✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

परत एकदा 'स्वच्छतेच्या बैलाला..'

न
नीधप यांनी
Sun, 11/15/2009 - 13:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19165 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

छान उपक्रम आहे.

प्रसन्न केसकर
Sun, 11/15/2009 - 14:08 नवीन
माझ्याकडुन जी अन जेव्हढी मदत शक्य आहे तेव्हढी मदत करेनच.
  • Log in or register to post comments

आभार. -

नीधप
Sun, 11/15/2009 - 14:26 नवीन
आभार. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर

मूळ लेख

विसोबा खेचर
Sun, 11/15/2009 - 14:14 नवीन
मूळ लेख तिकडे अन् चर्चा आणि मदत वगैरे इकडे? बरं बरं! :) डॉक्यूकरता आमच्या शुभेच्छा हो! तात्या.
  • Log in or register to post comments

गेल्यावर्

नीधप
Sun, 11/15/2009 - 14:25 नवीन
गेल्यावर्षीच्या दिवाळी अंकासाठी लिहिलेला लेख आहे. तो इथे न टाकणे साहजिकच. चर्चा तिथे सुरू झाली आणि तिथेही आवाहन केले आहे. माझ्या ब्लॉगवर पण केले आहे. इथे ते आवाहन करणे तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही लेख उडवून टाका. कदाचित तुम्हाला एका महत्वाच्या मुद्द्यापेक्षा तुमच्या संकेतस्थळाची exclusivity महत्वाची असेल. मर्जी तुमची. तसंही मी इथे काही लिहिण्याची सोय नाही. कितीही महत्वाचे काही लिहा पण तरी मी लिहिलंय म्हणल्यावर काय प्रकारचे प्रतिसाद येतात हे मिसळभोक्ता या आयडीच्या घाणेरड्या प्रतिसादातच दिसतंच आहे. प्रत्येक ठिकाणी मी काहीही लिहिलं असेल तिथे येऊन काहीतरी घाणेरडं बोलायचं यामधे या आयडीला धन्यता वाटते. त्याला तुमचा पाठिंबा असतो हेही आहेच. नसता तर असला प्रतिसाद तुम्ही उडवला असतात. असो.. पण असे असताना मी मूळ लेख इथे न लिहिण्यावर तुम्ही काही बोलणे चुकीचेच. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

इथे ते

विसोबा खेचर
Sun, 11/15/2009 - 14:35 नवीन
इथे ते आवाहन करणे तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही लेख उडवून टाका.
असे मी कुठेही म्हटलेले नाही..इथे आवाहान करणे मला पटले नसते तर तुम्ही सांगायच्या आधीच लेख उडाला असता!
कदाचित तुम्हाला एका महत्वाच्या मुद्द्यापेक्षा तुमच्या संकेतस्थळाची exclusivity महत्वाची असेल.
शक्यता नाकारता येत नाही!
मर्जी तुमची.
ती तर आहेच. प्रत्येकाने आपापल्या मर्जीप्रमाणेच वागावे! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

वरचा

नीधप
Sun, 11/15/2009 - 14:39 नवीन
वरचा घाणेरडा प्रतिसाद संपादीत केल्याबद्दल आभार. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

वरचा

विसोबा खेचर
Sun, 11/15/2009 - 14:42 नवीन
वरचा घाणेरडा प्रतिसाद संपादीत केल्याबद्दल आभार.
अश्या घाणेरड्या प्रतिसादांबद्दल मला किंवा इतर संपादकांना वेळोवेळी कळवल्यास योग्य ती कारवाई होत राहील/केली जाईल. धन्यवाद.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

>>मी काही

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 11/15/2009 - 14:53 नवीन
>>मी काही प्रश्नावल्या तयार करणारे. त्यानुसार त्यांनी आपल्या आजूबाजूला जेजे लोक योग्य वाटतील त्यांना प्रश्न विचारून त्याची उत्तरे जमा करून माझ्याकडे पाठवावीत ही विनंती. हं यात आपणास मी मदत करीन. आपण प्रश्नावली आम्हास पाठवावी. >>मिसळभोक्ता या आयडीच्या घाणेरड्या प्रतिसादातच दिसतंच आहे. प्रत्येक ठिकाणी मी काहीही लिहिलं असेल तिथे येऊन काहीतरी घाणेरडं बोलायचं यामधे या आयडीला धन्यता वाटते. अहो, तुम्ही लक्ष नका देऊ त्यांच्याकडे. खूप रिकामा वेळ असला की त्या आयडीतून असे प्रतिसाद येतात. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

व्यनितून

नीधप
Sun, 11/15/2009 - 15:00 नवीन
व्यनितून तुमचा इमेल आयडी कळवलात किंवा toiletdocu@gmail.com याठिकाणी टेस्ट इमेल पाठवलात तर प्रश्नावली तयार होतास लगेच पाठवते. आभार. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या ,

पक्या
Mon, 11/16/2009 - 13:58 नवीन
तात्या , चांगल्या कामाकरीता काहो इतका संकुचित विचार करता? आश्चर्य वाटले वरचा प्रतिसाद पाहून. -जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

नी...

बिपिन कार्यकर्ते
Sun, 11/15/2009 - 15:28 नवीन
शक्य ती सगळी मदत करेन. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

डॉक्यूमें

अवलिया
Sun, 11/15/2009 - 17:37 नवीन
डॉक्यूमेंट्रीकरता आमच्या शुभेच्छा ! --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

श्रावण मोडक
Sun, 11/15/2009 - 17:44 नवीन
शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

नी, शक्य ती

स्वाती२
Sun, 11/15/2009 - 17:54 नवीन
नी, शक्य ती मदत करीन. शुभेच्छा आहेतच.
  • Log in or register to post comments

प्रोत्साहन

प्रकाश घाटपांडे
Sun, 11/15/2009 - 18:06 नवीन
एक चांगला विषय कृतिशील रित्या हाताळला जातोय याबद्दल समाधान व प्रोत्साहन. १५ ऑगस्ट २००९ च्या साप्ताहिक सकाळ मध्ये संध्या टांकसाळे व अमृता वाळिंबे यांनी या विषयाला चांगली वाचा फोडली आहे. हा एक जनआंदोलनाचा विषय आहे. कुठल्याही संस्थेत/ठिकाणि आपण गेल्यावर तेथील स्वच्छतागृह पिण्याचे पाणि व कचरा या गोष्टी पाहिल्यावर त्या संस्थेची / ठिकाणाची लायकी समजते. हा विषय जास्तीत जास्त बोलला जावा. वैयक्तिक पातळीवर शासनावर दबाव आणण्यासाठी किमान पत्र लिहिण्याचा उपक्रम सातत्याने राबवला तरी खुप झाले. मागच्या पंधरवड्यात पुण्यातील एमटीडीसी च्या कार्यालयात जाउन मी तेथील अधिकार्‍यांना भेटुन पर्यटनात स्वच्छतागृहांची मोहीम राबवण्यासाठी वैयक्तिक पातळीवर संवेदनशील रहावे अशी विनंती केली. आपल्या मिटिंग मध्ये धोरणात्मक बाबी जेव्हा हाताळता त्यावेळी या विषयाचा आग्रह धरा. उत्तराखंड ला गेलो होतो तेव्हा एका स्वच्छतागृहचालकाने नोंदवलेले निरिक्षण होते कि पेड टॊयलेट यशस्वीरित्या राबवल्यावर पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली . केरळ मधील विवेकानंद केंद्राचे एक संचालक श्री घारपुरे यांनी कमीत कमी साधनात पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपण काय करु शकतो यावर पुण्यात सदिप व्याखान दिले त्यावेळि गावातील स्वच्च्छतागृहांचे अनुभव सांगितले. नीरजा यांनी हा विषय कृतीशील रित्या लावुन धरल्याबद्दल मन:पुर्वक अभिनंदन व आभार. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

चांगलं कार्य आहे

बहुगुणी
Sun, 11/15/2009 - 18:32 नवीन
सहभागी होऊन मदत नक्कीच करेन. Keep up the good work, शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

+१.

Nile
Mon, 11/16/2009 - 03:15 नवीन
सहभागी होऊन मदत नक्कीच करेन. Keep up the good work, शुभेच्छा!
हेच म्हणतो! माझा इमेल व्यनी करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

उपक्रमाला

माझी दुनिया
Sun, 11/15/2009 - 18:41 नवीन
उपक्रमाला शुभेच्छा ! मी टेस्ट मेल पाठवला आहे. प्रश्नावली तयार झाल्यावर पाठवावी. मी माझी उत्तरे भरून पाठवीन. ____________ डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

सुनील
Sun, 11/15/2009 - 18:49 नवीन
शुभेच्छा! शक्य होईल ती मदत करण्यास आनंद वाटेल. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 11/15/2009 - 21:31 नवीन
नीरजा, उपक्रमासाठी शुभेच्छा! प्रश्नावली तयार झाली की मलाही जरूर पाठव. माझ्यासारख्या आणखी काही (रिकामटेकड्या) सर्कारी लोकांकडूनही उत्तरं घेऊन जरूर पाठवेन. 'एक शून्य मी' या पुस्तकातही पुलंनी या विषयांवर काही दशके आधी लिहीलेला निबंध आहे. अजूनही आपण त्याच दशकात आहोत याची लाजही वाटते, आणि प्रत्यक्षात बाहेर फिरायची वेळ येते तेव्हा त्रासही होतो. अदिती
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

प्रभो
Sun, 11/15/2009 - 21:45 नवीन
शुभेच्छा! मदत करायचा प्रयत्न नक्कीच करेन... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

सगळ्यांच्

नीधप
Sun, 11/15/2009 - 23:40 नवीन
सगळ्यांच्या उस्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार. सर्वांना प्रश्नावली तयार होताच लवकरात लवकर पाठवून देते. तसेच डॉक्यु मधे काय नी कसे करता याबद्दलही तुमच्या सूचनांचे स्वागत आहे. घाटपांडे, चांगली माहीती आहे. श्री घारपुर्‍यांना संपर्क करायचा असल्यास कुठे करता येईल का? कर्क, अतिशय उत्तम माहीती. या संस्थांकडे मी नक्कीच चौकशी करीन. 'कचराकोंडी' मी पाह्यलीये आणि माझ्याकडे प्रतही आहे. उत्तम डॉक्युमेंटेशन आहे. आणि अतुलचं मार्गदर्शन घेणे हा मुद्दा तर यादीमधला एक महत्वाचा मुद्दा आहेच. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

सजग नागरिक मंच

प्रकाश घाटपांडे
Mon, 11/16/2009 - 10:14 नवीन
पुण्यात सजग नागरिक मंचाची स्थापना करणारे व अनेक नागरी विषय माहिती आधिकाराद्वारे लाउन धरणारे अ‍ॅक्टिविस्ट विवेक वेलणकर pranku@vsnl.com यांनी त्या कार्यक्रमाचे संयोजन केले होते.अधिक माहिती त्यांचेकडे मिळेल. त्यांचा संपर्क क्र. ९८५००६३४८० त्यांची या कामी नक्की मदत होईल.( माझा संदर्भ नाही दिला तरीही) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

राजकारणी सहभाग

हुप्प्या
Mon, 11/16/2009 - 00:20 नवीन
स्त्री खासदार वा आमदार ह्यांना ह्या उपक्रमाची माहिती दिली तर कदाचित त्या जास्त मदत करतील. इतकी मूलभूत गरज इतकी दुर्लक्षित आहे ह्याची खंत वाटते. एकंदरीत भारतीय सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, आरोग्य याविषयी बेफिकिर असतो पण ह्या संदर्भात तर कळसच आहे. मला वाटते की स्त्रियांची स्वच्छतागृहे फुकट न ठेवता पैसे देऊन सशुल्क ठेवावीत. मग कदाचित ती स्वच्छ ठेवली जातील. जास्त सुविधा हव्या असल्या तर जास्त शुल्कवाली असावीत असे काही कुणी केले आहे का? परदेशवासीयांना या उपक्रमाला कशी मदत करता येईल?
  • Log in or register to post comments

सुलभने

नीधप
Mon, 11/16/2009 - 09:27 नवीन
सुलभने सशुल्क केले होते काही प्रमाणात पण त्यांचीही अवस्था फारशी भली नाही. सशुल्क असेल तरी चालेल कितीही ठेवा शुल्क पण सुविधा पुरवा असं म्हणणारा आमच्यासारखा एक वर्ग आहे. त्याच वेळेला महिन्याच्या बजेटमधे रोजच्या २-५ रूपयांच्या खर्चाने फरक पडू शकणारा एक वर्ग आहे. या दुसर्‍या वर्गामधे मुंबईत बहुतांशी अशा महिला आहेत ज्या रोज खूप दूरवरून प्रवास करत आपल्या हपिसात पोचतात आणि तेवढाच प्रवास करून घरी पोचतात. अगदी रोजचे रोज डेक्कन क्वीन चा पास काढून अप्-डाउन करणार्‍या पण अनेक महिला बघितल्या आहेत. सशुल्क आठ आणे-रूपयापेक्षा जास्त ठेवल्यास या वर्गाचे काय हा प्रश्न उरतोच. स्वच्छ टॉयलेटस ही पैशाने विकत घेता येण्याजोगी चैन आहे मूलभूत सुविधा नाही असाही संदेश जातोच की. असो... - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

चैन आणि मूलभूत गरज

हुप्प्या
Mon, 11/16/2009 - 11:26 नवीन
अन्न, वस्त्रे, निवारा ह्याही मूलभूत गरजा आहेत. चैनी नाहीत पण त्या तरी फुकट कुठे मिळतात? पैसे द्यावेच लागतात ना? तसे ह्यालाही द्यावेत. निदान दोन पैसे मिळतायत म्हणून त्या जागा स्वच्छ ठेवल्या जातील अशी एक आशा. कुठलाही उपक्रम फुकट आणि सरकारी बनला की तिथे भ्रष्टाचाराचा बुजबुजाट होतो हे लक्षात घेतले पाहिजे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

हाही

नीधप
Mon, 11/16/2009 - 12:40 नवीन
हाही मुद्दा बरोबर आहे. मी लाउड थिंकींग या पातळीवरच हा मुद्दा मांडला होता. मला चर्चा होणं अपेक्षित आहे. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

नीरजा उत्तम उपक्रम!

चतुरंग
Mon, 11/16/2009 - 01:16 नवीन
शुभेच्छा आहेतच. तुमची प्रश्नावली तयार झाली की पाठवून द्या. संपर्काचा ईमेल आयडी व्यनीतून पाठवतोय. सार्वजनिक स्वच्छतागृहे ही आपल्याकडची फार जुनी समस्या अजूनही फार मोठ्या प्रमाणावर तशीच आहे हे बघून वाईट वाटते. सुलभ इंटरनॅशनल ला तुम्ही संपर्क केला आहे का? त्याचे संस्थापक श्री. बिंदेश्वर पाठक ह्यांना मध्यंतरी स्टॉकहोममध्ये स्वीडिश सरकारचा पुरस्कार मिळाला. चतुरंग
  • Log in or register to post comments

सुधा

विंजिनेर
Mon, 11/16/2009 - 07:45 नवीन
सुधा मुर्ती (इन्फोसिस फाउंडेशनच्या प्रमुख)सुद्धा ग्रामीण भागातील स्वच्छतागृह मोहीम राबवतात. त्यांच्या कडून अधिक माहिती/मदत मिळेल.
  • Log in or register to post comments

अतिषय

रेवती
Mon, 11/16/2009 - 11:22 नवीन
अतिषय योग्य उपक्रम! आपल्याला शुभेच्छा! मलाही प्रश्नावली मिळावी असे वाटते. चतुरंगकडून घेइन. आणखी काही मदत करण्यासारखी असल्यास करीन. अवांतर: दोन महिन्यांपूर्वी मुलाच्या शाळेची सहल एका जंगलसदृश भागात गेली होती. थंडीला सुरुवात झाली असताना सगळ्या साडेसात आठ वयाच्या विद्यार्थ्यांना दोनपेक्षा जास्तवेळा रेस्टरूम वापरण्याची गरज असणार होती. दोनवेळा नेऊन आणल्यावर माझ्या मुलाला तिसर्‍यांदा जाणे शक्य झाले नाही व हा सगळ्यांसमोर सांगायला संकोचला. मग पुन्हा शाळेत पोहोचेपर्यंत त्रास झाला. ही गोष्ट तातडीने वर्गशिक्षकांना लेखी कळवली त्यावर त्यांनी पालक शिक्षक भेटीत तो मुद्दा महत्वाचा मानून आधी चर्चेला घेतला. त्यावेळी आपल्याकडे शाळेतल्या शाळेत रोज होणार्‍या मानसिक/शारीरिक कोंडीची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. रेवती
  • Log in or register to post comments

उत्तम!

धमाल मुलगा
Mon, 11/16/2009 - 11:34 नवीन
चांगला आहे प्रकल्प. शुभेच्छा. मेल-आयडी व्यनिमधुन कळवत आहेच.. प्रश्नावली जरुर पाठवावी, नक्की मदत करुच. -(पक्का राडेबाज आणि कृतिशील अविचारी) ध.
  • Log in or register to post comments

प्रकल्पास

निखिल देशपांडे
Mon, 11/16/2009 - 12:07 नवीन
प्रकल्पासाठी शुभेच्छा मेल आयडी व्यनी तुन पाठवतच आहे. जरुर मदत करु निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments

अगदी अगदी

दिपाली पाटिल
Mon, 11/16/2009 - 12:34 नवीन
अगदी अगदी महत्त्वपूर्ण मुद्दा आहे...प्रकल्पासाठी शुभेच्छा. मेल-आयडी व्यनिमधुन कळवत आहेच... प्रश्नावली जरुर पाठवावी. दिपाली :)
  • Log in or register to post comments

शक्य ती

दशानन
Mon, 11/16/2009 - 12:37 नवीन
शक्य ती मदत करीन. शुभेच्छा आहेतच. rj.jain@gmail.com ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
  • Log in or register to post comments

प्रश्नमंजूषा जरूर पाठवा

सुधीर काळे
Mon, 11/16/2009 - 15:11 नवीन
व्यनिद्वारा माझा ID पाठवत आहे. प्रश्नमंजूषा जरूर पाठवा, मीही जमेल तितकी मदत करेन. उपक्रमाला शुभेच्छा! सुधीर काळे ------------------------ सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा...

sneharani
Mon, 11/16/2009 - 15:44 नवीन
प्रकल्पासाठी शुभेच्छा. मेल-आयडी व्यनिमधुन कळवत आहेच... प्रश्नावली जरुर पाठवावी.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा