थायलंड - ८ दिवस ट्रिप प्लान (स्वतःच्या फॅमिलीबरोबर जाणार्यांसाठी)

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in भटकंती
8 Apr 2018 - 12:59 am

उपयुक्त साईट्स

विमान बुकिंगसाठी - www.skyscanner.com
हॉटेल बुकिंगसाठी - www.agoda.com
हॉटेल रिव्ह्यूसाठी - www.tripadvisor.com

या सग्ळ्या मी स्वतः वापरलेल्या आहेत :)

रहाण्यासाठी जागा

बँकॉक - खाओसान रोड
फुकेत - बांग्ला रोडच्या जवळ (पण बांग्ला रोडवर नाही :D)
क्राबी - मार्केटच्या जवळ

-------------------------------------------------------------------------------------------------------------
पोहोचण्याचा दिवस (T day) बँकॉक
-------------------------------------------------------------------------------------------------------------

शक्यतो संध्याकाळी ३:३० पर्यंत पोहोचणारे विमान निवडावे...विमानतळावरून बँकॉकला जाण्यासाठी मेट्रो आहे...विमानतळावर चौकशी खिडकीवर मेट्रोचे उतरण्याचे स्टेशन विचारावे
हॉटेलला पोचून फ्रेश होऊन लोकल मार्केटमध्ये चालत फ़ेरफ़टका मारावा आणि त्याचबरोबर लोकल टूर कंपनीकडे दुसर्या दिवशीसाठी (T+१ day) "टायगर टेंपल + फ़्लोटिंग मार्केट + बाकी" (ग्रँड पॅलेस नसलेली) अश्या "फक्त एकदिवसीय" टूरचे बुकिंग करून टाकावे (साधारण माणशी जास्तीत जास्त १२००-२००० दर असावा)...२-४ टूरवाल्यांकडे चौकशी केल्यावर टूरची नक्की किंमत समजतेच (आणि तसाही १००-२०० चाच फरक असतो)...टूरवाले सकाळी हॉटेलवर न्यायला येतात आणि नंतर आणून सोडतात (तरीसुध्धा ही सुविधा आहे की नाही ते नक्की करून घ्यावे)
त्याच बरोबर (T+२ day) च्या संध्याकाळची / रात्रीची फुकेताला जाणार्या ट्रेनचे / बसचे तिकिट बुक करून ठेवावे...ट्रेन / बस दुसर्या दिवशी सकाळी फुकेतला पोचते.

मुख्य सुचना - टूरला जाताना टायगर टेंपलसाठी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत हे आठवणीने विचारावे

-------------------------------------------------------------------------------------------------------------
१ ला दिवस (T+१ day) बँकॉक
-------------------------------------------------------------------------------------------------------------

टूरवाल्यांनी सांगितल्याप्रमाणे कटाक्षाने हलक्या रंगाचे कपडे घालावेत...लोकल टूर कंपनी कडून टायगर टेंपल + फ़्लोटिंग मार्केट + बाकी
टायगर टेंपल हा Once in life time प्रकार आहे...वाघाला हात लावता येतो :) तिथे साधारण २००० रुपये भरले (ग्रुप साठी - जास्तीत जास्त ६ जण एका ग्रुप मध्ये) तर वाघाच्या बछड्याला मांडीवर घेऊन फ़ोटो काढता येतात...नैतर फक्त हात लावता येतो :)

मुख्य सुचना - लहान मुले बरोबर असतील अथवा जरा ज्यादाच आगावू लोक बरोबर असतील तर त्यांना आधीच "शिस्तीत" समजावून टायगर टेंपलमधल्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या सुचना व्यवस्थित पाळायला बजावावे...वाघाला हात लावता येतो पण जर जास्त आगावूपणा केला तर वाघ "ए हा बघा ना मला त्रास देतोय" असे सांगत नाही...वाघ डायरेक्ट मान पकडणार नैतर पंजा मारणार...टायगर टेंपलमधल्या कार्यकर्त्यांचा वास वाघांना ओळखीचा असतो त्यामुळे त्यांना वाघ काही करत नाही परंतु आपण मात्र पहिल्यांदाच गेलेलो असतो...तस्मात काळजी घेणे

जवळपास संध्याकाळचे ६:३०-७:०० होतात परतायला मग संध्याकाळी लोकल मार्केटमध्ये चालत फ़ेरफ़टका कम शॉपिंग...खाओसान रोडला लागूनच खाउगल्ली आहे
रात्र्र रात्री खाओसान रोडवर जीवाचे बँकॉक करावे :)

-------------------------------------------------------------------------------------------------------------
२ रा दिवस (T+२ day) बँकॉक
-------------------------------------------------------------------------------------------------------------

चालत चालत Grand Palace + Sleeping Golden Budhdhaa + जवळची ३-४ टेंपल...५-६ तासात आरामात होते पाहून (इतके चालणे नसेल जमत तर Grand Palace थोडा कमी फिरावा अथवा सरळ बँकॉक सिटी टूर बुक करावी)...सगळ्या जागा एकमेकांपासून चालत ५-१० मिनिटांच्या अंतरावर आहेत...सकाळी ८:३० ला निघून नाश्ता बाहेरच करून निघालेले उत्तम...संध्याकाळी लोकल मार्केटमध्ये चालत फ़ेरफ़टका कम शॉपिंग...रात्री फुकेतला जाणार्या ट्रेन / बस मध्ये झोपून जावे. ट्रेनचे तिकिट भारतातून बुक करता येत असेल तर तसे करावे कारण तिकिटे फार लवकर संपतात.

-------------------------------------------------------------------------------------------------------------
३ रा + ४ था + ५ वा दिवस (T+३, T+४, T+५ day) फुकेत
-------------------------------------------------------------------------------------------------------------

हा दिवस पुर्णपणे तुमचा...फुकेत पायी फिरा...पॅटाँग बीचला वोटरस्पोर्ट करा...बांग्ला रोड + मार्केट...सगळे अगदी लागून आहे...फुकेताला २ समुद्रकिनारे आहेत (२ विरुध्ध बाजूंना)...दोन्ही बाजूंसाठी वेगवेगळ्या Island hopping बोट टूर असतात...दोन्ही साठी बुकिंग करा :)
क्राबीला जाणार असाल तर त्यासाठी सकाळी लवकरच्या बसचे बुकिंग करा...फक्त आणि फक्त सकाळची लवकरचीच बस घ्यावी...फुकेत ते क्राबी हा ३ तासांचा प्रवास अगदी गुळगुळीत रस्त्यांवरून आणि मुख्य म्हणजे अप्रतिम निसर्ग सौंदर्य असणार्या रस्त्यावरून होतो :)

फुकेत मध्ये एकाच Island hopping बोट टूर करणार असाल तर ज्या मध्ये "माया बे" आणि "Twin island" असतात ती टूर करा
फुकेत मध्ये १ दिवस वाचवायचा असेल तर मग बँकॉकमधूनच फ़ुकेतच्या टूरचे बुकिंग करून ठेवा आणि ज्या दिवशी फुकेतला पोचाल त्या दिवशी एक Island hopping बोट टूर करा...पॅटाँग बीचला वॉटरस्पोर्ट त्याच दिवशी संध्याकाळी (उजेड असे पर्यंतच) करता येतील

मुख्य सुचना - बांग्ला रोडवर लहान मुलांना बरोबर नेऊ नका ;)

-------------------------------------------------------------------------------------------------------------
६ वा दिवस (T+६ day) क्राबी
-------------------------------------------------------------------------------------------------------------

सकाळी क्राबीला जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसणारे नजारे डोळ्यात साठवून घ्यावे...फ़ोटो काढायचे भान रहात नाही :)...क्राबी मध्ये पोचल्यावर फक्त आणि फक्त आराम...लोकल मार्केट मध्ये फिरावे :)
क्राबीमध्ये चुकुनही Island hopping बोट टूर करू नये...फुकेत मधून आणि क्राबी मधून एकाच टैपच्या टूर असतात कारण फुकेत आणि क्राबी हे एकाच समुद्राच्या विरुध्ध बाजू आहेत :)
क्राबी मध्ये बघण्यालायक टूर करावी ती एकाच "Ton Sai beach" (http://matadornetwork.com/trips/15-places-to-see-bioluminescence-pics/)

फमिलीसाठी थायलंड इतकेच ;)

प्रतिक्रिया

अरे व्वा छान माहिती दिली!
दोनचार फोटु टाक.

पगला गजोधर's picture

8 Apr 2018 - 6:11 am | पगला गजोधर

अरे वा, २ वर्ष्यापूर्वी टका ला फो न करून , अस्मादिकांनी सल्ला विचारला होता, त्यावेळी त्यानेच अशीच उपयुक्त माहिती दिली होती, त्याची आठवण झाली.
;)

टवाळ कार्टा's picture

9 Apr 2018 - 3:50 pm | टवाळ कार्टा

हा धागा तेव्हाच टाकायचा होता...कामाच्या गडबडीत विसरून गेलेलो

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Apr 2018 - 9:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

उपयोगी माहिती. फोटो हवे होते.

त्या वाघांना इतकं ड्रग्ड करुन ठेवलेलं असतं की खूप वाईट वाटतं. दया येते. ते हल्ला करणं, जबड्यात हात पकडणं सोडाच, धड एक मिनिट मानही वर उचलू शकणार नाहीत इतक्या तीव्र सीडेटिव डोसवर पूर्ण वेळ ठेवलेले असतात. फोटोलाही ढोसकलून मुंडी वर करवली जाते.

सिडेटिव्ह हेवी डोस देऊन वरुन झोपूही न देता दर पाच मिनिटानी फोटोसाठी जागवणं ही फार दयनीय अवस्था आहे. त्या थायलैंडमधल्या वाघांची अशी करुण कहाणी आहे.

बछड्याना तर उपाशी ठेवतात की ज्यामुळे फोटोवेळी ते आसूसून दूध पितात बाटलीतून. पण तेही त्यांना पोटभर मिळत नाही कारण पोटभर दिलं तर पुढच्या फोटोना ते दूध पिणारच नाहीत. म्हणजे इन्कम कमी. म्हणून फोटोपुरते घोट घोट देतात.

असो..

टवाळ कार्टा's picture

9 Apr 2018 - 3:53 am | टवाळ कार्टा

+१११११११११११

आपल्याकडे माकडवाले,अस्वलवाले येत पैसे दिले की नाच करत. नागवाले टोपलीतून नाग आणत. मेनका( मनेका) गांधीने सोडवले बिचाय्रांना.

*त्यांच्याकडून नाच करवत*

पगला गजोधर's picture

9 Apr 2018 - 12:21 pm | पगला गजोधर

त्या वाघांना इतकं ड्रग्ड करुन ठेवलेलं असतं की खूप वाईट वाटतं. दया येते. ते हल्ला करणं, जबड्यात हात पकडणं सोडाच, धड एक मिनिट मानही वर उचलू शकणार नाहीत इतक्या तीव्र सीडेटिव डोसवर पूर्ण वेळ ठेवलेले असतात. फोटोलाही ढोसकलून मुंडी वर करवली जाते.

सिडेटिव्ह हेवी डोस देऊन वरुन झोपूही न देता दर पाच मिनिटानी फोटोसाठी जागवणं ही फार दयनीय अवस्था आहे.

.
वाघ म्हणजे डरकाळी,
वाघ म्हणजे एक फटका दोन तुकडे...
वाघ म्हणजे तिथल्या प्रदेशाचा राजा..
.
गलितगात्र वाघ पाहवत नाही .. जगात कुठेही ..
अगदी इथेही..
.
त्याऐवजी थायलँडला पेंग्विनबरोबर फोटो काढायची सोय आहे का ?

टवाळ कार्टा's picture

9 Apr 2018 - 3:52 pm | टवाळ कार्टा

हा विषय इथे नको हि विनंती

टवाळ कार्टा's picture

9 Apr 2018 - 3:52 pm | टवाळ कार्टा

मि गेलेलो तेव्हा वाघाचा १ बछडा गळ्यात दोरी बांधून ठेवलेला (ड्रग्ड नव्हता)....त्याला हातभर अंतरावरून मोकळ्या जागेत फिरताना बघता आले

अभ्या..'s picture

9 Apr 2018 - 4:04 pm | अभ्या..

बोका असेल रंगवलेला. नीट पाह्यले ना?

विशुमित's picture

10 Apr 2018 - 6:15 pm | विशुमित

हा हा हा..!!
खळखळून हसलो.

पिलांना ड्रग नसावेत करत (मरून जाऊ नये म्हणून). शिवाय ती धोकादायक नसतात.

पण मोठ्या वाघांना करतात.

पगला गजोधर's picture

9 Apr 2018 - 4:28 pm | पगला गजोधर

मी जिथे भेट दिलेली त्या प्राणिशाळेत , वाघांच्या बछड्याना श्वेत डुक्करांच्या पिल्लांबरोबर लहानाचे मोठे करतात,
वाघाचे बछडे डुकरीणीचे दूध पिते , त्यामुळे त्यांच्यातली ऍनीमॉसिटी कमी होते, बछडे माणसाळतात वैग्रे अशे सांगण्यात आलेले ...

टायगर टेम्पल ही क्रूरतेची परिसीमा आहे असे म्हटले तरी चालेल. गविंंनी वर सांगितले आहेच.

इकडे आपल्या शहरांत गायींना चारा देऊन पुण्य मिळवण्याची सोय असते ती फार मजेदार असते. लोक येतात गायवाल्याकडून चारा घेतात आणि गायीला देऊन पाठीवर हात फिरवून डोक्याला लावतात. मग एखादी कार येते. मालक आतूनच खूण करतो- चारावाला गायीला चारा देतो - कारची खिडकीची काच थोडी खाली करून मालक नोट सरकवतो ती गायवाला घेतो - कार निघून जाते. मग दुसरी कार येते.

पगला गजोधर's picture

9 Apr 2018 - 7:42 am | पगला गजोधर

कृपया, धागा लेखकाला कोणी, त्याच्या "थायलंडचे ट्रिपचे" फोटो दाखवण्याची गळ घालू नये.

दिलेल्या जागांचे भरपूर फोटो जालावर आहेतच. गळवगैरे घालणारे आम्ही कोण? बाकी बय्राच ठिकाणी टका स्वत: गेलेला आहे. प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो.

चौकटराजा's picture

9 Apr 2018 - 9:55 am | चौकटराजा

मी जी थायलंडची ट्रीप केली आहे त्या बाबत खुलासा-- जालावरचे " थायलंड" असा सर्च दिला की जे फोटो येतात ते माझेच आहेत. मी फक्त त्या फोटोत दिसत नाही . कारण ज्याने माझे फोटो काढले त्याची ती चूक वा शैली आहे. बाकी प्रवास वर्णन नंतर जालावर वाचून टाकतो. हा का ना का !!

कंजूस's picture

9 Apr 2018 - 10:54 am | कंजूस

पाण्याने शिंतोडे उर्फ वाटरमार्क टाकले नाहीत का?

फॅमिली टूरसाठी प्लान परफेक्ट आहे.
यात रेस्टोरेंट ट्रेलचा भाग ऍडवता येईल - त्यांच्याकडे फूड आणि थीम रेस्टोरेंट ह्याबद्दलची कल्पकता जबरदस्त आहे.

कपिलमुनी's picture

9 Apr 2018 - 12:49 pm | कपिलमुनी

विमान प्रवास वगळता किति खर्च येतो ?

स्वतःच नीट प्लान केल्यास २५ हजारात ४ ते ५ दिवसांची टूर बसवता येते. तसा स्वस्त देश आहे. स्ट्रीट फूड (कोंकणस्थी चिकट गोळाभात इत्यादि) खाऊन राहायचं ठरवल्यास आणखी कमी.

अनेक भारतीय टूर्सच्या खर्चापेक्षा थायलैंड स्वस्त पडतं.

प्रचेतस's picture

9 Apr 2018 - 12:58 pm | प्रचेतस

आणि 'तो' खर्च साधारण किती येतो?

गवि's picture

9 Apr 2018 - 1:04 pm | गवि

बावीस तेवीस ह.

+-

प्रचेतस's picture

9 Apr 2018 - 1:55 pm | प्रचेतस

दुप्पट आहे हो अलमोस्ट :(

पगला गजोधर's picture

9 Apr 2018 - 1:59 pm | पगला गजोधर

ऑन सिझन / ऑफ सिझन दरात फरक होऊ शकतो

दुप्पट आहे हो अलमोस्ट :(

तुम्हाला निम्म्यात म्हणजे ११-१२ हजारात फॉरेन ट्रिप पाहिजे? तुम्ही ना बेडसे किंवा भाजे लेणी बघून या.

प्रचेतस's picture

9 Apr 2018 - 3:08 pm | प्रचेतस

हे वायलं, ते वायलं...

टवाळ कार्टा's picture

9 Apr 2018 - 3:09 pm | टवाळ कार्टा

वल्ल्याने काय विचारले ते एकतर कोणाला समजले नाही अथवा समजून न समजल्यासारखे केले आहे =))

अभिजीत अवलिया's picture

9 Apr 2018 - 3:14 pm | अभिजीत अवलिया

:)

टवाळ कार्टा's picture

9 Apr 2018 - 3:11 pm | टवाळ कार्टा

लेण्यांत फक्त दगडी सौंदर्य असते =))

प्रचेतस's picture

9 Apr 2018 - 3:51 pm | प्रचेतस

तरीही सौंदर्यच ते.

लेण्यांत फक्त दगडी सौंदर्य असते =))

या लेण्याद्रीला कुठे मृदु सौंदर्य आणि स्पर्श कळणार?

अष्टविनायकातला जरासा वेगळा लेण्याद्री आठवला.
वल्लोबा पण आहेच आमचा जरा.....वेगळा....वेगळा.........

वरुण मोहिते's picture

9 Apr 2018 - 3:57 pm | वरुण मोहिते

सविस्तर खर्च सांगतो 'तो' खर्चाचा

टवाळ कार्टा's picture

15 Jun 2019 - 8:46 pm | टवाळ कार्टा

कधी सांगणार?

अनुप ढेरे's picture

9 Apr 2018 - 4:21 pm | अनुप ढेरे

क्राबीत थाई मसाज घ्यावा. स्वस्त आहे. एक तासाचा फुट मसाज ३०० का ४०० रु पडतो. उत्तम असतो.

टवाळ कार्टा's picture

9 Apr 2018 - 6:03 pm | टवाळ कार्टा

जवळपास सगळीकडे रेट सारखाच असतो

आयुष्यात कधी फॅारनला गेलोच तर १) कोस्टा रिका, २) इजिप्त, ३)मेक्सिको ४)पापुआ न्यु गिनी.

अर्धवटराव's picture

24 Apr 2018 - 1:32 am | अर्धवटराव

मेक्सीको अफाट सुंदर आहे. अवष्य बघा. पिरॅमीड्स, कॉपर कॅन्यन, मायन्स प्रदेशातले समुद्रकिनारे... चिक्कार आहे बघण्यालायक. पण सध्या तो देश नशापाणि सम्राटांच्या ताब्यात गेल्यासारखा आहे :(

मालोजीराव's picture

11 Apr 2018 - 5:43 pm | मालोजीराव

फॅमिली साठी खाओसान अयोग्य जागा आहे ... साथोर्न,सिलोम किंवा सुखूमवित भागात राहावे , BTS (स्कायट्रेन) आणि MTR (मेट्रो) जवळ आहेत इथून

टवाळ कार्टा's picture

11 Apr 2018 - 6:22 pm | टवाळ कार्टा

फॅमिली म्हणजे पार्टनर - मुले

पगला गजोधर's picture

11 Apr 2018 - 7:24 pm | पगला गजोधर

फॅमिली म्हणजे पार्टनर - मुले

म्हणजे
पार्टनर व (तिची/त्याची, स्वतः ची / आणि दोघांची कंबाईन ) मुले ?????

टवाळ कार्टा's picture

11 Apr 2018 - 8:34 pm | टवाळ कार्टा

पार्टनर मायनस मुले असे वाचायचे आहे ते

पगला गजोधर's picture

11 Apr 2018 - 9:07 pm | पगला गजोधर

"पार्टनर"ला घेऊन कुठं जायचं तर "थायलंड"ला...
हम्म...
"थायलंड"ला जायचं तर कोणाला बरोबर घेऊन तर "पार्टनर"ला ...
हम्म....
कुछ तो गडबड है दया . .....

तुमचा पार्टनर काय म्हणतोय तुमच्यासोबत थायलंड ट्रिप करुन.
पुढल्यावेळी पार्टनरीण बघा.

पगला गजोधर's picture

12 Apr 2018 - 3:51 pm | पगला गजोधर

म्हणजे इथेच बघायची, की तिकडे जाऊन ?

आता तो टक्कॉजीरावांचा प्रश्न आहे.

टवाळ कार्टा's picture

14 Apr 2018 - 1:04 am | टवाळ कार्टा

अरेरे...मिपा परंपरेला धरून इथेही वैयक्तीक प्रतिसाद सुरु झाले...ज्जा तुम्हाला "तसल्या" थायलंडचा योगच नै येणार.......ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