✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सप्तश्रृंगी देवी

प — पाषाणभेद, Sat, 03/03/2018 - 01:41
सप्तश्रृंगी देवी काल रातीला देवी माझ्या सपनात आली गड देवीचा चढायाला सुरूवात मी गा केली || धृ || रडतोंडीचा घाट होता लई अवघड पाहून छातीमधी बाई व्हयी धडधड रस्त्यामुळं नांदूरीगड चढण आता सोपी झाली ||१|| अठरा शस्त्रे घेतले तू ग अठरा हातामधी सौभाग्याचे अलंकार तुझ्या अंगावरती महिषासुर मारी तू आदिमाया शक्तिशाली ||२|| विडा तांबूलाचा खावूनी मुखी रंगला सप्तश्रृंगीच्या पायी जीव माझा दंगला देवी माझी सोळा शिणगार ग ल्याली ||३|| कुंकवाचा मळवट भरला देवीच्या कपाळी अकरा वार साडी नेसूनी अंगावर चोळी घाई करा दुपारच्या आरतीची वेळ आता झाली ||४|| - पाषाणभेद

प्रतिक्रिया द्या
4397 वाचन

💬 प्रतिसाद (9)

छान !

चौथा कोनाडा
Sat, 03/03/2018 - 13:15 नवीन
छान ! तिथं आता रोप वे झालाय असं ऐकलंय, त्याचा उल्लेख नाही केलात का या भक्तीगीतात ? सप्तशृंगी माता की जय !
  • Log in or register to post comments

झैरात

चांदणे संदीप
Sat, 03/03/2018 - 15:12 नवीन
रोप वे चं माहित नाही पण तिथल्या स्कायवॉकचं 3D कन्सेप्ट मी केलं होतं बऱ्याच वर्षापूर्वी. ज्यावरून नंतर तो प्रत्यक्षात बांधला गेला. (काळा गॉगल घातल्याची स्मायली) ;) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

रोप वे टाकला होता पहिल्याच

पाषाणभेद
Sun, 03/04/2018 - 23:42 नवीन
रोप वे टाकला होता पहिल्याच कडव्यात पण मिटरमध्ये बसत नव्हता. म्हणून काढून टाकला. रच्याकने, रोपवे ज्या कंपनीने बांधला त्याचे उपकंत्राटात काम माझ्या चुलत भावाने केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

छान....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 03/03/2018 - 13:23 नवीन
आरती आवडली. बोलो, सप्तशृंगी माता की जय ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मस्तच हो पा.भे. साहेब. केव्हा जाउन आलात ?

दुर्गविहारी
Sat, 03/03/2018 - 19:21 नवीन
मस्तच हो पा.भे. साहेब. केव्हा जाउन आलात ? ;-)
  • Log in or register to post comments

छान

manguu@mail.com
Sat, 03/03/2018 - 21:59 नवीन
छान
  • Log in or register to post comments

रोपवे हवी कशाला?

बापू मामा
Mon, 03/05/2018 - 00:14 नवीन
सप्तशृंगीला जायला रोपवे हवी कशाला? भक्तीभाव पाहिजे
  • Log in or register to post comments

मामा रोपवे खरोखरचा रोपवे

पाषाणभेद
Mon, 03/05/2018 - 03:00 नवीन
मामा रोपवे खरोखरचा रोपवे नाहीये. फनीक्यूलर ट्रॉली आहे ती. अन ती फक्त पायथा ते मंदिर अशी आहे. इतर पर्यटनस्थळी असते तशी मौज मजेसाठी नाही. अन दर्शन घेणे अन ट्रॉलीत बसणे दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. रच्याकने, अजून फनीक्यूलर ट्रॉली चालू झालेली नाही. हे बघा: https://www.youtube.com/watch?v=z5nrWT2zIe8
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापू मामा

नाशिक आजोळ आणि सप्तशृंगीमाता

प्रचेतस
Mon, 03/05/2018 - 09:04 नवीन
नाशिक आजोळ आणि सप्तशृंगीमाता आजोळची कुलदेवता असल्याने खूपदा ह्या परिसरात येणे झाले आहे. सप्तशृंगी परिसर खरोखर प्रचंड सुंदर आहे. गडाचा एकदम लांबलचक पण अतिशय निरुंद कडा अगदी अंगावर येणारा भासतो. दरेगावचे पाटील कुठल्या मार्गे हा कडा चढून वर ध्वज लावतत हे अजूनही उलगडत नाही. शीतकड्यावरुन समोरची अजिंठा सातमाळा रांग खूप छान दिसतो, समोरचा मार्कंड्या, मोहनदरीचे आरपार छिद्र, रवळ्या-जवळ्या, धोडपची खाच, इखारा लै भारी दिसतात. खूप पूर्वी शीतकड्याजवळच्या उभ्या वाटेने मार्कंड्या आणि सप्तशृंगीच्या खिंडीत उतरलो होतो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा