✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

'सारे तुझ्यात आहे' आल्बमचा प्रकाशनसोहळा

स
सुधीर कांदळकर यांनी
Fri, 03/21/2008 - 06:06  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3931 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

प
प्राजु Fri, 03/21/2008 - 06:25 नवीन

हम्म..

वर्णन छान शब्दबद्ध केलं आहे. कार्यक्रमाचा वृतांत इथे दिल्याबद्दल धन्यवाद.. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 03/21/2008 - 07:24 नवीन

धन्यवाद

मग माईक जयश्रीताईच्या हातात गेला. त्यांनी कुवैतच्या मराठी मंडळासाठी रचलेले गीत म्हणून दाखवले. काही व्यक्ती त्यांच्या व्यक्तिमत्वाने एखाद्या समारंभावर ठसा उमटवून जातात. शब्द कसे उच्चारावेत, वाक्यात स्वराचा चढउतार कसा असावा हे खरे म्हणजे त्यांच्याकडून शिकावे. प्रत्येक शब्दाला त्या वाक्यात एक विशिष्ट नाद असतो, एक उच्चारसौंदर्य असते. हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत राहते. असे नादमय बोलणे असल्यावर कविता मीटरमध्येच जन्माला आल्या तर आश्चर्य नाही. असे नादमय पण हिंदी शब्द मी कलापिनी कोमकली यांच्या तोंडून ऐकले आहेत. ही एक निसर्गत्त अशी दैवी देणगी आहे आणि फ़ार दुर्मिळ आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन. यात एकहि अ़क्षर अवास्तव नाही. अजून ते उच्चार माझ्या कानांत आहेत. समारंभ वेगळ्या उंचीवर गेला आहे हे जाणवू लागले. सुधीरराव, प्रथम, आपण ह्या कार्यक्रमाचा वृत्तांत आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. जयश्रीताई माझ्या ऑर्कुट मित्रमंडळात आहेत, ह्याचा अभिमान वाटतो. (आणि त्या नागपूरकर आहेत, ह्याचाही. हल्ली पुणे-मुंबई येथील इनू-सॢला ह्यांच्यातील संवाद बघता, आम्ही नागपूरकर आहोत ह्याविषयी अचानक बरे वाटू लागले आहे.) - सर्किट
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 03/21/2008 - 08:27 नवीन

सुरेख आणि नेटका!

अतिशय सुरेख,दिमाखदार अशा ह्या प्रकाशन सोहळ्याचे वर्णन सुधीररावांनी तितक्याच नेटकेपणाने केलेय. सुदैवाने मी देखिल ह्या समारंभाला हजेरी लावू शकलो त्यामुळे सुधीररावांनी इथे केलेले वर्णन किती नेमके आहे ह्याचा मी साक्षीदार आहे. सुधीरराव अभिनंदन आणि आभार. आता थोडेशी माझ्याकडून भरः जयश्रीने आपल्या मनोगतात सांगितले...... माझ्या कविता लेखनाला दिशा दिली ती सर्वप्रथम कुवेतमधील संगीतकार श्री.विवेक काजरेकर ह्यांनी. कवितेचे गीत होण्यासाठी त्यात हव्या असणार्‍या नेमक्या गोष्टी म्हणजे त्यातील मात्रा,वृत्त आणि मीटर सारख्या तांत्रिक गोष्टींबद्दल मोलाचे मार्गदर्शन त्यांनी मला केलेलं आहे. त्यांच्याचबरोबर झालेल्या बोलण्यातून कुवेतमधील मराठी मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमात राष्ट्रगीतासारखे म्हणता येईल असे मायमराठी बद्दलचे रुजवू मराठी, फूलवू मराठी हे गीत मी लिहू शकले. माझ्या कविता लेखनाला सर्वप्रथम प्रसिद्धी दिली ती मायबोली ह्या संकेतस्थळाने आणि त्यानंतर मनोगत ह्या संकेतस्थळाने. इथे मला खूप मित्र-मैत्रिणी भेटल्या. त्यांच्याकडून नेहमीच मोलाचे मार्गदर्शन ,कौतुक आणि प्रोत्साहन मिळत आलेले आहे. ह्या संग्रहाचे सारे तूझ्यात आहे हे शीर्षकही माझ्या एका कामिनी केंभावी नावाच्या मैत्रिणीने सुचवले आणि मलाही ते खूप आवडले. ह्या बद्दल अजून बरेच लिहिण्यासारखे आहे पण ते आपल्याला खुद्द जयश्रीच्या समर्थ शब्दात थोड्याच दिवसात वाचायला मिळेल आणि तेच जास्त योग्य ठरेल. तेव्हा इथेच थांबतो.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 10:27 नवीन

सर्वांचे अभिनंदन..

सुधीरराव, उत्तम वृत्तांत! मलाही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची खूप इच्छा होती परंतु काही घरगुती कारणांमुळे जमलं नाही. या अल्बमकरता मी जयूचं मनापासून अभिनंदन करतो. जयूचं निवेदनही अतिशय रसाळ असतं यात काहीच वाद नाही. असो, जयूला आणि ह्या अल्बममधील सर्व संबंधित कलाकारांना सुगमसंगीतातील पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा! तात्या.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 03/21/2008 - 10:58 नवीन

छान...

वृत्तांत दिल्याबद्दल धन्यवाद! उत्तम वर्णन.... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Tue, 03/25/2008 - 13:45 नवीन

एक झलक!

इथे आणि इथेही पाहा
  • Log in or register to post comments
ज
जयवी Fri, 03/28/2008 - 20:22 नवीन

तहे दिल से शुक्रिया !

सुधीरजी..... सगळ्यात पहिले...... तुमचे आभार..... इतक्या सुरेख वृत्तांताबद्दल !! मला इथे प्रतिक्रिया द्यायला खरं तर उशीरच झालाय पण आज कुवेतला परत आलेय आणि लग्गेच लेख वाचून आभार मानतेय. तुम्ही माझी जरा जास्तंच तारीफ केलीये हो.....!! पण आपला कार्यक्रम इतका मनापासून कोणाला आवडला ह्याचा आनंद मात्र नक्कीच झाला. पण तुम्ही न भेटता गेलात...... ह्यांचं वाईटही वाटलं. आता पुढच्या वेळी मात्र नक्की भेटूयात प्राजु, सर्कीट(नागपूरकर) :) , देवकाका, तात्या (तुमची वाट बघत होते हो), इनोबा........ सर्वांचेच आभार !! आता सीडी विकत घेऊन त्याबद्दल अभिप्राय नक्की कळवावा. देवकाका दूरदर्शनाचे दुवे दिल्याबद्दल खूप खूप आभार. आता कुणाकुणाचे किती किती आभार मानू असं झालंय..... इतकी सगळ्यांची मदत झालीये. असंच प्रेम असू द्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा