Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आजानुकर्ण on Wed, 05/28/2008 - 22:18
  • Log in or register to post comments
  • 35741 views

प्रतिक्रिया

Submitted by विकास on Wed, 05/28/2008 - 22:28

Permalink

एक प्रश्न..

मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली. आपल्याला गेल्या शतकाच्या असे म्हणायचे आहे का? (हे भाषाशुद्धीसाठी सुचवले नाही बरकां! :-) )
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Wed, 05/28/2008 - 22:30

In reply to एक प्रश्न.. by विकास

Permalink

पुस्तकातील उतारा

मपलं न्हाई ह्ये. ( म्ह. इदं न मम. ;) ) पुस्तकप्रकाशन/लेखन १९९० व्या दशकात. त्यामुळे तुमची दुरुस्ती बरोबर. (स्पष्टीकरणोत्सुक!) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 05/28/2008 - 22:57

In reply to पुस्तकातील उतारा by आजानुकर्ण

Permalink

धन्यवाद

संदर्भाबद्दल धन्यवाद बाकी "स्पष्टीकरणोत्सुक" साठी जरा सोपा शब्द सुचवा की!
  • Log in or register to post comments

Submitted by मन on Wed, 05/28/2008 - 22:38

Permalink

आयला केव्हढा आवाका आहे

ह्या लेखाचा. सही. पण एक नाही समजलं.भौगोलिक सलगता पाहिल्यास, तामिळ प्रांत कुठे महाराष्ट्राला लागुन आहे? मुख्यतः त्या काळात तरी, संस्कृती आणि भाषा ह्यांचं आदान-प्रदान व्हायचं ते सलग भु-भागातुन. त्ये "कानडाउ विट्टलु..." वगैरे ऐकुन होतो. म्हणजे मराठी-कन्नड नातं वगैरे.पण थेट तमिळ म्हंजे कमाल आहे बुवा. त्या काळात इतका संपर्क तरी कुठं होता एकमेकांशी? बरं मग संस्कृत्-मराठी-हिंदी ह्यांची एक्मेकांच्या अत्यंत जवळ जाणारी देवनागरी लिपी तरी कशी शिल्लक राहिली? मराठी लिहिताना त्या तामिळ लिपीचा वापर का होत नाही? (जर मराठी-तमिळ भाषा संबंध इतका दृढ असेल तर त्याच लिपीत मराठी लिहिणं जास्त नैसर्गिक्/सोयीचं राहील. नाही का?) (स्वगतः- तरिच म्हटलं, त्या चर्चेतुन हिरिरिनं बोलताना अचानक आ'कर्ण राव गायब कुठं झाले? ह्यांनी तर सरळ नवा लेखच टाकला की राव) आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 05/28/2008 - 23:27

Permalink

सुरेख माहिती!

ह्यातली जवळजवळ सगळीच मला नवीन होती. मराठी आणि तमिळ ह्या इतक्या मिळून मिसळून असतील असे माहीत नव्हते. ;) धन्यवाद आ.कर्णा! चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on Wed, 05/28/2008 - 23:51

Permalink

आवाका...

आजानुकर्ण साहेब, मनोबांनी म्हंटल्याप्रमाणे ह्या लेखाचा आवाका खरोखर खुप मोठा आहे. त्यावर काहि लिहावे एवढी आमची पात्रताही नाही.तरीहि काही मुलभुत प्रश्न मनात आले, त्याचे निराकरण आपण केल्यास उत्तम होइल. खैरे ह्यांनी मराठी-तमिळ संबंधांचा बराच अभ्यास केलेला दिसतोय.परंतु त्यांनी मांडलेले विचार हे एकांगी वाटतात.अहो गेल्या हजारो वर्षात तमिळ भाषेत काहीच फ़रक पडला नाही काय? मराठी भाषेचेच पहा ना. ज्ञानेश्वरीच्या काळातील मराठी व आत्ताची मराठी ह्यात केवढा फ़रक जाणवतो. खुद्द तमिळ भाषेत बरेच संस्क्रृत शब्द आढळ्तात.तमिळ भाषेचा मराठी भाषेवर जर एवढा प्रभाव पडला असेल, तर तो संस्कृत भाषेवर कसा काय पडलेला दिसत नाही?किंवा तसे काही असेल तर तेही स्पष्ट केलेत तर बरे. अहो तमिळच कशाला, मराठी व बंगाली भाषेत सुध्दा तोंडात बोटे घालावीत (कोणीहि कोणाच्या) अशी साम्य स्थळे आहेत. उदा.सकाळ,वाटी,भातवाढी,डाव,पाडा,.......... पण माझ्या माहीति प्रमाणे हेच शब्द इतर भाषांत जसेच्या तसे वापरले जात नाहीत.(काहि प्रमाणात ओडिया,व आसामी भाषेत) किंबहुना,समस्त कोंकण पट्टय़ात बोलल्या जाणा-या भाषेत आणि मराठीत तसेच बंगालीत कमालीचे साम्य आढळते. ते हि कसे काय? असे बरेच प्रश्न आहेत.त्यामूळॆ काहि शब्दात साम्य आढळले म्हणुन तेच मराठी भाषेचे मुळ मानणे पटत नाही. थोडे सविस्तर लिहिल्यास उत्तम. अभिज्ञ
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on गुरुवार, 05/29/2008 - 07:39

In reply to आवाका... by अभिज्ञ

Permalink

बहुधा

भाषेचा मराठी भाषेवर जर एवढा प्रभाव पडला असेल, तर तो संस्कृत भाषेवर कसा काय पडलेला दिसत नाही?किंवा तसे काही असेल तर तेही स्पष्ट केलेत तर बरे.
बहुधा संस्कृत भाषा ही इतकी यमनियमांनी बांधलेली आहे की तिला श्वास घेण्यापुरतीही जागा मिळाली नाही आणि शुद्धाशुद्धतेच्या कल्पनांपायी ती गुदमरून मृतप्राय झाली असे काही लोक म्हणतात ते खरे असावे! याउलट ज्या भाषांनी काळाप्रमाणे स्वतःचे रूप बदलले त्याच टिकून राहिल्या. आपला, (पिंडावरचा कावळा) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 05/29/2008 - 08:09

In reply to बहुधा by आजानुकर्ण

Permalink

सहमत..

याउलट ज्या भाषांनी काळाप्रमाणे स्वतःचे रूप बदलले त्याच टिकून राहिल्या. सहमत आहे... ;) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 05/28/2008 - 23:54

Permalink

उडवले जाईल..!

क्रुपया हे वाचावे! हे लेखन इथून उडवले जाण्याची शक्यता आहे, हे जाणूनच पुढील प्रतिसाद द्यावेत! भाषा, भाषा शुद्धी, व्याकरण, शुद्धलेखन, संस्कृत भाषेची सो कॉल्ड महती या विषयावर चर्चा करावयास माझे मित्र शशांक जोशी यांचे उपक्रम हे संस्थळ फार छान आहे! मिसळपाववर वरील विषय सहसा एन्करेज केले जात नाहीत याची नोंद घ्यावी..! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on गुरुवार, 05/29/2008 - 07:24

In reply to उडवले जाईल..! by विसोबा खेचर

Permalink

आदरणीय तात्यासाहेब

हाती घ्याल ते तडीस न्या असे आमचे गुरूदेव म्हणतात. एवढ्या लेखापुरतं माफ करा. पुढे व्याकरणविषयक चर्चा तिकडे होईल याची काळजी घेऊ. आपला, (अवलंबनपर्णोद्गमसूत्रोत्सुक!) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 05/29/2008 - 08:09

In reply to आदरणीय तात्यासाहेब by आजानुकर्ण

Permalink

ठीक..

एवढ्या लेखापुरतं माफ करा. पुढे व्याकरणविषयक चर्चा तिकडे होईल याची काळजी घेऊ. ठीक आहे! मिपावरील एक्स पंचायत समिती सदस्य हा आपला रुतबा ध्यानात घेऊन आम्ही तूर्तास काहीच बोलत नाही. चालू द्यात चर्चा..! परंतु या पुढे कृपया कुणीही भाषा, भाषेचा विकास, भाषेचं यांव, भाषेचं त्यांव, शुद्धलेखन, व्याकरण या विषयांवरील चर्चा मिपावर करून मिपाचं वातावरण घाण करू नये अशी सर्वांना हात जोडून, नम्र व कळकळीची विनंती! मिपा जसं आहे तसंच राहू द्या! त्याला विद्वान संकेतस्थळांच्या रांगेत नेऊन बसवायचा प्रयत्न करू नका एवढीच विनंती! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 05/29/2008 - 00:07

Permalink

अवांतर

वरील उतार्‍याच्या संदर्भात एक लेख जालावर सापडला आहे. जो खैरे साहेबांच्या दाव्याच्या विरोधी आहे. http://groups.google.com/group/alt.language.hindi/browse_thread/thread/cfc7d78c964dd86b कदाचित वरील तामिळ शब्द महाराष्ट्री प्राकृतामधून दक्षिणेत गेले असण्याचा संभव आहे. कारण महाराष्ट्री पा़कृताबद्द्ल ख्रिस्तपूर्व ५व्या शतकापासून उल्लेख आढळतात. अधिक माहीती इथे वाचता येईल http://en.wikipedia.org/wiki/Maharashtri पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on गुरुवार, 05/29/2008 - 07:36

In reply to अवांतर by llपुण्याचे पेशवेll

Permalink

पेशवेसाहेब

पुणेकर पेशवेसाहेब, खैरे साहेबांनी मराठी ही फक्त तमिळकडून आली असा कुठेही दावा केलेला नाही. मात्र शुद्धिकरणचळवळे लोक मराठीचा संबंध फक्त संस्कॄताशी जोडू इच्छितात आणि इतर भाषा अस्पृश्य असल्याप्रमाणे त्यांचा विटाळ मानला जातो. खैरे साहेबांच्या लेखात शास्त्रीय प्रयोग केल्यानंतर मराठी व तमिळचा संबंध कसा आहे हे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच संस्कृतानेही मराठीला शब्द दिले आहेत हे मान्य केले आहे. मात्र मराठीचा संबंध फक्त संस्कृताशीच आहे अशीएकांगी भूमिका मांडणार्‍यांनी पुन्हा (शक्य असल्यास) विचार करावा यासाठीच तो प्रतिसाद. मराठी ही फक्त तमिळ किंवा फॉर दॅट मॅटर संस्कृताशीच संबंधित आहे व इतर (फारसी, अरबी, इंग्रजी, कन्नड) भाषांचा तिला विटाळ होतो असे मानू नये! अवांतरः जय महाराज या लेखकाचा 'आवाका' गुगल ग्रुप्सवर वावरणार्‍या अनेकांना माहिती आहे. केवळ भावनिक उद्दीपन करून इतरांच्या नावाखाली भूमिका मांडणे असा त्यांचा खाक्या केवळ ह्याच समुदायावर नसून. या व अशा इतर समुदायांवरही लोकप्रिय आहे. सरस्वती नदीबाबतचा पुरावा आणि भाषा यांचा संबंध सुब्रम्हण्यम यांनी तिथे स्पष्ट केलेला नाही. त्याविषयावर अधिक माहिती वाचायला आवडेल. मात्र त्यांनी दिलेले रामायणाचे पुरावे हास्यास्पद आहेत. हे लेखही वाचा यापेक्षा अधिक काय सांगू शकतो? दुवा १ दुवा २ दुवा ३ आपला, (गारदी) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 05/29/2008 - 09:10

In reply to पेशवेसाहेब by आजानुकर्ण

Permalink

पुरावे

सरस्वती नदीबाबतचा पुरावा आणि भाषा यांचा संबंध सुब्रम्हण्यम यांनी तिथे स्पष्ट केलेला नाही. त्याविषयावर अधिक माहिती वाचायला आवडेल. http://www.gisdevelopment.net/application/archaeology/site/archs0001.htm http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/2073159.stm आणि हा विकीचा http://en.wikipedia.org/wiki/Sarasvati_River
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on गुरुवार, 05/29/2008 - 09:15

In reply to पुरावे by विकास

Permalink

माफ करा

सरस्वती नदीचा पुरावा नको. ही नदी आणि भाषा यांचा संबंध जो सुब्रम्हण्यम यांना अपेक्षित आहे त्याबाबतचा पुरावा.
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन on गुरुवार, 05/29/2008 - 10:19

In reply to पेशवेसाहेब by आजानुकर्ण

Permalink

एकतर्फी

हा लेख बराचसा एकतर्फी वाटला. संस्कृतावरं टिका करायची म्हणुन कहिहि... तसेच संस्कृतानेही मराठीला शब्द दिले आहेत हे मान्य केले आहे.... (माझ्या माहितिप्रमाणे बरेच. किंबहुना इतर तुम्ही उल्लेख केलेल्या भाषांपेक्षा कितितरी पटींनी जास्त.) असो अधिक माहितिसाठी कदचीत हा दुवा उपयोगी पडेल http://en.wikipedia.org/wiki/Languages_of_India#Classical_languages_of_India अजुन एक प्रश्न म.टा.मध्ये दिलेले जे शब्द आहेत त्यापैकी बहुतेक बरेच शब्द नेहमीच वापरले जातात. जर एकदा नीट पहावे http://www.misalpav.com/node/1897 चुकभुल द्यावी घ्यावी (हे कुठल्या भाषेतुन आले बां? कायं करायचयं B) सुसंस्कृत चेतन
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on गुरुवार, 05/29/2008 - 10:32

In reply to एकतर्फी by चेतन

Permalink

द्या की

माझ्या माहितिप्रमाणे बरेच. किंबहुना इतर तुम्ही उल्लेख केलेल्या भाषांपेक्षा कितितरी पटींनी जास्त.)
तुम्हाला खैरे यांच्या तुलनेत बरीच माहिती दिसते (किती तरी पटींनी जास्त) . तेव्हा संस्कृताने मराठीला किती शब्द दिले आहेत हे सांगू शकाल का? व इतर भाषांपेक्षा नक्की किती पटीने जास्त ते देखील सांगा. एक हिंट देतो. तेलुगू-कन्नडमधून ज्ञानेश्वरांनी हजारो शब्द घेतले. (संस्कृतामधून घेण्याऐवजी) ते किती ते मोजता येतीलच. असे का बॉ? आपला, (तौलनिक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन on गुरुवार, 05/29/2008 - 10:58

In reply to द्या की by आजानुकर्ण

Permalink

एक हिंट

एक हिंट देतो. तेलुगू-कन्नडमधून ज्ञानेश्वरांनी हजारो शब्द घेतले. (संस्कृतामधून घेण्याऐवजी) ते किती ते मोजता येतीलच. असे का बॉ? तेलुगू-कन्नड या भाषांबद्दल आपण थोडं आधिक वाचावं आणी मगचं हे विचारावं http://en.wikipedia.org/wiki/Telugu_language माझ्यामते तुम्हाला ह्या दुव्याची देखिल गरज आहे http://en.wikipedia.org/wiki/Sanskrit अवांतरः तेव्हा संस्कृताने मराठीला किती शब्द दिले आहेत हे सांगू शकाल का? व इतर भाषांपेक्षा नक्की किती पटीने जास्त ते देखील सांगा. १५३४३६७ संस्कृत ५३४९ तमिळ २३८९ कन्नड १२३४ तेलगु हा अकबरासारखा प्रश्न झाला राजधानीत कावळे किती? ह. घ्या. स्वगतः भाषा हा शब्द कोठुन आला बरं?
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on गुरुवार, 05/29/2008 - 11:05

In reply to एक हिंट by चेतन

Permalink

व्वा !!

व्वा काय पुरावा आहे !!
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन on गुरुवार, 05/29/2008 - 12:24

In reply to व्वा !! by अमोल केळकर

Permalink

जरा हा

जरा हा दुवा पहावा http://en.wikipedia.org/wiki/Marathi_language#cite_note-bhasha-9 येथे एक वाक्य आहे Marathi has taken words from and given words to Sanskrit, Kannada, Hindi, Urdu, Arabic, Persian, and Portuguese. At least 50% of the words in Marathi are either taken or derived from Sansrit. हे आणखिन काही Literature in all Dravidian languages owes a great deal to Sanskrit, the magic wand whose touch raised each of the languages from a level of patois to that of a literary idiom". (Sastri 1955, p309) सर्वज्ञानी गूगल आणी en.wikipedia.org च्या सहाय्याने अज्ञानी चेतनमार्फत ज्ञानीलोकांकरिता अवांतरः ज्ञानेश्वर, अम्रुतानुभव हे शब्द कोठुन आले बरं? अतिअवांतरः महाराष्ट्र हा शब्द कोठुन आला बरं...? मी मराठीचं पण संस्कृत थोडफार कळणारा चेतन
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on गुरुवार, 05/29/2008 - 13:05

In reply to जरा हा by चेतन

Permalink

हे देखील वाचा

संस्कृतचे योगदान कोणीही नाकारलेले नाही! मात्र फक्त संस्कृत हा अडाणीपणा बाजूला ठेवावा इतकेच म्हणणे आहे. भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठीला संस्कृतची झेरॉक्स कॉपी करायची असेल तर करा. मग मराठीही संस्कृताप्रमाणेच चोपड्यांमध्ये बंद राहील. सुदैवाने आमच्यासारखी सामान्य जनता अशा प्रयत्नांची खिल्ली उडवेल यात शंका नाही. सोबत हे देखील वाचा. आपला, (स्पष्टवक्ता) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन on गुरुवार, 05/29/2008 - 14:32

In reply to हे देखील वाचा by आजानुकर्ण

Permalink

मात्र फक्त

मात्र फक्त संस्कृत हा अडाणीपणा बाजूला ठेवावा इतकेच म्हणणे आहे सहमत मात्र या गोंडस नावाखाली कोणी संस्कृतला खाली दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला मात्र नक्की विरोध आहे. भाषाशुद्धीकरण आणि जडजंबाल लेखन : मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांचे निवडक उतारे या लेखात मलातरी हा प्रकार थोडासा जाणवला. आपण दिलेला दुवा वाचनिय आहे पण इथे तुलना कोठेहि नाहि आणी ती होउ नये असे मला वाटते संस्कृतचे योगदान कोणीही नाकारलेले नाही हे म्हणुनसुद्धा लेखात तरी सुर नाकरण्याचाच दिसतोयं असो तुम्हि हे नाकारत नाही ह्यातच समाधान. मी तरी मराठीप्रमाणे संस्कृतलाही आपलीच मानतो त्यामुळे कदाचित माझा सुर कडवटही असेल. कडवट चेतन
  • Log in or register to post comments

Submitted by कोलबेर on गुरुवार, 05/29/2008 - 20:59

In reply to मात्र फक्त by चेतन

Permalink

सहमत आहे

चेतनरावांनी आकडेवारी देऊन संस्कृतातुन किती शब्द आले आणि इतर भाषांमधून किती ह्याची तौलनिक माहिती देऊन अजानुकर्ण ह्यांच्या मुद्द्याचे खंडन केले आहे. श्री.अजानुकर्ण ह्यांनी त्याची कसलीही नोंद न घेता संस्कृत विरोधाचा सुर लावला आहे तो एकांगी वाटतो.
मात्र फक्त संस्कृत हा अडाणीपणा बाजूला ठेवावा इतकेच म्हणणे आहे सहमत मात्र या गोंडस नावाखाली कोणी संस्कृतला खाली दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला मात्र नक्की विरोध आहे.
ह्या चेतनरावांच्या भुमिकेशी आम्ही देखिल सहमत आहोत. आंधळी भक्ती आणि विरोधासाठी विरोध हे दोन्हीही अयोग्य!
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 05/29/2008 - 22:30

In reply to सहमत आहे by कोलबेर

Permalink

+१

कोलबेर ने योग्य आणि थोडक्यात मांडले असल्याने "+१" व्यतिरीक्त अजून काही नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Fri, 05/30/2008 - 07:32

In reply to +१ by विकास

Permalink

माफी असावी

कोलबेरशेठ आणि तुम्ही दोघांनीही मी दिलेला दुवा न वाचताच ही प्रतिक्रिया दिली आहे हे खेदाने म्हणावे लागत आहे. आपला, (सखेद) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Fri, 05/30/2008 - 07:29

In reply to सहमत आहे by कोलबेर

Permalink

काय कोलबेर शेठ

अहो संस्कृतविरोधाचा आणि एकांगी सूर कोणी लावला आहे येथे? चेतनरावांनी दिलेल्या आकडेवारीतील ह.घ्या. हे वाचले का? समजा चेतनरावांनी गंभीरपणे ती आकडेवारी दिली आहे असे मानू. मग मी दिलेल्या दुव्यावर दाते कर्वे यांच्या कोशानुसार मराठीतील एकूण शब्द 1,12,189 आहेत हे स्पष्ट लिहिले आहे. मग चेतनरावांनी दीड लाखाहून जास्त शब्द संस्कृतातून आलेत याचा पुरावा देणे आवश्यक नाही का? मी विरोधासाठी विरोध करत असल्याचा एकही पुरावा द्यावा मी सपशेल माफी मागण्यास तयार आहे! आपला, (सहसदस्य) आजानुकर्ण अवांतरः श्री. जनरलपंत डायर यांच्या वटहुकूमाची अंमलबजावणी करण्यास आम्ही बांधील आहोत. मात्र आमचे मित्र कोलबेर शेठ यांच्या प्रतिसादात 'आजानुकर्ण' या आमच्या नावाचा वैयक्तिक उल्लेख झाल्याने प्रतिसाद देत आहोत याची जनरलपंतांनी नोंद घ्यावी ही विनंती. आपला, (स्पष्ट) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 05/30/2008 - 07:37

In reply to काय कोलबेर शेठ by आजानुकर्ण

Permalink

थांबवावा..

आता सर्वांनी हा विषय इथेच थांबवावा! काही चर्चा करायची असेल तर ती खरडवहीतून किंवा व्य नि तून करावी. अन्यथा हा संपूर्ण थ्रेडच अप्रकाशित करण्यात येईल.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 05/29/2008 - 09:01

Permalink

सुरेख लेख

मराठी भाषाशुद्धीची चळवळ, भाषाशुद्धीचा आग्रह, आणि मराठी तामिळीचे भाषिक नातेसंबध एका माहितीपूर्ण लेखनात वाचायला मिळाले, आणि ते आवडले. अवांतर : मिसळपाव मराठी संकेतस्थळावर सर्व लेखन संवाद हे मराठी भाषेतून होत असतांना भाषिक लेखांना संस्थळाच्या मालकाचा विरोध होतो, ही गोष्ट मराठी भाषाप्रेमी म्हणुन दुखः देणारी वाटते. ;) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 05/29/2008 - 09:46

In reply to सुरेख लेख by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

भ्रम..!

मराठी भाषाशुद्धीची चळवळ, भाषाशुद्धीचा आग्रह, हा हा हा! हे शब्द वाचूनच करमणूक झाली! :) नथ नाकानं साजिरवानी, गला भरून सोन्याचे मनी कोलीवार्‍याची मी गं रानी रात पुनवेला नाचून करतंय मौजा! काय हो बिरुटेशेठ, तुमच्या भाषाशुद्धीच्या चळवळीत, आग्रहात वरील ओळी बसतात का? की त्याही अशुद्ध? :) काय रे बाला, हिर्‍याच्या कुडाचे तुज्या कुल्ल्यावर पोकल बांबूचे फटके मारू का दोन? रांडच्या, हिकू का तुला?! :) काय हो बिरुटेशेठ, तुमच्या भाषाशुद्धीच्या चळवळीत, आग्रहात वरील ओळी बसतात का? की त्याही अशुद्ध? :) मराठी भाषा ही अठरापगड जातीजमातीत बोलली जात असताना आपण चार सोकॉल्ड पांढरपेशी व स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारी लोकं भाषाशुद्धीच्या चळवळीच्या अन् आग्रहाच्या कुठल्या अंधःकारात वावरतोय, कुठल्या भ्रमात वावरतोय देव जाणे! :) आपला, (आग्र्या-कोळ्यात लहानाचा मोठा झालेला) दर्याचा राजा -तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by कोलबेर on गुरुवार, 05/29/2008 - 09:59

In reply to भ्रम..! by विसोबा खेचर

Permalink

तात्या

तात्या शाळेत असताना तुमचा व्याकरणाचा मास्तर लैच मारकुटा होता का हो? नाही.. भाषाशास्त्र ह्याविषयी कुणीही काहीही बोलले की त्यामधुन 'शुदद्धलेखनाची सक्ती लादली जाते आहे' ह्या एकमेव निष्कर्षावर तुम्ही कायम येताना पाहुन मनात आलेली ही शंका वाढत जाते.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 05/29/2008 - 10:09

In reply to तात्या by कोलबेर

Permalink

:)

हम्म! कोलबेरा, प्रत्यक्षात भेटू तेव्हा या विषयावर तुझ्याशी बोलीन सवडीने! अगदी नक्की...! :) तूर्तास, गोमू संगतीनं माज्या तू येशील काय आरं संगतीनं तुज्या मी येनार नाय ह्या ओळी भाषेच्या आणि भाषाशास्त्राच्या दृष्टीनं चूक की अचूक, ह्या विचारात मी अडकलो आहे आणि बाप खपल्यासारखा चेहेरा करून त्यावर गहन विचार करतो आहे! तेव्हा, प्लीज डोन्ट डिष्टर्ब मी! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 05/29/2008 - 16:27

In reply to भ्रम..! by विसोबा खेचर

Permalink

आम्ही सोकॊल्ड :)

आपण चार सोकॉल्ड पांढरपेशी व स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारी लोकं भाषाशुद्धीच्या चळवळीच्या अन् आग्रहाच्या कुठल्या अंधःकारात वावरतोय, कुठल्या भ्रमात वावरतोय देव जाणे सोकॊल्ड, भाषा शुद्धीचे आग्रही, शुद्धलेखनाचे पुरस्कर्ते, बोजड भाषेचे महागुरु, संस्कृतप्रेमी, फुगीर सुशिक्षित, म्हणजे आम्ही की काय ? च्यायला आमची प्रतिमा इतकी कशी उंचावली !!! ;) आपल्याप्रमाणेच, अठरापगड जातीजमातीची बोलल्या जाणारी बोली ही आमची जीव का प्राण आहे, आम्ही त्यावर नुसते प्रेम करत नाही तर, रहाटगाड्यात ती भाषा लिहितो, बोलतो आणि जगतोही !!! :) -दिलीप बिरुटे (बोली भाषा लेखनात वापरणारा )
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 05/29/2008 - 13:14

Permalink

द्रावीडी प्राणायामाचा हट्ट

संस्कृत सारखी शब्द बंबाळ भाषा सामान्य लोकाना समजत नव्हती म्हणुन ज्ञानेश्वरानी भगवद्गीता जनसामान्यांच्या बोली भाषेत आणली त्या बोली भाषेला आपण पुन्हा शब्दबंबाळ करण्यासाठी संस्कृतचा आधार घेत आहोत. यातच काय ते समजावे. सामान्यांच्या या भाषेला पुन्हा एकदा उच्चेतरांची भाषा बनवण्याचा घाट कशासाठी घालत आहोत? हा पुन्हा द्रावीडी प्राणायामाचा हट्ट कशासाठी.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on गुरुवार, 05/29/2008 - 13:17

In reply to द्रावीडी प्राणायामाचा हट्ट by विजुभाऊ

Permalink

हेच

हेच तर सांगायचा प्रयत्न करून रायलो ना भौ आम्ही आपला, (सहमत) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन on गुरुवार, 05/29/2008 - 15:03

In reply to द्रावीडी प्राणायामाचा हट्ट by विजुभाऊ

Permalink

हट्टी

संस्कृत सारखी शब्द बंबाळ भाषा सामान्य लोकाना समजत नव्हती म्हणुन ज्ञानेश्वरानी भगवद्गीता जनसामान्यांच्या बोली भाषेत आणली त्या बोली भाषेला आपण पुन्हा शब्दबंबाळ करण्यासाठी संस्कृतचा आधार घेत आहोत. आता ज्ञानेश्वरीतली बोली भाषा ही कळत नाही म्हणुन आपण त्याचाही अनुवाद करुन वर बोलीला शब्दबंबाळ म्हणणार का? (आपल्याच शब्दात उच्चेतरांची भाषा वगैरे वगैरे ठरवणार का?) संस्कृतला खाली दाखवण्याचा हा अट्टाहास कशापायी? कडवट चेतन अवांतरः अनेक उत्तम साहित्याचे मराठित अनुवाद झाले आहेत म्हणुन मुळ भाषेला नावे ठेवावी का? संथ विजुभाउंच्या प्रवचनांनी शब्दबंबाळ सामान्य चेतन (ह. घ्या.)
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 05/29/2008 - 15:19

In reply to हट्टी by चेतन

Permalink

मृत भाषेच्या कुबड्या किती काळ वापरणार

संथ विजुभाउंच्या प्रवचनांनी शब्दबंबाळ सामान्य चेतन चेतन भौ म्या संथ न्हाय पन ज्ञानेश्वरी लिव्हुन बी काही शतके उलटली. ती बोली बी आता मागं र्‍हायली. म्या कुटं संस्क्रुतला खाली दाकावतोय. ती तशीबी आम्च्या डुईवरुनच जातीय. फकस्त मृत भाषेच्या कुबड्या किती काळ वापरणार आपण. जिवंत भाषा जिवंत नदी सारखी असते. ती वाहती रहायला तिला छोट्या नद्या/ ओढे/ प्रसंगी नालेही मिळतात. कल्पना करा उद्या गंगा किंवा कृष्ण नदीच्या सर्व उपनद्या शुद्धीच्या नावाखाली अडवल्या तर त्यांचे स्वरूप कसे असेल. उगमाजवळ असेल तेवढेच राहील. उरल समुद्राबाबतीत असे झाले आणि आता उरल समुद्र आटुन त्याचे आस्तित्व एक मोठे डबके म्हणुन राहीले आहे
  • Log in or register to post comments

Submitted by limbutimbu on गुरुवार, 05/29/2008 - 15:06

Permalink

सन्स्कृत राहुदे बाजुला

सन्स्कृत राहुदे बाजुला, ज्ञानेश्वरी तरी नीट समजते का आपल्याला? (आणि मुळात कितीक जण वाचतात्/वाचणारेत?) इकडे पुढच्या पिढ्या इन्ग्रजी माध्यमातून शिकवुन "देशी इन्ग्रज" तयार करण्याचे कारखाने सुरू असताना स्वातन्त्रवीरान्नी भाषा शुद्धीबाबत जे केल ते योग्य की अयोग्य हा वाद आता हवाचे कशाला? कोण बोलणार लिहिणार वाचणार तुमची ती दरिद्री दळभद्री मराठी जिच्यात म्हणे ज्ञानाचे काहीही कण नाहीत म्हणुन तर इन्ग्रजी माध्यमातून लहानग्यान्ना शिक्षाण देतात ना हल्ली? अन जन्तेच्या पुढल्या पिढ्या जर मराठी शिकणारच नसतील तर हवित कशाला म्हणतो मी ही थेर? त्यापेक्षा एमटीव्ही बघा, ऐश करा! :D (जे खानदानी(?), उच्चवर्णीय(?), मराठीप्रेमी असतील ते टिकवतीलच मराठी, ती ही शुद्ध स्वरुपात! नाहीतर शेवटी "पुणे" आहेच!:D ) आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on गुरुवार, 05/29/2008 - 15:20

Permalink

अट्टाहास, आग्रह आणि संस्कृतप्रेम

अजानुचा लेख चांगला आहे, बरीच नवी माहिती मिळाली. मराठी भाषा ही जशी फक्त संस्कृतापासून बनली नाही तशी ती फक्त तमिळपासूनही बनलेली नाही. (तसे अजानुने लिहिल्याचा दावाही नाही) संस्कृती आणि भाषा यांच्यात कालानुसार होत जाणारी सरमिसळ जुनी आहे. उद्वेग तेव्हा येतो जेव्हा संस्कृत आम्हाला आवडते (हे म्हणणार्‍या लोकांना संस्कृतात चार वाक्ये लिहिता येतात का देवजाणे! उगीच इथून तिथून पाठ केलेले श्लोक देणे म्हणजे आपल्याला संस्कृत येते अशी काहीजणांची समजूत असावी) म्हणून आम्ही संस्कृतातले शब्द प्रतिशब्द म्हणून घेणार हा पोरकटपणा वाटतो. संस्कृतातून येणारे शब्द हे सुटसुटीत असतील, योग्य अर्थ देत असतील आणि इतरांना समजायला सोपे होत असतील तर लोक त्यांना उचलून धरतीलच नाहीतर असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात. संस्कृतात सर्व काही आहे हा आणखी एक पोरकट ग्रह लोकांनी काहीही माहित नसताना करून ठेवलेला असतो. जी भाषा एका विशिष्ट गटाच्या बाहेर पडलीच नाही, जिच्यात काळानुसार फारसा (पाणिनीनंतर संस्कृतावर सोपस्कार करणार्‍या लोकांची यादी वाचायला आवडेल) बदल झाला नाही तिच्यात आधुनिक शास्त्रात लागणारे सर्व शब्द आहेत आणि म्हणून इतर भाषांतून येणारे शब्द गाळून बोजड शब्द निर्मिती करावी हा आणखी एक ग्रह. असाच एक ग्रह की संस्कृतात सर्व उच्चार आहेत. संस्कृत बोलल्याने वाणी शुद्ध होते. यावर अनेक स्थळांवर झालेल्या चर्चांमध्ये हा दावा किती फोल आहे यावर चर्चा झाली आहेच. मराठी लोकांचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे कसे मजेशीर असते यावर अनेक चित्रपटांत प्रसंग दाखवले आहेत तरी आमची वाणी संस्कृतामुळे शुद्ध असा आणखी एक हास्यास्पद दावा. मराठीत संस्कृतातील बरेचसे शब्द रूळल्याने बरेचदा अभियांत्रिकी (अभिवादन, अभिमान, अभिनंदन हे शब्द मराठीत आधीच आहेत) आणि यंत्र हा शब्दही मराठीत रूळलेला आहे तेव्हा अभियांत्रिकी हा शब्द मराठी प्रतिशब्द नसून संस्कृत प्रतिशब्द ठरतो आणि "म्हणजे काय आहेत का तुमच्याकडे पर्याय संस्कृताशिवाय?" असे पोरकट प्रश्न विचारले जातात. बरं, हे संस्कृतचा आग्रह धरणारे कोण तर पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक, त्यांना इतर भाषांची ऍलर्जी का तेच कळत नाही. गेल्या एका प्रतिसादात मग सुचवा पाली आणि फार्सी शब्द असा प्रश्न विचारण्यात आला पण या भाषा तरी प्रचलीत आहेत का आणि नसल्यास जी भाषा प्रचलीत आहे तिची आठवण का नाही आली? कारण ते उत्तर पोरासोराला आले असते की अभियांत्रिकी= इंजिनिअरींग पण भाषा पोरासोरांना येऊ नये हीच या मंडळींची इच्छा असते का काय कोणास ठाऊक. हजर, हरकत, परागंदा, बुजुर्ग, बाबा, बायको, खुर्ची, पेन, पेन्सिल, दप्तर हे आणि असे अनेक शब्द सोडून का द्यावेत तर कोणीतरी उठून भाषाशुद्धीचं खूळ निर्माण करतो. रूळलेल्या शब्दांची भाषाशुद्धी आणि भाषेत येणार्‍या नव्या शब्दाला प्रतिशब्द शोधणे यातला फरक काही श्रेष्ठींना जाणवला नाही याचे सखेद आश्चर्य वाटते. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 05/29/2008 - 15:53

In reply to अट्टाहास, आग्रह आणि संस्कृतप्रेम by प्रियाली

Permalink

सहमत..!

असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात. हा हा हा! :) तिच्यात आधुनिक शास्त्रात लागणारे सर्व शब्द आहेत आणि म्हणून इतर भाषांतून येणारे शब्द गाळून बोजड शब्द निर्मिती करावी हा आणखी एक ग्रह. बरं, हे संस्कृतचा आग्रह धरणारे कोण तर पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक, त्यांना इतर भाषांची ऍलर्जी का तेच कळत नाही. अगदी १०० टक्के सहमत आहे.. ! :) आपला, (प्रियालीचा मित्र) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on गुरुवार, 05/29/2008 - 17:16

In reply to सहमत..! by विसोबा खेचर

Permalink

संस्कृतचा

संस्कृतचा आग्रह धरणारे जे कोण पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक आहेत त्यापैकी कुणीही हजर, हरकत, परागंदा, बुजुर्ग, बाबा, बायको, खुर्ची, पेन, पेन्सिल, दप्तर हे आणि असे अनेक शब्द सोडून द्या आणि संस्कृतोत्भवच शब्द घ्या असा आग्रह धरल्याचे मिसळपाववरील तिनही चर्चेत दिसला नाही. (असल्यास ते मुर्ख आहेत असे माझे वैयक्तीक मत आहे.). जर दुसर्‍याकुठल्या संस्थळावर असा अग्रह त्यानी धरला असेल तर ती धुणी मिसळपाववर का धुतली जात आहेत? संस्कृतातून येणारे शब्द हे सुटसुटीत असतील, योग्य अर्थ देत असतील आणि इतरांना समजायला सोपे होत असतील तर लोक त्यांना उचलून धरतीलच नाहीतर असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात. हे कस बरोब्बर बोललात प्रियालीताई.... अहो एकदा भाषा वाहत्या नदीसारखी म्हटली की जड धोंडे अपोआपच तळाला जाणार. चांगले आसेल ते तुकारामाच्या गाथेप्रमाणे आपोआप वरती येइल त्यासाठी मुद्दामहून कष्ट घ्यायची सुध्धा गरज पडणार नाही. त्यामुळे ज्याना कोणाला असले जड शब्द वापरायचेत त्याना वापरुदे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे बाकीचे पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतील. अवांतर : मराठी लोकांचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे कसे मजेशीर असते यावर अनेक चित्रपटांत प्रसंग दाखवले आहेत तरी आमची वाणी संस्कृतामुळे शुद्ध असा आणखी एक हास्यास्पद दावा. कुठल्या चित्रपटात त्या मराठी माणसाची वाणी संस्कृतमुळे शुध्ध होती तरी त्याचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे मजेशीर होते असे दाखवले आहे. असली उदाहरणे देउन संस्कृतमुळे मराठी लोकांचे हिंदी-इंग्रजी बोलणे मजेशीर होते असे म्हणायचे आहे का तुम्हाला? यातून फारसी-अरबी नकोच असे म्हणणार्‍यांप्रमाणे तुमचाही सुर आता संस्कृत नकोच असा होउ लागलाय असे दिसते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on गुरुवार, 05/29/2008 - 17:48

In reply to संस्कृतचा by आंबोळी

Permalink

कोणाला मूर्ख म्हणताय?

दिनांक (तारीख) मूल्य (किंमत) उपस्थित (हजर) वेतन (पगार) निर्बंध (कायदा) झरणी(फाउंटनपेन) मी केवळ काही वेगळी उदाहरणे दिली, मूळ उदाहरणे मटात आणि मिपावर आली आहेतच. माझ्या उदाहरणात वरील उदाहरणेही टाका कारण मी दिलेली उदाहरणे आणि वरील उदाहरणे ही मराठीतील प्रचलीत शब्द आहेत. तेव्हा ज्यांना मूर्ख म्हणालात :SS त्यांचे प्रेमी धावत येतीलच असे मानू. =)) (खरे म्हणजे नाही येणार कारण त्यांना आपला फोलपणा कळला आहे तेव्हा ते सध्या इकडची वाक्ये तिकडच्यांच्या नावावर खपवायच्या मागे आहेत.) आणि हो! मूळ लेख मटावरचा ना मग ती धुणी चालतात का भौ तुम्हाला की इथे तुमच्या मर्जीची धुणी धुवावी लागतात?
यातून फारसी-अरबी नकोच असे म्हणणार्‍यांप्रमाणे तुमचाही सुर आता संस्कृत नकोच असा होउ लागलाय असे दिसते.
अजिबात नाही. हास्यास्पद दावे जसे की संस्कृताची भरणा केल्याने आमची वाणी शुद्ध होते असे दावे करणार्‍यांवर ती टिप्पणी आहे, अर्थात ते तुम्हाला मानवेल असे वाटत नाही. उलट जेव्हा आपली नाणी खोटी ठरू लागतात तेव्हा मग इतरांवर संस्कृत द्वेष्टे असल्याचे, भट-बामनांना बोलणी लावल्याचे दावे केले जातात.
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन on गुरुवार, 05/29/2008 - 16:58

In reply to अट्टाहास, आग्रह आणि संस्कृतप्रेम by प्रियाली

Permalink

असहमत

गेल्या एका प्रतिसादात मग सुचवा पाली आणि फार्सी शब्द असा प्रश्न विचारण्यात आला पण या भाषा तरी प्रचलीत आहेत का आणि नसल्यास जी भाषा प्रचलीत आहे तिची आठवण का नाही आली? हे म्हणजे राज ठाकरेंने.... ही दोन ओळींची बातमी सबसे तेजमध्ये दाखवण्यासारखं आहे सगळं खर सांगयचचं नाही बरं, हे संस्कृतचा आग्रह धरणारे कोण तर पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक, त्यांना इतर भाषांची ऍलर्जी का तेच कळत नाही. हाच प्रश्न तुम्हाला... संस्कृतची ऍलर्जी का? गेल्या एका प्रतिसादात मग सुचवा पाली आणि फार्सी शब्द असा प्रश्न विचारण्यात आला पण या भाषा तरी प्रचलीत आहेत का आणि नसल्यास जी भाषा प्रचलीत आहे तिची आठवण का नाही आली? संस्कृतला आपण प्रचलीत म्हणताय का? म्या कुटं संस्क्रुतला खाली दाकावतोय. ती तशीबी आम्च्या डुईवरुनच जातीय. फकस्त मृत भाषेच्या कुबड्या किती काळ वापरणार आपण त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच. हे मात्र खरे... असो चुकभुल दयावीघ्यावी सावरकर आणि संस्कृतप्रेमी मराठी चेतन
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on गुरुवार, 05/29/2008 - 17:11

In reply to असहमत by चेतन

Permalink

असहमत असण्याबद्दल खात्री होती

हे म्हणजे राज ठाकरेंने.... ही दोन ओळींची बातमी सबसे तेजमध्ये दाखवण्यासारखं आहे सगळं खर सांगयचचं नाही
हे म्हणजे ओढलेली झापडे काढायची नाहीत हे आहे. एक तर आपण माझा प्रतिसाद वाचलेला नाही आणि वर असहमतीचा प्रतिसाद तयार ठेवून मोकळे. मला संस्कृतची अजिबात ऍलर्जी नाही..पण फक्त संस्कृतची नक्कीच आहे. संस्कृताचा मराठीवर प्रभाव कोणी नाकारत नाही.
संस्कृतला आपण प्रचलीत म्हणताय का?
हाहाहाहा!!!! नाही याला मी हास्यास्पद विधान म्हणते, माझा प्रतिसाद नीट वाचला असता तर कळले असते. हल्ली सुसंस्कृतांची भाषा इंग्रजी. संस्कृताचा काही संबंध नाही. म्हणूनच अभियांत्रिकीला = इंजिनिअरींग म्हटले.
त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की
भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे
. ती खरी मराठी नाहीच.
हे वाक्य माझे नाही. मी असे काही सांगणारे भाष्यही केलेले नाही. संस्कृतही ब्राह्मणांनी आपल्यापुरती मर्यादीत ठेवली होती असे काहीसे म्हटले आहे. तेव्हा हे वाक्य माझ्या उपप्रतिसादात घालून लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही असे नाही, असला काहीतरी चावटपणा आपण कराल ही खात्रीही होतीच, तेव्हा चालू दे!
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन on गुरुवार, 05/29/2008 - 18:07

In reply to असहमत असण्याबद्दल खात्री होती by प्रियाली

Permalink

हे म्हणजे

हे म्हणजे ओढलेली झापडे काढायची नाहीत हे आहे. एक तर आपण माझा प्रतिसाद वाचलेला नाही आणि वर असहमतीचा प्रतिसाद तयार ठेवून मोकळे हे म्हणजे ओढलेली झापडे काढायची नाहीत हे आहे १००%खरं फक्त कोणाबाबतं...... (क्षमस्व) म्हणूनच अभियांत्रिकीला = इंजिनिअरींग म्हटले मला वाटतं इंजिनिअरींगला अभियांत्रिकी हा प्रतिशब्द दिला होता.... त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे ती खरी मराठी नाहीच. हे वाक्य माझे नाही. हे मलाही माहीते तेव्हा हे वाक्य माझ्या उपप्रतिसादात घालून लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही असे नाही, असला काहीतरी चावटपणा आपण कराल ही खात्रीही होतीच, तेव्हा चालू दे! तुमचे वाक्य नसले तरी भाव तोच होता (मी चुकीचं समजलो काय?) असो राग नसावा... क्षमोत्सुक चेतन (दुसरा शब्द आठवला नाही)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on गुरुवार, 05/29/2008 - 18:13

In reply to हे म्हणजे by चेतन

Permalink

केली क्षमा

कारण मूर्खांवर राग धरू नये, त्यांना क्षमा करावी हे सांगण्यासाठी संस्कृत शिकायची गरज नसते. =))
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन on गुरुवार, 05/29/2008 - 18:32

In reply to केली क्षमा by प्रियाली

Permalink

धन्यवाद

हा "अभिज्ञ " यांचा शेवटचा प्रतिसाद फारसी,:- पुर्झा-आलम्-गिरी मागधी:- आब्बीयात्तिणी (अभियांत्रिकी चा अप्-भ्रंश, जसे "आर्य "चे "आयरियाणं" किंवा "साधु"चे "साहु/शाहु" बनते तसेच. ) पाली:- सिप्पस्तथ्य स्वाहिली:- हुलुलो-ले-एंजि-रत्ते-पासो हे शब्द दिल्या बद्दल श्री मनोबा व प्रा.डॉ.दिलीप बिरुटे याना धन्यवाद. हे शब्द "कर्णाला" (कानाला) अवघड वाटतायत की अभियांत्रिकी अवघड वाटतोय? =)) धन्यवाद क्षमाशील प्रियाली ताई हे थोडेसे कुठुन तरी forward आलेले लढत मूर्ख कोठेही 'खुट्ट' काही | संताप यास येई | आंदोलनास जाई | तो लढत मूर्ख | पिळत मूर्ख तोंडी भिजे न तीळ | मारे अफाट पीळ | ऐकून 'दातखीळ' | तो पिळत मूर्ख| मूर्ख चावट (विशेषण चिकटवलेला) चेतन
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Fri, 05/30/2008 - 03:46

In reply to धन्यवाद by चेतन

Permalink

क्षमस्व!

आपल्याला कारण नसताना मूर्ख म्हटल्याबद्दल क्षमस्व! परंतु, मी न लिहिलेले शब्द दुसर्‍यांच्या प्रतिसादातून उचलून मला चिकटवण्याचा प्रकार पसंत नाही.
तुमचे वाक्य नसले तरी भाव तोच होता (मी चुकीचं समजलो काय?)
याला मी हो असे उत्तर देईन परंतु तुम्हाला पटावा असा अट्टहास नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 05/29/2008 - 20:32

In reply to असहमत असण्याबद्दल खात्री होती by प्रियाली

Permalink

एक प्रश्न

मला संस्कृतची अजिबात ऍलर्जी नाही..पण फक्त संस्कृतची नक्कीच आहे. हे मी सतत वाचतोय तुमच्याकडून अजानूकर्णाकडून म्हणून हा प्रश्नः कृपया "फक्त संस्कृत" वापरा असे नक्की या चर्चांमधे कोण म्हणाले? संदर्भ मिळाले तर बरे वाटेल. वास्तवीक चर्चा सावरकरांच्या १२५ व्या जयंती निमित्त चालली होती. त्यात त्यांनी तयार केलेले प्रतिशब्द लिहीले. त्या माझ्या लिहीण्यात मी काही संस्क्रूतचा उल्लेख देखील केला नव्हता. (त्यांच्या हिंदूत्व आणि क्रांतिकार्याबद्दल बरेच बोलले जाते त्यामानाने भाषाशुद्धीबद्दल कमी बोलले जाते. म.टा. मधील या बातमीत सावरकरांनी निर्माण केलेल्या काही वापरातील मराठी शब्दांची यादी आहे ती स्वातंत्र्यवीरांना नम्र अभिवादन करत येथे देत आहे) त्यांनी संस्कृत लिहीले त्यांना तसे वाटले, त्यांना सुचले आणि तुम्हि वापरत असा अथवा नसा पण एक झरणीचा अपवाद सोडल्यास दिनांक, मूल्य, उपस्थित, वेतन, निर्बंध, हे शब्द आजही वापरात आहेत आणि मला नाही वाटत ते कोणी संस्कॄतच्या अभिमानाने वापरतात. पण मूळ विषय बाजूला जाऊन "मराठीचे अतोनात नुकसान झाले असे म्हणले गेले.." पुढे जेंव्हा "संस्कृत मधले शब्द असले तर काय बिघडले" असे काही जण म्हणायला लागले. तेंव्हा, त्यात नको इतका ओंकार नी म्हणल्याप्रमाणे हा विषय चघळायला सुरवात झाली आणि जणू काही हे सर्वजण फाक्त संस्कृतचेच शब्द वापरा असे म्हणतात अशी हवा केली गेली. त्यात परत "बहूजन समाज" वगैरे शब्द आणायचे. त्यातून नकळत जातीय चष्मे तयार होतात आणि ते चालू शकतात... असो. माझ्या पुरते बोलाल तर मी काही फक्त संस्कॄत असा कधी आग्रह धरलेला नाही पण त्याचा अथवा इतर भाषेतून मराठीत रूळलेल्या शब्दांना पण विरोध केलेला नाही. माझा विरोध असेलच तर कुठल्याही पद्धतीने जातीचे चष्मे वापरण्याला आहे. आपल्या देशाचा त्यामुळे आत्तापर्यंत झालेला विचका आपण पाहून त्यावरून या काळात पण काही शिकणार नसलो तर आपल्याला भारत म्हणून आणि जगात कुठेही असलात तरी भारतीय म्हणून काही भविष्य नाही. मुकी बिचारी कुणीही हाका अशी मेंढरेच आपण बनणार कधी राजकीय दास्याने तर कधी वैचारीक....म्हणून अस्ल्या चष्म्यांचा मला तिरस्कार येतो. नळाच्या पाण्यावर भांडल्यासारख्या या चर्चा चालू आहेत असे वाटायला लागले आहे. हे सांगण्याचे कारण इतकेच की हा सर्व गहजब (कुठल्या भाषेतला शब्द?) मी चालू केलेल्या लेखातून चालू झाला. माझ्या पुरता हा विषय मी बंद करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on गुरुवार, 05/29/2008 - 20:40

In reply to एक प्रश्न by विकास

Permalink

प्रश्न विचारून विषय का बंद करताय

प्रश्न विचारून विषय बंद करताय :) यातच सगळं आलं.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 05/29/2008 - 20:51

In reply to प्रश्न विचारून विषय का बंद करताय by प्रियाली

Permalink

वादासाठी

प्रश्न विचारून विषय बंद करताय यातच सगळं आलं. ह्यात पण आपण उत्तर दिले नाहीत यात पण सगळ आले का? :-( मी वाद घालण्यासाठी विषय बंद केला आहे. उत्तर मिळाले तर त्याला उत्तर देईन. अजून ही उत्तराची वाट बघत आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com