगवेगळ्या भाज्यांच्या तथाकथित लिंगनिर्देशक आणि लिंग-चेतक गुणांबाबत मी गमतीने सांगत होतो - शब्द ग्राम्य होते, "अभ्यासू" नव्हते. मग माझ्या लक्षात आले, की बाजूला एक पोक्त कुटुंब माझ्याकडे थोड्या रागाने बघत होते. चेहर्यामोहर्यावरून असे स्पष्टच होते, की ती भाषा त्यांना कळत होती. मी स्वतः ओशाळलो, आणि हे ओशाळणे योग्यच होते, असे मला अजून वाटते. तोच विषय इंग्रजीमध्ये अशा खुल्या ठिकाणी बोलण्याबाबत माझ्या मनातही विचार आला नसता. (म्हणजे बिगर-इंग्रजी बोलून मी एक खाजगी संवादकक्ष निर्माण झाल्याच्या भ्रमात होतो. म्हणूनच तो विषय त्या ग्राम्य शब्दांत मी बोलत होतो.) यावरून असे दिसते, की खाजगीमध्ये (फक्त मित्रांना समजणार्या भाषेत, किंवा, फक्त मित्रांना ऐकू येईल अशा ठिकाणी) जे ग्राम्य शब्द ठीक आहेत, तेच शब्द मित्रांशीच बोलताना बाजारात ठीक नाहीत, हे जाणण्याबाबत कुठलेसे निकष आपणा सर्वांना अध्याहृत असावेत. - - - मित्रांशीच खाजगी/सार्वजनिक बोलणे यातील नीरक्षीरविवेक अध्याहृत आहे, पण तो जुलमी आहे, असे कोणी म्हणू शकते. पण मग तसे म्हटले पाहिजे. किंवा अध्याहृत नियम आहेत ते स्पष्टपणे काय आहेत? याबाबत कोणाला संशोधन करायचे असेल, तर तेही ठीकच आहे. पण ते संशोधन करायची जबाबदारी (किंवा तज्ज्ञता) मिसळपाव चालकाकडे आहे, हे समजून प्रश्न विचारणे ठीक नव्हे. या प्रश्नाचे सुस्पष्ट उत्तर मिळेपर्यंत भाजीबाजारात त्या लैंगिक विषयाबाबत चर्चा मी चालू ठेवायलाच हवी होती काय? किंवा सुस्पष्ट उत्तर नाही म्हणून उद्या इंग्रजीमध्ये त्या विषयाबाबत बाजारात चर्चा करू काय?
मिसळपाववरील सदस्यांनी गलिच्छ, हीन व मानहानिकारक भाषा वापरू नये याबाबतीत मालकांकडून सूचना आली हे उत्तमच.+१ असेच म्हणतो..
In reply to घोषणेच्या दुसर्या धाग्यावर by नितिन थत्ते
In reply to +१ by क्रेमर
In reply to राजेश जे आपल्याला मान्य असेल by विजुभाऊ
In reply to उर्मट, लोचट वगैरे by प्रियाली
मात्र एक प्रश्न आहे. मित्रामित्रांच्यात अनेक वेळा अशी भाषा गंमत म्हणून वापरली जाते. त्यात मानहानीचा बिलकुल हेतू नसतो. अनेक माननीय सदस्यांच्या खरडवह्या अशा भाषेने भरलेल्या सापडतील. त्या सर्व स्वच्छ करणार का? मला म्हणायचं आहे की दुसऱ्याची मानहानी करणारी गलिच्छ भाषा आणि मित्रांमित्रात गमतीने वापरलेली भाषा यात फरक कसा करणार?हाच प्रश्न माझ्याही मनात आला होता. राजेश आणि मी एकमेकांना खरडवहीत परस्परांबद्दल काहीबाही बोललो, आणि आम्हा दोघांना त्याविषयी आक्षेप नसला तरीही त्यावर कारवाई होणार का? (यात राजेश आणि मी हे केवळ उदाहरणादाखल आहे).
