विमुक्ता, अजून थोडा धावता आढावा घेतला असतास तर छान झाले असते.
"वेळातवेळ काढून प्रत्येकाने एकदातरी का वाचावं " याचे जरा विवेचन असते तर मजा आली असती..
*शॉपिंग लिस्ट मधे टाकलय पुस्तक... :)
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
खरंतर अजून माहिती द्यावी वाटत होती, पण इतक्या थोर लोकांच्या कार्याबद्दल ‘मी काय लिहिणार?’ असं वाटलं म्हणून जास्त नाही लिहिलं... आणि पुस्तक खूपच छान आहे... एकदा हातात घेतलं तर ठेवावंच वाटत नाही...
खूपच छान पुस्तक आहे हे!
त्यांचा परिस्थितीशी असलेला झगडा वाचून अंगावर काटा येतो.
पुस्तकातले फोटो पहायला मात्र धाडस पाहिजे. अस्वलाच्या हल्ल्यातला जखमी माणूस व त्यावर केलेले उपचार वाचवत नाहीत.
रेवती
हे खरेच छान पुस्तक आहे. डॉ. प्रकाश आमटेंचे कार्य चांगल्या पद्धतीने वाचकापर्यन्त पोचते. सुंदर सुरुवातीनंतर शेवटी मात्र थोडासा कंटाळा येतो. पण एकूण परिणामकारक.
अवांतर: हे पुस्तक वाचनालयात वाचायला मिळेल.
इथेही वाचा. विडीयोजही पहाता येतील.
मदर टेरेसां चे फोटो ज्याप्रमाणे सगळीकडे पहायला मिळतात, भारतात सगळ्या शाळांतही मदर टेरेसाचे गोडवे गायले जातात. पण आपले आमटे कुटुंबिय मात्र त्याबाबतीत दुर्दैवीच म्हणायला हवेत. आपला महाराष्ट्र सुद्धा त्यांची उपेक्षाच करतो.
आमटे कुटुंबियांना माझा मानाचा मुजरा.
खरेच छान पुस्तक आहे....
एकदातरी वाचावे असे...
आणि हो..
बाजिराव रोड वर एक प्रदर्शन लागले आहे,,,
तिथे प्रकाशवाटा ह्या पुस्तकावर अजुन एक पुस्तक फुकट मिळते
विमुक्त, तुम्ही हे छोटेशे विवेचन देउन एका चांगल्या पुस्तकाची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. हे पुस्तक नक्कीच घेउन वाचावे लागेल.
बाबा आमटे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या(कार्या) बद्दल काही जास्त लिहिण्याची
माझ्या सारख्यांची पात्रता नाही. त्यांचं अफाट, निस्वार्थी कार्य हीच खरी ओळख.
(त्यांच्या लोकबिरादरी या प्रकल्पा बद्दल जास्त माहिती या http://lokbiradariprakalp.org/index.html ठिकाणी मिळेल.)
भामरागढ महाराष्ट्रातच आहे. चंद्रपूर पासून ४ तासाचा रस्ता आहे. शक्य झाल्यास आवर्जून भेट द्या. प्रकाशदादांसारखे निगर्वी व्यक्तीमत्व शोधून सापडणार नाही. जाताना ग्लोरी ऑफ आलापल्ली पहायला विसरू नका.
उमराणी सरकार
प्रतिक्रिया
प्रशांत
विमुक्ता,
छान माहीती
कुठेही
छान माहीती
छान माहीती
खरंतर अजून
खूपच छान
छान आहे पुस्तक
आणखी एक लेख
इथेही माहिती मिळू शकेल
खरेच छान
या छोट्याश्या
छान माहीती
प्रकाशवाट
नुसते वाचू नका