लेख वाचला नाही. वाचेनच असेही नाही. पण एक मूलभूत शंका... पत्नीव्रता धर्माबद्दल कुठे काही आहे का? आय मीन कोणत्याही धर्मात असले तरी चालेल. तेवढंच तपासून बघता येईल हो.
अग्नीला साक्षी ठेवुन हातात हात घेवुन सात फेर्या मारतांना "धर्मे च अर्थे च कामे च नातिचरामि" अशी शपथ नाही घेतलीस का ? की तेव्हा भान विसरुन गेला होतास ?
अरे हो लेखाबद्दल बोलायचेच राहिले. अशा लेखांमुळे हिंदूंवर चिखल उडवायला काही लोकांना बळ मिळते. खरे हिंदू अशा लेखांपासुन दूर रहावेत अशी प्रामाणिक इच्छा आहे.
आमच्या WPTA क्लबातल्या दोघांनी "लेख वाचला नाही. वाचेनच असेही नाही." असं लिहील्यावर मी लेख वाचण्याचा सवालच येत नाही.
पण एक प्रश्न आहे, १२-१३ व्या शतकातल्या लोकांनी आंग्ल भाषेतही काही लिहीलं आहे का?
तारादेविच्याबतीत पण असेच आहे.भुचक्रातील बारा राशिन्मध्ये गुम्फ्लेल्या २७ नक्शात्राची अधिष्ठात्री देवता तारादेवी ,तीच्या भर यौवनात वरिष्ठ ग्रह गुरु यांची अधिष्ठात्री देवता असलेले बृहस्पती हे तीच्याकडे आकर्षित होउन तीच्याशी विवाहबद्ध झाले .
हि कुठली तारा हो ? पंचकन्यांमधली तारा म्हणजे सुग्रीवाची पत्नी ना ?
पुन्हा काही प्रश्न उपस्थीत होतातच :-
१) कुठले तारे ?
२) सँडल खाल्ल्यावर दिसतात ते का?
३) ४ पेग नंतर दिसतात ते का ?
४) इथे काही सदस्य काथ्याकुटरुपी अकलेचे तोडतात ते का?
इ इ.
हे असे नवीन सदस्य येतात. धडाधड तीनचार दीर्घ लेख लिहून गायब होतात. त्या लेखांवर चर्चा वगैरे काही करत नाहीत. आपणच इकडे काथ्या कुटत बसतो.
एवढे तीनचार लेख झाले की परत कुठलेही लेखन करत नाहीत.
पूर्वी सदानंद ठाकूर हे असेच सदस्य येऊन गेले.
व्वा.... काय अविश्वसनीय असा योगायोग नितीन जी. नेमक्या याच शब्दात मी डॉक्टर मजकुरांच्या येथील गांभीर्यपूर्वक अस्तित्वाबद्दल लिहिण्याच्या बेतात होतो (विशेषतः त्या 'ज्योतिषशास्त्रा'चा धाग्यावर, पण नंतर वाटले की ज्या या धाग्याला डझनभर मिळालेले प्रतिसाद पाहुन्/वाचून त्यांनी निदान एक ओळीची तरी प्रतिक्रिया दिली असेल तरी त्यांचे धागे वाचण्याची प्रेरणा मिळेल...पण नाही.) पण ते काम तुम्ही अगोदरच करून योग्य तो फटका दिला ते बरे झाले.
तुम्हाला या पठडीतील कुणीतरी 'सदानंद ठाकूर' आठवले अन् मला 'तो' शहाजहान बुद्रुक, ज्याने 'अल्लाच कसा सर्वश्रेष्ठ' असा १०० प्रतिसाद खेचक धागा दिला आणि तीवर एकही प्रतिक्रीया न देताच रमजान महिन्यात जणू काय अल्लालाच प्यारा झाला. आम्ही इकडे एकमेकाच्या प्रतिसादाच्या अनुषंगाने भिंतीवर धडका देत बसलो.
सदरहू डॉक्टरदेखील त्याच बेनाम गाडीचे प्रवासी आहेत का?
इन्द्रा
(उदा. शांती म्हणजे नक्की काय हे पाश्चात्यांना काळात नाही शांती ही बाहेर नसते तर अंतर्गत असते व ती बाहेर शोधली जाते. खाली माझी अंतर राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त कविता पहा जिला Inter national Library of Poetry ,U .S .चा पुरस्कार प्राप्त आहे )
माझ्या आठवणीप्रमाणे अमेरिका (ज्याला गुरुचरित्रात यू एस असे म्हणतात) पाश्चात्त्य देश आहे. ज्यांना शांती कळत नाही, त्यांना कुठल्या कवितेला पारितोषिक द्यायचे हे कसे कळेल ?
बाय द वे, हे विकीपीडियातून साभार.
Critics of the International Library of Poetry's business model describe their practices as "deceptive and misleading" in that they misrepresent their activities as a contest based on the quality of poetry submitted, whereas in fact the quality has little or no influence on the outcome. They are also accused of portraying the anthologies they publish as a "real literary credit that poets can be proud of" while simultaneously producing anthologies that are available on special order only and which are full of poor quality poetry.[2] Other critics point out that standard industry practice is for winners of poetry contests to receive gratis copies of any publication of their work, and that ILP fails to follow this protocol.[3]
The Better Business Bureau comments that it has received "hundreds" of complaints concerning ILP, and that it considers their business to be vanity publishing. In 2004, the New York State Consumer Protection Board launched an investigation into ILP, which it said "takes advantage of people both emotionally and financially," but suspended the investigation due to a shortage of complaints.[3]
मंदोदरी कोणत्या काळात वालीची पत्नी झाली? काहीहीहीहीहीही!!! काही आधार वगैरे आहे का याला? बंडलबाजी नुसती.
अंगद हा तारा आणि वालीचा पुत्र. कृपया तिच्या नावाने अधिक तारे तोडणे बंद करावे. तारा ही वालीची सहचारिणी आणि उत्कृष्ट सल्लागार होती. वालीच्या वधानंतर तिने सुग्रीवाशी विवाह केला किंवा त्याच्याकडे राहीली. सुग्रीवाच्या पत्नीचे नाव रुमा होते. तिचे अपहरण वालीने केले होते. त्याकाळात त्यांच्यावर झाले ते अत्याचार पुरे होते असे वाटते आता त्यांच्या नावांचे तारे तोडून पुढले अत्याचार थांबवावेत.
अहिल्या कोण बरे? उद्या होळकरांची अहिल्या ती हीच म्हणून लेखकमहाशय सांगतील. गौतम ऋषींच्या पत्नीचे नाव अहल्या होते. मायावी बियावी कसली? बंडलबाजी नुसती.
एखाद्या पुरुषाने विनाकारण पत्नीस त्रास दिल्यास तो सप्त जन्म पर्यंत विधुर होतो.एखाद्या पुरुषाने चारपांच स्त्रियांशी विवाह केल्यास असे पुरुष स्त्री जन्म घेतात व त्या स्त्रिया त्यांची कामवासना व संस्कार क्षीण न झाल्याने पुरुष जन्म घेउन त्या या जन्मात स्त्री झालेल्या त्या पूर्व जन्मीच्या पुरुषाचा उपभोग घेतात.तेच उलटपक्षी एखाद्या स्त्रीच्या बाबतीत घडू शकते.
थांबवा रे ही बंडलबाजी कुणीतरी!!!!
तै, तुमचा व्यासंग कमी पडतोय.
अंबा, अंबिका, अंबालिका ह्यांच्यापैकी कुणीतरी शिखंडी झाला/ली होता/ती, बदले की आग मे जळून.
मग त्याचेच हे लॉजिकल एक्स्टेंषन समजा.
ती अंबा.
आई अंबाबाई उचल... या डॉक्टरला! सोबत मिभोंना उचललंस तरी माझं काही म्हणणं नाही.
बाकी हे बरं आहे. एका बायकोला त्रास दिला म्हणून पुढच्या सात जन्मी बायकांनी मरायचं आणि या प्राण्याला विधुर बनवण्याची सोय करायची.
आई अंबाबाई उचल... या डॉक्टरला! सोबत मिभोंना उचललंस तरी माझं काही म्हणणं नाही.
या जन्मी लवकर उचलले, तर इतरांचे पुढचे सात जन्म नक्कीच बर्बाद होणार !
त्यामुळे, मांडवली करून टाकू इथेच.
(बाय द वे, आमच्या सात आयडींचे सात जन्म, म्हणजे एकूणपन्नास !)
आपण आपल्या बायकोला त्रास देतो हे कसलेही आढेवेढे न घेता मानल्याबद्दल शतशः धन्यवाद.
असे आम्ही म्हणत नाही, आमची बायकोच म्हणते. आणि ती म्हणते ते सगळेच आम्हाला शीरसावंद्य असते.
यावरून कुणीतरी सांगितलेला एक विनोद आठवला.
कपल्स थेरपीच्या क्लासमध्ये एकदा समुपदेशक म्हणाला. जे पुरुष स्वतःला बायकोच्या ताटाखालचे मांजर समजतात त्यांनी इकडे रांग करा. जे तसे समजत नाहीत, त्यांनी दुसरीकडे रांग करा.
सगळे पुरुष पहिल्या रांगेत जाता. फक्त एकच दुसर्या रांगेत जातो. त्याला समुपदेशक म्हणतो, " अभिनंदन ! माझ्या आयुष्यात मला पहिल्यांदा एक पुरुष दुसरीकडे उभा राहिलेला सापडला!". त्यावर तो पुरुष म्हणतो: "आधी मी पहिल्या रांगेत जाणार होतो, पण काय करणार ? बायकोनी सांगितलं तिकडे दुसरीकडे उभा रहा म्हणून !"
असो.
सो कॉल्ड "आय.एल.पी." ची लक्तरे बाहेर काढल्याबद्दल श्री.मिभोंचे अभिनंदन. मी समजत होतो की "मोरू" करणार्या मंडळींचा भरणा नवी दिल्ली आणि लखनौ येथेच प्रामुख्याने आहे, पण या मंडळीच्या भाऊबंदानी साता समुद्रापलिकडेही शाखा काढलेल्या दिसतात. दिल्लीतून काही वर्षापूर्वी "इंडियाज् व्हूज व्हू इन लिटरेचर" अशी गलेलठ्ठ नावाची एक वार्षिक डिरेक्टरी निघायची. तीमध्ये 'संत तुकारामा' चा "स्न्त टिकाराम" आणि वि.स.खांडेकर यांचा वि.स.खान्द्कर असे भन्नाट उल्लेख असायचे. याच्या प्रकाशनाच्या बगलबच्च्यांची आणि वर्तमानपत्रातून रविवार पुरवणीची जबाबदारी असलेल्या काही होतकरू उपसंपादकांचे साटेलोटे असायचे. मग ही दिल्लीकर मंडळी हुशारीने या उपसंपादकाकडून त्या त्या स्थानिक वर्तमानपत्राकडे येऊन पडत असलेल्या गाडीभर लिखाणाच्या कर्त्यांचे (जे 'धडपडणारे लेखक' या पदाला उत्सुक असत) घरचे पत्ते मिळवीत आणि मग नंतर केव्हातरी एका छानशा ग्लॉसी पेपरवर गोल्ड कलरचे एम्बॉसिंग केलेल्या लेटरपॅडवर 'महाराष्ट्रातील भावी आदरणीय लेखक' अशा शब्दांचे मोरपीस फिरवून "आम्ही तुमचे अमुकतमुक वर्तमानपत्रात प्रसिध्द झालेले लेखन वाचले असून तुमचा लेखन प्रवास विश्वसनीय आहे..." आदी मजकूर व नंतर "आम्ही अशा होतकरू लेखकांचा देशातील अन्य वर्तमानपत्रांना/नियतकालिकांना परिचय व्हावा म्हणून "इंडियाज् व्हूज व्हू इन लिटरेचर" नावाची डिरेक्टरी प्रसिद्ध करीत आहोत, त्यासाठी आपल्या आजवरच्या लेखनाची माहिती, एक फोटो व सोबत डिरेक्टरीची (डिलक्स क्वॉलिटी) किंमत रुपये ४००/- वरील पत्त्यावर पाठवावेत."
हा गब्रू आपले आता भारतवर्षात नाव होणार तर मग जाईनात का ४०० रुपये.... असा थोर थोर विचार करी आणि पैशे पाठवून मोकळा होई. चारसहा महिन्यानंतर एक सुमार दर्जाची पुस्तिका त्याच्या नावावर पार्सलने येई, ज्याचे पोस्टेज यानेच भरायचे असते. बस्स. आपला त्सुनामीसदृश्य फोटो व दोन ओळीचे भांडवल पैपाहुण्यात तर करीच पण पुढे नोकरीचा अर्ज करताना "माझे नाव अमुकतमुक डिरेक्टरीत झळकले आहे...' हा उल्लेख तो 'अचिव्हमेन्ट' सदराखाली करे.
त्याच पुठ्ठ्यातील ही आयएलपीची कमाई.
इन्द्रा
इंटरनॅशनल लायब्ररी ऑफ पोएट्री अशा संस्थेबद्दल माहिती मिळाली - खूपच इंटरेस्टिंग आहे. तुमची फसवणूक नाही ना झाली? कृपया तुम्हाला कविता पाठवल्यावरून आलेले अनुभव या सर्वाशी तपासून पहा. तुम्हाला भविष्य कळले होते का की तुम्हाला फसवले जाऊ शकते?
http://www.online-literature.com/forums/showthread.php?t=174
खरया सितेस लंका गमनापूर्वी अग्नि देवतेने आपल्या गर्भात लपवले आणि मत्याच्या सीतेस रवानाने लंकेस नेले. लंकदहना नन्तर सितामातेने अग्नि प्रवेश केला त्यात मायावी सीता गुप्त झाली आणि खरी सीता परत आली.
आयला, म्हणजे जे सगळं रामायण घडलं ते खोट्या सीतेपोटी? रामाला हे माहीत नव्हतं असं म्हणून तुम्ही रामाच्या बुद्धीमत्तेबद्दल वा देवत्वाबद्दल शंका घेत आहात का? की ज्याने रावणाला मारलं तोही खरा राम नसून या मायावी सीतेचा मायावी पती होता?
अशी देवांची बदनामी करणं बरं नाही.
प्रतिक्रिया
बाब्बो..! चालू द्या.. तात्या.
लेख वाचला नाही. वाचेनच असेही
लग्नात
लेख वाचला नाही. वाचेनच असेही
+२
SILENCE, is, WITHIN......
तारादेविच्याबतीत पण असेच
ही तारा नसून
'तारे' असावेत! पुन्हा काही
हॅ हॅ हॅ
तारा
लय भारी
नाडीग्रन्थ
हे असे नवीन सदस्य येतात.
बेनाम गाडीचे प्रवासी
मजेदार
काय बंडलबाजी आहे?
बंडलबाजी ?
आई अंबाबाई
हॅ हॅ हॅ
काय कॉन्फिडन्स आहे स्वतःबद्दल!
असे आम्ही म्हणत नाही
आयएलपी आणि प्रसिद्धी
फसवणुकीचे भविष्य कळले होते का?
बदनामी