ससा, सुसर आणि ससाणा
आणखी एक मिपाप निती कथा.
पुर्वी इसापाने जंगलमधले प्राणी पाहून इसाप निती कथा लिहील्या. मिपा नावाच्या ह्या तळ्यात किंवा मळ्यात (काय म्हणायच ते म्हणा) अनेक चित्रविचित्र प्राणी आहेत. स्वभावाप्रमाणे नावे वापरून जरी ते वावरायचा आव आणीत असले, तरी पुष्कळदा निळा रंग धूवून निघाल्यानंतर खरा कोल्हा उघडा पडला, तसेही होत असते.
हे प्राणी अवलोकन करीत अनेक साधु-महात्मे, नाना अवलिया ह्या जंगलात स्वैर फिरत असतात.
जंगलातील एका तळ्यात बुडी मारली तेव्हा, अशाच एका महान पुरुषा (ओह. सॉरी. सत् लावायला विसरलो) बरोबर खालील संवाद होण्याचे भाग्य प्रप्त झाले.
>>>>>>सुसर- काही माशांना मारता यावे म्हणुन सुसरी सशांशी दोस्ती करतात.
>>>ससा- क्या बात है नाना! ससा आणि सुसर एक नवीन मिपाप निती कथा बनवू चला. कथाके लिये साला कुछभी करेंगा. ससुरा ससा सुसरसेभी सांस लेना सिखेंगा!
इसापाने एकट्यानेच सगळ्या कथा लिहील्या होत्या. आपण मिपा तळ्या भोवती बसून सुसरीची सुरस कथा बनवू या कां?
तर जंगल् वासी, जलचर, निशाचरांनो (निशाचर- अमेरिकेत रहाणारे) प्रतिसादांमधून ही मिपाप निती कथा पुढे न्या. प्रत्येक प्राणी फक्त मागच्या प्रतिसादामधून कथा पुढे नेईल. खून खराबा, दंगा-मस्ती, छुरीयां चलाना सब चलेगा. पण कृपया कथे पुरतेच ठेवा. वैयक्तिक आवडनिवड, गुण-दोष ह्यांची चर्चा नको. म्हणजेच, दुसर् या शब्दात, कोल्ह्याचा निळा रंग धुवू नका.
बाकी संपादकांची फलटण समर्थ आहेच म्हणा. (अवांतर- नाहीतरी इतक्या प्रचंड संख्येत असलेल्या संपादकांना काही काम नको का? ;) )
चलो ह्हो ज्जाये!
मिपाप निती कथा- २
ससा सुसर आणि ससाणा-
एका निबीड अरण्यात एक विशाल तळे होते. तळे इतके खोल होते, की मी मी म्हणणार् यांना तळाचा थांगपता लागत नसे. एक विनयशील, हळूवार वगैरे असणारा ससा तळ्याच्या काठावर बसून खूप असुयेने आत खोलवर पोहणार् या जलचरांकडे बघत बसायचा. पण आत उडी घ्यायची त्याला फार भिती वाटायची. कारण बरेचदा, पाण्यावर खळबळ माजलेली त्याने पाहिली होती. त्यावेळेस पाणी शांत व्हायचे तेव्हा रक्ताळलेले मासांचे तुकडे आणि त्यावर तुटून पडलेले छोटे मोठे मासे त्याने पाहिले होते.
असाच एकदा तो बसला असतांना एक सुसर तेथे आली.......
प्रतिक्रिया
असाच एकदा
लाटांवर
े. ससा
सुसर सशाला
समांतर कथा :-
टा-या कुठे त्या तरस नावाच्या
तळ्याच्या