टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
भाषाशुद्धी, जडजंबाल लेखन, मराठी भाषेचे मूळ
भाषाशुद्धीकरण आणि जडजंबाल लेखन : मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांचे निवडक उतारे.
मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली. काही काळ तिने आवाज केला. पुढे तो थंडावत गेला. दरम्यान या चळवळीला पुरस्कर्ते आणि अनुयायी लाभले ते संख्येने मर्यादितच होते. उच्च जात, आणि उच्च नसले तरी त्याच्या जवळपासचे शिक्षण, या दोन प्रमुख मर्यादा. सर्वसाधारण लोकात तिचे हसे झाले. शुद्धीकृत भाषेची विडंबने झाली. तिला अनुयायांपेक्षा पुरस्कर्तेच अधिक लाभले
म्हणजे अशा शुद्धीकरणाचा तात्त्विक पुरस्कार करणारे. 'तशा' भाषेत आपले लेखन करणारे फार थोडे होते. शेवटी आपले लेखन ज्यांच्यासाठी त्या लोकांना ते कितपत समजेल ही शंका आड आली असणार. पण भाषाशुद्धीकरणाची चळवळ थंडावली, तिचे उघड उद्योग संपले, तरी आपल्या स्वातंत्र्यचळवळीच्या भाषेत ती 'भूमिगत' झाली. परिणामी ती कीड लागल्या प्रमाणे पसरली. बर्याच लेखनाच्या मुळांना ती कीड लागली. अनेकदा त्या लेखकांच्या नकळत! आणि 'शिष्ट' लेखकांमुळे ती लागण स्वत:ला लेखक न समझणार्या वाचकांपर्यंत पोचली. कृत्रिम, अर्थहीन आणि जडजंबाल लेखन त्यांना तसे वाटेनासे झाले. आपल्या भाषेबाबतची संवेदनाच क्षीण झाली आणि ती पुढे नष्ट झाली.
या भाषाशुद्धीचळवळीचे प्रणेते त्या काळी नावामागे बॅ. हा बॅरिस्टर या इंग्रजी पदवीचा संक्षेप लावणारे आणि आता 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी लावले जाणारे वि. दा. सावरकर. या भाषाहोमात भस्म करायचा संकल्प होता तो मराठीत आलेल्या फारसी व इंग्रजी शब्दांचा. या संकल्पामागची चेतना राजकीय होती, तशीच ती धार्मिकही. पण राजकीयपेक्षा मुख्यत्वे धार्मिक. एक तर इंग्रजी शब्द लेखनात येत ते तुलनेने फारच थोडे. फारसी कुळीतलेच फार. आणि इंग्रजी शब्द जेमतेम शतकभरात आलेले तेवढेच. मात्र फारसी शब्द कित्येक शतके ठाण मांडून बसलेले. अगदी शिवशाहीपूर्वीपासून. आणि एवढे एकजीव झालेले की तीक्ष्ण नाकाचे व्युत्पत्तिशोधक सोडल्यास ते शब्द परके आहेत याचा वाचणार्यांना, लिहिणार्यांना, वापरणार्यांना संशयदेखील येऊ नये.
पण ही शुद्धीकरणाची चळवळ जोरात आल्यावर काही घ्राणेंद्रिये (म्हणजे देशी भाषेत नाके) अधिकच तिखट झाली. आणि हाय खाल्लेल्या म्लेंच्छ सैनिकांना जळीस्थळी संताजी व धनाजी दिसू लागले तशी या शुद्धीसैनिकांना म्लेंच्छ व यवनी शब्द दिसू लागले. या सर्वच सैनिकांना भाषाशास्त्राची तालीम (हा देखील एक म्लेंच्छ शब्दच) मिळालेली होती असे नाही. तिची भरपाई करायला भाषाभिमान समर्थ होता!
पुढे आपले एक मोठे कवी माधव जूलियन यामध्ये उतरले. फारसीचा
विटाळ झालेल्या अनेक कविता त्यांनी संस्कृतच्या फवार्यांनी सोवळ्या करून घेतल्या. याशिवाय भाषाशुद्धीकरणाचा प्रचारही केला. मात्र पुढे १९१७ मध्ये त्यांनी आपल्या एका पत्रात लिहिले "संस्कृत शब्दांची निष्कारण गर्दी निषेधार्ह आहे. या लोकांना संस्कृत भाषा अवगत असावी. पण स्वत:च्या मराठी भाषेशी नीट परिचय नसावा याची कीव येते! बोलीतील सुलभ शब्दांकडे आपले दुर्लक्ष होते." १९२१ साली त्यांनी "प्रत्येक मराठी शब्दाचे संस्कृतशी नाते जोडण्याचा मूर्खपणाचा प्रयत्न धिक्कारला."
अर्थात हे शुद्धीकरणाचे खूळही संपूर्णत: देशी नाही! साहेबाला त्याने आधी पछाडले होते. पहिल्या महायुद्धानंतर, इंग्रजीतील 'नेटिव' (ऍंग्लो सॅक्सन कुळातले) शब्द कटाक्षाने वापरून फ्रेंचद्वारा आलेल्या लॅटिन कुळीतल्या व तशा शब्दांना नाकारायचे अशी टूम निघाली होती.
भाषा साधी सोपी करावी हा त्यामागचा हेतू. आपले शुद्धीकरण मात्र त्याच्या अगदी उलट जाणारे.
भाषाशुद्धीचा हा आग्रह प्रामुख्याने हिंदीच्या प्रगतीलाही भोवला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय व्यवहाराला सोयीची
म्हणून वापरल्या जाणार्या इंग्रजीचा वरचष्मा उतरवण्यासाठी तिच्याजागी कोणती भाषा आणायची असा प्रश्न पडल्यावर संख्याबळाच्या आधारावर हिंदीची वर्णी लागली. पण कोणती हिंदी? गांधीजींचा कौल पडला साध्या सोप्या 'खडीबोली'च्या बाजूने
. मात्र पंडित मालवीयांसारख्या काही पुढार्यांच्या हिंदीच्या पुनरुज्जीवनवादी संस्कृतीकरणामुळे, तापलेल्या धर्मनिष्ठेमुळे. भावी सत्तेच्या गाजरामुळे, संस्कृतचे रंगरोगण केलेल्या हिंदीची घोडदौड सुरू झाली. सत्ता आल्यावर हिंदीच्या उद्धारासाठी पैशांची लयलूट झाली. इतर भाषांच्या वाट्याला कंजूष भिक्षा आली.
