थारे..! थारे..!!
बायको रोज रात्री साडेअकरापर्यंत बालिका वधू बघते या कारणाने कोर्टातून काडीमोड मिळू शकतो का ??
छळ हां फ़क्त शारिरीकच असायला हवा का? ..तीव्र मानसिक छ्ळाचं काय ?
मी रात्री साडेअकरा वाजता गोड गूळझोपेत शिरत असतो.. जिच्याखेरीज इतर कोणीही आपल्याला कुशीत घेत नाही ती निद्राराणी बोलवत असते.. आणि मधेच थाडे..माडे असं काहीतरी थाड्थाड़ ऐकू येतं.. मी आणि माझा लहान मुलगा..दोघेही लहान बाळासारखे दचकून अंग काढतो.. तो तर बिचारा लहान बाळच आहे..मीही माझं मोठ्ठं (लठ्ठ) अंग काढतो..
डोळे खाडकन उघडतात आणि समोर एक अत्यंत हडळ टाईप म्हातारी दिसते.. ती केवळ वाईट असायचं म्हणून वाईट असायचं अशा स्वांत सुखाय जीवनध्येयाने एका गरीब सुनेला आणि बाजूला रेशमी झब्बे घालून उभ्या असलेल्या साबणवडी टाईप पुरुषांना काहीतरी कचाकचा बोलत असते..ती सून (आणि मी..) हमसाहमशी रडेपर्यंत हडळ बोलतच राहते..
भयभीत अवस्था थोड़ी शांत झाल्यावर डोळा लागतो.. बायकोचा विसर पडतो.. मुलगा ही माझ्या कुशीत शिरून थोडा सावरतो.. पण लगेचच परत थारे थारे थारे..असं तीन चारदा ऐकू येतं..थरथरत्या डोळ्यानी परत पाहिलं तर दुसराच channel चालू असतो.. पण थारे मारे आहेच (च्या थारी मारी..!)
थोडावेळ जागेच राहू आणि मग सगळं सगळं संपल्यावर झोप येते का पाहू असं म्हणून काहीवेळेला मग मी जागाही राहतो.. त्यामधे साधारण खालचे प्रसंग पुन्हा पुन्हा घडतात:
१) कोणी एक नवी सून घरात येऊ घातलेली असते.. ती पदर डोक्यावर घेऊन उभी.. मग दोन तीन खूप छोट्या किंवा अतिरिक्त अवखळ टीन एजर मुली (या ही सुनाच तर नसतील ??) पळत पळत येऊन या नव्या सुनेला घेऊन गच्ची किंवा बाग़ दाखवायला जाणं..यात पंधरा मिनिटं..तिथे सीन संपतो..
काय दाखवतात गच्चीत ?? ते आम्हाला तरी दाखवा..
२) सर्वजण जरतारी कपड्यात नटून (झोपताना सुद्धा) एका कोणा "जिजू" ची (माझं) मन विटेपर्यंत थट्टा करतात..
सगळे खूप आनंदात आणि हसत असतात..
ते आनंदात अणि हसत असणं याचाच अर्थ समजून जा सज्जनहो की आता खडूस म्हातारी येऊन काहीतरी गलिच्छ बरळून सगळ्यांना दु:खी करणार.. मग ती वाईट व्यक्ती येतेच.. ती वाईट आहे हे कदाचित माझ्या लहान बाळाला कळणार नाही म्हणून तिच्या एंट्रीलाच गिधाडाच्या आवाजासारखा काहीतरी sound effect..
उपस्थित सर्वांवर तीनदा वरून..तीनदा खालून आणि एकेकदा "जमण्या अने डाब्या" बाजूने झिप झिप, झप झप आणि झुप झुप करून camera..
मग ती येऊन एखाद्या सुनेला हमसाहमशी रडवण्याची तिची duty इमाने इतबारे पार पाडून जाते..साबण वड्या नेहमीप्रमाने मान खाली घालून आईचं गरळ ऐकतात आणि गरम नि:श्वास सोडत राहतात..
४) एक अत्यंत अत्यंत इनोसंट (मर्फीचं बाळ जणू अशी) लहानशी मुलगी..(ही पण "बहू"च..) खूप खूप भोळेपणाने स्वत:हूनही जास्त इनोसंट स्वरात पण अत्यंत मार्मिक आणि मुद्द्याचे प्रश्न विचारत असते.. आणि आजुबाजूला रेशमी कापडांच्या ठाणांसारखे स्त्री-पुरुष मर्तिकाला आल्यासारखे चेहरे करून निरुत्तर बसलेले असतात..
३) एक सुंदर गोरी सून (पण हिरव्या मस्काय्रामुळे आणि डीप कट उघड्या गळ्यामुळे ती वाईट असल्याचं आम्ही ओळखलं आहे महाराजा...!!) ही स्वत:शीच तिचे खुनशी plans बोलून दाखवत असते.. ते plans एकदम टेरर टाईप असतात..लहान सहान काही नाहीच.. साधारण घराच्या चाव्यांवर कब्जा.. (चावीचं काय एव्ह्ढं? आम्ही कामवाल्या बाईसाठी रोज समोर नेन्यांकडे ठेवतो..!) ..विरानी, मनसुखानी किंवा आणि कोण्या "आनी" छाप घराण्याची पार काशी घालणं..त्यांचा सुपडा साफ़ करणं..निर्वंश करणं.. इतपत तरी किमान तिचा plan असतोच..
अरे बाप रे.. यापेक्षा सांगली-सोलापूरकडचं एखादं घरगुती मुलीचं "स्थळ" का बघत नाहीत ही लोकं..
मी अत्यंत सहनशील आहे.. उमेदीच्या काळात मी राजश्री छाप सिनेमे बघण्याइतका दम कमावला होता. ..मी देस में निकला होगा चाँद बघू शकायचो एकेकाळी .. पण किती दिवस ?? आता ताकद कमी होतेय.. काळ सोकावतोय..
सांगा ना.. बायको रोज बालिका वधू बघते या कारणाने कोर्टातून काडीमोड मिळू शकतो का ?? माझ्यासारखे आणखी कोणी यात पिळून निघताहेत का? कोण उभं राहील आपल्या बाजूनं?
मेधा पाटकर की "मनसे" ?
प्रतिक्रिया
खुमासदार...
मदत...
समदु:खी
काडी मोड सोडाच. बायकोला तुमचा
माझी आई अश्या रुमालाची गरज
कधितरी कंटाळून आपली पत्नी
हा लेख जबरी झाला आहे. करमणूक
छान लेख..
खरं आहे.
माझी पत्नी अमराठी आहे. म्हणून
म्हणजे इकडे कुआं तिकडे विहीर
माझी पत्नी अमराठी आहे. म्हणून
बरी दिसते
या मालिकांच्या आयची ***.. यात
अग्रीड..
हॅ हॅ हॅ!
>>'माझिया प्रियाला भीक
वृत्त..
उत्खननाबद्दल स्वारी..पण
अबाबा बा बा बा...अगागागा
एकदम खुसखुशित लेख !
सर्व बायका बघतात हो.. लहान,
अशा प्रकारची "जनर्लाइड"
+१
-१
भाउ अन सी आय डी ?? अग आय
सी आय डी
मस्त!!! कंस वाढवा.
व्वा! खुप दिवसानी मनापासुन
तुम्ही पण
नाही. या 'पाशवी' स्त्रिया अशा
ग्रेट आयडिया..पण
मी " सास भी कभी बहू थी " ग्रस्त.
इस रात की सुबह नही...
:)
माननीय सदश्य परिकथेतील
खुसखुशीत
हे वाचलच नव्हत. ज्याने खोदकाम
मी पण आत्ताच वाचतोय.
वर तुमची कमेंट आहे बरं का 10
खरेच की. इसारलोच हुतो म्या.
चालायचंच.
अत्यंत महालोल लिखाणशैली ! =))
हा (आणि अनेक इकडे तिकडे
=)) =))