प्रीती तुझ्यावरी पण...
प्रीती तुझ्यावरी पण,समजे मलाच नाही.
या अनाकलनाचा,मी काय अर्थ घ्यावा?
शब्दात सांगताना,उरते मनात काही.
या गूढ शांततेचा,मी काय अर्थ घ्यावा?
एका किनारी तूही ,दुसय्रास स्पर्श माझा.
मधल्या प्रवाहितेचा,मी काय अर्थ घ्यावा?
मोडून एक काठ,वळते नदी जराशी.
मग शांत त्या तळाशी,कोठून सूर द्यावा?
जमले मनावरी हे, शेवाळ दाट सारे.
गहिरे कसे म्हणू मी?निसटंताचं अर्थ व्हावा!
आता मनावरूनी, सोडून देतं सारे.
दिसली फुले जरी ही,निरं-माल्य अर्थ व्हावा!
सोडून काय देऊ? सारेच क्षणभराचे.
हे रोजचेच आहे, साधाच अर्थ घ्यावा.
थांबवू कशास मग मी? या नित्य काव्यगतीला?
या लख्ख वर्तमानी,आता विराम घ्यावा.
=============================
अतृप्त..
या कवितेचा काय अर्थ घ्यावा?
वाहव्वा अत्रुप्तजी आत्मा...!!
वाहव्वा प्र चेट्सजी अगोबा,
गुर्जेश, फुल्ल विडंबनाचा
कवितेच्या नावावरुनच कळते, ही
विराम कशाला?
अतृत्प आत्मा एकदाचा व्यक्त
* युट्यूब लिंकेखालील ओळी
मस्त हो.....
खूप छान कविता आहे
:-)
व्वा व्वा, व्वा व्वा, !
दुत्त दु त्त!
=))
मस्त आवडली...
(No subject)
गुर्जींनी अत्रुप्त, अता असं न
बुवा
सर्वांसी धन्यवादम् !
व्वा गुर्जी, कविता आवडली.