गाभा:
ए.एम.सी हा एक पैलू
दुसर्या पैलूचे काय?
सहज रावांनी मिसेस पिग ला एस. ओ. डब्ल्यु हा शब्द सुचवला.
पण लक्षणे सांगितली नाहीत.
ही ए. फ.सी.सौ. नेमकी कशी ओळखावी.
ही नेमकी काय करते?
ज्यामुळे ही बिरुदावली बहाल होते.
ए.एम.सी.पि. प्रमाणे ही बिरुदावली मामी,बहीण, आत्या, काकी, मैत्रीण बॉस ह्यांना पण लागते का?
मला फारसा अनुभव नाही.
पण मला नाही म्हणजे असे काहीही नसते का?
कुणी तरी निट उलगडुन सांगा बघु.
प्रतिक्रिया
25 Aug 2011 - 3:35 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
कुणी तरी निट उलगडुन सांगा बघु.
:(
25 Aug 2011 - 4:38 pm | सहज
कॉलिंग आदिजोशी, कॉलिंग आदिजोशी, कॉलिंग आदिजोशी
रामदास काका कुठे असतात आजकाल?
25 Aug 2011 - 5:06 pm | चिरोटा
त्याचे उत्तर ह्यात दडलेले आहे.

25 Aug 2011 - 11:35 pm | आशु जोग
how do u find time to ...
25 Aug 2011 - 7:18 pm | शुचि
फिमेल शॉव्हेनिस्ट असं काही नसतं.
आता गोल्ड डिगर, नॅगर वगैरे नकारात्मक संबोधने बायकांकरता वापरली जातात. पण फिमेल शॉव्हेनिस्ट कधी ऐकीवात नाही.
25 Aug 2011 - 7:29 pm | धमाल मुलगा
इश्श्य!
उभ्या रोमप्यारिसातुनी मैत्रवाटा
कुणी मद्ययात्रेत या गुंतले?
आरक्त त्याच्या नेत्रांच्या कडा अन
चषकसूक्त ओठात ओथंबले...
26 Aug 2011 - 5:41 pm | विजुभाऊ
इश्श्य!
उभ्या रोमप्यारिसातुनी मैत्रवाटा
कुणी मद्ययात्रेत या गुंतले?
आरक्त त्याच्या नेत्रांच्या कडा अन
चषकसूक्त ओठात ओथंबले...
आहाहा जिओ धमु जिओ...
दे भरुनी चषक आज सत्वर
एम आर पी सखी तू काय वाचतेस
सुरईच्या पोटातले ओठी येवू दे
विरह नको चषकाला
........... विजुभाउसाहेब सुरावर्दी
25 Aug 2011 - 8:08 pm | प्रियाली
युयुत्सुंना सांगू की शोधून काढायला.
आम्ही तर बॉ "पाशवी" असं ऐकलं आहे.
25 Aug 2011 - 8:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मेल शॉव्हनिझम असतं तर फीमेल शॉव्हनिझम! हाय काय नाय काय!
आता लगेच उदाहरणं मागू नकोस. काही महिन्यांपूर्वी यावर थोडा विचार केला होता, पण तेव्हा काही सुचलं नाही.
मास्तर, ते एबीसीडी काय लिहीलं आहेत हो वर? नीट उचकटून सांगा की.
25 Aug 2011 - 8:13 pm | रेवती
'पत्नी' म्हटलं की सगळं आलच!;)
25 Aug 2011 - 11:36 pm | आशु जोग
एक होता राहुल विन्सि आनि २ सोनिया मेनियो
25 Aug 2011 - 11:36 pm | आशु जोग
एक होता राहुल विन्सि आनि २ सोनिया मेनियो
25 Aug 2011 - 11:45 pm | चेतन सुभाष गुगळे
मला जाणवलेली काही लक्षणे...
म्हणजे बहुधा त्या असाव्यात की ज्या पुरुषांची अपुर्या वस्त्रांतली छायाचित्रे संकेतस्थळावर टाकतात, त्यांना अश्लील विशेषणे बहाल करतात, इतर पुरूषांशी कचाकचा भांडतात, डोंबलं, हुडूत असे शब्द वापरून समोरच्याला गप करतात. इतकं करून पुन्हा समोरच्यालाच मोठं व्हायची सूचना करतात.
26 Aug 2011 - 1:59 am | प्रियाली
उगी उगी बाळा रडू नको. :) मोठा हो!
26 Aug 2011 - 2:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
हे रडं नसून 'वैश्विक सत्य' आहे, असा माझा दावा आहे. याच्या पुष्ट्यर्थ हा दुवा पहा.
26 Aug 2011 - 7:13 am | चेतन सुभाष गुगळे
एकेरीवर का आली? तू आली म्हणून मीही आलो. घे न रडता...
26 Aug 2011 - 7:42 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
पण आळी म्हणजे तर छोटी गल्ली! प्रियाली हा आयडी छोटीशी गल्ली, alley कसा काय होईल?
बाकी ते संशोधनपर लेखनाचं वाचन कुठवर आलं हो चेतन सुभाष गुगळे?
26 Aug 2011 - 8:08 am | चेतन सुभाष गुगळे
<< प्रियाली हा आयडी छोटीशी गल्ली, alley कसा काय होईल? >>
होऊ शकतं. आख्ख्या गल्लीतल्या बायका आलटून पालटून हा आयडी वापरून आपली मतं इथे टंकत असतील. यापूर्वीच्या मान्यवर महिलांनी माझा कधीच एकेरी उल्लेख केला नव्हता. पण आताचा लेटेस्ट प्रतिसाद पाहा तिथे माझा एकेरी उल्लेख केला गेलाय. कदाचित एकाहून अधिक व्यक्ति असाव्यात असा संशय घ्यायला जागा आहे. दुभंग व्यक्तिमत्व असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
आता तुमच्या प्रश्नाविषयी -
<< बाकी ते संशोधनपर लेखनाचं वाचन कुठवर आलं हो चेतन सुभाष गुगळे?>>
अनेक विषयांवर वाचन चालु आहे..तुम्हाला कुठलं अभिप्रेत आहे? वैद्यकीय म्हणाल तर काल रात्री याच संकेतस्थळावर पंचवीस प्रकरणे प्रकाशित केली आहेत. सव्वीसावे प्रकरण मिरेना विषयी आहे, लवकरच इथे प्रकाशित केले जाईल.
अवांतर : - माझं संपूर्ण नाव वापरून केलेला उल्लेख आवडला. धन्यवाद.
26 Aug 2011 - 8:16 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
voilà१,२! राजेश, आणखी थोडे बोसॉन्स असण्याची शक्यता वर्तवली आहे पहा!
तेगमार्कचं संशोधन हो, मल्टीव्हर्सचं. ते कुठवर आलं? (वेगळी खरड कशाला लिहा, म्हणून इथेच विचारून घेते.)
१. पुन्हा माझ्या गटारातून च्यायला, आयला बाहेर आलं तर वाद वाढायचे, त्यापेक्षा फ्रेंचमधे आश्चर्य व्यक्त केलं की कसं एकदम दोन चार पायर्या उंचून उच्चभ्रू होता येतं. शिवाय तस्साच जोरकस उच्चार लिहून व्यक्त करता येतो.
२. "वल्लाऽ"च्या जवळचा उच्चार असल्यामुळे उंटवाले बिकाशेखही खूष होतील.
26 Aug 2011 - 8:32 am | चेतन सुभाष गुगळे
<< तेगमार्कचं संशोधन हो, मल्टीव्हर्सचं. ते कुठवर आलं? >>
तिथे तर डोंबल, हुडूत असे शब्द वापरून मला गप्प केलंत. मी मांडलेल्या युनिवर्सल सेट च्या संकल्पने विषयी तुम्ही चकार शब्दही बोलायला तयार नाही. मी तिथे इतके पर्याय सूचविले त्यापैकी एक ही तुमच्या सोयीचा नाही काय? एकाचा जरी वापर केला असतात तरी मी गंभीरपणे ते तेगमार्कचं संशोधन नक्की वाचायला घेतलं असतं.
इथे दुसर्याच्या धाग्यावर तिसर्याच विषयाची चर्चा कशाला?
तुमच्या फ्रेंच भाषेच्या ज्ञानाविषयी कौतूक. मी देखील २००८ मध्ये मॅंडरीन (चीनी) भाषा प्राथमिक पातळीवर शिकून घेतली,
http://www.youtube.com/watch?v=eFbeNwZ8jvg
पण त्या शिकवणी वर्गात शिव्या शिकवल्याच नाहीत. वर्गात माझ्यासोबत तीन महिलाही असल्यामूळे ते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन शिकवत नसावेत बहुधा. मलाही शिव्या शिकण्याची गरज नसल्याने मीही चौकशी केलीच नाही.
26 Aug 2011 - 8:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो, पण चांगला एम.आय.टी.मधला हुशार प्राध्यापक तो तेगमार्क, त्याचं संशोधन सोडून मी आंतरजालावरच्या आयडीचे (क्रिडेंशल्सही माहित नसताना) विचार कशाला वाचू विश्वरचनेबद्दल? याचं कायतरी स्पष्टीकरण द्याल.
छे हो, मला फ्रेंच कसलं येतंय? आपले इकडून तिकडून दोनचार शब्द उधारीवर नाहीतर ढापून आणायचे. मॅंडरीन शिकण्याचा क्षीण प्रयत्न केला होता, पण माझं 'मा-मा' ऐकून माझ्या मित्र-मैत्रिणींनी नाद सोडला. शेवटी "अगदीच आपण ढ, एकही भाषा शिकता येत नाही", असं डिप्रेशन यायला लागल्यावर एका पोलिश मित्राकडून चार पोलिश शिव्या शिकून घेतल्या.
पण तसं फ्रेंच voila हे इंग्लिशमधेही वापरतात हो, जसं जर्मन भाषेतलं uber, ruck-sack आलंय तसंच!
26 Aug 2011 - 9:28 am | चेतन सुभाष गुगळे
<< आंतरजालावरच्या आयडीचे (क्रिडेंशल्सही माहित नसताना) विचार कशाला वाचू विश्वरचनेबद्दल? >>
यूनिवर्सल सेट हे माझं संशोधन नाही हो. हा भाग शाळेतच शिकविला जातो.
फ्रेंचच्या जोडीला जर्मन, पोलिशचंही ज्ञान आहे तर. पुनश्च कौतूक.
<< अगदीच आपण ढ, एकही भाषा शिकता येत नाही >>
हे काही पटत नाही. भाषा हे विचार व्यक्त करायचं एक माध्यम आहे. असं एखादं माध्यम जरी ज्ञात असेल तरी पुरतं. एकाहून अधिक भाषा येत नाहीत हा काही स्वत:ला ढ मानण्याचा निकष होऊ शकत नाही, (इतर अजून कुठल्या निकषांमुळे तुम्ही तसं ठरवित असाल तर गोष्ट वेगळी).
26 Aug 2011 - 9:03 am | राजेश घासकडवी
खरं सांगायचं तर 'प्रियाली' हा माझाच आयडी आहे. म्हणजे बोसॉन्स नव्हे तर फर्मियॉन्स. (पत्र नव्हे, मित्र च्या चालीवर)
26 Aug 2011 - 9:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
ओहो, तुम्ही अर्ध्या-चक्कराचे (काय दिव्य मराठी आहे हे!) असल्यामुळे एक स्त्री-नामधारी-आयडी आणि एक पुरूष-नामधारी-आयडी घेतलात काय? महान आहात, आमचा हा एक विम्प* नमस्कार मान्य करा.
*क्षीण प्रयत्न यावर कोटी आहे.
26 Aug 2011 - 9:56 am | राजेश घासकडवी
आमच्या चकरा कधी वर कधी खाली असतात. आमचा विक्षिप्तपणा (स्ट्रेंजनेस), आणि चार्म वेगळाच आहे. त्यामुळे कधी या रूपाने प्रगट होतो तर कधी त्या रूपाने. बाकीची चर्चा आम्ही प्रियाली या आयडीने करूच. कदाचित.
26 Aug 2011 - 2:10 pm | प्रियाली
या घोषणेबद्दल "आय अॅम प्रियाली" असे लिहिलेली गांधीटोपी आणि "मी(च) प्रियाली" असे लिहिलेला सदरा तुम्हाला पाठवण्यात येत आहे.
27 Aug 2011 - 12:06 am | आशु जोग
उगी उगी रडू नको Smile
26 Aug 2011 - 5:20 am | शुचि
प्रकाटाआ
26 Aug 2011 - 3:12 am | प्राजु
कांद्याचे भाव, मसाल्याच्या भावापेक्षा जास्त होणार असं ऐकलं आहे.
तसं झालं तर मग सगळे बल्लव आणि सगळ्या सुगरणी काय करणार?
26 Aug 2011 - 6:13 am | स्पंदना
काय करणार?
की काय करणार नाहीत?
26 Aug 2011 - 10:50 am | इरसाल
प्राजुताई कांदे जर का महागले तर सक्तीचा चातुर्मास पाळावा लागणार.
किंवा मग सगळ्या रेसिपी बिनापाण्याच्या....सॉरी बिनाकांद्याच्या कराव्या लागणार.
26 Aug 2011 - 4:07 pm | परिकथेतील राजकुमार
आता नाकानी कांदे सोलणार्यांचे कसे होणार ?
26 Aug 2011 - 6:14 am | स्पंदना
आहे माझ्या कड लक्षण कथा. वेळ मिळाला की टाकतेच.
26 Aug 2011 - 3:25 pm | साती
आमच्या मते ए एम सी हा 'पिवळा पितांबर' आहे,
पितांबर लाल,हिरवा असू शकत नाही तसेच तसेच हा 'सी' नेहमी 'एम' च असणार. 'एफ' असूच शकत नाही.
26 Aug 2011 - 4:30 pm | पंगा
हम्म्म्म्म्...
Chauvinism(3)चे याहून चांगले उदाहरण (अगदी टेक्स्टबूक उदाहरण!) शोधावे तरी लागावे काय? ;)
26 Aug 2011 - 4:32 pm | विनायक प्रभू
प्रकाश पडला पंगा शेठ
26 Aug 2011 - 4:59 pm | सविता
अरेरे... कधी कुठे आणि कसा काय पडला?
फार लागलं नाही ना त्याला?
27 Aug 2011 - 3:32 am | पंगा
धप्पकन.
पाय घसरला. केळ्याच्या सालीवरून. हल्ली लोकांना काही सिविक सेन्सच नस्तो मेला.
26 Aug 2011 - 6:11 pm | पंगा
यावरून, 'साती' ही आयडी एका पुरुषाची आहे, असा निष्कर्ष काढता यावा काय?
म्हणजे पहा, 'साती' ही आयडी एका स्त्रीची असेल, तर हे विधान शोवनिस्टिक ठरते. पण मग हे विधान स्वतःच्याच विरोधात जाते. (कारण, या विधानानुसार स्त्री ही शोवनिस्टिक असूच शकत नाही.) म्हणजे 'साती' ही आयडी एका स्त्रीची असू शकत नाही.
उलटपक्षी, 'साती' ही आयडी जर एका पुरुषाची असेल, तर मग हे विधान शोवनिस्टिक ठरत नाही. पण मग पुरुषाने शोवनिस्टिक असलेच पाहिजे, नसून चालणार नाही, असे या विधानात कोठेही म्हटलेले नसल्याने ही बाब या विधानाच्या आड येत नाही.
सबब, एखादी आयडी ही (१) एक तर पुरुषाची किंवा स्त्रीची असू शकते, आणि (२) दोन्ही असू शकत नाही, हा गृहीतकसंच घेतल्यास, आणि (३) याव्यतिरिक्त कोणतीही शक्यता विचारात न घेतल्यास*, 'साती' ही आयडी एका पुरुषाची आहे, या निष्कर्षाप्रत येण्यास कोणताही प्रत्यवाय नसावा.
अर्थात, 'साती' ही आयडी पुरुषाची असावी की स्त्रीची, हा पूर्णपणे त्या आयडीचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु केवळ एखाद्या फुटकळ विधानावरून होम्सगिरीने (किंवा वॉटसनगिरीने) काय वाटेल ते निष्कर्ष कसे काढता येऊ शकतात, याचा एक किंचित प्रयोग करून पाहिला, इतकेच.
सातीकाका हलकेच घेतील, अशी आशा आहे. ;)
* गृहीतकांचा फापटपसारा उगाचच न वाढवण्याच्या उदात्त हेतूने हा वस्तरा लावल्या गेलेला आहे.
26 Aug 2011 - 11:15 pm | साती
फापटपसारा आवडला.
किरण आणि फ्रेंडस वाचण्याच्या आधीपासूनच आम्हाला एम.पी.डी. झालाय त्यामुळे मी स्त्री किंवा पुरुष आय डी काहीही असू शकते,पण काका.... ईईईईईई. दादा,भैया,दोस्त,मित्रा तरी म्हणा.
(आता वयाच्या बाबतीत इतकं डिफेन्सिव झाल्यावर माझा आय डी स्त्री का पुरुष हा प्रश्न पडु नये.)
26 Aug 2011 - 11:27 pm | पंगा
...'बंड्या' चालेल?
ठीक आहे, बंड्या! ;)
26 Aug 2011 - 11:33 pm | साती
चालेल.
बंडी-साती.
26 Aug 2011 - 11:36 pm | पंगा
लक्षात ठेवीन.
26 Aug 2011 - 3:30 pm | daredevils99
हे सगळं चाल्ललय काय?
26 Aug 2011 - 5:46 pm | विजुभाऊ
मास्तर नव्या वर्गाला ए बी सी डी शिकवत आहेत
26 Aug 2011 - 6:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर, काय कल्लं नाय ?
-दिलीप बिरुटे
27 Aug 2011 - 3:04 pm | विनायक प्रभू
पुरुष हा जेनेटीकली मेल शोवानिस्ट पिग असतो..
पण स्त्री फिमेल शोवानिस्ट सौ. असते का? (सौ हा शब्द सहजरावांकडुन साभार)
लक्षणे काय?
असा प्रश्न.
27 Aug 2011 - 12:00 am | आशु जोग
चेतन सुभाष गुगळे तूसी ग्रेट हो
तुम्ही आहात तोवर आम्हाला या लोकांना घाबरायचे कारण नाही
जिते रहो
जिते रहो
27 Aug 2011 - 8:31 pm | बिपिन कार्यकर्ते
मी पूर्ण सहमत आहे.
सध्या इतकंच. गुर्जींच्या समोर आम्ही गप्प असतो.
28 Aug 2011 - 4:16 pm | चेतन सुभाष गुगळे
<< तुम्ही आहात तोवर आम्हाला या लोकांना घाबरायचे कारण नाही >>
तुम्हाला निराश करणार नाही. खात्री बाळगा.
धन्यवाद.