माझ्याबाजुला बसलेली ती.
दीवस कोणता होता माहीती नाही,मी दुपारी बांद्रयाला जायला निघालो होतो.ट्रेनसाठी प्लॅटफॉर्मवर गेलो.ट्रेनमधे व बाहेर फारशी गर्दी नव्हती.पाउस पडुन छान गार वातवरण तयार झाल होत व सावली पडल्यासारख झाल होत.........असो.
मी अगदीच गबाळा व लोफर दीसत नव्हतो.अनेक वर्षांनंतर 'शर्ट व पँट'(फॉर्मल) अंगाला लागत होत्,म्हणुन जरा अवघडल्यासारखा वागत होतो.जरा इकडे तिकडे नजर फीरवली,नाही म्हणजे आपण कोणाच 'लक्ष' तर नाही ना हे बघायला.अर्थात त्याचा उद्देश हाच की हस होउ नये.काहीजण मला 'चैन उघडी आहे' अस का नाही सांगत हे समजत नाही.
ट्रेन सुटायला आली तेव्हा रीकाम्या जागा परप्रांतिय लोक भरु लागले.मी चौथ्या सीटवर बसुन मस्त सेकंड क्लासचा फायदा घेतला.चारातला एक उठला तस मी आत सरकणार तोच........................................
सफेद त्वचा असलेला दंड....हो सफेदच पांढरा नाही.......त्यावर काळा टी शर्ट.........सर्वच मस्त!
मी चेहरा पहायचा मोह आवरला नाही म्हणुन मान वर करुन पाहणार तोच बाजुचा भैया जागा करायला म्हणून इतका जलद गतीने हलला की माझे लक्ष त्याकडे गेल.तो कुत्रासारखा जीभ काढुन तोंड उघडायचा बाकी राहीला होता.बाकी पुरा 'आउट' झाला होता.ह्या साल्या असल्या प्राण्यामुळे मुली/तरुणी/बाया(?) भाव खातात.
मी बाजुला सरलो,आता तिला दोघांच्या मधे बसाव लागणार म्हणुन ती तशीच उभी होती.अखेर भैयाचा पोपट झाला व तिने मला 'आप अंदर हो जाईये ना' अस सांगितल तेव्हा मी आत शिरलो व ती माझ्या बाजुला बसली...........नाही हो मी अजुन तिचा चेहरा बघितला नव्हता,ती बाजुला बसली तेव्हा मी 'तिला पाहताच भैया पागल' कसा झाला ते बघत होतो.
आणि मी मान तिला बघण्यासाठी वळवली.तर एक छोटासा चेहरा माझ्याकडे बघुन हसला,तो तिच्या खाद्यांवर तडमडणारा मुलगा होता.तिचा स्वःताचा नसावा अस मनापासुन वाटल व "इस के बाद मम्मी के पास जायेंगे" हे एकल्यावर तसच होत कळल्यावर का माहीती नाही पण बर वाटल.
मुलग्याने पुढे आणलेली मान बाजुला काढली व तिचा चेहरा दीसला.आता वर्णन नाही करत बसत पण खुप सुंदर दीसत होती.मी १०-१५ सेकदांत डोळे लहानमोठे करुन करुन तिला बघुन घेतल.तिच्या डोळ्यात डोळे मिळाले तेव्हा मी नजर खिडकीला(ती बसलेल्या त्या बाजुची नाही विरुद्ध बाजुची) चिटकवली ती आता परत तिला पहायच नाही हे ठरवुनच.
गाडी बोरीवलीला आली तेव्हा ट्रेन खुपशी रीकामी झाली.तिने मुलाला बाकड्यावर उभ केल.मी मुला बघण्यासाठी म्हणून बाजुला मान वळवली तर तिच्याशी पुन्हा नजर मिळाली."काय पाहतोस रे लबाडा' असे भाव दीसले.मी 'काही नाही,काही नाही' अस मनात येउनही बोललो नाही.
आहाहा..............काय ते रुप!!!पावडर नाही की क्रीम नाही..........अस्सल पेठा!
हसरा चेहरा,केस पण मस्त फीरवलेले,डोळे बोलके..........भाव खाण्यासाठी लागणार सर्व अगदी भरभरुन होत तिच्याकडे.पण मी इच्छा नसताना तिच्याकडे का बघत होतो माहीती नाही.मला खरच मुलाला पहायच होत :) .'मी अगदीच खडुस नाही' हे दाखवायला मुद्दाम मुलाच्या गालावर हात फीरवला.मुलगा पण छान गोरा होता.आम्ही मस्त 'छोटा परीवार' वाटत होतो.बाजुचे भैये पण 'साईड व्हीलन' सारखे निसटले होते.
"आप कहां जाओगे?" तिचा प्रश्न.
माझ डोक हलल......हो तिच बोलली होती.
"बॅन्ड्रा"....."और आप?"
"मालाड"
"अच्छा"
"आपको सदाशिव एन्क्लेव' पता है?"
आता दुसरा कोणी असता तर "कहा पे है वो?","मालाड मे है या?","अरे वो अंधेरी का तो नही?","आपको वहा जाना है?","मुझे सदाशिव मार्केट मालुम है,एन्क्लेव पता नही" असे पुढे बोलायला कारण शोधणारे प्रश्न विचारत बसला असता.
मी सरळ "जी नही" अस उत्तर दील.formality म्हणुन थोडं हसुन वेगळीकडे बघायला लागलो.
ट्रेन पुढे निघाली.
ती कधी खिडकीकडे व कधी मुलाकडे पहात होती व मी मान सरळ ठेउन भ्रमात पहात होतो.
पुढच्या स्टेशनला ट्रेन अजुनच रीकामी झाली.
आता मालाड येणार म्हणुन मी का माहीती नाही पण परत तिच्याकडे बघितल.मधल्या वेळात मी व ती
एकमेंकांकडे बघण्याचा एकही चान्स सोडत नव्हतो.मी मनातल्या मनात त्या छोट्या मुलावर खुश झालो होतो.
आता ह्यावेळेस मी तिच्याकडे अगदीच रोखुन बघितल तिने पण डोळ्यात डोळे भरले.मी अवघडलो व बाजुला बघितल.खुपच अवघडल्यासारख झाल म्हणुन ताठ बसुन 'इन' नीट केल.बेल्ट नीट केला,कमरेच्या इथे हात लावुन पँट सारखी केली तोच..........
.
.
.
.
"चड्डी नही पहना क्या?" ती बोलली.
मी जागेवरुन खाली पडुन नये म्हणून स्वःताला सावरण्यासाठी यशस्वी खटाटोप केला व तिच्याकडे पाहील.तिच बोलली होती.........तिने लहान मुलाच्या कॉलरला हलकेच पकडल होत,मुलगा हाताने पँट वर खेचत होता.
हुश्श!..................मला काय भलतच वाटल.
मालाड स्टेशनवर गाडी वेग कमी करु लागली.माझ्या छातीत खुप हलचाली होउ लागल्या.ती उभी राहली.मी तिला न्याहाळुन घेतल.ती मला पहातेय हे लक्षात असुनही अगदी हक्काने तिच्या डोळ्यात डोळे टाकले.तिने लाजुन दाखवल.
ती उतरली.वळुन बघतेय का हे पहायला नाही मिळाल.कारण माझ्या डोक्यात तिच वाक्य आल............."चड्डी नही पहना क्या?"
अरे नसेल घातली कार्ट्याने चड्डी म्हणुन काय इतक्या जोरात अस विचारायच?
आणि तु एवढी लाजरी वाटत होतीस्,का बोललीस हे वाक्य?
माझ्या मनातली तिच्याबद्दलची सर्व मते मलिन झाली.
साधे बोलायचे मॅनर्स नव्हते तिला!!
हे असे विचार करुन वाकड झालेल तोंड मी सरळ केल व घड्याळाकडे बघुन मान नकारार्थी हलवली.
एखादी स्त्री आपल्या सोज्वळतेने कीती सुंदर दीसते आणि 'हे' असे 'अविचारी' बोलणे कसे रुपाला बिघडवत,अशाच काहीश्या गोष्टींचा विचार करत मी बांद्र्याला एक सिगरेट ओढली. :)
प्रतिक्रिया
) रागावणार
लै भारी
हा हा हा..
ही ही ही ही!
.....ख्ररच्....असं असतं!
.....ख्ररच्....असं असतं!
) ) मी
चड्डी
ट्रेन
ह्म्म्म
ते
च्यायला!!!
एकंदर
सही..
>> अनेक
इतक्या
सर्वप्रथम
अरे बापरे!!!
मला एवढच
<<<दीसण्याल
नाही मला
वाव्वा!!
छान लिहिले आहे.
मस्त