Skip to main content

तुम्हाला भावणारा भावी पंतप्रधान (विरोधीपक्षीय) कंचा?

लेखक माहितगार यांनी सोमवार, 23/11/2026 20:23 या दिवशी प्रकाशित केले.

२०२९ नंतर तुम्हाला भावणारा भावी (नेपो-किड नसलेला विरोधीपक्षीय नेता) पंतप्रधान अथवा विरोधीपक्षीय नेता  कोण असावा असे तुम्हाला वाटते आणि का?

'नेपो-किड' (Nepo-kid) हा शब्द साधारणपणे अशा व्यक्तींसाठी वापरला जातो ज्यांना त्यांच्या पालकांच्या किंवा कुटुंबाच्या प्रभावशाली पार्श्वभूमीचा (घराणेशाहीचा) फायदा मिळतो.
 

सद्य  ९ नॉन-एनडीए मुख्यमंत्र्यांपैकी दोघांची थेट राजकीय घराणेशाहीची (Political Dynasty) पार्श्वभूमी आहे ते या यादीतून वगळले आहेत, तर खालील उर्वरित सात मुख्यमंत्री कोणत्याही राजकीय घराण्यातून आलेले नाहीत: 


१)  सुखविंदर सिंग सुखू (हिमाचल प्रदेश): सामान्य कुटुंबातून आणि विद्यार्थी राजकारणातून (NSUI) पुढे आलेले नेते.
 

२)  डी. के. शिवकुमार  (कर्नाटक): राजकारणात कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना संघटनात्मक कार्यातून पुढे आलेले नेते.
 

३) व्ही. डी. सतीशन   (केरळ): विद्यार्थी चळवळीतून आणि वकिलीच्या व्यवसायातून राजकारणात आलेले नेते.
 

४) भगवंत मान   (पंजाब): राजकारणात येण्यापूर्वी ते एक प्रसिद्ध विनोदी कलाकार (Comedian) आणि अभिनेते होते.
 

४) ए. रेवंत रेड्डी   (तेलंगणा): विद्यार्थी राजकारण (ABVP) आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली.
 

५) लालदुहोमा   (मिझोरम): ते माजी भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी होते आणि नंतर राजकारणात आले.
 

६) सी. जोसेफ विजय  (तामिळनाडू): राजकारणात येण्यापूर्वी ते तमिळ चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय अभिनेते होते (टीप: त्यांचे वडील एस. ए. चंद्रशेखर हे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक होते, त्यामुळे चित्रपटसृष्टीतील पार्श्वभूमी असली तरी त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय नाही).
 

७) अरविंद केजरीवाल

 

८) अभिजीत दिपके 

 

* नेपो-किड नसलेली इतर  विरोधीपक्षीय नावे तुम्ही सुचवू शकता पण त्यांनी त्यांच्या नातेवाईक भावी पिढीला राजकारणात आणलेले नसावे.   

ज्यांना नेपो-किडच भावी पंतप्रधानपदी/ विरोधीपक्ष नेते पदी हवेत त्यांनी वेगळा धागा काढावा, मिपा चर्चेचा  प्रभाव गल्लीतला नेता निवडीवरही होत नाही हे लक्षात घेऊन  हा धागा हायजैक करू नये.

 

* हा धागा भावी पंतप्रधान एनडीए नसावाच अशा आग्रहाने काढलेला नाही. एनडीए समर्थकही त्यांना आवडणारा भावी विरोधी पक्ष नेता कोण असावा हे नोंदवू शकतात.

*   अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी, धागा चर्चा हायजैक करण्याचा मोह टाळण्यासाठी आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागा साठी अनेक आभार. 

 

 

 


वाचने 687
प्रतिक्रिया 45

प्रतिक्रिया

मला भावी पंतप्रधानपदी खालीलपैकी कोणीही चालेल. इतर कोणीही चालणार नाही. 

 

- राखी सावंत, गौतमी पाटील, बिचकुले, सुषमा अंधारे, पूनम पांडे, सुप्रिया श्रीनेत, जया बच्चन, मायावती, ममता, नाना पटोले, हर्षवर्धन सपकाळ, अतुल लोंढे, सचिन सावंत, संजय राऊत, अमोल मिटकरी, आव्हाड, चंद्रकांत पाटील, नबाब मलिक, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, रॉबर्ट वाड्रा, सुप्रिया सुळे, रोहित पवार, शरद पवार, पार्थ पवार, नसिरुद्दीन शाह, अमोल पालेकर, प्रकाश राज, लालूप्रसाद यादव 


In reply to by श्रीगुरुजी

राखी सावंत, गौतमी पाटील पासून यादी चालू केल्यामुळे  जरासा स्मायली. पण यादीतील बऱ्याच नावांचा नेपोटीझमशी संबंध असल्यामुळे या चर्चे धाग्यास ती ती नावे पात्र ठरू शकत नाहीत


In reply to by श्रीगुरुजी

पंतप्रधान म्हणुन जर "बिचकुले /  बिचुकले" ह्यांचे नाव सुचवत असाल तर माझा पुर्ण पाठिंबा असेल 

ते म्हणे डॉ. पण आहेत. हुच्चविद्याविभुषीत ...


In reply to by श्रीगुरुजी

असं कसं, असं कसं ? सनीताईंना कसे विसरलात भौ ?


In reply to by श्रीगुरुजी

सनीताई कोण?


पूर्वी दूरदर्शनवर पी.एस.पी.ओ पंख्यांची जाहिरात होती. त्यात पंखा विकत घ्यायला आलेला एक मनुष्य पी.एस.पी.ओ म्हणजे काय हे विचारतो त्यानंतर कित्येक लोक पी.एस.पी.ओ नही जानता? असे त्याला विचारत हैराण करतात. https://www.youtube.com/watch?v=RawNP0E28lo सनीताई कोण हा प्रश्न वाचल्यावर त्या जाहिरातीची आठवण झाली.

 

अहो सनीताई कोण म्हणजे काय? त्याच मूळच्या व्होरा कुलोत्पन्न करणजीत कौर पण पडद्यावर स्वत:ला लिओनी कुलोत्पन्न म्हणविणाऱ्या सनी लिओनी 😀


In reply to by चंद्रसूर्यकुमार

माहीतीबद्दल धन्यवाद चंसुकु.

ह्या ताई काय करतात? म्हणजे प्रसिध्द आहेत असे वाटते.

 

--णिरागस

चबु


In reply to by चबुगबाळे

अशी पण चर्चा चालू आहे कळले तर बरेच जण 'मी पंतप्रधान झालो तर / झाले तर  अशा मुलाखती' देऊ लागतील.  


In reply to by चबुगबाळे

या बाई मॉडेल आहेत आणि हिंदी चित्रपटांमध्येही कामे करतात की पूर्वी करायच्या. त्यांचा फोटो इथे दिल्यास मिपासारख्या सोज्वळ संकेतस्थळावर उत्तान फोटो दिल्याबद्दल सदस्यत्व उडू शकेल ही भीती आहे म्हणून त्या बाईंचा फोटो इथे देत नाही 😀


In reply to by चंद्रसूर्यकुमार

मॉडेल मंडळींचे काम त्यांच्या त्यांच्या जागी आहे, हि मंडळी किमान स्वरा स्टाईलने खरेच राजकारणात आली तर चर्चा करण्यात पॉईंटे. तसे काही मॉडेल्स राष्ट्रीय राजकारणात छोटे मोठे स्थान निर्माण करून आहेत. 

 

ओळखा पाहू कोण?: त्यातील एक प्रसिद्ध राजघराण्याच्या सुनबाई  आणि त्यांचे लेकरू प्रसंगी राजघराण्याकडे पाठ फिरवूनही राजकारणात छोटेसे का होईना स्थान टिकवून आहेत.  नेपोटीझम मुळे या धाग्याचा त्यांना फायदा नाही पण  भारतीय राजकारणाने मॉडेल्स ते फुलनदेवी सर्वांना संधी दिली आहे. कोण कुठे पोहोचेल हे सांगता येत नाही कमी न लेखणे हेच बरे.    

 

नुसतीच चर्चा भरकटली तर नेपो-किड्श नसलेल्यां गंभीर राजकारण्यांबद्दलची, सामान्य जनतेच्या किमान स्वप्नातली संधी  मागे पडेल.   


In reply to by माहितगार

ओळखा पाहू कोण?: त्यातील एक प्रसिद्ध राजघराण्याच्या सुनबाई  आणि त्यांचे लेकरू प्रसंगी राजघराण्याकडे पाठ फिरवूनही राजकारणात छोटेसे का होईना स्थान टिकवून आहेत. 

एक हिंट देतो- विश्वामित्र ऋषींची तपश्चर्या भंग करायला ज्या अप्सरेला पाठविले गेले होते त्या अप्सरेचे जे नाव होते तेच नाव या पूर्वाश्रमीच्या मॉडेलचे पण आहे 😀 त्याच पूर्वाश्रमीच्या मॉडेलने १९८४ मध्ये आपल्या दीराविरोधात निवडणुक लढवली होती.

बादवे, एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही मॉडेल म्हणून एका शर्टच्या दुकानासाठी जाहिरात केली होती. 


In reply to by श्वेता व्यास

हो. मेनका गांधी लग्न होण्यापूर्वी मॉडेल होत्या. संजय गांधी गेल्यानंतर कॉग्रेसचा वारसा आपल्याकडे येईल अशी त्यांची अपेक्षा होती पण इंदिरा गांधींनी राजीवना आपला उत्तराधिकारी म्हणून पुढे आणले. त्यातूनच मतभेद वाढले. मग पंतप्रधान निवासातून इंदिरांनी दोन वर्षाच्या वरूणला घेऊन त्यांना जायला सांगितले. त्यांच्या वयाची २५ पूर्ण झाल्यानंतर पहिली लोकसभा निवडणुक होती १९८४ ची लोकसभा निवडणुक. त्यावेळेस मेनका गांधींनी राजीव गांधींविरोधात अमेठीमधून निवडणुक लढवली. त्यात मेनकांचे डिपॉझिट जप्त झाले होते.

त्यांच्या नावाचे स्पेलिंग मनेका असे केले जात असले तरी नाव मेनका आहे असे वाटते. १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रीमंडळात त्या होत्या तेव्हा शपथ घेताना त्यांनी 'आय... मेनका गांधी डू स्वेअर इन द नेम ऑफ गॉड....' असे म्हटले होते हे टिव्हीवर बघितल्याचे आठवते. 

 

शर्टाच्या जाहिरातीत मॉडेल म्हणून होते ते मुख्यमंत्री कोण हे पण सांगता येईल का? 

 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

>>शर्टाच्या जाहिरातीत मॉडेल म्हणून होते ते मुख्यमंत्री कोण हे पण सांगता येईल का? 

हा किस्सा फडणवीसांकडून एका मुलाखतीमध्ये ऐकला होता. मित्रासाठी जाहिरात केली असे काहीसे होते.


In reply to by श्वेता व्यास

हा शर्ट मला तरी बराच विचित्र वाटला. पण प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असते. असे शर्ट वापरणारे लोक असतीलच.


In reply to by श्रीगुरुजी

वरील यादीत काही नावे कळत नकळत अनावधानाने राहून गेली. त्यासाठी हात जोडून क्षमा मागतो. ती नावे खालीलप्रमाणे -

 

- महाकवी ए आर दास, प्रकाश आंबेडकर, कोळसे पाटील, उर्फीताई, मल्लिका शेरावत, अभिजित दिपके, ध्रुव राठी, नेहा बोरा, आशिष रांका, सौरभ दास, दिपाली भोसले उर्फ दिपाली सय्यद, अंबादास दानवे, पवन खेडा, भास्कर जाधव, नवनाथ बन, सुलक्षणा सलगर, पुरूषोत्तम खेडेकर, श्रीमंत कोकाटे, गोपीचं पडळकर, गुणरत्न सदावर्त, महश भट्ट, राजू शेट्टी, रबीशकुमार, प्रकाश कराट, राजदीप सरदेसाई, प्रसन्न जोशी, नम्रता वाकळे, निरंजन टकले 


In reply to by श्रीगुरुजी

@गुरुजी, 

सन्माननीय कप्टन  अशोक  खोतांचे नाव नसल्यबद्द्ल निषेध ... या थोर माणसावर सिनेमा येतोय म्हणजे बघा. 

महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स 

 

अरे, हाय काय नाय काय ! 


In reply to by चौथा कोनाडा

अनुमोदन! अशोक खोत सुद्धा सुयोग्य उमेदवार आहेत. 


विरोधी पक्ष कॉग्रेसमधील एकच नेता मला त्यातल्या त्यात चांगला वाटतो. ते आहेत गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री रमाकांत खलप. त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आणि गैरव्यवहारांचे आरोप आहेत पण त्यामानाने बरेच कमी- दोनच. त्यातील कोणताच आरोप सिद्ध होणे सोडाच कोर्टात तरी गेला आहे असे वाटत नाही. आताच्या महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात काही गणंग भ्रष्टाचारासाठी पूर्वी तुरूंगात जाऊनही आलेले आहेत. असल्यांपेक्षा रमाकांत खलप कधीही चांगले. ते महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षात असल्यापासून त्यांची प्रतिमा एक अभ्यासू नेता आणि चांगला प्रशासक अशी आहे. कॉग्रेसमध्ये आहेत म्हणून तेवढ्यापुरता गांधी घराण्याचा उदो उदो सोशल मिडियावर करतात पण कॉग्रेसमधील इतरांप्रमाणे उघड उघड तळवे चाटायला जात नाहीत.

अर्थात ते यापुढे पंतप्रधान सोडाच विरोधी पक्षनेताही सोडाच खासदारही होतील असे वाटत नाहीत. एक तर त्यांचे वय आता जवळपास ८० च्या घरात आहे आणि उत्तर गोव्यात काही ठिकाणी त्यांचा प्रभाव आहे तो सोडून इतर कुठेही त्यांच्या नावावर चार मतेही फिरायची नाहीत. तसेच ते त्यांचे घर- मांद्रे मधून सलग दोन वेळा विधानसभा निवडणुक हरले (२००२ आणि २००७). त्यानंतर १७ वर्षे निवडणुकांच्या राजकारणापासून दूर होते. अचानक २०२४ मध्ये उत्तर गोव्यातून त्यांनी कॉग्रेस उमेदवार म्हणून निवडणुक लढवली पण विजयी उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या ६०% मते पण ते मिळवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचे निवडणुकांचे राजकारण आता संपल्यात जमा आहे. 

तरीही कॉग्रेसमधील एका नेत्याविषयी त्यातल्या त्यात अनुकूल मत असेल तर ते रमाकांत खलप.


In reply to by चंद्रसूर्यकुमार

भारतीय पंतप्रधान पदाचा इतिहास पहाता मते फिरवणारे मास पॉलीटीशियन्स जास्त सक्सेसफुल असतात पण अखिल भारतीय मास सपोर्ट नसणाऱ्यांनाही  बऱ्याच जणांना संधी मिळालेली दिसते. अर्थात त्याही मागे बऱ्याचदा पडद्यामागचा कोणत्यान कोणत्या आर्थिक सबळ गटांचा  छुपा पाठींबा असावा. 


In reply to by माहितगार

भारतीय पंतप्रधान पदाचा इतिहास पहाता मते फिरवणारे मास पॉलीटीशियन्स जास्त सक्सेसफुल असतात पण अखिल भारतीय मास सपोर्ट नसणाऱ्यांनाही  बऱ्याच जणांना संधी मिळालेली दिसते. 

यात सगळ्यात महत्त्वाची नावे म्हणजे ह.दो.देवेगौडा आणि इंदरकुमार गुजराल. देवेगौडांना निदान कर्नाटकातील लोक तरी ओळखत होते आणि कर्नाटकबाहेरील निदान काही लोकांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव तरी ऐकले असावे. पण गुजराल पंतप्रधान झाले तेव्हा नेहमी वर्तमानपत्रे वाचणारे आणि बातम्या बघणारे/ऐकणारे ५-१०% लोक सोडले तर देशातील ९०-९५% लोकांनी त्यांचे नाव तरी ऐकले होते की नाही. गुजरालांना संधी मिळाली त्या काही महिन्यांच्या कालावधीत पण पाकिस्तानातील रॉच्या कारवाया बंद करून इतकी म्हणजे इतकी घाण घालून ठेवली की विचारूच नका.


आदित्य आणि उबाठा तसेच त्यांचे पक्ष प्रतोद विश्वप्रवक्ते श्री संजयजी यांचाही एकदातरी  विचार व्हावा.


In reply to by विजुभाऊ

पक्ष प्रतोद विश्वप्रवक्ते श्री संजयजी या धागाचर्चेत विचारात घेतले जाऊ शकतात.  आदित्य आणि उबाठा हे नेपो-कीड्स या धागा चर्चेपुरते बाद करावयास हवेत.


सध्या तरी बिचुकले, सनीताई व संजयदादा आघाडीवर आहेत.

 

तसं पाहिलं तर मिपावरील अनेक महानुभाव, पंतप्रधानपदी स्थानापन्न होण्यास सुयोग्य आहेत. 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

अरेरे, यांना कसा काय विसरलो? 

 

- निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे, प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, आसारामबापू, खरगे

 

हे सुद्धा पंतप्रधानपदावर आरूढ होण्यास सुयोग्य आहेत. 


In reply to by श्रीगुरुजी

कुमार केतकर आणि गिरीश कुबेर राहिलेच की.


वरील याद्या मधल्या  बहुसंख्य लोकांची पंतप्रधानां चे चपराशी होण्याची सुद्धा  लायकी  नाही!


In reply to by श्रीगुरुजी

उपरोध तर आपल्या पहिल्या प्रतिसादातच समजला होता 

 

पण कोळसे पाटील. सुमार केतकर,  योगेंद्र यादव,  केजरीवाल, दिपके सारखी  नावे आल्या मुळे  त्यांची लायकी दाखवायचा मोह अनावर झाला.

 

यातील प्रत्येक माणूस फाटक्या चपलेने बडवण्याच्याच लायकीचा आहे. त्यांना पंतप्रधानांचा चपराशी सुद्धा बनवणे चूक ठरेल.     


धागाकर्त्याच्या विनंतीला केराची टोपली दाखवत पहिल्याच प्रतिसादत गुरुजींनी धाग हायजॅक करून टाकला.


पूर्वी योग्य उमेदवार ठरत नसे तेव्हा हत्तीच्या सोंडेत फुलांचा हार देऊन रस्त्याने फिरवत. मग हत्ती ज्याला माळ घालेल तो राजा होत असे. 


दिपकराव,कृष्ण कन्हैया,बोले चुडीया...

अनेक सुयोग्य व्यक्ती आहेत. 

 

बाकी समयोचित धागा आहे.

 


In reply to by कर्नलतपस्वी

कृष्ण कन्हैया म्हणजे कन्हैयाकुमार? तो सुद्धा सुयोग्य आहे. 

 

दिपक, बोले चुडीया कोण? 


मला व्यक्तिशः एकच विरोधी नेता पंतप्रधान व्हायला आवडेल. हा नेता मितभाषी, प्रसिद्धीपासून दूर राहणारा, कार्यक्षम, स्वच्छ, एकही आरोप नसलेला, कधीही वादग्रस्त वक्तव्य न करणारा आहे. 

 

हा नेता ओळखा.


In reply to by श्रीगुरुजी

नवीन पटनायक? पण त्यांचे वय आता ८० आहे आणि प्रकृतीच्या कुरबुरी आहेत.


In reply to by चंद्रसूर्यकुमार

बरोबर. वय ही बऱ्याच सुयोग्य विरोधी नेत्यांची समस्या आहे. २०२४ मध्ये त्यांचा पक्ष विधानसभा निवडणूक हरल्याचे मला दु:ख झाले होते. 


चंद्र बाबू नायडू हा त्यातल्या त्यात चांगला माणूस आहे.

मितभाषी, काम करणारा, प्रशासनाची उत्तम जाण असणारा आणि बेफाट वक्तव्ये न करणारा   


In reply to by सुबोध खरे

तो कधी डावीकडून उजवीकडे उडी मारेल याची शाश्वती नाही. 


In reply to by श्रीगुरुजी

कुणीकडे कां उडी मारेना.. आपल्याला काय? 

चांगला पंप्र झाल्याशी कारण 


नवीन पटनायक आणि चंद्राबाबू नायडू  नक्कीच चांगले नेते आहेत पण पहिल्यांची आधीची जनरेशन आणि दुसऱ्यांची पुढची जनरेशन राजकारणात असल्यामुळे या धाग्यापुरते बाद करूया.

 

शशी थरूर मात्र  राजकीय घराण्यातून नाहीत अद्याप तरी त्यांची मुले राजकारणात आलेली नाहीत त्यांनी स्वत: पक्षांतर्गत लोकशाहीसाठी फुल न फुलाची पाकळी कार्य केले आहे ह्याची सकारात्मक नोंद घ्यावी लागते पण पक्षांतर्गत घराणेशाहीला त्यांचे आव्हान अद्यापतरी मर्यादीतच म्हणावे लागेल.