१०० कौरवांची नावं काय आहेत???

मला काही माहित आहेत
१. दूर्यौधन
२. दु:शासन
३. युयुत्सु

तुम्हाला माहीती आहेत का?

१००

माझ्याकडे होती फार फार पूर्वी १०० कौरवांची नावे..पण आता नाहीत,हरवली कुठेतरी Sad

१०१ कौरवांची नावे.

The Kauravas १०१

Duryodhanan
Dussaasanan
Dussahan
Dussalan
Jalagandhan
Saman
Sahan
Vindhan
Anuvindhan
Durdharshan
Subaahu
Dushpradharshan
Durmarshanan
Durmukhan
Dushkarnan
Vikarnan
Saalan
Sathwan
Sulochanan
Chithran
Upachithran
Chithraakshan
Chaaruchithran
Saraasanan
Durmadan
Durvigaahan
Vivilsu
Vikatinandan
Oornanaabhan
Sunaabhan
Nandan
Upanandan
Chithrabaanan
Chithravarman
Suvarman
Durvimochan
Ayobaahu
Mahaabaahu
Chithraamgan
Chithrakundalan
Bheemavegan
Bheemabalan
Vaalaky
Belavardhanan
Ugraayudhan
Sushenan
Kundhaadharan
Mahodaran
Chithraayudhan
Nishamgy
Paasy
Vrindaarakan
Dridhavarman
Dridhakshathran
Somakeerthy
Anthudaran
Dridhasandhan
Jaraasandhan - (It Is questionable if Jaraasandha(n?) is a part of the Kaurava Clan. The actual story can be found [1])
Sathyasandhan
Sadaasuvaak
Ugrasravas
Ugrasenan
Senaany
Dushparaajan
Aparaajithan
Kundhasaai
Visaalaakshan
Duraadharan
Dridhahasthan
Suhasthan
Vaathavegan
Suvarchan
Aadithyakethu
Bahwaasy
Naagadathan
Ugrasaai
Kavachy
Kradhanan
Kundhy
Bheemavikran
Dhanurdharan
Veerabaahu
Alolupan
Abhayan
Dhridhakarmaavu
Dhridharathaasrayan
Anaadhrushyan
Kundhabhedy
Viraavy
Chithrakundhalan
Pramadhan
Amapramaadhy
Deerkharoman
Suveeryavaan
Dheerkhabaahu
Sujaathan
Kaanchanadhwajan
Kundhaasy
Virajass
Yuyutsu
Dussala

आताच मी १

आताच मी १ ब्लॉग वाचत होते त्यात त्यांच्या जन्माची कथा पण होती.
धन्य ती गांधारी........ Whew!

छळ...

कुणाही छळणार्‍या १०० जणांचे नांव विचारात घ्यावे..........जसे ॠचा.

मी १ ला

Cool

मी १ ला कौरव की १०० तेवढं सांगा काका.

उदाहरण..

अहो ते एक उदाहरण आहे. जसे..... म्हणजे उदाहरणादाखल. नांवे काहीही असू शकतील अगदी प्रभाकर पेठकर सुद्धा.

दुर्योधन / दु:शासन ही नावे?

कोण पोटच्या पोराचे नाव दुर्योधन किंवा दु:शासन असे ठेवेल? माझ्या समजुतीप्रमाणे त्यांची खरी नावे सुयोधन आणि सुशासन अशी होती. महाभारतकारांनी त्यांच्या कृत्यामुळे त्यांना दुर्योधन / दु:शासन अशी टोपणनावे दिली.

असो. काही महिन्यांपूर्वीच्या लोकरंगमध्ये सर्व १०० नावे पाहिल्याचे आठवते. मिळाल्यास येथे दुवा देईन.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विकर्ण

हा ही एक कौरव.
कौरव दरबारातील द्युत - वस्त्र हरण प्रयत्न ह्यामध्ये वस्त्र हरण आणि एकुणच त्या सभेत पांडवांना देण्यात येणारी हीन
वागणुक ह्याला भर सभेत्/दरबारात कडाडुन विरोध करणारा एकमेव कौरव.

आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)

>>कोण

>>कोण पोटच्या पोराचे नाव दुर्योधन किंवा दु:शासन असे ठेवेल?

Surprise

गांधारीला विचार...

तिने का ठेवले ते तिच सांगेल..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ही घ्या...

वा...

वाचकराव,
छान दुवा.... सगळी नावे आहेत त्यात. ऋचा, वाच तिथे आहेत सगळी नावे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दु:शाला

१०० : १ ...?? असूदेत.
त्यात काहींची नावे वाईट अन् काहींची चांगली असे का? कोणाला माहित असल्यास प्रकाश टाकावा.

खरेतर कौरव

खरेतर कौरव १०१ होते
त्यांना १ दु:शाला नावाची बहीण होती

महाराष्ट्

महाराष्ट्रात काही विशिष्ट जमाती॑मध्ये 'दुर्योधन' हे ना॑व ठेवतात

कौरव जन्माची गोष्ट

गांधारीला दिवस गेल्यावरही २ वर्ष आपत्य होत नाही यावर चिडून तीने गर्भावर प्रहार केला, तीला आणि कौरव वंशाला वाचवण्या साठी भिष्मांनी व्यासांना बोलावले (भिष्म आणि व्यास हे भाऊ-भाऊ होत)
व्यासांनी तुपाच्या मडक्यात (किंवा विशिष्ट जलात)हे १०० तुकडे ठेवले. जवळ पास १ वर्षानंतर यातून (जीव निर्माण केले आणि) मुले ऊत्पन्न झाली . (हे सर्व होई पर्यंत धृतराष्ट्राच्या 'सेवेकरीता' ऐक दासी होती)
९९ मुले, १ मुलगी (दुश्शला) आणि धृतराष्ट्राला दासी पासुन १ मुलगा (युयुत्सु) होता. असे हे १०० कौरव होते. Nail Biting

थोडसं अवांतर

(भिष्म आणि व्यास हे भाऊ-भाऊ होत)
माझ्या माहिती प्रमाणे हे नातं खरच गुंतागुंतिचं आहे.
आपण समजतो तशे ते थेट "सावत्र" भाउ सुद्धा नव्हते.(आणि सख्खे तर नाहिच नाही.)
(रक्ताचं नातं नव्हतं.)

मत्स्य गंधा आणि पराशर मुनींना एक पुत्र झाला त्यां नाव "व्यास"

गंगा आणी शांतनु राजा ह्यांना झालेला मुलगा म्हंजे भीष्म.

पुढे खुप खुप वर्षांनी मत्स्य गंधा आणि शंतनु ह्यांनी विवाह केला.(ह्या दोहांच्याही जन्माच्याअ कित्येक वर्षे नंतर.)
भीष्म आणि व्यास ह्यांच्यात अशाप्रकारे ना समान (सख्खे)वडील होते.
ना समान (सख्खी) माता.

बाकी, गांधारेच्या त्या मुलीचं नाव "सु शला" च असावं असं वाटतं.

आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)

तुझा मुलगा माझा मुलगा मिळुन आपल्या मुलाला मारात आहेत.

मत्स्य गंधा आणि पराशर मुनींना एक पुत्र झाला त्यां नाव "व्यास"
गंगा आणी शांतनु राजा ह्यांना झालेला मुलगा म्हंजे भीष्म.
पुढे खुप खुप वर्षांनी मत्स्य गंधा आणि शंतनु ह्यांनी विवाह केला.(ह्या दोहांच्याही जन्माच्याअ कित्येक वर्षे नंतर.)
भीष्म आणि व्यास ह्यांच्यात अशाप्रकारे ना समान (सख्खे)वडील होते.ना समान (सख्खी) माता.

कालांतरानन्तर शंतनु मत्स्यगंधेला एकदा म्हणाला तुझा मुलगा माझा मुलगा मिळुन आपल्या मुलाला मारात आहेत.

"तुझा

"तुझा मुलगा....माझा मुलगा...आपला मुलगा..."

Smile :-) ह.ह .मु.व.

आपलाच,
मनोबा

ह्यालाच

ह्यालाच 'टेस्ट ट्युब बेबी' म्हणतात काय?

होय ...

पु. ना. ओकांची पुस्तके वाचा. सर्व वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाची त्रेता आणि द्वापारयुगातच झाल्याचे आढळेल Smile

१०० कौरवांची नावं काय आहेत???

दु:शाला हिचं सुध्धा खरं नाव सुशाला होतं का?

सुशीला

मुरमुरे किंवा चुरमुर्‍यांवर पाणी शिंपडून पोह्यांसारखा एक पदार्थ करतात त्याला सुशीला म्हणतात.

(स्मरणशील) आजानुकर्ण

कौरव १ ; कौरव २

कौरव १ ; कौरव २ ; कौरव ३ ;कौरव ४...कौरव १००...जसे पेन्टियम ; पेन्टियम २ ;पेन्टियम ३
( एक शंका हे कौरव लपंडाव खेळताना १०, २०, ३०, ४०, ५०,.,.,...,१०० कसे म्हणत असतील)

एक शंका हे

एक शंका हे कौरव लपंडाव खेळताना १०, २०, ३०, ४०, ५०,.,.,...,१०० कसे म्हणत असतील ---तोंडाने...

"आई माझ पत्र हरवल" खेळताना कौरवाना केवढ मोठ रिंगण करुन बसावे लागत आसेल नाही? आणि क्रिकेट खेळताना नेहमी एका कुणाला तरी बाहेर बसावे लागत आसेल किंवा अंपायर व्हावे लागत आसेल.... बिच्चारा.

क्रिकेट

क्रिकेट खेळताना नेहमी एका कुणाला तरी बाहेर बसावे लागत आसेल किंवा अंपायर व्हावे लागत आसेल
गणीत चुकतय भौ

गणित

कसे चुकेल? १०० कौरव.
११ च्या ९ टीम = ९९ +१ (अंपायर) = १००
दु:शाला चीअर गर्ल

चीअर गर्ल

Rolling On The Floor
हाण तिचायला कंदिल्या !! डायरेक्ट चीअर गर्लच बनवुन टाकलस रे दु:श्शलेला !!

आता

Smile)

आता दु:शासन जास्तच गडबडीनं द्रौपदीची साडी ओढायला लागेल....बहिणीची लाज झाकायला कापड नको का त्याला? Smile

मस्त रे ध

मस्त रे ध मु...
बहिणीची लाज झाकायला कापड नको का त्याला_
लोळून हसतोय... Rolling On The Floor Rolling On The Floor

_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

(विषय दिलेला नाही)

Rolling On The Floor Rolling On The Floor

एका टीम मध्य ऑफिशियली १२ खेळाडु असतात

ए आम्बोळ्या क्रिकेट मध्ये एका टीम मध्य ऑफिशियली १२ खेळाडु असतात
१२* ८ = ९६ होतात. बाकी ४ मेंबरांचे काय करणार ( हल्ली ४था अम्पायर नावाचा कार्यक्रम असतो.)

:)

मला माहीत असलेल्या काही कौरवांची नावं खालीलप्रमाणे आहेत -

(माझ्या माहितीप्रमाणे ही नावं कौरवांचीच आहेत, सदर नावांशी मराठी आंतरजालावर वावरणार्‍या अन्य कुणा व्यक्तिच्या नावांशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ एक योगायोग समजावा!)

१) तात्या अभ्यंकर
२) महेश वेलणकर
३) विनायक गोरे
४) मिलिंद भांडारकर
५) संजोप राव
६) प्रियाली
७) कोलबेर
७) आजानुकर्ण
८) धोंडोपंत
९) केशवसुमार

असो...

अजून कुणाला आठवल्यास उरलेली नावं येथे अवश्य द्यावीत ही विनंती.. ! Smile

आपला,
(कौरव) तात्या.

ह्म्म

आणि उरलेले कौरव म्हणजे त्यांची जालावरची अनेक नावे <Tongue
(केशव) सुमार
स्वगतः माझे खरे नाव काय? Confused

लय खास!

आणि उरलेले कौरव म्हणजे त्यांची जालावरची अनेक नावे
हे लय खास! Smile
स्वाती

हाहाहा :))))))

तात्या,
मराठी संकेतस्थळावरील महाभारतातील कौरवांची नावे बरोबर हुडकली.
ह.ह.पु.वा !!!!

काही राहिलेली नावे !!!

शशांक (संस्थळाचा मालक )
अत्यानंद ( बाप रे मेलो आता )
भोमेकाका ( च्यायला कोण आसामी होती/ होता, मला अजून कळले नाही. )

(माझ्या माहितीप्रमाणे ही नावं कौरवांचीच आहेत, सदर नावांशी मराठी आंतरजालावर वावरणार्‍या अन्य कुणा व्यक्तिच्या नावांशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ एक योगायोग समजावा!)

धमाल

Smile)

धमाल मुलगा
आनंदयात्री
छोटा डॉन
स्वयंभू

ह्यांना वगळून कसे चालेल हो?

शिपुरडे

अरे हे तर कौरवांच्या सेनेतले मागच्या रांगेतले शिपुरडे ! Smile)

अर्धसत्य ...

आम्ही कौरवाकडून असलो तरी कौरव नव्हतो ...
आम्ही "शकुनीमामांच्या द्युत टीम " मध्ये होतो ...
जेव्हा जेव्हा "दु:शला" ला कंटाळा यायचा तेव्हा ती आमच्याबरोबर "द्युत" खेळायची ...

स्वगत : च्यायला त्या वेळचे द्युत खेळाचे फोटो काढून जर मिपावर चढवले असते तर लोकांचा गैरसमज नसता झाला ...

द्युतपटु छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

हा हेच खरे

हेच खरे आहे .. आम्हाला डानरावांचा शोध लै आवडला .. दु:शला - द्युत लै लै मज्जा ... Smile)
डान्या येतोस ना पुण्याला ... द्युत खेळुत तु मी अन धम्या !

आणि....आणि....आ

आणि....आणि....आणि..........

चियरलिडर दु:शाला?

अरे नक्की ...

मी येतच आहे लवकरच, बसु आपण सगळे ....
तु, मी, धमालिस्तानचे युवराज धमालसिंग, मराठा प्रांताचे अधिपती "इनूराव" व गुजरात शेर "विजूशाह" असे सगळे मोठ्ठा बार उडवून देऊ द्युताचा काय ?
त्यानंतरचा "वस्त्रहरणाचा सोहळा" तेवढा नको ...[ आजकाल दिवस बरे नव्हेत !!!]

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

झंप्याला आणि ऐश्वर्या राय भाऊ

ए त्या झंप्याला आणि ऐश्वर्या राय भाऊ ला कोणते कौरव करायचे ? का त्याना सात्यकी आणि कृतर्वमाच्या यादव कुळात टाकायचे

मी पण!

तिरशिंगराव माणूसघाणे

तशी नावे दहा आहेत पण नंबर फक्त ९?

७ व्या नंबराचे कौरव जुळे दिसतात! Waiting Smile)

(स्वगत - 'चतुरंग' दिसत नाही यात? तरी मला वाटलंच, लेको द्यूत खेळण्याऐवजी 'बुद्धीबळा'ने खेळा म्हणून मागे लागलो होतो त्यामुळे माझा पत्ता ह्यांनी कट केलेला दिसतो! Thinking )
चतुरंग

आणखी काही कौरव तसेच महाभारतकालीन व्यक्ती

आणखी काही कौरव तसेच महाभारतकालीन व्यक्ती
आम्बोळी ( या कौरवाकडे "कन्दील " नावाचे अमोघ अस्त्र होते)
विजुभाऊ ( या कौरवाकडे "क्रमशः " नावाचे अमोघ अस्त्र होते)
मदनबाण ( हा त्याच्या सर्व कौरवा भावांचा गृप फोटो काढायचा)
प्राजु ( एका कौरवाला पुढचा जन्म स्त्री चा मिळेल असा शाप होता)
मनस्वी ( ---तेच----)
प्रभाकर पेठकर (हे भिमाला विराटाच्या दरबारात भिमाला सैपाक शिकवायचे)
स्वाती राजेश (हया ते पदार्थ चाखुन पहायच्या)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ( हे कौरवांचे व्याकरणाचे शिक्षक होते)

ही हा हा हा

(विषय दिलेला नाही)

Rolling On The Floor Rolling On The Floor Rolling On The Floor

भडकमकर मास्तर

मास्तर हि एक महाभारतकालीन व्यक्ती होय.

हे ना कौरवांकडील होते ना पांडवांकडील. पण याना बर्‍याच अस्त्रविद्या अवगत होत्या.

महाभारतातील युद्ध , द्रौपदी वस्त्रहरण्,भीम्-हिडींबा राक्षस विवाह, झालेच तर ध्रुतराष्ट्र पांडू व विदुराचा नियोग पद्धतीने जन्म आणि असे बरेच इव्हेण्ट मास्तरानीच म्यानेज केले होते.

महाभारतात

महाभारतातील युद्ध , द्रौपदी वस्त्रहरण्,भीम्-हिडींबा राक्षस विवाह, झालेच तर ध्रुतराष्ट्र पांडू व विदुराचा नियोग पद्धतीने जन्म आणि असे बरेच इव्हेण्ट मास्तरानीच म्यानेज केले होते.

Silly

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !