✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

काय 'ध्यान' आहे! -३

क
कवितानागेश यांनी
Tue, 11/23/2010 - 00:56  ·  लेख
लेख

Book traversal links for काय 'ध्यान' आहे! -३

  • ‹ काय 'ध्यान' आहे! -२
  • Up
  • काय 'ध्यान' आहे! -समाप्त ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7885 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

वेगळाच अनुभव.फक्त तो अनुभव

शुचि
Tue, 11/23/2010 - 01:05 नवीन
वेगळाच अनुभव. फक्त तो अनुभव घ्यायला आपण तयार आहोत का हे ज्याचे त्यानी ठरवायचे.
  • Log in or register to post comments

खरंय.

कवितानागेश
Tue, 11/23/2010 - 01:20 नवीन
माझी देखिल तयारी नव्हती कितीतरी वर्षे, म्हणून तर 'इतर' सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या वाटत होत्या. आता परत जायचा विचार करतेय.... ( क्लास इम्प्रूव्ह्मेंटसाठी!)
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

यकु
Tue, 11/23/2010 - 02:21 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

ओह रे?

स्पंदना
Tue, 11/23/2010 - 08:13 नवीन
ओह रे ? मी कोहरे ताल म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

वाचतिये.छान वाटतय.

रेवती
Tue, 11/23/2010 - 03:24 नवीन
वाचतिये. छान वाटतय.
  • Log in or register to post comments

माउ. इतकी क्लिष्ट गोष्ट अशी

स्पंदना
Tue, 11/23/2010 - 08:12 नवीन
माउ. इतकी क्लिष्ट गोष्ट अशी हसत खेळत भरवते आहेस की पोट भरलेल कळणार सुद्धा नाही. मी पण जाव म्हणतेय. बघु हं! काढते वे़ळ.
  • Log in or register to post comments

शिवाय आम्हाला पूर्ण हिंसेचे

निवांत पोपट
Tue, 11/23/2010 - 08:27 नवीन
शिवाय आम्हाला पूर्ण हिंसेचे पालन करायला सांगितले होते, हिंसा शब्द बदलून अहिंसा अशी दुरूस्ती करा.
  • Log in or register to post comments

हा हा हा

कवितानागेश
Tue, 11/23/2010 - 09:16 नवीन
हा हा हा ( दात विचकून विकट हसणारी स्मायली) हाच 'तो' पाशवीपणा बरे का! रात्री १२ वाजता लिहित असल्याने तो स्पष्ट दिसून आला!
  • Log in or register to post comments

>>आणी एकदम आठवले, 'च्यायला,

स्वानन्द
Tue, 11/23/2010 - 10:10 नवीन
>>आणी एकदम आठवले, 'च्यायला, मी कित्ती घाबरायचे हिला आत्तापर्यंत!' हा बदल मात्र कसा काय झाला नक्की माहित नाही. पण गुरुजी सांगत होते ते आठवले, की 'ध्यानानी 'करूणा' जागी होईल, द्वेष संपेल.' यावरून माझा स्वतःचा अनुभव सांगावासा वाटतो. कामानिमित्त मी मुंबैला होतो. तेव्हा आमच्या गेस्ट हाऊस्च्या आसपास खूप कुत्री होती. म्हणजे साधारण १० नंतर मुख्य रस्ता सोडुन डाव्या गल्लीत जिथे आमची गेस्ट हाऊस ची बिल्डीग होती, तिथे जायला वळलो तर रस्त्यात अगदी १५ -२० कुत्री संपूर्ण रस्ताभर पसरलेली असायची. एक दिवस कामावरून परतत असताना जवळ्पास १० -१२ कुत्री मागे लागली होती. जीव वाचवून कसाबसा सुटलो होतो. पण तेव्हापासून कुत्र्यांची फार भिती मनात बसली होती. कुत्रे दिसले की लांबूनच पळायचो. त्यानंतर १-२ महिन्यानी मी प्राणायाम, बिंदू त्राटक आणि ध्यानाचा सराव करू लागलोहोतो.साधारण २-३ आठवडे न चुकता सराव होत होता. कामाचा ताण नसल्याने वेळ्ही चुकत नव्हती. याच दर्म्यान अगदी प्रकर्षाने जाणवलेल्या बदलांमधला एक बदल म्हणजे ही कुत्र्यांबद्दलची भिती अचानक पणे गायब झाली होती. ती देखील त्यासाठी मी विषेश काहीही प्रयत्न न करता! म्हणजे एवढी की मी अनोळक्या ठिकाणी गेलो आणी तिथे एखादे कुत्रे भटकताना दिसत असेल तर अगदी त्याच्या जवळ जाऊन बसताना देखील भितीचा लवशेश नसे. उलट त्याच्याशी कनेक्ट ( मराठी प्रतीशब्द? ) होता येत असे. मला माहीत आहे, की बर्‍याच जणाना वाटेल की हे तर मी 'तसंही' करू शकतो. पण आधीची भिती आणि मग अचानक झालेला हा बदल, तोही विनासायास हे माझ्या बाबतीत तरी 'तसंही' शक्य झालं नसतं एवढं मात्र नक्की.
  • Log in or register to post comments

