Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by तुषार घवी on Fri, 02/18/2011 - 10:38
मिपा वरील हा माझे पहिलेच लि़खाण, आणि लिखाणाचे प्रयोजन हे कि आपल्या (पुणेकरान्च्या) लकडी पूला ला २५० वर्षे पुर्ण झाली. या निमित्ताने मिपाकरान्कडून लकडी पूलाबद्दल काही अधिक माहिती मिळावी ही अपेक्षा.
  • Log in or register to post comments
  • 16641 views

प्रतिक्रिया

Submitted by स्पा on Fri, 02/18/2011 - 10:46

Permalink

छान ळीहित आहात आजचा भाग

छान ळीहित आहात आजचा भाग आवडला :) पुढील ळीखाणास शुभेच्छा
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Fri, 02/18/2011 - 11:18

Permalink

बघा बघा. पुल लकडी असूनही २५०

बघा बघा. पुल लकडी असूनही २५० वर्षे टिकला. अन आताचे पुल बांधता बांधता पडतात.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Fri, 02/18/2011 - 11:23

Permalink

लकडी पुला खालुन खुप पाणी गेले

आता तरी तिथे उड्डाणपुल व्हावे हिच इच्छा. बाकी लकडीपुला खाली तुम्ही काय करत असता?
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 02/18/2011 - 11:25

Permalink

लकडीपुल हा पुल आहे पुलावरुन

लकडीपुल हा पुल आहे पुलावरुन इकडून तिकडे जाता येते. त्याच बरोबर तिकडून इकडे पण येता येते. तुम्ही समोरील बाजुला गेलात की इकडची बाजु तिकडची होते. त्यामुळे पुलावरुन फक्त इकडून तिकडे जाता येते असे दोन्ही बाजुला उभे राहुन म्हणता येते. लकडीपुलाखालुन एक गटार वहाते. सभ्य पुणेकर तिला नदी म्हणतात. पूरे ? की अजुन सांगु?
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 02/18/2011 - 11:33

In reply to लकडीपुल हा पुल आहे पुलावरुन by अवलिया

Permalink

लाकडी पुलाबद्दल अजुन काही फॅक्ट्स

१. लाकडी पुल हा लाकडापासुन बणलेला णाही. २. लाकडी पुला वरुन दुचाकी वाहणांस बंदी आहे. एकदा मी लाकडी पुलाहुन दुचाकी घेऊन गेलो असता मामांनी मला प्रेमाने पकडले होते , आणि १०० रुपये दिल्यावर अगदी तेवढ्याच प्रेमाने ते मला सोडायला देखील आले होते. ३. लाकडी पुल हा मॅग्नेटिक असावा , कारण तो उत्तर-दक्षिण ह्या दिषांना सेटल झालेला आहे. ४. एका साईडला गरवारे पुल तर दुसर्‍या साईड ला अलका टॉकिज , असा सांस्कृतिक वारसा लाकडी पुलाला लाभलेला आहे. ५. अलिकडे लाकडी पुलावरुन रेंबो सर्कस दिसते ( चु.भु.द्या.घ्या) ६. बरेच लोकं लाकडी पुला खालच्या कृष्णगंगेत कपडे धुताना दिसतात , सकाळी लवकर गेल्यास अन्य अवयवही धुताना दिसतात. ७. एकाच नदीवर एवढ्या जवळजवळ बांधलेल्या पुलांची संख्या जगात सर्वांत जास्त आहे त्यामुळे लाकडी पुलाचे स्पेशलत्व कमी झाले आहे. ८. लाकडी पुलावरुन एकदा मी माझी जुनी फाटकी बॅग नदीत फेकुन दिली होती. ९. लाकडी पुल मला खुप खुप आवडतो . १०. पुण्यात अजुन लाकडी पुल णिर्माण झाले तरी ह्या आद्य लाकडी पुलांची सर त्याला येणार नाही. - लाकडी टारझन
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Fri, 02/18/2011 - 11:54

In reply to लाकडी पुलाबद्दल अजुन काही फॅक्ट्स by टारझन

Permalink

५. अलिकडे लाकडी पुलावरुन

५. अलिकडे लाकडी पुलावरुन रेंबो सर्कस दिसते.
टारोबा, तुम्ही एका पुलावरुन दुसर्या पुलावर टुणकण उडी मारलेली आहे. रेंबो सरकस ही काकासाहेब गाडगीळ पुलावरुन दिस्त्ये. लकडी पुलावरुन फक्त सरकसचा तंबु दिसतो. तसे पाहता, शर्यती लावुन आम्च्या बालगोपाल मंडळाच्या सदस्यांनी लकडी पुलावर बरीच कामे केलेली आहेत.(सु.सां.न ल.)
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 02/18/2011 - 11:54

In reply to लाकडी पुलाबद्दल अजुन काही फॅक्ट्स by टारझन

Permalink

खांब किती आहेत ते ल्याहायला

खांब किती आहेत ते ल्याहायला विसरलात.. :)
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Fri, 02/18/2011 - 12:05

In reply to लाकडी पुलाबद्दल अजुन काही फॅक्ट्स by टारझन

Permalink

मग फक्त चारचाकीच वाहने जाऊ

मग फक्त चारचाकीच वाहने जाऊ देतात का? का पायी पायी चालत जायचे? समजा गाडीतून, दुचाकीवरून फिरायला गेलो आणि लाकडी पूल ओलांडावा लागला तर सगळ्यांनी गाडीतून उतरून गाडी ढकलत ढकलत न्यायची का? तसेच दुचाकीचेही...
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Fri, 02/18/2011 - 12:19

In reply to मग फक्त चारचाकीच वाहने जाऊ by शिल्पा ब

Permalink

लकडी पुल. ह्या विषयीचे

लकडी पुल. ह्या विषयीचे डीट्टेल मार्गदर्शण आपणाला वपाडाव क्लासेस, तु. पा. चौक, फ.कॉ. रस्ता येथे देण्यात येइल. वेळ : सकाळी ५ ते ६/ सायंकाळी ९ ते १०. फीस : २०० $ क्रेडीट कार्ड स्विकारले जातील. (२% अतिरिक्त कर )
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 02/18/2011 - 12:24

In reply to लकडी पुल. ह्या विषयीचे by वपाडाव

Permalink

पण तुमचा तर लोकांच्या चड्ड्या

पण तुमचा तर लोकांच्या चड्ड्या धुण्याचा बिजणेस आहे ना ? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मुलूखावेगळी on Fri, 02/18/2011 - 12:31

In reply to पण तुमचा तर लोकांच्या चड्ड्या by टारझन

Permalink

पण तुमचा तर लोकांच्या चड्ड्या

पण तुमचा तर लोकांच्या चड्ड्या धुण्याचा बिजणेस आहे ना ?
मशीन अ‍ॅटोमॅटिक असली कि १दा सुरु करुन बराच वेळ मिळत असेल ना रे त्यांना;)
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Fri, 02/18/2011 - 13:41

In reply to पण तुमचा तर लोकांच्या चड्ड्या by मुलूखावेगळी

Permalink

पण तुमचा तर लोकांच्या चड्ड्या

पण तुमचा तर लोकांच्या चड्ड्या धुण्याचा बिजणेस आहे ना ? मशीन अ‍ॅटोमॅटिक असली कि १दा सुरु करुन बराच वेळ मिळत असेल ना रे त्यांना;)
मशीणच्या स्पेसिफिकेषणबद्दल आपल्याला व्य. नि. करण्यात येइल. अवांतर चर्चा इथे नकोत. अवांतर : आम्हाला मिळालेल्या वेळात उगाच लुडबुड करु नये. त्याने त्रास होतो. अथवा रजनिला व्य. नि. करावा लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by मुलूखावेगळी on Fri, 02/18/2011 - 14:36

In reply to पण तुमचा तर लोकांच्या चड्ड्या by वपाडाव

Permalink

मशीणच्या स्पेसिफिकेषणबद्दल

मशीणच्या स्पेसिफिकेषणबद्दल आपल्याला व्य. नि. करण्यात येइल.
शुभस्य शीघ्रम
अवांतर : आम्हाला मिळालेल्या वेळात उगाच लुडबुड करु नये. त्याने त्रास होतो. अथवा रजनिला व्य. नि. करावा लागेल.
त्रास कोनाला? रजनी कोन रे वड्या?
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Mon, 02/21/2011 - 12:13

In reply to मशीणच्या स्पेसिफिकेषणबद्दल by मुलूखावेगळी

Permalink

ह्या रिप्लायचे फटु रजनिच्या

ह्या रिप्लायचे फटु रजनिच्या गुप्तहेरांनी टिपले आहेत... आप्ल्याला लागलीच खबर येइल..
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार घवी on Fri, 02/18/2011 - 12:06

In reply to लाकडी पुलाबद्दल अजुन काही फॅक्ट्स by टारझन

Permalink

बहुमुल्य महिती दिलीत. लकडी

बहुमुल्य महिती दिलीत. लकडी पूला बद्दल एवढी महिती कधीच नाही मिळाली.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार घवी on Fri, 02/18/2011 - 12:06

In reply to लाकडी पुलाबद्दल अजुन काही फॅक्ट्स by टारझन

Permalink

बहुमुल्य महिती दिलीत. लकडी

बहुमुल्य महिती दिलीत. लकडी पूला बद्दल एवढी महिती कधीच नाही मिळाली.
  • Log in or register to post comments

Submitted by पंगा on Sun, 02/20/2011 - 02:57

In reply to लाकडी पुलाबद्दल अजुन काही फॅक्ट्स by टारझन

Permalink

थोडी भर

१. लाकडी पुल हा लाकडापासुन बणलेला णाही.
मूळ लकडी पूल हा पेशवाईत जेव्हा केव्हा बांधला गेला, तेव्हा तो लाकडाचाच असल्याबद्दल ऐकलेले आहे. त्याजागी नंतर बांधलेल्या (आता अस्तित्वात असलेल्या) पुलाचे अधिकृत नाव 'छत्रपती संभाजी पूल' असे आहे. मात्र पिढ्यानपिढ्यांच्या जुन्या सवयीने लोक त्यास आजही 'लकडी पूल' असेच संबोधतात. (आजचा 'लकडी पूल' लाकडाचा नाही, हे बरोबर.)
२. लाकडी पुला वरुन दुचाकी वाहणांस बंदी आहे. एकदा मी लाकडी पुलाहुन दुचाकी घेऊन गेलो असता मामांनी मला प्रेमाने पकडले होते , आणि १०० रुपये दिल्यावर अगदी तेवढ्याच प्रेमाने ते मला सोडायला देखील आले होते.
लकडीपुलावर १९९०च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत दुचाकी वाहनांना बंदी नव्हती. मात्र तोपर्यंत लकडीपुलावरील वाहतूक प्रमाणाबाहेर वाढल्याने त्यातील काही वाहतूक इतरत्र वळवण्यासाठी त्या सुमारास शेजारच्या झेडब्रिजचे बांधकाम सुरू झाले. (साधारणतः त्याच सुमारास मी पुणे सोडल्याने त्यानंतर ते बांधकाम पूर्ण होऊन झेडब्रिज वाहतुकीस नेमका कधी खुला झाला, ते सांगू शकत नाही.) नंतर झेडब्रिज पूर्ण झाल्यावर सर्व दुचाकी वाहतूक तेथे वळवण्यात येऊन लकडीपुलावर दुचाकी वाहनांना बंदी आणण्यात आली. (पादचार्‍यांना मात्र लकडीपुलावरून चालण्यास बंदी नाही, असे आठवते.)
६. बरेच लोकं लाकडी पुला खालच्या कृष्णगंगेत कपडे धुताना दिसतात , सकाळी लवकर गेल्यास अन्य अवयवही धुताना दिसतात.
केळकर रस्यावरून सुरू होऊन डेक्कन जिमखाना बसस्टँडमागे उगवणार्‍या काजव्याची आठवण ताजी करून दिल्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा. आहे का तो काजवा अजून? नारायण पेठेतून डेक्कनला यायला तो शॉर्टकट चांगला होता. अनेकदा वापरलेला आहे. फक्त, नाक मुठीत धरून आणि पाय भलत्याच कशात तरी पडत नाही याची खात्री करत जरा जपून चालावे लागे, एवढेच. 'कृष्णगंगा' हे नाव उपहासाने वापरले आहे काय? ('गंगा मैली' अशा अर्थाने?) तसे असल्यास हरकत नाही. अन्यथा, या 'नदी' म्हणवल्या जाणार्‍या (तेवढा पावसाळ्यात कधीमधी पूर येतो फक्त तेव्हा सोडून) नाल्याचे अधिकृत नाव 'मुठा' असे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चैतन्य ईन्या on गुरुवार, 05/28/2015 - 19:21

In reply to थोडी भर by पंगा

Permalink

तो झेड नावाचा वायझेड ब्रिज

तो झेड ब्रीज कोणी वापरतच नव्हते. शेवटी लाकडीपुलावर दुचाकी वाहनांना बंदी घातली म्हणून ते वापरत आले. तसेही ते फार काही चांगले बांधलेले नाहीयेत. जाण्या आणि येण्याचा रस्ता इतका विचित्र आहे कि ते सोयीस्कारच नव्हते. पण तसेही लोकांना सरळ आणि सोयीस्कर काही मिळूच नये किंवा तितका विचार करण्याची ईछाच नाहीये कोणाची.
  • Log in or register to post comments

Submitted by मुलूखावेगळी on Fri, 02/18/2011 - 11:30

Permalink

मी त्या पुलावरुन २ व्हीलर नवी

मी त्या पुलावरुन २ व्हीलर नवी असताना घातली आनि १०० रु दंड भरल्याने माझ्या खुप ह्रुद्य आठवनी आहेत.
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Fri, 02/18/2011 - 11:39

Permalink

लकडीपूलाकडे जो रस्ता जातो

तोच रस्ता लकडीपूलाकडून परत येतो.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Fri, 02/18/2011 - 11:44

Permalink

मग काकासाहेब गाडगीळ पूल

मग काकासाहेब गाडगीळ पूल कुठला? -मुंबईकर माउ
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Fri, 02/18/2011 - 11:48

In reply to मग काकासाहेब गाडगीळ पूल by कवितानागेश

Permalink

त्याला सभ्य लोक (पुणेकर)

त्याला सभ्य लोक (पुणेकर) झेड्-ब्रिज म्हणतात.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Sun, 02/20/2011 - 09:52

In reply to त्याला सभ्य लोक (पुणेकर) by वपाडाव

Permalink

आणि असभ्य

>>त्याला सभ्य लोक (पुणेकर) झेड्-ब्रिज म्हणतात. आणि आमच्यासारखे काही असभ्य लोक त्याला 'झ' पुल असे म्हणतात !!
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Mon, 02/21/2011 - 12:17

In reply to आणि असभ्य by आनंदयात्री

Permalink

आम्हालाही तिकडे सामील

आम्हालाही तिकडे सामील व्हायचंय... मार्गदर्शन करावे...
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Mon, 02/21/2011 - 12:48

In reply to आणि असभ्य by आनंदयात्री

Permalink

"'झ' पुल " याला तुम्ही असभ्य

"'झ' पुल " याला तुम्ही असभ्य म्हनता हा असभ्य लोकांचा घोर अपमाण आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Fri, 02/18/2011 - 11:59

Permalink

लकडी पुलावर निबंध

आमच्या पुण्यात एक लकडी पुल आहे. पुलाला आम्ही ब्रीज असेही म्हणतो. समोरचे काका कायम ब्रीज खेळत असतात. ते ब्रीज खेळताना दारू सुद्धा पितात. ते खुप वाईट आहेत असे आमचा बाबा म्हणतो. बाबा मला घेऊन कधी कधी लकडी पुलावर जातो. पुण्यातली माणसे पुलावरून पाण्यात काही पण फेकतात. मी एका पैलवानाला जुनी फाटकी बॅग फेकताना पाहिले. बाबा "तो माणूस पण वाईट आहे" असे म्हणत होते. नंतर आमच्या बाबाने घरातल्या दारुच्या बाटल्या पुलावरून फेकल्या. खुप मजा आली. घरातला कचरा कमी झाला. त्या पैलवानाला नंतर पोलिस मामाने पकडले आणि त्याच्या कडून पैसे घेतले. आमचा बाबा पण घरात पैसे आणतो. तो ते आईला देतो. आई मला खुप मारते. लकडी पुलावर एकदा सकाळी आईपण आली होती. खालती बरीच माणसे कपडे धुत होती. आमच्या घरी कपडे धुवायला एक बाई येते. मध्येच आई "शी बाई" असे काहीतरी ओरडली. मग आम्ही घरी आलो. बाबा हल्ली सकाळी सकाळी लकडी पुलावर एकटा फिरायला जातो. मला बरोबर नेत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Fri, 02/18/2011 - 12:11

In reply to लकडी पुलावर निबंध by योगी९००

Permalink

निबंध एकदम जमुन आलाय. उद्या

निबंध एकदम जमुन आलाय. उद्या सकाळी आपण फिरायला जाउ. आता हट्ट नको.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Fri, 02/18/2011 - 12:27

In reply to निबंध एकदम जमुन आलाय. उद्या by वपाडाव

Permalink

झक्कास

झक्कास
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Fri, 02/18/2011 - 13:19

In reply to लकडी पुलावर निबंध by योगी९००

Permalink

येक लंबर...

भौत बढीया णिबंध... स्वारी, लकडी / लाकडी पुलाबद्दल म्हाईती नाही...
  • Log in or register to post comments

Submitted by निशदे on Fri, 02/18/2011 - 23:26

In reply to लकडी पुलावर निबंध by योगी९००

Permalink

मस्त

जमलेले आहे.......अजून आपले साहित्यवाचन करायला मिळावे हीच नम्र विनंती..... <<मी एका पैलवानाला जुनी फाटकी बॅग फेकताना पाहिले>><<त्या पैलवानाला नंतर पोलिस मामाने पकडले आणि त्याच्या कडून पैसे घेतले. >> हे फारच आवडले. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 05/28/2015 - 16:47

In reply to लकडी पुलावर निबंध by योगी९००

Permalink

मध्येच आई "शी बाई" असे

मध्येच आई "शी बाई" असे काहीतरी ओरडली.
इंग्लिशमध्ये शी म्हणजे ती. त्यामुळे आई त्या बाईला उद्देशून ओरडली असावी. आमच्या इंग्लिशच्या बाई फार ओरडतात. आणि त्यांना ओ दिल्यावर पोरं रडतात. पण मी रडत नाही. कारण रडणारे रडूबाई असतात. आमच्याकडे कामाला येते तिचे नावही आईने रडूबाई ठेवलेय पण ती रडत नाही, दांड्या मात्र मारते. गांधीजींनी दांडी सत्याग्रह केला होता. साधेपणा कसा असावा हे सांगताना एकदा सर म्हणाले "एक दांडीवर, एक ****". त्यावर मि शंका विचारली की दांडीवर जर ठेवले तर तिथपर्यंत परत चालत जायला नको का? ते कोण जाणार? त्यावर सर हसले आणि डोक्यात एक टप्पल मारली. उगी तिप्पल लावू नको असे आई कायम मला म्हणत असते. पण आपल्याकडे पावडरच आहे, तिप्पल कुठेय असे म्हटल्यावर तिने का मारले मला अजूनही कळालेले नाही. आई दूष्ट आहे. मला नतद्रष्ट म्हणते. संस्कृतच्या सरांना अर्थ विचारला तर डिक्शनरीत नाही म्हणाले.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on गुरुवार, 05/28/2015 - 17:13

In reply to मध्येच आई "शी बाई" असे by बॅटमॅन

Permalink

संस्कृतच्या सरांना अर्थ विचारला तर डिक्शनरीत नाही म्हणाले.

संस्कृतच्या सरांना अर्थ विचारला तर डिक्शनरीत नाही म्हणाले.
डिक्शनरी पाहिजे का डिरे़क्टरी आम्चा प्युन चंद्या नेहमी विचारतो. लोक त्याला कधी कधी चंद्या पिवून आलाय असं उगीचच चिडवतात.चिडवणे वाईट असे आम्च्या भोप्या (त्याचे चिडवून झाल्यावर) म्हणतो. म्हणून आम्ही त्याला लाडाने भोपळ्या म्हणतो. भोपळ्याची भाजी मला आवडत नाही पण आवडणारे भोपळ्याचे घारगे श्रावणात कारतात. श्रावण महिना लक्षात राहयचे कुर्कुरीत कारण म्हणजे त्याच महिन्यात पापडगांव्करांची लिज्जत वाढव्णारी कवीता जाहीरात येते.जाहीरातींमुळे सिनेमा एक सलग पाहता येत नाही आणि लिंक तुटते. "लिंक ताले अच्छे जो अपनेही चाबीसे खुले" असे आलोकनाथ सांगतात. ==पूढे चालू
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 05/28/2015 - 17:31

In reply to संस्कृतच्या सरांना अर्थ विचारला तर डिक्शनरीत नाही म्हणाले. by नाखु

Permalink

=))

आणि आलोकनाथ संस्कारी आहेत. तसे संस्कारी नसल्याने 'लिंक-न' ताले आमच्या आवडीचे. लिंकन हा अमेरिकेचा अध्यक्ष होता. त्याने मुख्याध्यापकांना लिहिलेले एक पकाव पत्र आमच्या शाळेत लटकून ठेवलंय. त्याची सुरळी किंवा विमान केले पाहिजे. प्राचीन काळात विमान होते म्हणतात. परवाच आमच्या घटक चाचणीत चीनचे भाग विचारले होते, भोप्याने प्राचीन आणि अर्वाचीन असे लिहिले. भोप्याला भोपळा मिळाला. तसे म्हणताच तो म्हणाला भो** पळा! मी म्हणालो भोप्या, प्राचीकडे बघून लिवलास का नाय अन्सर सांग बगू खरं. तं म्हणतो कसा, गच्चीत बसलो की प्राचीचीच आठवण येते.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on गुरुवार, 05/28/2015 - 17:51

In reply to =)) by बॅटमॅन

Permalink

आजकाल

पुर्वीसारख्या गच्च्याही राहिल्या नाहीत आणि शिव्याही. पूर्वी शिव्यांमध्येही गच्चीचा वापर व्हायचाच.आमच्या चंद्याला चिडवणारा पेड्णेकर कधी कधी "गच्च आहे रे" असे म्हणतो क्लीनिकला हमखास जावून आलं की . आलं चहात टाकलं की चहाची चव फर्मास लागते असा आमचे नाना माईंआडून सांगतात. नाना नेह्मी माईंच्या आडच असतात असे आमच्या गुरुजींचे ठाम मत आहे. आपले मत कुणाला विकू नका अशी अफवा मतदानाचे दिवसात पसरते त्याकडे कानाडोळा करा असे आम्चा हितेषभाई सांगत असतो् हितेशभाईला दुनियाची खबर जागेवर बसल्या बसल्या मिळते असे तो ग्रेट्थिंकरला मक्याच कणीस खाताना बोलला असा सगळ्यांना वाटते, पण आपण लक्ष्य देऊ नये. मक्याचं कणीस कुठेपण भेटते पण डोक्यात जाणारा मक्या फक्त सिनेमा आणि टीव्हीवर दिसतो. त्याच्या पायी आपण आपलाच टिव्ही फोडू नये,चॅनेल बदलावा असं डांगे साहेब म्हणतात ते काही खोटं नाही.खोटं खर्‍यासारख दिसलं तरी ती थुंकी या बोटीवरून स्वारी या बोटावरून त्या बोटावर न्यायची इगत सगळ्यांनाच जमेलच असं नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 05/28/2015 - 18:42

In reply to आजकाल by नाखु

Permalink

नाखुकाका फॉर्मात!

नाखुकाका फॉर्मात!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 05/28/2015 - 20:39

In reply to नाखुकाका फॉर्मात! by बॅटमॅन

Permalink

अरे काय चाललंय भेंडी.

अरे काय चाललंय भेंडी. मरतोय मी हसून हसून.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on गुरुवार, 05/28/2015 - 20:42

In reply to अरे काय चाललंय भेंडी. by प्रचेतस

Permalink

मरणांतिनी वैराणी !!

मरणांतिनी वैराणी !!
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on गुरुवार, 05/28/2015 - 21:45

In reply to मध्येच आई "शी बाई" असे by बॅटमॅन

Permalink

_/\_

माझ्या निबंधावर बॅटमॅन भाऊंचा आणि ना.खु.चा प्रतिसाद व तसाच एक निबंध वाचून मि.पा.वर असल्याचे सार्थक झाले..!! हा निबंध म्हणजे माझ्या काही आवडत्या प्रतिसादांमधला एक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार घवी on Fri, 02/18/2011 - 12:10

Permalink

पनिपतच्या युद्धानन्तर हा पूल

पनिपतच्या युद्धानन्तर हा पूल बान्धला कि त्याही अगोदरपासून काम चालु होते?
  • Log in or register to post comments

Submitted by बबलु on Fri, 02/18/2011 - 12:14

Permalink

माझ्या ५ वर्षे वयाच्या

माझ्या ५ वर्षे वयाच्या भाच्याच्या लकडी पुलाबद्दलच्या भावना समजून घ्याव्यातः-- ;) ;) मला पुण्याचा लाकडी पूल खूप्प खूप्प आवडतो. आम्हाला मावशी लाकडी-की-काठी गाणे म्हणून दाखवते. मावशीकडे दोन दोन कुत्रे आहेत. काका चिंटूला कधी कधी कुत्रा म्हणतात. चिंटू पक्का अवली कर्टा आहे, माझ्या चड्डीत स्पायडर सोडतो. स्पायडरमॅन मस्त झोके घेतो आणि त्याच्या गर्लफ्रेंडला शहरभर फिरवतो दोरीवरून. माझ्याकडे पण एक दोरी आहे, त्यापासून मी बेचकी बनवली आहे... लाकडी. मला पुण्याचा लाकडी पूल खूप्प खूप्प आवडतो. आम्हाला मावशी लाकडी-की-काठी गाणे म्हणून दाखवते. ...... ...... ......
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Fri, 02/18/2011 - 12:15

Permalink

पानिपत च्या युद्धावर जी फौज

पानिपत च्या युद्धावर जी फौज पुण्याहून कूच झाली ती याच पुलावरून गेली, असे आईकीवात आहे
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार घवी on Fri, 02/18/2011 - 12:25

In reply to पानिपत च्या युद्धावर जी फौज by स्पा

Permalink

पुण्याहून कूच झाली कि परती

पुण्याहून कूच झाली कि परती च्या वेळी या पूलावरुन शहरात गेली. कारण पानिपतचे युद्ध १४ जानेवारी १७६१ ला झाले आणी पूल झाला १७ फेब्रुवारी १७६१ ला.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Fri, 02/18/2011 - 13:44

In reply to पुण्याहून कूच झाली कि परती by तुषार घवी

Permalink

फौज परत आली का?

पानिपतावरून मराठी फौज परत आली का?
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार घवी on Fri, 02/18/2011 - 13:58

In reply to फौज परत आली का? by आजानुकर्ण

Permalink

हो हो, पनिपतावरुन मराठी फौज

हो हो, पनिपतावरुन मराठी फौज (लष्कर + बुणगे) परत आली.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Fri, 02/18/2011 - 13:59

In reply to हो हो, पनिपतावरुन मराठी फौज by तुषार घवी

Permalink

धन्यवाद

माहितीबद्दल आभारी आहे
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Fri, 02/18/2011 - 13:48

In reply to पुण्याहून कूच झाली कि परती by तुषार घवी

Permalink

हे सग्ळं वरच्या परिच्छेदात

हे सग्ळं वरच्या परिच्छेदात यायला हवं होतं. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Fri, 02/18/2011 - 12:26

In reply to पानिपत च्या युद्धावर जी फौज by स्पा

Permalink

अरे

अरे बापरे. मग त्या पुलावरून जाणे नकोच की.
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Fri, 02/18/2011 - 17:02

Permalink

आम्ही तर मस्त टु व्हिलर

आम्ही तर मस्त टु व्हिलर पुलावरुन जातो बाबा ..
  • Log in or register to post comments

Submitted by रमेश आठवले on Fri, 02/18/2011 - 23:21

Permalink

आणखी पूल

हैदराबाद व बडोदे येथेही लकडी पूल आहेत. ईतर ठिकाणी पण असतील.
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Mon, 02/21/2011 - 12:19

In reply to आणखी पूल by रमेश आठवले

Permalink

हैदराबाद येथील पुल हा

हैदराबाद येथील पुल हा "लकडी-का-पुल" आहे... त्याच नावाने एक लोकल ट्रेन स्टेशन सुद्धा आहे...
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com