user

धोका

हास्य वरचे, आत दु:खाशी सलोखा
बेगडी आयुष्य देते रोज धोका

बंद केली मी सुखाची सर्व दारे,
एकही नाही घराला या झरोका

हारणे हा वारसा की धर्म माझा?
सोडला हातातला प्रत्येक मोका!

सोबती काळोखगर्भाचा उबारा,
आणि चुकलेल्या क्षणाचा मंद ठोका

ध्यास आता थांबण्याचा, संपण्याचा
अंत व्हावा वेगळा, नवखा, अनोखा

प्रत्येक

प्रत्येक ओळ सुंदर! विशेष्त मला आवडलेल्या ह्या ओळी-

हास्य वरचे, आत दु:खाशी सलोखा
बेगडी आयुष्य देते रोज धोका

हारणे हा वारसा की धर्म माझा?
सोडला हातातला प्रत्येक मोका!

जियो.

मस्त!

प्रत्येक कडवे सुंदर!

अवांतर: तुम्ही कवितांचे पुस्तक कधी काढताय याची वाट बघतोय!

राघव

राघव

अगदी

अगदी सहमत!

तात्या.

--Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it..!

शेवटची द्विपदी?

ध्यास आता थांबण्याचा, संपण्याचा
अंत व्हावा वेगळा, नवखा, अनोखा

शेवटच्या द्विपदीतील अंत्ययमक 'अनोखा' ?
त्यामुळे आधीचे सगळे कष्ट पाण्यात गेले.
ही द्विपदी सोडून बाकी सगळ्या द्विपदी ऊत्तम जमल्या आहेत.
तेव्हा क्रांति,शेवटच्या द्विपदीत योग्य तो बदल कर.बाकी चाल तयार आहे....

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

कविता आवडली

आवडली
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

कल एक हंस उतरा
आसमान से
बहुत सारी
सफ़ेदी लिए, निर्मलता लिए
अपने पूरे पंखों से समेटता रहा मुझे
लगता है अब भी वह मुझे उड़ाए
ले जा रहा है...
.................................अमिता प्रजापति

व्वा!!

सोबती काळोखगर्भाचा उबारा,
आणि चुकलेल्या क्षणाचा मंद ठोका

ध्यास आता थांबण्याचा, संपण्याचा
अंत व्हावा वेगळा, नवखा, अनोखा

या ओळी खूप सुंदर आहेत.
फार फार सुंदर!

- प्राजक्ता
http://www.praaju.com/

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

फारच

फारच छान..

binarybandya™

आवडली.. फार

आवडली.. फार सुंदर..

-- मेघवेडा.

आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? Shock

छाणंच हो

छाणंच हो कविता Smile

- गेमवेडा
खरडवही आणि खरडफळा अनुमती मिळाली ना ? आता सही बदला Smile

कविता

कविता आवडली. थोडी वेगळ्या धाटणीची वाटली. राघवप्रमाणेच आम्हीही वाट बघू आता. Smile

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते

वा! नेहेमीप्रमाणेच सुंदर!

आणि त्याचप्रमाणे आमची दुसरी दाद 'धोका' देणार नाही! Wink

(निर्धोक)चतुरंग

कविता छान जमली आहे

क्रांती,
कविता छान जमली आहे.
------------------------
सुधीर काळे
बाद मुद्दत उन्हें देखकर यूँ लगा, जैसे बेकार दिलको करार आ गया!

सुधीर काळे: Pl read my letter on J&K published in JP on 23rd August 2010
http://www.thejakartapost.com/news/2010/08/23/letter-kashmir-again.html

सुंदर

सुंदर कविता.

ध्यास आता थांबण्याचा, संपण्याचा
अंत व्हावा वेगळा, नवखा, अनोखा
ह्या ओळी तर खासच.

- अश्विनी

- अश्विनी

Scroll to Top