इनो संपल्या नन्तर .....
हे काय नशीबी आले...हे भाग्य हे असले कसले
बघ निघुन गेले सारे साथी...माझे मनोगतही फ़सले
मी डोळे उघडुन बघतो..तेंव्हा माझे मला कळते
घ्यायला घास मोठा गेलो ...तेंव्हा दंताडच हरवुनी बसले
बहर माझा लिहिता लिहिता केंव्हाच सुकोनी गेला
फ़ुका कौतुक होत होते...तेही आता अंतरले
उरल्या कथा ;जेवण यादी .प्रतिसाद नाही मिपावरती
विखार माझा फ़ुसका ठरला...अन विचार वैभव हरले
आता शिव्या उरल्या ओठी...... पोटी परी जळजळणे
ईनो घेउन.जिवंत रहाणे हेच नशिबी केवळ उरले
उपक्रम एकटाच राबवीत बसलो ऐसा
मीच मला म्हणूवूनी थोर.. काळीज तरी ना निवले
सोबत होते, तेही गेले निघून दुसऱ्या वाटे
वर्जेश गर्जेश आता कसला ...वाटे.पिसाळले श्वानच डसले
लुब्र्या सारखा तसाच राहिलो.... भुंकत मिपा वरती
काय लिहितो मी; फिकीर कोणा, कोणी वाचले वा ना वाचले
हे काय नशीबी आले...हे भाग्य हे असले कसले
बघ निघुन गेले सारे साथी...माझे मनोगतही फ़सले
प्रेरणा: अं जालावरील "ते" व्यक्तीमत्व
विजू भाऊ - बहर माझा लिहिता
जगदंब जगदंब .. सॉरी .. राव
आत्मवृत्त आवडले. आणि
आत्मकथन आवडले.
आत्मकथन आवडले.