कोल्हापुरी मटण

आंबोळी's picture
आंबोळी in पाककृती
3 Oct 2010 - 1:05 am

लोकहो...
लै दिवसानी मटण करायचा बेत ठरला आणि पाकृसाठी मिपाचाच दरवाजा ठोठवावा लागला...
पाक्रुही झकास मिळाली.... स्वाती राजेश यांची
संडे स्पेशल (कोल्हापुरी पांढरा व तांबडा रस्सा)

सोबत थंडगार बीअर..... अहाहा....

पाकृ आणि सजावट : सौ. अंबोळी.
फोटो घेणार / लेख टाकणार आणि ग्लास संपवणार : श्री. अंबोळी

प्रतिक्रिया

चिंतामणी's picture

3 Oct 2010 - 1:37 am | चिंतामणी

च्या मारी. लोक पाकृ टाकतात. पन फटु टाकत नाहीत म्हनुन लोक बोंबलतात.

इथ तर फकस्त फटु हाये आणि जळवायला "फोटो घेणार / लेख टाकणार आणि ग्लास संपवणार : श्री. .." असे वाक्य हाय.

आता हेला काय करायचे?????

:(

हा तर आयत्या बिलावरचा नागोबा निघाला.

कौशी's picture

3 Oct 2010 - 2:37 am | कौशी

खुप आवडली....

शुचि's picture

3 Oct 2010 - 4:44 am | शुचि

मस्त!!!!

असो. फोटो लय भारी.
भाकरी हुती का बरुबर? आन कांदा?
भरपुर चिरुन घेऊन त्याचा बी फोटु टाकायचा की राव.... (एक चकती दिस्तीये तशी कोपर्‍यात ;) )

एण्जॉय(ला असालच ऑल्रेडी. पण तरीही..)

.

कोल्हापुरी मटण खायला आम्हाला न बोलावल्याबद्दल जाहिर निषेध.
किमान ग्लास संपवायला तरी बोलवायला हवे होते.
:)

(उपाशी) अभिज्ञ.

सद्दाम हुसैन's picture

3 Oct 2010 - 3:11 pm | सद्दाम हुसैन

मरहब्बा .. आज तो अमारा मटन कानेका ही मुड है उई.. तुमने तो अमारा दिन बना दि उइ ..
बडाही अजिब नाम है मुमारा,,,, "आंबोळी" :) लिया कैसे उई!

सद्दाम हुसैन

विसोबा खेचर's picture

3 Oct 2010 - 12:08 pm | विसोबा खेचर

काय बोलू?!

तात्या.

--
आमच्या संगीताच्या सार्‍या व्याख्या अन् अपेक्षा इथे पूर्ण होतात!

पिवळा डांबिस's picture

4 Oct 2010 - 2:59 am | पिवळा डांबिस

आंबोळीणबाई मटण करणार| स्वाती राजेश मूळ आधार||
आंबोळ्या शिंचा आयता खाणार| पोटात दुखणार निश्चित||
:)

सहज's picture

4 Oct 2010 - 7:50 am | सहज

कंदीलकुमार पचले का हो जेवण? सांगा बरे! :-)

आंसमा शख्स's picture

4 Oct 2010 - 5:13 am | आंसमा शख्स

मटन सही आहे. आवडले. चाखायला अजून मजा येईल असे वाटते. सोबत बिर्याणी...?

मेधा खेंगरे's picture

4 Oct 2010 - 2:57 pm | मेधा खेंगरे

आण ति डिश ......

लै भारि....

जागु's picture

4 Oct 2010 - 3:09 pm | जागु

व्वा मस्त झालय मटण.

जागु's picture

4 Oct 2010 - 3:10 pm | जागु

व्वा मस्त झालय मटण.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Oct 2010 - 3:22 pm | परिकथेतील राजकुमार

कंदीलशेठ, आपण शाकाहारी असल्याने 'गल्लास' बघुन जीवाचे समाधान करुन घेतले ;)

पितरांच्या शांतीसाठी आम्ही इथे संयम राखून असताना मुद्दाम चमचमीत आमिषे डोळ्यापुढे नाचवतायंत. कुठे फेडाल हे पाप?
अजून नवरात्राचे नऊ दिवस बाकी आहेत.
देवा का अशी सच्छिल ब्राह्मणांची परीक्षा घेतो आहेस?
तात्या! यांना आवरा. माझा धीर सुटत चाललाय.

धमाल मुलगा's picture

4 Oct 2010 - 4:05 pm | धमाल मुलगा

काय बे मास्तुरे?
एकटा एकटाच?

निषेध!