खरं सांगू स्वानंद भाऊ, मला

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 11/23/2010 - 15:23 नवीन
खरं सांगू स्वानंद भाऊ, मला एकदाच माझ्या वडलांनी सांगितलं, सांगितलं काय, ऑलमोस्ट दरडावलं, "खबरदार घाबरलीस कुत्र्यांना तर!" आणि कुत्र्यांची भीती गेली, मी वडलांना घाबरून घालवली. अर्थात त्यांनी अशा गोष्टी थोड्या प्रेमळपणे सांगितल्या असत्या तर आयुष्यातली पहिली तेरा वर्ष वडलांचीही भीती वाटली नसती ही गोष्ट वेगळी. आजूबाजूचा निसर्ग पहायला मला माझ्या पीएचडी सुपरवायझरने शिकवलं. याला कुठला नवीन पक्षी-प्राणी दिसला की मी काम करत असतानादेखील तिथून उठवून ते प्राणी-पक्षी दाखवायचा. फिरायला गेलो की नवी जागा, तिथली माती, झाडं यांच्याबद्दल गप्पा मारायचा. किडे उगाचच मारू नयेत वगैरे घरातूनच शिकवलं होतं, पण सायबाच्या देशातल्या डासांमुळे काही वर्ष डास मारायचीही गरज नव्हती. ओडोमॉस सगळ्यांनीच लावलं तर शहरी डासांना त्यांची अंडी उबवण्यासाठी रक्त कुठून मिळणार? आणि तसं झालं नाही तर आपण डासार्भकांची हत्या करू. हे चालतं का? या अशा छोट्या छोट्या गोष्टी शिकायला दहा दिवस विजनवासात का रहायचं हे अजून मला तरी समजलेलं नाही. तुझी लिहीण्याची स्टाईलमात्र आवडली हां! वाटलं तर अवांतर: तुम्ही (विपश्यना करणारे) कोणी 'पाडस' ही कादंबरी वाचली आहेत का? त्यात जोडीचा बाप साप चावल्यावर समोर आलेली हरिणी मारतो, विष उतरवण्यासाठी. तिथे त्याची करूणा जागी झाली असती तर? 'करूणा' असण्याला विरोध नाही, पण प्रत्येक वेळेस करूणामय दृष्टीकोनच असावा का; करूणेचा अतिरेकही त्रासदायक होतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

विजनवास

कवितानागेश
Tue, 11/23/2010 - 16:21 नवीन
तो विजनवास नसतो. ते 'स्वतःसोबत' रहाणे असते. संपूर्णपणे स्वतःबरोबर राहील्याशिवाय आपण स्वतःला कसे काय ओळखणार? साधनेचा उद्द्येश फक्त किडे-पक्षी बघणे हा नाहीये. तो तर फक्त 'साईड इफेक्ट' आहे. मन संवेदनशील होणे हा उद्द्येश आहे. अवांतर: पाडस वाचली अहे. अतिरेक कशाचाही वाइटच. ( कध्धी करु नकोस बरे का!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

सुंदर रसाळ वर्णन् ! पुढचे भाग

सुप्रिया
Tue, 11/23/2010 - 11:20 नवीन
सुंदर रसाळ वर्णन् ! पुढचे भाग वाचण्यास उत्सुक आहे. -सुप्रिया
  • Log in or register to post comments

सुरेख.

यशोधरा
Tue, 11/23/2010 - 16:43 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments

फारच छान!

रुपी
Tue, 05/19/2015 - 05:13 नवीन
फारच छान! खरोखरच आपली फक्त नजर फिरते, आपण 'पहिले' काहीच नसते.>> हेही खूप आवडलं! एकंदरीतच या साधनेबरोबर आलेला हा नवीन दृष्टीकोन आवडला..
  • Log in or register to post comments

मस्तच , साधनेचा अनुभवच वेगळा

कविता१९७८
Tue, 05/19/2015 - 10:45 नवीन
मस्तच , साधनेचा अनुभवच वेगळा ग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा