✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कान्हा

क — कोमल, Wed, 02/23/2011 - 17:00
श्रावणाच गाण तुझ्या ओठी सुरु होत, ऊन पावसाशी झिम्मा, मन खेळत बसतं॥ इन्द्रधनुच्या कमानीत तुझी कमनीय काया, माझ्या मनाला मोहते,तुझी सप्तरंगी छाया॥ ओठी बासरी तुझ्या, तिचे वेडे खुले सुर, चिंब पावसात भिजे, मन बनून मयूर॥ माथ्यावरी सजे मोरपिसं, जणू पाचूचा खड़ा, आला बघा गं सयांनो, माझा कान्हा-सावला॥ त्याच्या सोनेरी देहाची, सोन्या सारखी किरणे, तशी सोनेरी शेवंती, गाते पहाटेचे गाणे॥ माझ्या सावल्या देहात, "सावल्या"चेच चैतन्य, दर्पणात पाहे मी, माझ्या सावल्या चे बिंब॥ नाही मी राधा, अन मीरा ही नाही तरी तुझीच आस कान्हा धरून मी राही... तरी तुझीच वाट कान्हा पाहत मी राही॥

प्रतिक्रिया द्या
1521 वाचन

💬 प्रतिसाद (3)

मस्त !

कच्ची कैरी
Wed, 02/23/2011 - 18:15 नवीन
मस्त ग!आवड्ली कविता.
  • Log in or register to post comments

कविता खुपच छान आहे .. २ दा

गणेशा
Wed, 02/23/2011 - 20:24 नवीन
कविता खुपच छान आहे .. २ दा वाचुन ही अजुन वाचाविशी वाटते आहे.. असेच लिहित रहा.. वाचत आहे .. अवांतर : सावला हा हिंदी शब्द आहे बहुतेक, सावळा हा मराठी.. म्हनुन सावला शब्द सावळा म्हनुनच वाचला .. छान वआटला. चु.भु.दे.घे.
  • Log in or register to post comments

मस्त ग कोमल... तुझ्या सगळ्या

हरिप्रिया_
गुरुवार, 02/24/2011 - 09:32 नवीन
मस्त ग कोमल... तुझ्या सगळ्या कविता मिळू दे आम्हाला वाचायला..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा