अनुभवली आहे. मला दोन्ही भाग आवडले आता युयुत्सु व अदिती या दोघांपेक्षा जास्त आतुरतेने एक्लिप्सची वाट पहात आहे. ;-)
टिपीकल टिनएज हॉलीडे मुव्ही असे वाटले होते पण मस्त टिपी झाला. याचे कारण या कथा लिहणारी एक बाई आहे हे असावे का?
कथा व मांडणी छान भारी त्यामुळेच बाकी सगळे दुय्यम असुनही इंटरेस्ट टिकून राहीला.
एकूणच व्हॅम्पायर , मानवी गंध, शाकाहारी असले तरी प्राण्यांचे रक्त पिणारे वगैरे प्रकारांची भीती वाटते... :&
दोन दिवसांत तीन वेळा ट्वायलाईट पाहणार्या परापासून त्याच्या क्याफेत जाणार्या मंडळींनी जपून राहावे असे सांगावेसे वाटते... #:S
#:S
ता.क. .. परा, मानवी गंधाविषयी तुझे मत काय आहे???
ह्या पिक्चरचे दोन्ही भाग भारी होते.
त्यातला पहिल्या भागाचे मस्त परिक्षण केले आहेस, दुसर्या भागाची वाट पहात आहे.
पटकन येऊदेत ...
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
खुप दीवसांनी mobile मधल wattpad च version update केल तर 'featured work' मधे vampire आणि love,romance ह्याच विषयावर जास्त लिहल होत.मी बोललो काय साल्या एकाच विषयावर लिहलय....... कारण मी crime story शोधत होतो.........हे आता मला कळल त्या लेखकांवर कसल भुत चढलेल ते!!
आम्हाला आमच्या आवड्त्या कथा ज्या चित्रपटामुळे नाही भेटु शकल्या त्या चित्रपटाचा आम्ही निषेध करतो!!
आणि अशा पकाउ विषयाला रोचक रुप दील्याबद्द्ल 'परा' ह्यांचे आभार.....तुमच्या मुळे त्या चित्रपटाला आजुन प्रेक्षक भेटतील.
The Dark Knight पण भलताच गाजला पण तोही मला download करुन बघावसा नाही वाटला........सांगायचा भाग हा की.......हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे.
शेणबा,श्यानबा,कोदा,ज्ञानबा,शिवबा,कडबा.............ई.
साभार...........
प्रणयकथेतील खाजकुमार!
(आता फिट्टुस झाल............you can stop or you can continue!)
*************************************************
You want to cope with 'Global Warming'?
Then ban porn movies!!
मी चित्रपट पाहिला.... आणि "व्हँपायर" या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित चित्रपटदेखील किती काव्यात्मकरित्या घेता येतात याचे सुंदर उदाहरण म्हणजे "ट्वायलाईट". निव्वळ ते कॉलेज, तो परिसर, कॅन्टिन, क्लासरूम, बेलाचे अन्य मित्रमैत्रिणीबरोबर समुद्रकिनार्यावर पिकनिकला जाणे, आणि एडवर्डचा तिथे येण्यास ठाम नकार....त्यामुळे बेलाचा गोंधळ.... या सर्व गोष्टींचे इतक्या सुंदररितीने चित्रीकरण झाले आहे की, हा एक भयपट आहे हे लक्षातच येत नाही.
("बेला" पात्रासाठी तरी सर्वांनी हा चित्रपट पाहायला हवा...!)
(राजकुमार ~~ जेकब आणि त्याच्या वडिलांकडून "बेला" ला वेळीच सावध करण्याचे प्रयत्न.... याबद्दल लेखात उल्लेख केला असता तर चालले असते असे मला वाटते.... अर्थात त्यामुळे बेलाच्या निर्णयात काही फरक पडत नाही ही गोष्ट अलाहिदा...! एनी वे... नाईस रिपोर्टिंग !)
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
मुव्हीज वर थोडासा चित्रपट पाहीला.. पण बाहेर जावे लागल्याने बाकीचा नाही बघता आला, म्हणुन लगेच त्याच रात्री डी-व्हीडी आणुन २ वेळा पाहीला..चित्रपटाची कल्पना भन्नाट आहे.
"प्रेम" आणि प्रेमासाठी सारे काही.. मग तो रक्तपिपासु व्हंपायर का असेना!!
बॅकग्राऊंडवर बेला सांगत असते...
I never given much thought on how to DIE..
.
.
.
.
.
.
but DIE in place of someone I LOVED seems better way to DIE!
आणि फ्रंटला तो हरीणाचा शॉट्!!
त्या क्षणापासुन चित्रपट पकड घेतो तो शेवटच्या बॉल डान्स पर्यंत.. वाटत हा प्रवास संपुच नये!!!
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
आतापर्यंत पोस्टरवरुन हॅरी पॉटर टाईपचा वाटत होता म्हणून पाहणं टाळत होतो. तुझ्या या परीक्षणाने चित्रपट पाहावा असं वाटू लागलं आहे.
निदान बेलासाठी तरी ;)
फटू
मस्त परिक्षण रे !! तु पेपरात लिहायला लाग ... पुढारी वगैरे "आकडे" छापुन येणार्या पेपरांत तुझे हे परिक्षण छापुन आले तर त्या पेपरची सुद्धा इमेज सुधारेल . :)
तेव्हा घरात बघीतले होते खरे.
मी ,टीनएजर्सनी वाचायचे पुस्तक असेल म्हणून कव्हर बघून बाजूला ठेवून दिले होते.आता वाचावे म्हणतो.
काही सिनेमे परीक्षण वाचून बघीतले होते आणि बर्याच वेळ सिनेमापेक्षा परीक्षण चांगले वाटले होते.यावेळी तसेच होवो.
संधी मिळाली तर सिनेमा बघीन.मला डायलाग कळत नाहीत.सब टायटलवाला सिनेमा मिळतो आहे का ?
इंग्रजी चित्रपटांमधले संवाद न कळण्याची समस्या काका लोकांनाही सतावते तर. मी आपला उगाचच मनाशीच खट्टू होत होतो की आपल्यालाच इंग्रजी चित्रपटांचे संवाद कसे कळत नाहीत...
फटू
http://www.opensubtitles.org/
http://www.subscene.com/
http://www.subtitlesource.org/
http://www.allsubs.org/
या दुव्यांवरून हव्या त्या चित्रपटाचे subtitles तुम्ही उतरवू शकता.
बघायला पाहिजे. आपल्याला आवडतात असले सिनेमे. काय लहान पोरांसारखे असले सिनेमे बघतो या टिप्पण्या (बायकोच्या, आणखी कुणाच्या!) कानाआड करून परत परत या प्रकारचे सिनेमे बघण्यात मस्त मजा आहे.
(तुम्हा पुण्यात राहणार्या लोकांचं बरं आहे बाबा. छान थेटरं आहेत असले छान सिनेमे बघायला! )
आळश्यांचा राजा
उत्तम परिक्षण पण तेवढाच बकवास आणि भंगार चित्रपट.
Typical teenage lovestory. Action, thriller, suspense वगैरेची आवड असेल तर अजिबात बघु नका.
मी वेअरवुल्फ आणि व्हँपायरसाठि पाहिले आणि पस्तावलो. ~X(
इतका फ्रस्ट्रेट मी फक्त "जानी दुश्मन" पाहिल्यानंतर झालो होतो.
कथेमधे अनेक loose ends/अपुर्ण भाग असून तिच्या प्रेमळ आणि समजूतदार वडिलांसारखेच त्यांना फाट्यावर मारण्यात येते.
२ तासापैकी एकुण action चा भाग ४-५ मि. असेल. कदाचित वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे बाईने लिहिल्यामुळे असेल पण प्रेमकथेला ९५-९७% महत्व ? आवरा. ज्यांना टीनएज लव्हस्टोरिज आवडतात त्यांच्यासाठी पर्वणी. बराच वेळ आपण वाट बघत रहातो आणि काहीच होत नाही X(
खरे action/ game originated आवडणार्यांसाठी :
नविन आलेला प्रिन्स ऑफ पर्शिया चांगला आहे. अतिशय वेगवान. कुठेही आपण झक मारली किंवा डोक्यावरचे केस उपटावे असे वाटत नाही.
बराच वेळ आपण वाट बघत रहातो आणि काहीच होत नाही
आम्ही ईंजिनीयरींगला असताना सुमडीत बी ग्रेडचे पिच्चर पाहायलो जायचो. बराच वेळ आता येईल तसला सीन मग येईल अशी खुप वेळ वाट पाहायचो. पण तसले सीन काही यायचे नाहीत. उगाच आपली लहान मुलांची समजूत घालावे असे छोटे मोठे सीन मात्र खुप असायचे. :P
फटू
उत्तम परिक्षण! पण मास्तर म्हणतो तसे परापासून जरा
जपूनच राहिले पाहिजे.. चिलखत- जिरेटोप घालूनच त्याच्या नखांचा
सामना करावा लागेल.
उत्कंठा निश्चितच वाढली आहे..
प्रतिक्रिया
मस्त परिक्षण
क्या बात है!
मस्त रे
सहमत
मस्त रे..
चांगला आहे
एकूणच
मस्त
भारी...
लै भारी रे ...
खुप
बेला...!!
उत्कंठा
ह्म्म ?
बघायला हवा.
मस्त
सहीच.. परा !!
मस्त ओळख.
भारी
एडवर्ड
मस्त परीक्षण !!!
छान
मस्त
हे पुस्तक माझी मुलगी वाचत होती
चला...
स्टार
subtitles...
बघायला
चांगले परीक्षण
म्रुत्युन्जय, यु टू ??
हाहाहा....
उत्तम
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
परा नक्की