In reply to नीलकांता, मज पामराचा तुला एकच by विसोबा खेचर
In reply to जे सभासद तुला, संपादकांना आणि by मदनबाण
दुसर्यांची खिल्ली उडवताना /मस्करी करताना मजा येत असेल तर स्वतःची पण ते सहन करायची तयारी ठेवावी.तुमच्या आणि इतरांच्या खरडवहीत जो अश्लाघ्य प्रकार चालला होता हे सहन करायचे का? तसे असल्यास वरील नीलकांतच्या मजकूराला तुमची असहमती आहे असे समजायचे का? तुम्हाला जर प्रकार मान्य नव्हते तर त्याविरुद्ध तक्रार करणे किंवा तशाच स्वरूपाचे खोडकर, पोलिटिकली करेक्ट शालजोडीत माराणारे धागे लिहिणे हा पर्याय होता. तसे न करता तुम्ही जो प्रकार केलात त्यावर या धाग्यात नीलकांतने आक्षेप दर्शवला असता परत येऊन तुम्ही सहन करण्याबद्दल का सांगत आहात? नवनिर्मित संपादकमंडळाने कृपया यात लक्ष घालावे. खुद्द या धाग्यावर धमक्या देण्याचे प्रकार सुरू आहेत.
In reply to काय सहन करायचे? by प्रियाली
In reply to दुसर्यांची खिल्ली उडवताना by मदनबाण
बाई माझ्या खरवडी बद्धल बोलण्या पेक्षा इतरांच्या खरडवह्या पहा ! त्यांच्या खरडवह्या बरबटलेल्या सापडतील त्याची तुलना माझ्या खरड वहीशी शक्य नाही. ३ वर्षातला माझ्या खरडवही मधला मजकुर सगळ्यांना वाचायला उघडाच आहे. लावा जो शोध लावायचा आहे तो...माझा आक्षेप जे काल झाले त्यावर आहे. त्यात तुमची खरडवही सहभागी होती. मी तक्रारही त्याबद्दल केली होती आणि हा धागाही त्याबद्दलच आहे. तेव्हा दुसर्यांच्या वह्या बघा वगैरेची गरज नाही.
In reply to माझा आक्षेप by प्रियाली
In reply to माझा आक्षेप जे काल झाले by मदनबाण
In reply to निषेध नोंदवते! by प्रियाली
In reply to कांगावा करण्याचा क्षीण by मदनबाण
In reply to व्यक्तीगत मानहानीकारक मजकूर by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to डुक्कर म्हणणे मानहानीकारक का वाटावे? by आण्णा चिंबोरी
In reply to ईश्वरी अवतार आणि मानवी आयडी by ३_१४ विक्षिप्त अदिती
ईश्वरी अवतार आणि मानवी आयडी यांची तुलना केल्यामुळे महान हिंदू धर्माची अवहेलना झाली असं तुम्हाला वाटतं का?नाही. किंबहुना एखाद्याला डुक्कर म्हणणे हा त्याचा सन्मान आहे असे मला वाटते.
नसेल तर मग कलावतीमाता, अनिरूद्ध बापू, स्वामी समर्थ यांच्याशी इतर माणसांची तुलना करावी का?याबाबत पुरेशी कल्पना नाही. कलावती म्हणजे नवरी मिळे नवर्याला मधली निवेदिता जोशी का?
In reply to नाही by आण्णा चिंबोरी
In reply to व्यक्तीगत मानहानीकारक मजकूर by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to व्यक्तीगत मानहानीकारक मजकूर by मदनबाण
In reply to जे सभासद तुला, संपादकांना आणि by मदनबाण
In reply to घोषणेबद्दल आभारी......! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to नीलकांत व डॉ. बिरुटे by शिल्पा ब
In reply to घ्या! तिथं घोषणा करु करु by अनामिक
In reply to आणि खरडवह्या साफ व्हायला by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to याला काय म्हणावे? चोराच्या by रेवती
In reply to खिक by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to नाही हीच मेख आहे by आत्मशून्य
In reply to अजून एक प्रामाणिक शंका. by Nile
In reply to तुझो उजवो ड्वलो लै लवताव मा by गणपा
धन्यवाद