असा पिझ्झा बेस द्या मज आणुनि
सजविन मी जो चीझ टॉपिंगज् ने
बेक करुनि त्यास ओव्हन मध्ये
खाईन मी तो आनंदाने
थिन क्रस्ट वा थिक असो वा
मिट असो वा मिटलेस असो वा
शर्करावगुंठित सोडयासंगे
खाईन मी तो आनंदाने
हाय कॅलरी लो फायबर
तयाला एक्स्ट्रा चिजचा थर
पोषणमूल्ये असो नसो वा
खाईन मी तो आनंदाने
मिट लव्हर्स वा मार्गारिटा
वरती एक्स्ट्रा चीझ मारा
नानाविध टॉपिंग्ज संगे
खाईन मी तो आनंदाने
चीज असो वा व्हेजि असो वा
स्मॉल मीडियम लार्ज असो वा
चिकन टिक्का वा चिकरोनी
खाईन मी तो आनंदाने
चीज-न-कॉर्न, मार्गारिटा
पेरी-पेरी अथवा फियेस्टा
पॅराडाईज वा पनीर मखानी
खाईन मी तो आनंदाने
पनीर तंदुरी, चिकन विंग्ज
अन गार्लिक चिझी स्टिक्स
नानाविध सॉस संगे
खाईन मी तो आनंदाने
मिरीण्डा पेप्सी किंवा कोला
बेसिल पेस्टो वा मोझरेला
काँडिमेंट्स हे अकम्पनीला
खाईन मी तो आनंदाने
नकोच टॉपिंग्ज, नकोच बेस
तयार आयता पिझ्झा बेस्ट
मेड टू ऑर्डर पिझ्झेरियातुनी
तयार पिझ्झा द्या मज आणुनी
फस्फसत्या त्या पेय्या संगे
खाईन मी तो आनंदाने
भेदून टाकीन सारी वसने
फास्ट फूडच्या मेदवृद्धीने
केशवसुत _/\_
प्रतिक्रिया
5 Apr 2018 - 3:06 pm | अत्रुप्त आत्मा
5 Apr 2018 - 3:13 pm | गवि
श्री. केशवसुत्ताले वरिजिनल करवियले.. श्री. चामुंडराये पिझ्झायै करवियले.
5 Apr 2018 - 7:05 pm | सूड
=))
6 Apr 2018 - 3:33 pm | डॉ सुहास म्हात्रे
=))
7 Apr 2018 - 3:02 am | चामुंडराय
श्री गगनविहारीले कॉमेन्ट लिखवियले ...
श्री मिपाकराले एन्जॉय करवियले...
8 Apr 2018 - 2:02 am | चामुंडराय
ऑल पिझ्झा बॉईजचे आभार्स.
आपल्या तोंडात पिझ्झा पडो हि सदिच्छा. :)