मेथी पिठले

श्वेता२४'s picture
श्वेता२४ in पाककृती
29 Apr 2018 - 8:47 pm

साहित्य -
१वाटी बेसन
२मीरची चीरून
१०-१२ लसूण ठेचुन
१०-१२ पाने कढीपत्ता
२ चमचे कांदा लसूण मसाला
मीठ , तेल व फोडणीसाठी साहित्य अंदाजे
साहित्य
बेसनमध्यये पाणी व मीठ घालून खूप पातळ करावें. २-३ चमचे तेलात मीरची, कांदा व निम्मा लसुण घालावा

फोडणी
आता त्यात मेथीची पाने घालावी

मेथी घाला

आता थोडी हळद घालून बेसनाचे पाणी घालावे व झाकण ठेऊन मंद आचेवर १०-१२ मी शिजत ठेवावे. दुसरिकडे तडक्ययाची तयारी करावी

बेसन

८-९ चमचे तेल घेऊन त्ययात जीरे मोहरि हिंग कढीपत्ता लसूण घालून चरचरित फोडणी करावी. सर्ववात शेवटी कांदालसुण मसाला घालावा

तडका

लगेच तयार पिठल्ययावर पसरावे
मेथी पिठल
मेथी पिठलं तयार आहे
घ्या की खायला!

पारंपरिक पाककृती

प्रतिक्रिया

manguu@mail.com's picture

30 Apr 2018 - 7:49 am | manguu@mail.com

छान

II श्रीमंत पेशवे II's picture

3 May 2018 - 10:32 am | II श्रीमंत पेशवे II

सोपी आणि सरळ पाकृ ....

मस्त

श्वेता२४'s picture

3 May 2018 - 10:58 am | श्वेता२४

मंगू आणि पेशवे आपण आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद

सस्नेह's picture

3 May 2018 - 11:24 am | सस्नेह

हे थोडे वेगळेच आहे . मी मेथी- बेसन म्हणजे कोरडे पिठले करते. वाटली डाळ असते तसे.

श्वेता२४'s picture

3 May 2018 - 1:35 pm | श्वेता२४

हे पिठले थोडे पातळसर नेहमीच्या पिठल्यासारखेच असले तरी त्यातील मेथीची भाजी व तडक्यामुळे अप्रतीम चव येते. हे पिठले भाकरी व भात दोघांसोबतही चालते त्यामुळे हे पीठले केले की वेगळी भाजी किंवा आमटी करावी लागत नाही

जागु's picture

3 May 2018 - 2:40 pm | जागु

छान.

जागु's picture

3 May 2018 - 2:40 pm | जागु

छान.

शाली's picture

3 May 2018 - 5:27 pm | शाली

मी कधी खाल्ले नाही. करुन पहायला हवे एकदा. शेवग्याच्या शेंगा टाकतो आम्ही बरेचदा.

जुइ's picture

9 May 2018 - 12:04 am | जुइ

सोपी आणि अनोखी पाकृ. कांदा लसूण मसाला नसल्यामुळे नेहमीचा गोडा मसाला घालून बघेन.

श्वेता२४'s picture

9 May 2018 - 10:00 am | श्वेता२४

गोडा मसाला नको कोल्हापुरी चटणी किंवा एव्हरेस्ट / अंबारी चा कांदा लसूण मसाला मिळतो तोच घालावा अगदीच नसेल तर फक्त मिरची पावडर पण चालेल

मेथी किती घ्यायची? साहित्यात मेथी राहिली.

वेगळी पाककृती. नेहमी असे कोरडे पिठले पाहिले आहे. त्यात चिवळ नावाची भाजी टाकतात. मेथी घालून पाहायला हवी.

श्वेता२४'s picture

9 May 2018 - 10:05 am | श्वेता२४

मी एक मोठा बाउल मेथी घेतली आहे आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करता येईल

१)आम्ही पातळ पिठले करताना पीठ पाण्यात मिसळून फोडणीत टाकत नाही.
२) लाल मिरच्या लसुणच्या फोडणीवर चार वाट्या पाणी टाकतो, उकळल्यावर मीठ अंदाजे घालून ( पाणी अर्धे होणार या हिशोबाने) मग त्यावर कोरडे पीठ थोडेथोडे भुरभुरत ढवळत लिहायचे. उकळत असतानाचा पीठ टाकून हलवायचे. दहा मिनीटे शिजेल एवढे पाणी असतानाच पीठ टाकणे थांबवायचे. शेवटी शिजूनही थोडे पातळ सैलसर राहावे. गुठळी होऊ न देणे सवयीने जमते.
३)मग गॅस बंद करून कोथिंबीर टाकून न हालवता टाकून झाकायचे दहा मिनिटे. लसुण कोथिंबिर स्वाद आणि मिरचीचा तिखटपणा छान जमतो.
४) कोथिंबिरऐवजी मेथीपाने टाकता येतील. शेवटी टाकल्याने स्वाद येईल पण कडू होणार नाही.
५) पातळ पिठल्यात कांदा अजिबात घालायचा नसतो. ते झणझणीत न होता गोडसर होते.
६) घट्ट पिठले उर्फ झुणक्यामध्ये पीठ,कांदा,मिरच्या, मीठ, हळद भिजवून( जेमतेम पाणी) फोडणीवर ओतल्यास घट्ट झुणका होतो.

फोटो छान आले आहेत.

थोड्या टंकण चुका झाल्यात.

श्वेता२४'s picture

9 May 2018 - 10:13 am | श्वेता२४

मला मराठी टाईप करायची सवय नाहीय . हळूहळू जमेल तोपर्यंत सांभाळून घेणे
बाकी हा पदार्थ लग्नाआधी मी व माझे अहो यांनी पुण्यात एस पी कॉलेज जवळ गिरिजा नावाचे हॉटेल आहे तिथे खाल्ला होता. त्यानंतर खास हे पिठलं भाकरी खायला आम्ही जात असू
पुणे सोडल तसं यांनी मला हे घरीच ट्राय करायला सांगितलं. मी हि कल्पनेने अंदाज करून केलं आणि चक्क जमलं! आता नेहमीच यांची हे पिठलं करण्याची फर्माईश असते. त्यामुळे मिपावर हि रेसिपी टाकली

कंजूस's picture

9 May 2018 - 12:02 pm | कंजूस

माझ्या खरडीत चुका.