डॉ. कालेलकर यांच्या 'भाषा आणि संस्कृती' या विद्वत्ता, स्पष्टवक्तेपणा आणि विषयोचित विनोद यांच्या मेळाने फार वाचनीय झालेल्या पुस्तकातील काही वाक्ये इथे देतो. "इंग्रजीपेक्षाही कठीण अशी ही शुद्ध नवमराठी कित्येकदा इतकी दुर्बोध आहे की ती कळण्यासाठी ती ज्या मूळ इंग्रजीचे भाषांतर आहे तिकडे वळल्यावाचून गत्यंतर नसते... लोकांच्या माथी एक अगदी नवी, बोजड भाषा मारण्याचा जो प्रयत्न झाला तो फसला... 'सरकार' हा शब्दच पाहा. कोट्यवधी लोक अगदी सहजपणे हा शब्द वापरतात. मात्र त्याच्या जागी संस्कृतातून आलेला 'शासन' हा शब्द! मग त्याला साथीदार म्हणून 'शासकीय' 'प्रशासनिक' हे शब्द... 'सरकारी छापखाना' असे म्हणताच अंगावर सांडपाणी पडले असे वाटणार्या लोकांनी 'शासकीय मुद्रणालय' हा शूचिर्भूत पवित्र प्रयोग चालू केला आणि मराठीपासून सामान्य जनता कशी दुरावेल याची काळजी घेतली.
भाषेच्या बाबतीत शुद्धीकरण ही शास्त्रबाह्य कल्पना आहे. धर्माभिमान, खोटा स्वाभिमान, उच्चनीचतेच्या कल्पना... स्वत:ला श्रेष्ट न समजणार्या वर्गाची भावना अशा कारणांमुळे लोक शुद्धीकरणाकडे वळतात. "
याउलट गुजरातेतील बडोदे संस्थानात एके काळी मराठी व इंग्रजी या कारभाराच्या भाषा होत्या. त्याऐवजी लोकांची भाषा गुजराती ही कारभारासाठी वापरण्याचा गायकवाडांनी निर्णय घेतला. आणि त्यातील परभाषिक फारसीसारखे शब्द काढण्याचा अडाणी खटाटोप न करता कारभार व्यवस्थितपणे चालला.
पण सयाजीरावांच्या या विचारावर एका शुद्धीकारक मराठी पंडिताने आक्षेप घेतला म्हणे: "गुजराती ही क्षुद्र भाषा! मराठीत मुखकमल, चरणकमल असे म्हणतात. पण गुजरातीत तसे काही नाही!"
मराठी भाषा 'उच्च' करण्याची केविलवाणी धडपड ज्यांनी आरंभली त्यांनी तिला घसरणीला लावले. उदा हे काही शब्द पहा: रेडिओला सांवहिक. वनस्पतिशास्त्राला: औद्भिदशास्त्र. लंबगोलाला: विवृत्ताकृति. 'अवलंबनपर्णोद्गमसूत्र हा जबडातोड शब्द कशासाठी वापरला आहे कोण जाणे! एका विदुषीने Honeysuckle या शब्दाला मधुचोष्यक हा शब्द सुचवला
मराठी भाषेचे मूळः
राजाध्यक्षांच्या मतांनंतर 'मराठी भाषेचे मूळ' आणि 'अडगुलं मडगुलं' या थोर पुस्तकांचे लेखक, ज्येष्ठ भाषातज्ज्ञ विश्वनाथ खैरे यांचा मनोगतावर वाचलेला एक प्रतिसाद येथे देतो.
... मराठी व तमिळ या भाषांचा आणि संस्कृतींचा गाढ, प्राचीन संबंध दाखवणं हे या सर्व
लेखनाचं उद्दिष्ट आहे.प्रतीकार्थानं हा संबंध मराठीच्या बाळपणापासून सुरू होतो असं दाखवणारं गाणं म्हणजे बाळाला तीट लावण्याच्या वेळी मराठी आया शतकानुशतके म्हणत
आल्या आहेत ते:
अडगुलं मडगुलं/ सोन्याचं कडगुलं/रुप्याचा वाळा/ तान्ह्या बाळा/
तीट लावू//
तमिळमध्ये अटकु (अडगु) म्हणजे ठेवीची, विनिमयाची किंवा गहाणाची वस्तू. मडक्कू म्हणजे मातीची मोठी थाळी. मट्कलम् म्हणजे मडकं. मण् म्हणजे माती आणि कलम म्हणजे भांडं यावरून तो शब्द आला आहे. 'मडकं मोल म्हणून दिलं किंवा गहाण ठेवलं' असा पहिल्या ओळीचा अर्थ आहे. सोन्नम् म्हणजे सोनं आणि कडगम् म्हणजे कडं. ' मडकं देऊन सोन्याचं कडं घेतलं.' वाळम् म्हणजे गोल किंवा वर्तुळ. इरिप्पु म्हणजे रुपं, 'रुप्याचा वाळा घेतला.' हे दागिने तान्ह्या बाळाला घातले. 'ती' म्हणजे आग, जाळ. तीत्तल म्हणजे करपवणं, काजळणं. तीट्टुतल् म्हणजे अंगाला लावणं. तीत्तु म्हणजे दुष्टावा. 'दृष्ट' लागू नये म्हणून काजळीची तीट लावताना हे सगळे अर्थ एकत्र आले आहेत. तमिळ आणि मराठी समानार्थी शब्द किती सारखे आहेत पाहा.
खैरे विचारतात, "नवतरण्या महाराष्ट्री माउलीने तान्ह्या मराठी बाळाला जी शब्दाभूषणे घातली ती तमिळाईकडून तर घेतली नव्हती?" "होय" असं आत्मविश्वासपूर्ण उत्तर देण्यापर्यंत खैर्यांचा प्रवास नजीकच्या काळातच झाला. आणि केवळ शब्दभूषणं नव्हे तर सांकृतिक आभरणंही तामिळाईकडून मिळाली असे पुरावे ते सादर करीत राहिले.ओवी, अंगाई, पोवाडा हे सर्व तमिळमधून आले. ओवीचा चौथा चरण तुटका असतो एवढ्यावरून त्या अर्थाचे संस्कृत शब्द बनवायचे आणि त्याचा अपभ्रंश म्हणून ओवी शब्द सिद्ध झाला हे दाखवायचं असा
खटाटोप प्रस्थापित भाषाशास्त्राला धरून पूर्वीच करण्यात आला होता. प्रा. वेलणकरांनी ती संज्ञा अशी व्युत्पादिली आहे:
'अर्धचतुष्पदी-अठ्ठोठवइ-अड्ढुड्ढवयी-अड्ढूहवई-ढूहवई-हूहवई-होवई-ओवाई-ओवी. डॉ. कत्रे यांनी अपपादिका-अववाइआ-ओवैया-ओवी अशी परंपरा सांगितली."संस्कृतवरून व्युत्पत्ती काढायची म्हटल्यावर असा द्राविडी प्राणायाम करावाच लागतो" अशी यावर खैरे यांची टिप्पणी आहे. सरळ द्रविड भाषेकडे गेलं तर काय दिसतं? ओवीचा चौथा चरण तुटका ना? तमिळ ओऽवाय म्हणजे दात नसलेलं तोंड, तुटक्या काठाचं भांड. शिवाय 'ओवि' म्हणजे ध्वनी, आवाज. बाळ झोपताना ओऽ ओऽ करतं. त्याच तालावर आई त्याला ओऽ ओऽ करीत पटते. आवाहन करणारा हा आईचा मराठी ओऽ आहे. आजही मराठी गुराखी ओढाळ गुरू लांब गेलं तर ओऽ ओऽ करून त्याला ओवई किंवा ववई घालतो. (हे ग्रामीण बोलीचे महत्व. अशी अनेक उदाहरणे पुढे येतात.)छे, इश्श, अय्या हे उद्गार तमिळ.खंडोबा, त्याचा येळकोट, विठ्ठल, गोंधळ, तुळजाई, बोल्हाई, काळूबाई, फिरंगाई हे सर्व तमिळ.शेंडी पासून क्रमाने डोई, डोळा, पापणी, मिशी, ओठ, मोहरा, हात, पोट, स्त्रीयोनीचा मराठी शब्द, गुडघा, नडघी, घोटा, बोट हे सर्व तमिळ. 'तात्पर्य, शरीरवर्णनात आपण मराठी भाषिक नखशिखांत तमिळ आहोत.' शरीरवर्णनाचे शब्द हे भाषेतील प्राथमिक शब्द असतात हे या संदर्भात लक्षात ठेवणं योग्य होईल.चूलमूल, नातीगोती, भाजीपाला, स्वैपाकाचे पदार्थ, शेतीची अवजारे यांच्याशी संबंधित असलेले मराठीतील शब्दही तमिळ.
महाराष्ट्रातील स्थळनामांच्या अर्थाचा उलगडा तमिळवरून होतो हे द्रविड महाराष्ट्र या पुस्तकात दाखवले आहे. मुंबई, परळ, चेंबूर, वसई, वाशी, पुणे, वानवडी, येरवडा, थेऊर, जेजुरी, खंडाळा, जुन्नर, इत्यादी. मुठा, मुळा, उल्हास या नद्याही. उल्हास नदीच्या नावात उल्ह म्हणजे 'पल्ला मासा', जो केवळ याच नदीत सापडायचा. (आता प्रदूषणमुळं सापडत नाही.)मराठी वाचकांसमोर हे पुरावे मांडत असताना, दक्षिणी भाषाभ्यसकांपुढेही त्यांना भावतील असे तमिळ-मराठी संबंधांचे पुरावे इंग्रजी निबंधांतून खैरे सादर करीत आले आहेत. निर्णायक वाटावा असा पुरावा 'टोवर्डस इंडियन फोनॉलजी अँड लिंग्विस्टिक्स' या त्यांच्या निबंधात पहायला मिळतो. दक्षिणी भाषांच्या व्युत्पत्तिकोशाच्या दोघांपैकी एक संपादक एमेनो यांनी १९७० साली द्रविडियन कंपॅरेटिव्ह फोनॉलजी-ए स्केच या नावाच्या प्रबंधात सुमारे २७५ दक्षिणी शब्दावलीच्या वर्णांची तुलना केली आहे. त्यातल्या जवळ जवळ २६० गटांमधे मराठीतल्या एक ना एक शब्दाची ओळख पटते. त्यातल्या अनेकांच्या ज्या संस्कृत व्युत्पत्ती दिलेल्या आहेत त्या नमूद करून त्यांची कृत्रिमताही उघड केली आहे. अस्सल दक्षिणी म्हणवतात त्यांचे समशब्द मराठमोळे म्हणून वावरताहेत हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही.पण अगदी बिनतोड पुरावा हवा असेल तर तो पुढचा आहे. जे आपल्याला 'अस्सल मराठी' वाटतं त्याला आपण 'मराठमोळं' म्हणतो. अस्सल मराठी भाषेला आपण 'मराठमोळी' म्हणतो. तमिळ मर्रा (जो मराठीत मर्हा होतो) म्हणजे न झाकलेलं, उघडं किंवा स्पष्ट. 'मर्हाटाचि बोलु'! ज्ञानेश्वरीमधे बावीस वेळा हा शब्द आला आहे. आणि त्याचा हाच अर्थ असल्याचे खैर्यानी एका निबंधात दाखवून दिलं आहे. मोळि म्हणजे बोली, भाषा...
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


एक प्रश्न..
मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली.
आपल्याला गेल्या शतकाच्या असे म्हणायचे आहे का? (हे भाषाशुद्धीसाठी सुचवले नाही बरकां!
)
पुस्तकातील उतारा
मपलं न्हाई ह्ये. ( म्ह. इदं न मम.
)
पुस्तकप्रकाशन/लेखन १९९० व्या दशकात. त्यामुळे तुमची दुरुस्ती बरोबर.
(स्पष्टीकरणोत्सुक!) आजानुकर्ण
धन्यवाद
संदर्भाबद्दल धन्यवाद
बाकी "स्पष्टीकरणोत्सुक" साठी जरा सोपा शब्द सुचवा की!
आयला केव्हढा आवाका आहे
ह्या लेखाचा.
सही.
पण एक नाही समजलं.भौगोलिक सलगता पाहिल्यास, तामिळ प्रांत कुठे महाराष्ट्राला लागुन आहे?
मुख्यतः त्या काळात तरी, संस्कृती आणि भाषा ह्यांचं आदान-प्रदान व्हायचं ते सलग भु-भागातुन.
त्ये "कानडाउ विट्टलु..." वगैरे ऐकुन होतो. म्हणजे मराठी-कन्नड नातं वगैरे.पण थेट तमिळ म्हंजे कमाल आहे बुवा.
त्या काळात इतका संपर्क तरी कुठं होता एकमेकांशी?
बरं मग संस्कृत्-मराठी-हिंदी ह्यांची एक्मेकांच्या अत्यंत जवळ जाणारी
देवनागरी लिपी तरी कशी शिल्लक राहिली?
मराठी लिहिताना त्या तामिळ लिपीचा वापर का होत नाही?
(जर मराठी-तमिळ भाषा संबंध इतका दृढ असेल तर त्याच लिपीत मराठी लिहिणं जास्त
नैसर्गिक्/सोयीचं राहील. नाही का?)
(स्वगतः- तरिच म्हटलं, त्या चर्चेतुन हिरिरिनं बोलताना अचानक आ'कर्ण राव गायब कुठं झाले?
ह्यांनी तर सरळ नवा लेखच टाकला की राव)
आपलाच,
मनोबा
सुरेख माहिती!
ह्यातली जवळजवळ सगळीच मला नवीन होती.
मराठी आणि तमिळ ह्या इतक्या मिळून मिसळून असतील असे माहीत नव्हते.
धन्यवाद आ.कर्णा!
चतुरंग
आवाका...
आजानुकर्ण साहेब,
मनोबांनी म्हंटल्याप्रमाणे ह्या लेखाचा आवाका खरोखर खुप मोठा आहे.
त्यावर काहि लिहावे एवढी आमची पात्रताही नाही.तरीहि काही मुलभुत प्रश्न मनात आले,
त्याचे निराकरण आपण केल्यास उत्तम होइल.
खैरे ह्यांनी मराठी-तमिळ संबंधांचा बराच अभ्यास केलेला दिसतोय.परंतु त्यांनी मांडलेले विचार हे
एकांगी वाटतात.अहो गेल्या हजारो वर्षात तमिळ भाषेत काहीच फ़रक पडला नाही काय?
मराठी भाषेचेच पहा ना. ज्ञानेश्वरीच्या काळातील मराठी व आत्ताची मराठी ह्यात केवढा फ़रक जाणवतो.
खुद्द तमिळ भाषेत बरेच संस्क्रृत शब्द आढळ्तात.तमिळ भाषेचा मराठी भाषेवर जर एवढा प्रभाव पडला असेल,
तर तो संस्कृत भाषेवर कसा काय पडलेला दिसत नाही?किंवा तसे काही असेल तर तेही स्पष्ट केलेत तर बरे.
अहो तमिळच कशाला,
मराठी व बंगाली भाषेत सुध्दा तोंडात बोटे घालावीत (कोणीहि कोणाच्या) अशी साम्य स्थळे आहेत.
उदा.सकाळ,वाटी,भातवाढी,डाव,पाडा,..........
पण माझ्या माहीति प्रमाणे हेच शब्द इतर भाषांत जसेच्या तसे वापरले जात नाहीत.(काहि प्रमाणात ओडिया,व आसामी भाषेत)
किंबहुना,समस्त कोंकण पट्टय़ात बोलल्या जाणा-या भाषेत आणि मराठीत तसेच बंगालीत कमालीचे साम्य आढळते.
ते हि कसे काय?
असे बरेच प्रश्न आहेत.त्यामूळॆ काहि शब्दात साम्य आढळले म्हणुन तेच मराठी भाषेचे मुळ मानणे पटत नाही.
थोडे सविस्तर लिहिल्यास उत्तम.
अभिज्ञ
बहुधा
बहुधा संस्कृत भाषा ही इतकी यमनियमांनी बांधलेली आहे की तिला श्वास घेण्यापुरतीही जागा मिळाली नाही आणि शुद्धाशुद्धतेच्या कल्पनांपायी ती गुदमरून मृतप्राय झाली असे काही लोक म्हणतात ते खरे असावे! याउलट ज्या भाषांनी काळाप्रमाणे स्वतःचे रूप बदलले त्याच टिकून राहिल्या.
आपला,
(पिंडावरचा कावळा) आजानुकर्ण
सहमत..
याउलट ज्या भाषांनी काळाप्रमाणे स्वतःचे रूप बदलले त्याच टिकून राहिल्या.
सहमत आहे...
तात्या.
उडवले जाईल..!
क्रुपया हे वाचावे!
हे लेखन इथून उडवले जाण्याची शक्यता आहे, हे जाणूनच पुढील प्रतिसाद द्यावेत!
भाषा, भाषा शुद्धी, व्याकरण, शुद्धलेखन, संस्कृत भाषेची सो कॉल्ड महती या विषयावर चर्चा करावयास माझे मित्र शशांक जोशी यांचे उपक्रम हे संस्थळ फार छान आहे!
मिसळपाववर वरील विषय सहसा एन्करेज केले जात नाहीत याची नोंद घ्यावी..!
तात्या.
आदरणीय तात्यासाहेब
हाती घ्याल ते तडीस न्या असे आमचे गुरूदेव म्हणतात. एवढ्या लेखापुरतं माफ करा. पुढे व्याकरणविषयक चर्चा तिकडे होईल याची काळजी घेऊ.
आपला,
(अवलंबनपर्णोद्गमसूत्रोत्सुक!) आजानुकर्ण
ठीक..
एवढ्या लेखापुरतं माफ करा. पुढे व्याकरणविषयक चर्चा तिकडे होईल याची काळजी घेऊ.
ठीक आहे! मिपावरील एक्स पंचायत समिती सदस्य हा आपला रुतबा ध्यानात घेऊन आम्ही तूर्तास काहीच बोलत नाही. चालू द्यात चर्चा..!
परंतु या पुढे कृपया कुणीही भाषा, भाषेचा विकास, भाषेचं यांव, भाषेचं त्यांव, शुद्धलेखन, व्याकरण या विषयांवरील चर्चा मिपावर करून मिपाचं वातावरण घाण करू नये अशी सर्वांना हात जोडून, नम्र व कळकळीची विनंती!
मिपा जसं आहे तसंच राहू द्या! त्याला विद्वान संकेतस्थळांच्या रांगेत नेऊन बसवायचा प्रयत्न करू नका एवढीच विनंती!
तात्या.
अवांतर
वरील उतार्याच्या संदर्भात एक लेख जालावर सापडला आहे. जो खैरे साहेबांच्या दाव्याच्या विरोधी आहे.
http://groups.google.com/group/alt.language.hindi/browse_thread/thread/c...
कदाचित वरील तामिळ शब्द महाराष्ट्री प्राकृतामधून दक्षिणेत गेले असण्याचा संभव आहे. कारण महाराष्ट्री पा़कृताबद्द्ल ख्रिस्तपूर्व ५व्या शतकापासून उल्लेख आढळतात. अधिक माहीती इथे वाचता येईल
http://en.wikipedia.org/wiki/Maharashtri
पुण्याचे पेशवे
पेशवेसाहेब
पुणेकर पेशवेसाहेब,
खैरे साहेबांनी मराठी ही फक्त तमिळकडून आली असा कुठेही दावा केलेला नाही. मात्र शुद्धिकरणचळवळे लोक मराठीचा संबंध फक्त संस्कॄताशी जोडू इच्छितात आणि इतर भाषा अस्पृश्य असल्याप्रमाणे त्यांचा विटाळ मानला जातो. खैरे साहेबांच्या लेखात शास्त्रीय प्रयोग केल्यानंतर मराठी व तमिळचा संबंध कसा आहे हे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच संस्कृतानेही मराठीला शब्द दिले आहेत हे मान्य केले आहे. मात्र मराठीचा संबंध फक्त संस्कृताशीच आहे अशीएकांगी भूमिका मांडणार्यांनी पुन्हा (शक्य असल्यास) विचार करावा यासाठीच तो प्रतिसाद. मराठी ही फक्त तमिळ किंवा फॉर दॅट मॅटर संस्कृताशीच संबंधित आहे व इतर (फारसी, अरबी, इंग्रजी, कन्नड) भाषांचा तिला विटाळ होतो असे मानू नये!
अवांतरः जय महाराज या लेखकाचा 'आवाका' गुगल ग्रुप्सवर वावरणार्या अनेकांना माहिती आहे. केवळ भावनिक उद्दीपन करून इतरांच्या नावाखाली भूमिका मांडणे असा त्यांचा खाक्या केवळ ह्याच समुदायावर नसून. या व अशा इतर समुदायांवरही लोकप्रिय आहे.
सरस्वती नदीबाबतचा पुरावा आणि भाषा यांचा संबंध सुब्रम्हण्यम यांनी तिथे स्पष्ट केलेला नाही. त्याविषयावर अधिक माहिती वाचायला आवडेल. मात्र त्यांनी दिलेले रामायणाचे पुरावे हास्यास्पद आहेत. हे लेखही वाचा यापेक्षा अधिक काय सांगू शकतो?
दुवा १
दुवा २
दुवा ३
आपला,
(गारदी) आजानुकर्ण
पुरावे
सरस्वती नदीबाबतचा पुरावा आणि भाषा यांचा संबंध सुब्रम्हण्यम यांनी तिथे स्पष्ट केलेला नाही. त्याविषयावर अधिक माहिती वाचायला आवडेल.
http://www.gisdevelopment.net/application/archaeology/site/archs0001.htm
http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/2073159.stm
आणि हा विकीचा
http://en.wikipedia.org/wiki/Sarasvati_River
माफ करा
सरस्वती नदीचा पुरावा नको. ही नदी आणि भाषा यांचा संबंध जो सुब्रम्हण्यम यांना अपेक्षित आहे त्याबाबतचा पुरावा.
एकतर्फी
हा लेख बराचसा एकतर्फी वाटला. संस्कृतावरं टिका करायची म्हणुन कहिहि...
तसेच संस्कृतानेही मराठीला शब्द दिले आहेत हे मान्य केले आहे.... (माझ्या माहितिप्रमाणे बरेच. किंबहुना इतर तुम्ही उल्लेख केलेल्या भाषांपेक्षा कितितरी पटींनी जास्त.)
असो अधिक माहितिसाठी कदचीत हा दुवा उपयोगी पडेल
http://en.wikipedia.org/wiki/Languages_of_India#Classical_languages_of_I...
अजुन एक प्रश्न म.टा.मध्ये दिलेले जे शब्द आहेत त्यापैकी बहुतेक बरेच शब्द नेहमीच वापरले जातात. जर एकदा नीट पहावे
http://www.misalpav.com/node/1897
चुकभुल द्यावी घ्यावी (हे कुठल्या भाषेतुन आले बां? कायं करायचयं
सुसंस्कृत चेतन
द्या की
तुम्हाला खैरे यांच्या तुलनेत बरीच माहिती दिसते (किती तरी पटींनी जास्त) .
तेव्हा संस्कृताने मराठीला किती शब्द दिले आहेत हे सांगू शकाल का? व इतर भाषांपेक्षा नक्की किती पटीने जास्त ते देखील सांगा.
एक हिंट देतो. तेलुगू-कन्नडमधून ज्ञानेश्वरांनी हजारो शब्द घेतले. (संस्कृतामधून घेण्याऐवजी) ते किती ते मोजता येतीलच. असे का बॉ?
आपला,
(तौलनिक) आजानुकर्ण
एक हिंट
एक हिंट देतो. तेलुगू-कन्नडमधून ज्ञानेश्वरांनी हजारो शब्द घेतले. (संस्कृतामधून घेण्याऐवजी) ते किती ते मोजता येतीलच. असे का बॉ?
तेलुगू-कन्नड या भाषांबद्दल आपण थोडं आधिक वाचावं आणी मगचं हे विचारावं
http://en.wikipedia.org/wiki/Telugu_language
माझ्यामते तुम्हाला ह्या दुव्याची देखिल गरज आहे
http://en.wikipedia.org/wiki/Sanskrit
अवांतरः
तेव्हा संस्कृताने मराठीला किती शब्द दिले आहेत हे सांगू शकाल का? व इतर भाषांपेक्षा नक्की किती पटीने जास्त ते देखील सांगा.
१५३४३६७ संस्कृत
५३४९ तमिळ
२३८९ कन्नड
१२३४ तेलगु
हा अकबरासारखा प्रश्न झाला राजधानीत कावळे किती? ह. घ्या.
स्वगतः भाषा हा शब्द कोठुन आला बरं?
व्वा !!
व्वा काय पुरावा आहे !!
जरा हा
जरा हा दुवा पहावा
http://en.wikipedia.org/wiki/Marathi_language#cite_note-bhasha-9
येथे एक वाक्य आहे
Marathi has taken words from and given words to Sanskrit, Kannada, Hindi, Urdu, Arabic, Persian, and Portuguese. At least 50% of the words in Marathi are either taken or derived from Sansrit.
हे आणखिन काही
Literature in all Dravidian languages owes a great deal to Sanskrit, the magic wand whose touch raised each of the languages from a level of patois to that of a literary idiom". (Sastri 1955, p309)
सर्वज्ञानी गूगल आणी en.wikipedia.org च्या सहाय्याने अज्ञानी चेतनमार्फत ज्ञानीलोकांकरिता
अवांतरः ज्ञानेश्वर, अम्रुतानुभव हे शब्द कोठुन आले बरं?
अतिअवांतरः महाराष्ट्र हा शब्द कोठुन आला बरं...?
मी मराठीचं पण संस्कृत थोडफार कळणारा चेतन
हे देखील वाचा
संस्कृतचे योगदान कोणीही नाकारलेले नाही! मात्र फक्त संस्कृत हा अडाणीपणा बाजूला ठेवावा इतकेच म्हणणे आहे. भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठीला संस्कृतची झेरॉक्स कॉपी करायची असेल तर करा. मग मराठीही संस्कृताप्रमाणेच चोपड्यांमध्ये बंद राहील.
सुदैवाने आमच्यासारखी सामान्य जनता अशा प्रयत्नांची खिल्ली उडवेल यात शंका नाही.
सोबत हे देखील वाचा.
आपला,
(स्पष्टवक्ता) आजानुकर्ण
मात्र फक्त
मात्र फक्त संस्कृत हा अडाणीपणा बाजूला ठेवावा इतकेच म्हणणे आहे
सहमत
मात्र या गोंडस नावाखाली कोणी संस्कृतला खाली दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला मात्र नक्की विरोध आहे.
भाषाशुद्धीकरण आणि जडजंबाल लेखन : मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांचे निवडक उतारे या लेखात मलातरी हा प्रकार थोडासा जाणवला.
आपण दिलेला दुवा वाचनिय आहे पण इथे तुलना कोठेहि नाहि आणी ती होउ नये असे मला वाटते
संस्कृतचे योगदान कोणीही नाकारलेले नाही हे म्हणुनसुद्धा लेखात तरी सुर नाकरण्याचाच दिसतोयं
असो तुम्हि हे नाकारत नाही ह्यातच समाधान.
मी तरी मराठीप्रमाणे संस्कृतलाही आपलीच मानतो त्यामुळे कदाचित माझा सुर कडवटही असेल.
कडवट चेतन
सहमत आहे
चेतनरावांनी आकडेवारी देऊन संस्कृतातुन किती शब्द आले आणि इतर भाषांमधून किती ह्याची तौलनिक माहिती देऊन अजानुकर्ण ह्यांच्या मुद्द्याचे खंडन केले आहे. श्री.अजानुकर्ण ह्यांनी त्याची कसलीही नोंद न घेता संस्कृत विरोधाचा सुर लावला आहे तो एकांगी वाटतो.
ह्या चेतनरावांच्या भुमिकेशी आम्ही देखिल सहमत आहोत. आंधळी भक्ती आणि विरोधासाठी विरोध हे दोन्हीही अयोग्य!
+१
कोलबेर ने योग्य आणि थोडक्यात मांडले असल्याने "+१" व्यतिरीक्त अजून काही नाही!
माफी असावी
कोलबेरशेठ आणि तुम्ही दोघांनीही मी दिलेला दुवा न वाचताच ही प्रतिक्रिया दिली आहे हे खेदाने म्हणावे लागत आहे.
आपला,
(सखेद) आजानुकर्ण
काय कोलबेर शेठ
अहो संस्कृतविरोधाचा आणि एकांगी सूर कोणी लावला आहे येथे? चेतनरावांनी दिलेल्या आकडेवारीतील ह.घ्या. हे वाचले का?
समजा चेतनरावांनी गंभीरपणे ती आकडेवारी दिली आहे असे मानू. मग मी दिलेल्या दुव्यावर दाते कर्वे यांच्या कोशानुसार मराठीतील एकूण शब्द 1,12,189 आहेत हे स्पष्ट लिहिले आहे. मग चेतनरावांनी दीड लाखाहून जास्त शब्द संस्कृतातून आलेत याचा पुरावा देणे आवश्यक नाही का?
मी विरोधासाठी विरोध करत असल्याचा एकही पुरावा द्यावा मी सपशेल माफी मागण्यास तयार आहे!
आपला,
(सहसदस्य) आजानुकर्ण
अवांतरः श्री. जनरलपंत डायर यांच्या वटहुकूमाची अंमलबजावणी करण्यास आम्ही बांधील आहोत. मात्र आमचे मित्र कोलबेर शेठ यांच्या प्रतिसादात 'आजानुकर्ण' या आमच्या नावाचा वैयक्तिक उल्लेख झाल्याने प्रतिसाद देत आहोत याची जनरलपंतांनी नोंद घ्यावी ही विनंती.
आपला,
(स्पष्ट) आजानुकर्ण
थांबवावा..
आता सर्वांनी हा विषय इथेच थांबवावा! काही चर्चा करायची असेल तर ती खरडवहीतून किंवा व्य नि तून करावी. अन्यथा हा संपूर्ण थ्रेडच अप्रकाशित करण्यात येईल..
तात्या.
सुरेख लेख
मराठी भाषाशुद्धीची चळवळ, भाषाशुद्धीचा आग्रह, आणि मराठी तामिळीचे भाषिक नातेसंबध एका माहितीपूर्ण लेखनात वाचायला मिळाले, आणि ते आवडले.
अवांतर : मिसळपाव मराठी संकेतस्थळावर सर्व लेखन संवाद हे मराठी भाषेतून होत असतांना भाषिक लेखांना संस्थळाच्या मालकाचा विरोध होतो, ही गोष्ट मराठी भाषाप्रेमी म्हणुन दुखः देणारी वाटते.
भ्रम..!
मराठी भाषाशुद्धीची चळवळ, भाषाशुद्धीचा आग्रह,
हा हा हा! हे शब्द वाचूनच करमणूक झाली!
नथ नाकानं साजिरवानी,
गला भरून सोन्याचे मनी
कोलीवार्याची मी गं रानी
रात पुनवेला नाचून करतंय मौजा!
काय हो बिरुटेशेठ, तुमच्या भाषाशुद्धीच्या चळवळीत, आग्रहात वरील ओळी बसतात का? की त्याही अशुद्ध?
काय रे बाला, हिर्याच्या कुडाचे तुज्या कुल्ल्यावर पोकल बांबूचे फटके मारू का दोन? रांडच्या, हिकू का तुला?!
काय हो बिरुटेशेठ, तुमच्या भाषाशुद्धीच्या चळवळीत, आग्रहात वरील ओळी बसतात का? की त्याही अशुद्ध?
मराठी भाषा ही अठरापगड जातीजमातीत बोलली जात असताना आपण चार सोकॉल्ड पांढरपेशी व स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारी लोकं भाषाशुद्धीच्या चळवळीच्या अन् आग्रहाच्या कुठल्या अंधःकारात वावरतोय, कुठल्या भ्रमात वावरतोय देव जाणे!
आपला,
(आग्र्या-कोळ्यात लहानाचा मोठा झालेला)
दर्याचा राजा -तात्या.
तात्या
तात्या शाळेत असताना तुमचा व्याकरणाचा मास्तर लैच मारकुटा होता का हो? नाही.. भाषाशास्त्र ह्याविषयी कुणीही काहीही बोलले की त्यामधुन 'शुदद्धलेखनाची सक्ती लादली जाते आहे' ह्या एकमेव निष्कर्षावर तुम्ही कायम येताना पाहुन मनात आलेली ही शंका वाढत जाते.
:)
हम्म!
कोलबेरा, प्रत्यक्षात भेटू तेव्हा या विषयावर तुझ्याशी बोलीन सवडीने! अगदी नक्की...!
तूर्तास,
गोमू संगतीनं माज्या तू येशील काय
आरं संगतीनं तुज्या मी येनार नाय
ह्या ओळी भाषेच्या आणि भाषाशास्त्राच्या दृष्टीनं चूक की अचूक, ह्या विचारात मी अडकलो आहे आणि बाप खपल्यासारखा चेहेरा करून त्यावर गहन विचार करतो आहे! तेव्हा, प्लीज डोन्ट डिष्टर्ब मी!
तात्या.
आम्ही सोकॊल्ड :)
आपण चार सोकॉल्ड पांढरपेशी व स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारी लोकं भाषाशुद्धीच्या चळवळीच्या अन् आग्रहाच्या कुठल्या अंधःकारात वावरतोय, कुठल्या भ्रमात वावरतोय देव जाणे
सोकॊल्ड, भाषा शुद्धीचे आग्रही, शुद्धलेखनाचे पुरस्कर्ते, बोजड भाषेचे महागुरु, संस्कृतप्रेमी, फुगीर सुशिक्षित, म्हणजे आम्ही की काय ? च्यायला आमची प्रतिमा इतकी कशी उंचावली !!!
आपल्याप्रमाणेच, अठरापगड जातीजमातीची बोलल्या जाणारी बोली ही आमची जीव का प्राण आहे, आम्ही त्यावर नुसते प्रेम करत नाही तर, रहाटगाड्यात ती भाषा लिहितो, बोलतो आणि जगतोही !!!
-दिलीप बिरुटे
(बोली भाषा लेखनात वापरणारा )
द्रावीडी प्राणायामाचा हट्ट
संस्कृत सारखी शब्द बंबाळ भाषा सामान्य लोकाना समजत नव्हती म्हणुन ज्ञानेश्वरानी भगवद्गीता जनसामान्यांच्या बोली भाषेत आणली
त्या बोली भाषेला आपण पुन्हा शब्दबंबाळ करण्यासाठी संस्कृतचा आधार घेत आहोत.
यातच काय ते समजावे. सामान्यांच्या या भाषेला पुन्हा एकदा उच्चेतरांची भाषा बनवण्याचा घाट कशासाठी घालत आहोत? हा पुन्हा द्रावीडी प्राणायामाचा हट्ट कशासाठी.
हेच
हेच तर सांगायचा प्रयत्न करून रायलो ना भौ आम्ही
आपला,
(सहमत) आजानुकर्ण
हट्टी
संस्कृत सारखी शब्द बंबाळ भाषा सामान्य लोकाना समजत नव्हती म्हणुन ज्ञानेश्वरानी भगवद्गीता जनसामान्यांच्या बोली भाषेत आणली त्या बोली भाषेला आपण पुन्हा शब्दबंबाळ करण्यासाठी संस्कृतचा आधार घेत आहोत.
आता ज्ञानेश्वरीतली बोली भाषा ही कळत नाही म्हणुन आपण त्याचाही अनुवाद करुन वर बोलीला शब्दबंबाळ म्हणणार का? (आपल्याच शब्दात उच्चेतरांची भाषा वगैरे वगैरे ठरवणार का?)
संस्कृतला खाली दाखवण्याचा हा अट्टाहास कशापायी?
कडवट चेतन
अवांतरः अनेक उत्तम साहित्याचे मराठित अनुवाद झाले आहेत म्हणुन मुळ भाषेला नावे ठेवावी का?
संथ विजुभाउंच्या प्रवचनांनी शब्दबंबाळ सामान्य चेतन (ह. घ्या.)
मृत भाषेच्या कुबड्या किती काळ वापरणार
चेतन भौ म्या संथ न्हाय पन ज्ञानेश्वरी लिव्हुन बी काही शतके उलटली.
ती बोली बी आता मागं र्हायली.
म्या कुटं संस्क्रुतला खाली दाकावतोय. ती तशीबी आम्च्या डुईवरुनच जातीय.
फकस्त मृत भाषेच्या कुबड्या किती काळ वापरणार आपण.
जिवंत भाषा जिवंत नदी सारखी असते. ती वाहती रहायला तिला छोट्या नद्या/ ओढे/ प्रसंगी नालेही मिळतात.
कल्पना करा उद्या गंगा किंवा कृष्ण नदीच्या सर्व उपनद्या शुद्धीच्या नावाखाली अडवल्या तर त्यांचे स्वरूप कसे असेल.
उगमाजवळ असेल तेवढेच राहील.
उरल समुद्राबाबतीत असे झाले आणि आता उरल समुद्र आटुन त्याचे आस्तित्व एक मोठे डबके म्हणुन राहीले आहे
सन्स्कृत राहुदे बाजुला
सन्स्कृत राहुदे बाजुला, ज्ञानेश्वरी तरी नीट समजते का आपल्याला? (आणि मुळात कितीक जण वाचतात्/वाचणारेत?)
)

इकडे पुढच्या पिढ्या इन्ग्रजी माध्यमातून शिकवुन "देशी इन्ग्रज" तयार करण्याचे कारखाने सुरू असताना स्वातन्त्रवीरान्नी भाषा शुद्धीबाबत जे केल ते योग्य की अयोग्य हा वाद आता हवाचे कशाला?
कोण बोलणार लिहिणार वाचणार तुमची ती दरिद्री दळभद्री मराठी जिच्यात म्हणे ज्ञानाचे काहीही कण नाहीत म्हणुन तर इन्ग्रजी माध्यमातून लहानग्यान्ना शिक्षाण देतात ना हल्ली?
अन जन्तेच्या पुढल्या पिढ्या जर मराठी शिकणारच नसतील तर हवित कशाला म्हणतो मी ही थेर?
त्यापेक्षा एमटीव्ही बघा, ऐश करा!
(जे खानदानी(?), उच्चवर्णीय(?), मराठीप्रेमी असतील ते टिकवतीलच मराठी, ती ही शुद्ध स्वरुपात! नाहीतर शेवटी "पुणे" आहेच!
आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर)
अट्टाहास, आग्रह आणि संस्कृतप्रेम
अजानुचा लेख चांगला आहे, बरीच नवी माहिती मिळाली. मराठी भाषा ही जशी फक्त संस्कृतापासून बनली नाही तशी ती फक्त तमिळपासूनही बनलेली नाही. (तसे अजानुने लिहिल्याचा दावाही नाही) संस्कृती आणि भाषा यांच्यात कालानुसार होत जाणारी सरमिसळ जुनी आहे. उद्वेग तेव्हा येतो जेव्हा संस्कृत आम्हाला आवडते (हे म्हणणार्या लोकांना संस्कृतात चार वाक्ये लिहिता येतात का देवजाणे! उगीच इथून तिथून पाठ केलेले श्लोक देणे म्हणजे आपल्याला संस्कृत येते अशी काहीजणांची समजूत असावी) म्हणून आम्ही संस्कृतातले शब्द प्रतिशब्द म्हणून घेणार हा पोरकटपणा वाटतो.
संस्कृतातून येणारे शब्द हे सुटसुटीत असतील, योग्य अर्थ देत असतील आणि इतरांना समजायला सोपे होत असतील तर लोक त्यांना उचलून धरतीलच नाहीतर असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात.
संस्कृतात सर्व काही आहे हा आणखी एक पोरकट ग्रह लोकांनी काहीही माहित नसताना करून ठेवलेला असतो. जी भाषा एका विशिष्ट गटाच्या बाहेर पडलीच नाही, जिच्यात काळानुसार फारसा (पाणिनीनंतर संस्कृतावर सोपस्कार करणार्या लोकांची यादी वाचायला आवडेल) बदल झाला नाही तिच्यात आधुनिक शास्त्रात लागणारे सर्व शब्द आहेत आणि म्हणून इतर भाषांतून येणारे शब्द गाळून बोजड शब्द निर्मिती करावी हा आणखी एक ग्रह.
असाच एक ग्रह की संस्कृतात सर्व उच्चार आहेत. संस्कृत बोलल्याने वाणी शुद्ध होते. यावर अनेक स्थळांवर झालेल्या चर्चांमध्ये हा दावा किती फोल आहे यावर चर्चा झाली आहेच. मराठी लोकांचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे कसे मजेशीर असते यावर अनेक चित्रपटांत प्रसंग दाखवले आहेत तरी आमची वाणी संस्कृतामुळे शुद्ध असा आणखी एक हास्यास्पद दावा.
मराठीत संस्कृतातील बरेचसे शब्द रूळल्याने बरेचदा अभियांत्रिकी (अभिवादन, अभिमान, अभिनंदन हे शब्द मराठीत आधीच आहेत) आणि यंत्र हा शब्दही मराठीत रूळलेला आहे तेव्हा अभियांत्रिकी हा शब्द मराठी प्रतिशब्द नसून संस्कृत प्रतिशब्द ठरतो आणि "म्हणजे काय आहेत का तुमच्याकडे पर्याय संस्कृताशिवाय?" असे पोरकट प्रश्न विचारले जातात.
बरं, हे संस्कृतचा आग्रह धरणारे कोण तर पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक, त्यांना इतर भाषांची ऍलर्जी का तेच कळत नाही. गेल्या एका प्रतिसादात मग सुचवा पाली आणि फार्सी शब्द असा प्रश्न विचारण्यात आला पण या भाषा तरी प्रचलीत आहेत का आणि नसल्यास जी भाषा प्रचलीत आहे तिची आठवण का नाही आली? कारण ते उत्तर पोरासोराला आले असते की अभियांत्रिकी= इंजिनिअरींग पण भाषा पोरासोरांना येऊ नये हीच या मंडळींची इच्छा असते का काय कोणास ठाऊक. हजर, हरकत, परागंदा, बुजुर्ग, बाबा, बायको, खुर्ची, पेन, पेन्सिल, दप्तर हे आणि असे अनेक शब्द सोडून का द्यावेत तर कोणीतरी उठून भाषाशुद्धीचं खूळ निर्माण करतो. रूळलेल्या शब्दांची भाषाशुद्धी आणि भाषेत येणार्या नव्या शब्दाला प्रतिशब्द शोधणे यातला फरक काही श्रेष्ठींना जाणवला नाही याचे सखेद आश्चर्य वाटते.
असो.
सहमत..!
असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात.
हा हा हा!
तिच्यात आधुनिक शास्त्रात लागणारे सर्व शब्द आहेत आणि म्हणून इतर भाषांतून येणारे शब्द गाळून बोजड शब्द निर्मिती करावी हा आणखी एक ग्रह.
बरं, हे संस्कृतचा आग्रह धरणारे कोण तर पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक, त्यांना इतर भाषांची ऍलर्जी का तेच कळत नाही.
अगदी १०० टक्के सहमत आहे.. !
आपला,
(प्रियालीचा मित्र) तात्या.
संस्कृतचा
संस्कृतचा आग्रह धरणारे जे कोण पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक आहेत त्यापैकी कुणीही हजर, हरकत, परागंदा, बुजुर्ग, बाबा, बायको, खुर्ची, पेन, पेन्सिल, दप्तर हे आणि असे अनेक शब्द सोडून द्या आणि संस्कृतोत्भवच शब्द घ्या असा आग्रह धरल्याचे मिसळपाववरील तिनही चर्चेत दिसला नाही. (असल्यास ते मुर्ख आहेत असे माझे वैयक्तीक मत आहे.). जर दुसर्याकुठल्या संस्थळावर असा अग्रह त्यानी धरला असेल तर ती धुणी मिसळपाववर का धुतली जात आहेत?
संस्कृतातून येणारे शब्द हे सुटसुटीत असतील, योग्य अर्थ देत असतील आणि इतरांना समजायला सोपे होत असतील तर लोक त्यांना उचलून धरतीलच नाहीतर असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात. हे कस बरोब्बर बोललात प्रियालीताई.... अहो एकदा भाषा वाहत्या नदीसारखी म्हटली की जड धोंडे अपोआपच तळाला जाणार. चांगले आसेल ते तुकारामाच्या गाथेप्रमाणे आपोआप वरती येइल त्यासाठी मुद्दामहून कष्ट घ्यायची सुध्धा गरज पडणार नाही. त्यामुळे ज्याना कोणाला असले जड शब्द वापरायचेत त्याना वापरुदे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे बाकीचे पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतील.
अवांतर :
मराठी लोकांचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे कसे मजेशीर असते यावर अनेक चित्रपटांत प्रसंग दाखवले आहेत तरी आमची वाणी संस्कृतामुळे शुद्ध असा आणखी एक हास्यास्पद दावा. कुठल्या चित्रपटात त्या मराठी माणसाची वाणी संस्कृतमुळे शुध्ध होती तरी त्याचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे मजेशीर होते असे दाखवले आहे. असली उदाहरणे देउन संस्कृतमुळे मराठी लोकांचे हिंदी-इंग्रजी बोलणे मजेशीर होते असे म्हणायचे आहे का तुम्हाला? यातून फारसी-अरबी नकोच असे म्हणणार्यांप्रमाणे तुमचाही सुर आता संस्कृत नकोच असा होउ लागलाय असे दिसते.
कोणाला मूर्ख म्हणताय?
दिनांक (तारीख)
मूल्य (किंमत)
उपस्थित (हजर)
वेतन (पगार)
निर्बंध (कायदा)
झरणी(फाउंटनपेन)
मी केवळ काही वेगळी उदाहरणे दिली, मूळ उदाहरणे मटात आणि मिपावर आली आहेतच. माझ्या उदाहरणात वरील उदाहरणेही टाका कारण मी दिलेली उदाहरणे आणि वरील उदाहरणे ही मराठीतील प्रचलीत शब्द आहेत. तेव्हा ज्यांना मूर्ख म्हणालात
त्यांचे प्रेमी धावत येतीलच असे मानू.
(खरे म्हणजे नाही येणार कारण त्यांना आपला फो